फसवणूक टाळण्यासाठी नोटीस, आदेशाची पडताळणी करा - राज्यकर उपायुक्त संजय मोटकर

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का):- वस्तू व सेवा कर कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या नावे जर कोणत्याही प्रकारची नोटीस तसेच आदेशाची प्रत प्राप्त झाल्यास सदर नोटीस अथवा आदेश यांची ऑनलाईन तसेच संबंधित कार्यालयात संपर्क करून प्रथम पडताळणी करून घ्यावी. त्यानंतरच आपले म्हणणे कार्यालयास योग्य मार्गाने सादर करावे, जेणेकरून आपली होणारी फसवणूक टाळता येऊ शकते, असे आवाहन वस्तू व सेवा कर कार्यालय ओरोस, सिंधुदुर्ग चे राज्यकर उपायुक्त संजय मोटकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यापा-यास अज्ञात इसमामार्फत मिळालेल्या GST बनावट आदेश प्रकरणाच्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात येत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'