Posts

Showing posts from 2024

'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गचा समावेश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उ‌द्योगाचा समावेश झाला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य अणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India चे सहाय्यक व्यवस्थापक ताशी दोरजी शेर्पा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पडताळणी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संगणकीय साद्रीकरण केले. त्यावेळी काजू आणि काजू उत्पादनाबाबत व काजू प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली. "वेंगुर्ला काजू" यांस सन 2018 मध्ये जीआय (GI) मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72000 हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड झालेली आहे. देशामध्ये काजूप्रक्रियामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, असेही श्री.पाटील म्हणाले. याबाबत में रुक्मीणी फूडस, हुमरस या उद्योग घटकास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी काजू उत्...

निर्यात प्रचालन कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- जिल्हा उद्योंग केंद्रामार्फत जिल्ह्यातील निर्यात प्रचालन कार्यशाळा शुक्रवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार 'राज्यामध्ये निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोजगार निर्मितीचे लक्ष साध्य करण्यासाठी आणि निर्यात वाढीला प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनवण्यासाठी राज्याकडून केंद्र शासनाच्या जिल्हा हे निर्यात केंद्र उपक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात प्रचालन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमास सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम घटक निर्यातदार, निर्यातक्षम उ‌द्योजक, नवउ‌द्योजक, औ‌द्योगिक संस्था व संघटना, औ‌द्योगिक समूह, औ‌द्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे ...

करुळ घाटाची केली पाहणी एकेरी वाहतूक १५ जानेवारी पर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्न करा -मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

· १० जानेवारीला पुन्हा कामाची पाहणी करुन निर्णय घेणार · दर्जेदार कामाबरोबर घाट मार्गाची सुरक्षितता तितकीच महत्वाची · संरक्षक भिंतीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा सिंधुदुर्ग दि. १२ (जिमाका) वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहत आहोत. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (safety norms) प्राधान्य देत दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच घाटाच्या दुरूस्तीचे उर्वरित काम युद्ध पातळीवर पूर्ण करा. प्रवासी सुरक्षितेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. १५ जानेवारी पर्यंत घाट मार्ग चालू होणार असे संबंधित विभागाकडून सांगितले जात आहे. मात्र १० जानेवारीला पुन्हा घाट मार्गाची पाहणी करण्यात येईल. काम समाधानकारक झाल्यानंतरच १५ जानेवारीपासून एकेरी मार्ग (वैभववाडी ते कोल्हापूर) चालू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यंत्रणांनी त्या अनुषंगाने वेगाने काम करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. करूळ घाट मार्गाची श्री ...

सावंतवाडी येथे होणारा शेतकरी मेळावा पुढे ढकलला

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सन 2024-25 मधील चांदा ते बांदा योजनेंतर्गत दि. 28 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद सभागृह सावंतवाडी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा शेतकरी मेळावा पुढे ढकलण्यात येत आहे, असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. ०००००

सागरी मत्स्यव्यवसाय, नौका नयन, डिझेल इंजिनची देखभाल आणि परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. यामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौका नयन व डिझेल इंजिनची देखभाल आणि परिचलण या बाबींचा समावेश आहे. प्रशिक्षण सत्र दिनांक 1 जानेवारी 2025 पासून सुरु होत आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग- मालवण येथे हे प्रशिक्षण पार पडणार आहे. प्रशिक्षण सत्रासाठी जिल्ह्यातील मच्छिमार युवकांनी दि.31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र. मालवणकर यांनी दिली आहे. तपशील पुढीलप्रमाणे:- प्रशिक्षण कालावधी :- दि. 1 जानेवारी ते 30 जून 2025 आवश्यक पात्रता:- उमेदवारांचे वय 18 ते 35 असावे, (आधार कार्ड व रेशन कार्डची छायांकित प्रत जोडणे). उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक) क्रियाशील मच्छिमार असवा, (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.), उमेदवारास पोहता येणे आवश्यक. प्रशिक्षण शुल्क :- सहा महिन्याचे रु. 2 हजार 700/- मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. 60...

चांदा ते बांदा योजनांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या चांदा ते बांदा योजनांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. या अनुषंगाने दि. 28 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद सभागृह सावंतवाडी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये मोठ्या संख्यने शेतऱ्यांनी उपस्थित रहावे. चांदा ते बांदा अंतर्गत राबविण्यात येत असणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे, आंबा जुन्या फळबागांचे पुनरुजिवन, आंतरपिक पध्दतीने मसाला पिकांचा क्षेत्र विस्तार करणे, कोकम, करवंद, जांभूळ व फणस क्षेत्रातवाढ करणे. अटी, शर्ती पुढीलप्रमाणे :- कषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून लाभार्थ्यांची निवड व अनुदान देण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपले अर्ज दि. 28 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद सभागृह सावंतवाडी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये किंवा 31 डिसेंबर 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल. ...

'राष्ट्रीय ग्राहक दिन' उत्साहात संपन्न ग्राहकाने जागरुक असावे -जिल्हाधिकारी अनिल पाटील

· ऑनलाईन खरेदी करातना सावधानता बाळगा · फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करा सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा यांचे प्रमाण जाणून घेण्याचा, माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच गैरफायदा विक्रेते घेतात त्यामुळे ग्राहकाने नेहमी जागरुक राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तहसिलदार कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यक्रम सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती आरती देसाई, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, एस.एम. पाटील, श्री गोवेकर, श्री खाडीलकर, डॉ. नवांगुळ, आदी उपस्थित होते. कार्यक्रमांच्या वेळी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेबरोबरच भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते व ग्र...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभार्थ्यांनी प्रस्ताव कागदपत्रांसह सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सन 2019 मध्ये सुरु करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांना 2 हजार रुपये दर तीन महिन्यांनी म्हणजेच वर्षाला 6 हजार रुपये निधी मिळत आहे. 18 व्या हप्त्याचा जिल्ह्यात 1 लाख 20 हजार 285 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात 46 हजार 537 लाभार्थी हे विविध कारणांमुळे अपात्र करण्यात आलेले आहेत. यामध्ये देवगड 4 हजार 730, दोडामार्ग 3 हजार 678, कणकवली 5 हजार 215, कुडाळ 8 हजार 942 मालवण, 5 हजार 5, सावंतवाडी 13 हजार 173, वैभववाडी 3 हजार 754 व वेंगुर्ला 2 हजार 43 एवढे अपात्र लाभार्थी आहेत. अपात्र लाभार्थीच्या याद्या कृषी सहाय्यकांमार्फत ग्रामपंचायत कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या याद्यामधील पात्र लाभार्थींनी आपले प्रस्ताव 7/12, 8अ, फेरफार, आधारकार्ड (पती/पत्नी/18 वर्षाच्या आतील मुले) या कागदपत्रांसह कृषी सहाय्यकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. जेणेकरुन पात्र लाभार्थी यांची पडताळणी करुन त्यांचे प्रस्ताव ...

एक लाख थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- वसंतराव नाईक मुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत कै.पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुख्य कंपनी सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत 1 लाख थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. तरी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पोपट गिते यांनी केले आहे. सन.2024-2025 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 1 लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने रू.2,085/- चा नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित हप्त्यावर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. तशेच 25 टक्के बीजभांडवल कर्ज योजना, ऑनलाईन योजनामध्ये वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.10 लाखापर्यंत) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लाखापर्यंत या योजनेचा समवेश आहे अशे पत्रकात म्...

राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- राष्ट्रीय ग्राहक दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु यावेळी तालुक्याला प्राधान्य मिळण्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सावंतवाडी तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लतीफ बेग गार्डन हॉल कोलगांव सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे. ०००००

'सुशासन सप्ताह' निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करा -जिल्हाधिकारी अनिल पाटील

· अधिकाऱ्यांना हक्काप्रमाणेच कर्तव्यांची जाणीव असावी · कामाचे काटेकोर नियोजन आवश्यक · प्रशासनाने जनतेपर्यंत पोहचावे सिंधुदुर्गनगरी दि २३ (जिमाका):- जनकल्याणाच्या अनेक योजना शासन राबविते. काही वेळा नागरिकांना योजनांची माहिती नसते आणि माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचत नाही. पर्यायाने योजनांचा उद्देश सफल होत नाही. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. स्थानिक पातळीवर अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. 'सुशासन सप्ताह' निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत, तसेच सर्व विभागांचे...

अंतर्गत तक्रार निवारण समितीची तात्काळ स्थापणा करावी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- महिलांच्या सुरक्षेतीसाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 पारित करण्यात आलेला आहे. यामध्ये कामाच्या ठिाकणी अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रकारच्य औद्योगिक, व्यापारी आस्थापना, खासगी आस्थापना जिथे 10 किंवा 10 पेक्षा जास्त कामगार आहेत त्याठिकाणी या समितीची स्थापना तात्काळ करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे. राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य, यांच्या "महिला आयोग आपल्या दारी " हा कार्यक्रम व जनसुनावणीमध्ये आयोगाने अंतर्गत तक्रार निवारणी समितीच्या स्थापनेवर भर दिला असून आयोगाव्दारे समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्थापन केलेल्या समितीचे नाव व त्यांच्या कार्यकाळ इ. माहिती आपल्या आस्थापनेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करुन ती सर्व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे. व त्याची प्रत सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयाच्य Sindhudurgglo@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवण्यात यावी, असे आव...

वरिष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीड स्पर्धा 2025 खुल्या राज्य निवड चाचणीसाठी उपस्थिती राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- वरीष्ठगट राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद क्रीड स्पर्धा 2025 खुल्या राज्य निवड चाचणी चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय गुलटेकडी पुणे येथे दि. 26 डिसेंबर 2024 सकाळी 8 वाजता व्हॉलीबॉल खेळाच्या खेळाडूंना (पुरुष/ महिला) उक्त निवड चाचणीकरीता उपस्थित राहण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक, युवराज नाईक यांनी केले आहे. राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल या खेळप्रकारातील अधिकृत एकविध खेळ संघटना कार्यरत नसल्याने भारतातील व्हॉलीबॉल खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम सुरळीत सुरु रहावे यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनव्दारा ॲडहॉक समितीची नियुक्त करण्यात आली आहे. ॲडहॉक कमिटी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याव्दारे दि. 7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत जयपूर राजस्थान या ठिकाणी सन 2025 मधील वरीष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्तावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याची जबाबदारी आयोजन समितीस देण्यात आलेली आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे निवड चाचणीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला ...

विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या mpsc.gov.in व mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती आयोगाचे अवर सचिव र.प्र. ओतारी यांनी कळविली आहे. शासन सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. हे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आयोगाच्या व विविध संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकाची प्रत संबंधित संस्थांना पाठवून याबाबत दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. 00000

स्थानिक तक्रार समिती सदस्यत्वासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीचा 3 वर्षाचा कार्यकाल संपुस्टात आल्याने नवीन समिती गठीत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात महिला केंद्रित विषयांचे अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या पात्रतेच्या इच्छुक व्यक्तींनी 23 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६३- २२८८६९), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे शैक्षणिक कागदपत्रे, सविस्तर कार्य व महिला प्रश्न विषयक कामाचा अनुभव, मिळालेले पुरस्कार इ.चा उल्लेख करून आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिकारी (District Officer) तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. केंद्र शासनाचा कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम,2013 लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम दि.९.१२.२०१३ निर्गमित करण्यात आले आहेत. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्यादृष्टीने 10 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या सर्व खाजगी, शासकीय, निमशासकीय, कार्यालच्या ठि...

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत 'जनसुनावणी' महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला आयोग प्रयत्नशील -राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर

· तक्रार निवारण समिती नसलेल्या आस्थापनांवर तात्काळ कारवाई करा · सिंधुदुर्ग जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित · १२० तक्रांरीवर तात्काळ कार्यवाही सिंधुदुर्गनगरी दि १९ (जिमाका):- महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. यासाठीच महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत 'जनसुनावणी' हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्या जवळून जाणून घेण्यात येत असून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले. आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित 'महिला आयोग आपल्या दारी' कार्यक्रमातंर्गत जनसुनावणीच्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, माविमच्या सदस्य सचिव श्रीमती माया पाटोळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, माविमचे जिल्हा समन्वयक नितीन काळे आदी उपस्थित होते. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आय...

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त

नागपूर,दि. 19 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ....

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवरती अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. जिल्ह्यामधील महाविद्यालयात इ.11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी, व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणेविषयीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी दिनांक 16 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. तथापी, या योजनेबाबत जास्त प्रमाणात अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी न केल्याने अशा विद्यार्थ्यासाठी 31 डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती या प्रमाणे आहे. व...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 20 जानेवारी ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत कोर्स (CDS) क्र. 64 आयोजित करण्यात येत आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि. 13 जानेवारी 2025 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS -६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एस. एस. बी. वर्गामध्...

जिल्हा कोषागार कार्यालयात पेन्शनर्स डे संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- पेन्शनर्स डे साजरा करण्याच्या निमित्ताने निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधता आला. पेन्शनर्सना सर्व निवृत्तीवेतन विषयक लाभ यापुढेही नियमित देण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय प्रयत्तशील राहील असे प्रतिपादन अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) संजय घोगळे यांनी केले. जिल्हा कोषागार कार्यालयात आलेल्या पेन्शनर्स डेच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कोषागार आणि निवृत्तीवेतनधारक ऋणानुबंध या विषयाच्या माध्यमातून त्यांनी निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला. पेन्शनर्स डे च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काव्यरंग या कार्यक्रमात राजेंद्र कदम, मनोहर सरमळकर, नंदकिशोर गंगावणे, प्रभाकर तेली या निवृत्तीवेतनधारकांनी कविता सादर केल्या. तर निवृत्तीवेतनधारकांचे मनोगत या सत्रात अनेक निवृत्तीवेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. तसेच या निमित्ताने निवृत्तीवेतनधारकांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. मागील मेळाव्याच्या इतिवृत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- शेतीला लागणाऱ्या पाण्याची गरज विचारात घेऊन सन 2016-2017 पासून अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. यायोजनेंत दिनांक 01 आक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नविन घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. ही सुधारीत योजना 2024-2025 या वित्तीय वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या योजनेचा लाभ जिल्ह्यांतील अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. बाब व उच्चतम अनुदान मर्यादा (रु.) पुढीलप्रमाणे :- नवीन विहिर- 4 लाख, जूनी विहिर दूरस्ती- 1 लाख, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण – 2 लाख, इनवेल बोअरिंग- 40 हजार, वीज जोडणी आकर- 20 हजार, पंप संच- 40 हजार, सोलर पंप- 50 हजार, एचडीपीई/ पीव्हीसी पाईप- 50 हजार, तुषार सिंचन- 47 हजार, ठिबक सिंचन संच पूरक अनुदान- 97 हजार, यंत्रसामुग्री (बैलचलित, ट्रक्टर चलित अवजार)- 50 हजार, परसबाग- 5 हजार. वरील योजनेमध्ये लाभार्थी पात्रतेच्या अटी प...

शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता बँ.नाथ पै‍ शिक्षण संस्था, एम.आय.डी,पिंगुळी ता. कुडाळ येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती नितीन बोरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पुजार, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिल चे अध्यक्ष ॲङ संग्राम देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ परिमल नाईक आदी उपस्थितीत राहणार आहेत. ०००००

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते दु.2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जनसुनावणी. दुपारी 2 ते 2.30 राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता जिल्हा आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4 वाजता पत्रकार परिषद. सायं. 4 ते 6 वाजता महिला संघटना बैठक. सायं.6 वाजता सिंधुदुर्ग येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. ००००००

एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 17 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, व उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ सिंधुदूर्ग यांच्यामार्फत मुदती कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थीनी "ओबीसी" महामंडळाच्या जिल्हा कार्यालय सिंधुदुर्गमार्फत सर्व योजनांमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थीना संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे व महामंडळाच्या नवीन कर्ज योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ज...

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 17 (जिमाका) :- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा योजना राबविल्या जातात. तरी इच्छुक व गरजू इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळ व संत काशिबा गुरव युवा विकास महामंडळाच्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना, ऑफलाईन योजना या योजनेत कर्जाची मर्यादा ही रु. 5 लक्ष इतकी आहे. उमेदवाराचे वय 18 ते 50 पर्यंत असणे आवश्यक आहे. कर्जाच्या परतफेडीचा कालवधी मुदत 5 वर्षे आहे. या योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी सहभाग हा 5 टक्के असतो. महामंडळाच्या सहभागावरील कर्ज रकमेवर द.सा.द.शे 6 टक्के...

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. १७ (जिमाका) :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत 25 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजनेंचा विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) जमातीतील गरजू लोकांनी या याजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवथ्यापक पोपट गिते यांनी केले आहे. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील सामाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.१.०० लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व २५ टक्के बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १०.०० लक्ष ते ५०.०० लक्ष पर्यंत) या योजनांचा समा...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 30 डिसेंबर ते 08 जानेवारी 2025 या कालावधीत कोर्स (SSB) क्र. 60 आयोजित करण्यात येत आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दि. 24 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-६० कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एस. एस. बी. वर्गाम...

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी 1 हजार 125 प्रकरणे निकाली

सिंधुदुर्गनगरी दि. 16 (जिमाका) :- राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी 1 हजार 125 प्रकरणे निकाली काढण्यात आले. या प्रकरणातील एकूण तडजोडीची रक्कम रुपये 3 कोटी 45 लाख 71 हजार अशी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांच्यातील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एच .बी. गायकवाड,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी सर्व तालुका न्यायालयात प्रत्येकी एक पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमण्यात आले होते. पॅनेल क्र.1 मध्ये जिल्हा न्यायाधीश-1 श्रीम. एस. एस. जोशी व अति. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग व विधीज्ञ संकेत नेवगी यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.2 मध्ये दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) श्रीम. व्ही. आर. जांभुले, व मुख्य न्य...

जागतिक मानवी हक्क दिन संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक मानवी हक्क दिन संपन्न झाला. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, श्री. गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. बोर्डवे आश्रमशाळेचे मुख्यध्यापक आनंद कर्पे, यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.जिल्हा सामान्य प्रशासन विभागचे श्री. गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना मानवी हक्क दिनाबात माहिती दिली. समातादूत (प्रमूख वक्ता) सगुण जाधव यांनी मानवी अधिकार व संविधान याबाबत मार्गदर्शन केले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, यांनी मानवी हक्क दिनाबाबत माहिती दिली. त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधिक्षक श्रीम. शलाका तांबे, यांनी मानवी हक्क दिनाबाबत थोडक्यात माहिती दिली. उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास सहाय्यक आयुकत, समाज कल्याण कार्यालय, विविध महामंडळ...

'महिला आयोग आपल्या दारी' महिलानी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका) :- राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीची जनसुनावणी गुरुवार दि. 19 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती माया पाटोळे तक्रारीची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात या जनसुनावणीत महिलानी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर दि. 19 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचें निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ...

आपत्ती व्यवस्थापणाबाबत जागृती

सिंधुदुर्ग दि 9 (जिमाका) :- शालेय विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत जाणीव जागृती करणे, एखादी आपत्ती आल्यास त्याला कसा प्रतिसाद द्यावायाचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करणे आणि कोणत्याही आपत्कालीन स्थितीत स्वतःचे मनोधैर्य न गमावता त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणे तसेच इतरांना मदत करण्यास तत्पर राहणे हा उद्देश समोर ठेवून विद्यार्थ्यांकरिता विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा ४०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना घरगुती गॅस सिलेंडर ला आग लागल्यास ती कशी थांबवावी, अग्निशामक सिलेंडर चा वापर कसा करावा, शाळेत आग लागल्यास न घाबरता विद्यार्थी व शिक्षक यांनी वर्गाच्या बाहेर कसे पडावे याची माहिती दिली....

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-2024 संकलन शुभारंभ कार्यक्रम सशस्त्र दल निधीत आपले योगदान देऊन कर्तव्याचे पालन करुया -जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग दि 9 (जिमाका) :- आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे संरक्षण केले आहे. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग देऊन कर्तव्याचे पालन करुया असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन -२०२४ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्यावतीने सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा जिल्ह...

शासकीय योजनांचा लाभ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा - अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम

सिंधुदुर्गनगरी 3 (जि.मा.का):- समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना अत्यंत महत्वाच्या आहेत. शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. येथील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, नगर पालिका प्रशासन सहआयुक्त श्री औंधकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सागर साळुंखे, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, कृषि विकास अधिकारी जे.बी. झगडे, आदी अधिकारी उपस्थित होते. ॲड श्री. मेश्राम यांनी कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रिडा विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पशुसंवर्धन, शिक्षण महिला व बालकल्याण विभागांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. अनुसूचित जाती, जमाती वर्गाच्या कल्याणाकरिता विविध विभागांच्या असणाऱ्या योजना, त्याबाबतची सद्यस्थिती याविषयी सविस्त...

मध्यस्थामार्फत प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 3 (जि.मा.का) :- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात "मध्यस्थ कक्षाची" स्थापना करण्यात आलेली असून या आयोगाकडे सद्यिस्थितीत एकूण 05 प्रशिक्षित मध्यस्थ कार्यरत आहेत. तक्रारदार व विरुध्द पक्ष या दोघांच्यात सामंजस्याने तडजोड घडवून आणण्याचे महत्त्वाचे काम या मध्यस्थांमार्फत करण्यात येते. गुंतागुंतीची व क्लिष्ट स्वरुपाची प्रकरणे या मध्यस्थांमार्फत अतिशय सफाईदारपणे सोडविली जात असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रबंधक यांनी दिली आहे. जिल्हा ग्राहक आयोगामध्ये तक्रारदाराने अर्ज क्र. 6/2024 दाखल केला होता. तक्रारदाराने बिल्डरकडील कणकवली येथील अपार्टमेंट मध्ये सदनिका बुक केली होती. त्यासाठी त्यांनी बिल्डरला रक्कमही अदा केली होती. परंतु बिल्डरने तक्रारदाराला साठेखत पूर्ण करुन दिलेले नव्हते. सदनिकेचा ताबाही दिलेला नव्हता अगर त्याची रक्कमही परत केली नव्हती, त्यामुळे तक्रारदारने या जिल्हा आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदरचे प्रकरण जिल्हा आयोगाने सिंधुदुर्गातील जेष्ठ व नामांकीत विधिज्ञ एस. एन. भणगे यांच्याकडे मध्यस्थीस...

जिल्हा युथ आयकॉन निवडीकरीता इच्छुकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 या वर्षापासून दरवर्षी दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो. याकरिता ज्या युवांनी युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वयोगटातील युवांची 10 नावे युथ आयकॉन म्हणून जिल्हास्तरावरून विभागस्तराकरिता निवडण्यात येतील. तरी इच्छुक युवांनी आपल्या कार्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावी. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड (संपर्क क्रमांक. ९७६६९६५९९६/ ९१०३९३६०९८) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा. ०००००

पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात प्रगणकांना पशुपालकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी 25 (जि.मा.का) :- पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षींनी पशुगणना केली जाते. या अंतर्गत 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस 25 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ होत असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुटपक्षी आदी प्रजातीच्या जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. ग्रामीण भागासाठी 87 आणि शहरी भागासाठी 9 असे एकूण 96 पशुगणनेसाठी प्रगणक तर ग्रामीण भागासाठी 16 आणि शहरी भागासाठी 1 असे एकूण 17 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणकांद्यारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनांसाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी जनावराची अचुक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.सी. बलोलीकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. ठाकूर यांनी केले आहे. 000

ाजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी

र सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 रविवार 1 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्यनियर कॉलेज या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितिन राऊत यांनी दिली आहे. या परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 583 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ (KD001001 ते KD 001192), कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्यनियर कॉलेज (KD 002001 ते KD002391). या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना:- उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दिड तास अगोदर उपस्थित रहावे. येताना सुधारीत प्रवेशप्रमाणपत्र, ओळखीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक आयोग ओळखपत्र, स्मार्ट कार्ड व ड्रायव्ह...

पुस्तके उपलब्ध करुन देण्यसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- समग्र शिक्षा अंतर्गत महावाचन उत्सव 2024 या उपक्रमांतर्गत इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयानुरुप वाचनीय पुस्तकांची खरेदी करवयाची आहे. त्यासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी पुरवठादाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. पुरवठादाराकांनी सीलबंद दरपत्रके जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षणाधिकारी यांच्या नावे दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत समग्र शिक्षा जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे. या दरपत्रकांचा नमुना शिक्षण विभाग सिंधुदुर्ग नोटीस बोर्ड व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. अटी व शर्ती सदरची दरपत्रके प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून दि.५/१२/२०२४ पर्यंत दुपारी १४.०० वा. पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून स्विकारण्यात येतील तसेच सदरची दरपत्रके शक्यतो त्याच दिवशी दुपारी १६.०० वा उघडण्यात येतील. दरपत्रकाच्या लखोट्य...

बंदुक परवान्याच्या नुतणीकरणाची प्रक्रीया

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यांनी परवान्याचे नूतनीकरणासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील असलेल्या उपचिटणीस शाखेत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खालील आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे. 1. शस्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे). 2. शस्र वापरण्यास शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे Form S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र.3. शस्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form - S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्यानिशी सादर करावा.4. शस्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्र पडताळणी प्रमाणपत्र.5.सरपंच/पोलीस पाटील/नगराध्यक्ष / यांच्याकडील रहिवाशी व वर्तवणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड.6. मुळ शस्र परवाना अर्जासोबत जोडावा.7. परवाना नुतनीकरण 5 वर्षाकरीता फी रु. 2500/...

उच्च न्यायालय व खंडपीठांचे दोन दिवस विशेष लोक अदालत पक्षकारांना आभासी पध्दतीने सहभागी होता येणार

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेले खटले सिंधुदुर्गातुन आभासी पध्दतीने विशेष लोक अदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी विधी सेवा प्राधिकरणाने उपलब्ध केली आहे. मुंबई, उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे दि. 30 नोव्हेंबर 2024 व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोक अदालतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे या ठिकाणी प्रलंबित आहेत व ती तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी (ऑनलाईन) पध्दतीने सहभागी होऊ शकतात. सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रकरणे उच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन अध...

जिल्ह्यात 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शनिवार दि. 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे. सन 2024 वर्षातील हे चौथे लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेणेबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येते. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दि. 14 डिसेंबर 2024 चे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिल यांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झ...

''घर घर संविधान" कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून ''घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान घेण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सोमनाथ कदम, (व्याख्याते) इतिहास विभाग प्रमुख कणकवली कॉलेज कणकवली उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन, संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. त्याचबरोबर सर्व विभागप्रमुख यांनी शासन निर्णयामध्ये शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे वर्षभरामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करुन सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी संविधान आज घराघरात पोहचले पाहिजे ही जबाबदारी सर्व नागरीकाची असून य...

राष्ट्रीय युवा महोत्सवाअंतर्गत "भारत यंग लिडर्स डायलॉग" चर्चासत्रात सहभाग होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 – विकास भारत यंग लीडर्स डायलॉग चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. भारत सरकारने विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दरम्यान देशभरातून निवडलेले 3 हजार तरुण-तरुणी 12 ते 13 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताचे त्यांचे व्हिजन मांडतील आणि सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याच्या आणि शिकण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताची त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना सर्वोच्च निर्णय घेणारे आणि प्रसिद्ध जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांशी जोडणे आणि विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी ...

संविधान सप्ताहाचे 2 डिसेंबरपर्यंत आयोजन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने समाज कल्याण विभागांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत संविधान सप्ताहाचे आयोजन करुन संविधान दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, यांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, विविध महामंडळे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग या कार्यालयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. दि.26 नोव्हेंबर 2024 ते दि. 02 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शाळा व महाविदयालयांमध्ये तसेच अधिनस्त शासकीय वसतिगृहे, शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिका दर्शनी भागात लावून संविधान रॅली काढण्याचे गृहपाल, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सूचित करण्यात आले आहे. संविधानातील माह...

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

सिंधुदुर्गनगरी 26 (जि.मा.का) :- भारताच्या संविधान दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, नितीन राऊत ,आरती देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००

जिल्ह्यात 6 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.२१ (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मतमोजणी, निकाल नंतर मिरवणुका, तसेच दि. ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी/ महापरिनिर्वाण दिन, बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेमुळे हिंदु समाजातर्फे विजय दिवस व मुस्लीम समाजाकडून काळा दिवस पाळला जातो, तसेच जिल्ह्यात वैयक्तिक व सामाईक मागणीकरीता उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विधानसभा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ गृहमतदानात जिल्ह्यात २ हजार ३७० पैकी २ हजार २७३ मतदान

सिंधुदुर्ग, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली.जिल्ह्यात दि १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान गृहमतदानाची प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यात २ हजार ३७० पैकी २ हजार २७३ मतदारांनी गृहमतदान केले. विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व कंसात एकूण मतदान पुढीलप्रमाणे आहे. 268- कणकवली- 1 हजार 116 पैकी 1 हजार 055 , (अपंग- 158, ८५ वर्षांपुढील - 897) 269- कुडाळ- 638 पैकी 612 (अपंग- 60, ८५ वर्षांपुढील - 552) 270- सावंतवाडी- 616 पैकी 606 (अपंग- 91, ८५ वर्षांपुढील - 515) मतदारांनी मतदान केले. 0000000

समाज माध्यमांवर व्हायरल होणारा संदेश चुकीचा मतदार यादीतून नाव वगळल्यास नव्याने नाव नोंदणी करणे बंधनकारक जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती

सिंधुदूर्ग दि १७ (जिमाका) गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत असून या संदेशाद्वारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. या संदेशामध्ये असे नमूद आहे की ,‘ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा. अशा प्रकारचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. या संदेशाचे जिल्हा प्रशासनाकडून खंडन करण्यात आले असून याबाबत सत्यता पुढीलप्रमाणे.. मतदान यादी मधून मतदाराचे नाव वगळल्यास मतदान करता येत नाही. अशावेळी मतदाराने आपल्या नावाची नव्याने मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदवण्यासाठी नामनिर्देशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदाराला संधी असते, त्यानंतर मतदार यादी मध्ये नाव नोंदविता येत नाही. त्यामुळे सध्या ज्या मतदाराचे नाव मतदार यादीमधून वगळले आहे त्यांना २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क...

विधानसभा निवडणूक - २०२४ निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात, आता मतदानपूर्व काळातील आचारसंहिता उल्लंघनाबाबत योग्य कार्यवाही करा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून प्रशासनाला सूचना

सिंधुदुर्ग, दि.१७ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचासंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन होवू देवू नका. तसे झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशा सूचना नोडल अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या. शेवटचे ७२ तास, ४८ तास या कालावधीत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहिता पालन झालीच पाहिजे. कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास अजून त्यांच्या नेमणुका कराव्यात, मात्र कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती श्रध्दा पोवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे, परिवहन उपायुक्त विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, लिड बँकेचे श्री मेश्राम तसेच संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते. शेवटच्या कालावधीत प्रचार ...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणांना मान्यता

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणांना भारत निवडणूक आयोगाने खालीलप्रमाणे मान्यता दिली, असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. मतदार संघाचे नाव, कंसात मतमोजणी केंद्राचे ठिकाण 268- कणकवली विधानसभा मतदार संघ (कणकवली कॉलेज कणकवली, HPCL हॉल, तळमजला कणकवली.) 269- कुडाळ विधानसभा मतदार संघ (तहसिलदार कार्यालय कुडाळ येथील मध्यवर्ती सभागृहाची जागा) 270- सावंतवाडी विधानसभा मतदार संघ (तहसिलदार कार्यालय सावंतवाडी येथील आतील मोकळा पॅसेज) अशी आहेत. ०००००

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 गृह मतदानाला सुरुवात

लोकशाही बळकट करण्यासाठी मी मतदान केले, सर्वांनी मतदान करावे झाराप येथील शंकुतला सामंत यांचे मतदारांना आवाहन सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : मी ८६ वर्षांची महिला असून मतदानाच्या दिवशी मला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी खूप अडचण येत होती. भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे आता आमच्यासारख्या वयस्क व्यक्ती घर बसल्या मतदान करु शकतात. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कुडाळ विधानसभा मतदार संघातील ८६ वर्षीय मतदार शकुंतला सिताराम सामंत यांनी. झाराप येथील शकुंतला सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन गृह मतदान पथकाने मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील हे देखील उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तसेच दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मतदानाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६९-कुडाळ विधानसभा ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- 2024 अनुचित प्रकार रोखण्यासाठी सागरी किनाऱ्यावरील गस्त वाढवा -केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद · राज्य सीमेवरील वाहनांची कडक तपासणीचे निर्देश · रेल्वे स्थानकांवर यंत्रणा कार्यान्वित करावी · अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवावे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी गोवा कोस्टल गार्ड आणि जिल्हा पोलिस यांनी संयुक्त पथक स्थापण करावे. हे संयुक्त पथके सागरी क्षेत्रात २४ तास गस्त घालून संशयित हालचालींवर लक्ष ठेवतील यासाठी तात्काळ संयुक्त पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद यांनी दिलेत. केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद यांच्या अध्यक्षतेखाली आज सावंतवाडी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक खर्च निरीक्षक दिव्या के.जे., जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील तसेच गोवा राज्यातील उत्पादन शुल्क विभाग, परीवहन विभाग, सागरी सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद म्हणाले, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान ...

लोकशाही जनजागृती दिंडीस‍ जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवा झेंडा नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे -जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. नवमतदारांनी मतदान तर करायचेच आहे शिवाय त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावायचे आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून कणकवली शहरात आज कणकवली नगर पालिका आणि कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही दिंडी, रॅली, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे , मुख्याधिकारी गौरी प...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक सखी, युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार

सिंधुदुर्ग, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक महिला, एक युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहेत. विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. मतदारांना मतदानासाठी कोणत्याही अडचणी येवू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे जिल्हा प्रशासन सर्व तयारी करीत आहे. आयोगाच्या सुचनांप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महिला, एक युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात एकूण ३ महिला, ३ युवा आणि ३ दिव्यांग असे एकूण ०९ विशेष मतदान केंद्र राहणार आहेत. महिला मतदान केंद्रावर मतदान अधिकारी पासून सर्व कर्मचारी हे महिला, युवा मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी हे युवा राहणार असून दिव्यांग मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी राहणार आहेत. हे या मतदान केंद्रांचे वैशिष्ट्य असणार...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानाच्या दिवशी मुद्रीत माध्यमात दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान 2 दिवस अगोदर करावा लागणार अर्ज

सिंधुदुर्गनगरी दि.11 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर (१९ नोव्हेंबर) व मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर) मुद्रीत माध्यमातून राजकीय पक्ष व उमेदवारांच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. अशा जाहिरातींसाठी प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या २ दिवस अगोदर समितीकडे अर्ज करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. मतदानाच्या दिवशी (२० नाव्हेंबर) व मतदानाच्या एक दिवसापूर्वी (१९ नोव्हेंबर) प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा...