Posts

Showing posts from September, 2026

‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध आरोग्य उपक्रमांना गती नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व तत्पर आरोग्यसेवा देण्यासाठी विविध उपक्रम सुरू

सिंधुदुर्ग, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम सध्या सुरू आहेत. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ, तत्पर व नागरिककेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर अभियानामध्ये विशेष भर देण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, महिलांचे आरोग्य, अवयवदान संकल्प अभियान, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्त भारत, क्षयरोग निर्मूलन, जन्म-मृत्यू नोंदणी आदी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजना व सेवांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे. असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीला विशेष गती जिल्ह्यात उच्च रक्तदाब (Hypertension) व मधुमेह (Diabetes) यासाठी विशेष मोहीम सुरू असून, असंसर्गजन्य आजारांसाठी ३० वर्षे व त्यावरील वयोगटातील ना...

नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम

Image
सिंधुदुर्ग, दि. 19 : साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांशी संवाद साधणे तसेच त्यांच्या अडचणी व प्रतिक्रिया जाणून घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांशी थेट संवाद साधून शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या प्रतिक्रिया व अपेक्षा जाणून घेतल्या. ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजना व सेवांची माहिती देण्यात येत आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अडसूळ यांनी पर्यावरणपूरक उपक्रम, सायबर सिक्युरिटीबाबत मार्गदर्शन करत डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याचे आ...

कुडाळ नगरपंचायतीतर्फे गणेश घाटावर आभार आणि संकल्पाची रांगोळी 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश

Image
सिंधुदुर्ग, दि.१८ : शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि शहर सुंदर व आरोग्यदायी बनवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या देशव्यापी 'सेवा संकल्प अभियाना'चा भाग म्हणून कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन (दि.१७ रोजी) करण्यात आले. येथील प्रसिद्ध गणेश घाटावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकाभिमुख कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नागरिकांना विहित मुदतीत शासकीय व नागरी सेवा पारदर्शकपणे मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्ष जनतेच्या सहभागातून परिसर स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरी समस्यांचे जलद निवारण आणि सार्वजनिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाचे औचित्य साधून गणेश घाटावर एकत्र आलेल्या सर्व घटकांनी एकजुटीचे दर्शन घडवत भव्य मानवी साखळी तयार केली. राष्ट्रीय एकात्मता...

सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी व निरोगी जीवनशैलीच्या प्रसारावर भर

Image
सिंधुदुर्ग, दि. 18 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत चराठे येथे करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, चराठे गावच्या सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि आजाराचा धोका असलेल्या व्यक्तींची लवकर ओळख करण्यावर विशेष भर देण्यात य...

भेडशीतील गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-2026’

Image
सिंधुदुर्ग, दि. 18 (जिमाका): गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भेडशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना, अडचणींना आणि शासनाच्या योजनांबाबतच्या अपेक्षांना जाणून घेण्यात आले. ‘लोकसंवाद-2026’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल युगातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर सुरक्षेबाबत तसेच गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणाऱ्या ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही माहिती देण्यात आली. महसूल विभागामार्फत उपलब्ध विविध सेवांची माहिती मंडळ अधिकारी सचिन गोरे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या...

मंगेश पाडगावकरांच्या उभादांडा गावाला साहित्य पर्यटनाचे नवे रूप देणार दोन महिन्यांत ‘कवितांचे गाव’ दिमाखदार करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

Image
सिंधुदुर्ग, दि. 18(जिमाका) : कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक स्मृतींशी जोडलेल्या उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ उपक्रमाला नावाला साजेसे दिमाखदार स्वरूप देण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत विकासकामांना गती देण्यात येईल. यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘कवितांचे गाव’ अधिक प्रभावी करण्यासाठी मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेचे, शून्य पटसंख्या असलेल्या शाळेचे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनाचे तसेच त्यांनी भेट दिलेल्या दालनाचे, अशा महत्त्वाच्या पाच दालनांना प्राधान्याने विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात मंत्री सामंत यांनी भाषा संचालकांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या. भाषा संचालक उद्या उभादांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असून त्यानंतर प्रभावी नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. उभादांड्याच्या विकासासाठी गावातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्य...

गणपती उत्सव काळात टपाल विभागातर्फे विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’ सावंतवाडी व कुडाळ येथे २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान विविध टपाल, वित्तीय व विमा सेवा उपलब्ध

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : गणपती उत्सवाच्या काळात नागरिकांना टपाल, वित्तीय, विमा आणि पार्सल सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात टपाल सेवा नागरिकांच्या अधिक जवळ नेण्याचा हा अभिनव उपक्रम असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवांची माहिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार आहे. मेल सेवा, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) व ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI), पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB) आणि नागरिक केंद्रीत सेवा (CCS) यांसह विविध सुविधांची माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरक्षित बचत व वित्तीय सेवांची माहिती पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेच्या माध्यमातून नागरिकांना विविध बचत योजना, ठेव व पैसे काढण्याची सुविधा, नामनिर्देशन तसेच इंटरनेट व मोबाईल बँकिंगसारख्या डिजिटल बँकिंग सुविधांच...

महसुली व अर्धन्यायिक प्रकरणांचा आपापसातील तडजोडीने कायमस्वरूपी निपटारा

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : महसूल प्रशासनातील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली जमिनीशी संबंधित दावे व अपिले संबंधित पक्षकारांच्या आपापसातील सहमतीने आणि तडजोडीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यभर १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे महसूल न्यायालयांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकरणे पक्षकारांच्या परस्पर संमतीने निकाली काढून नागरिकांचा वेळ, पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील खर्च वाचण्यास मदत होणार आहे. सर्व स्तरांवरील महसूल न्यायालयांतील प्रकरणांचा समावेश मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले महसुली दावे व अपिलांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार ...

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात योग प्रशिक्षण व व्याख्यान शिबिरे

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा आयुष कक्ष, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने योग प्रशिक्षण व व्याख्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय आयुष विभाग, महिला व बाल रुग्णालय कुडाळ, ग्रामीण रुग्णालय वैभववाडी, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, ग्रामीण रुग्णालय मालवण, उपजिल्हा रुग्णालय कणकवली, ग्रामीण रुग्णालय पेंडूरकट्टा, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला, ग्रामीण रुग्णालय देवगड, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग आणि ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे योग प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. शिबिरांचे नियोजित वेळापत्रक दि. १७ सप्टेंबर – जिल्हा रुग्णालय, आयुष विभाग, सिंधुदुर्ग दि. १९ सप्टेंबर – महिला व बाल रुग्णालय, कुडाळ दि. २१ सप्टेंबर – ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी दि...

कलमठ येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ ई-कचरा व्यवस्थापन व ‘९ संकल्प थीम’वर ग्रामपंचायतीने काम करावे – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर

Image
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा संकल्प अभियान २०२६’ चा जिल्हास्तरीय शुभारंभ आज ग्रामपंचायत कलमठ येथे झाला. दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासोबतच ई-कचरा व्यवस्थापन, शाश्वत विकास आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविण्यात यावेत, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत कलमठच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कलमठ गावाच्या सर्वांगीण विकासाची तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले. ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी योजना, शासनाच्या विविध अभियानांमध्ये गावाचा सहभाग तसेच विविध उपक्रमांमधून ग्रा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : ग्रामीण भागातील स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अभियानांतर्गत गावांमधील दुर्लक्षित तसेच कचरा साचणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांची ओळख करून त्यांचे जिओ-टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणांची स्वच्छता करून आवश्यकतेनुसार सुशोभीकरण करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छता ज्ञानयात्रा, स्वच्छता संवाद तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नुतनीकरण अर्जास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नुतनीकरण (Renewal) अर्जांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असावा आणि इयत्ता ११ वी, १२ वी किंवा १२ वी नंतरच्या व्यावसायिक अथवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संबंधित महाविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थ्याने मागील अभ्यासक्रमात ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही गुणांची अट ४० टक्के आहे. ...

प्रलंबित महसुली दावे व अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत’चे आयोजन

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महसुली दावे व अपील प्रकरणे परस्पर संमतीने तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १२ वाजता महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. परस्पर संमतीने तडजोड करण्यास तयार असलेल्या पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अनुप जावळे यांनी केले आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या अधिनस्त उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये जमीन मोजणी प्रकरणे, फेरफार नोंदी, एकत्रीकरण योजनेतील चूक दुरुस्तीची प्रकरणे तसेच कार्यालयीन इतर तक्रारींबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध अथवा केलेल्या कार्यवाहीविरुद्ध अपील प्रकरणे दाखल होत असतात. या प्रकरणांमध्ये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून निर्णय होईपर्यंत पक्षकारांचा वेळ, पैसा व श्रम खर्ची पडतात. तसेच न्याय मिळण्यासाठी दीर्घकाळ प्र...

शेतकरी बांधवांनी कृषीविषयक महत्त्वाच्या बाबी पूर्ण करुन घ्याव्यात फार्मर आयडी, पीएम-किसान ई-केवायसी, ई-पिक पाहणी व ‘महाविस्तार-AI’चा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी तसेच स्थानिक शेतकरी बांधव गावी दाखल झाले आहेत. गावी आलेल्या शेतकरी बांधवांनी या कालावधीचा उपयोग करून शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या फार्मर आयडी, पीएम-किसान ई-केवायसी, लँड सीडिंग, आधार सीडिंग, ई-पिक पाहणी तसेच ‘महाविस्तार-AI’ ॲपचा वापर यासंबंधीची कार्यवाही तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागच्या वतीने करण्यात आले आहे. विविध योजनांसाठी फार्मर आयडी आवश्यक शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी AgriStack अंतर्गत फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, महाडीबीटी पोर्टलवरील विविध योजना, पीक विमा, पीक कर्ज, शासकीय भात खरेदी, ऑनलाइन खत खरेदी आदी सुविधांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या CSC (ग्राहक सेवा केंद्र) येथे जाऊन किंवा स्वतःच्या मोबाईलद्वारे तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावा. पीएम-किसानचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करा पीएम-किसान सन्मान निधी योजनेचा हप्...

पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला शासनाच्या योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी - पालकमंत्री नितेश राणे

Image
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून समाजातील १२ बलुतेदार आणि १८ पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता या योजनेत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत ही योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करूया, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी वीरसिंग वसावे, समिती सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी.डी. गावडे यांच्यासह संबंधित अधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला प्रशिक्षण, आधुनिक अवजारे आणि अर्थसहाय्याची जोड देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम क...

सकस आहारातून ॲनिमियावर मात करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम संपन्न

Image
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा घर आणि कामाच्या व्यापात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट परिणाम जन्माला येणाऱ्या अपत्यावरही होतो. त्यामुळे तरुणींनी जंक फूड टाळून सकस पोषणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. चांगल्या व योग्य पोषण आहारामुळे सर्व प्रकारचे आजार दूर ठेवता येतात; आपण सर्वांनी मिळून ‘ॲनिमिया मुक्त भारत’ हा संकल्प प्रत्यक्षात आणूया आणि सकस आहारातून ॲनिमियावर मात करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत आयोजित पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी महिला व तरुणींना योग्य पोषण आणि ॲनिमिया प्रतिबंधात्मक उपायांबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. शरीरातील रक्ताचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्थानिक सकस अन्नपदार्थ, पालेभाज्या आणि फळांचे सेवन किती गरजेचे आहे, हे तज्ज्ञांनी पटवून दिले. वि...

नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प करत अभियान यशस्वी करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे जिल्ह्यात 'सेवा संकल्प अभियाना'चा शुभारंभ

Image
सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे 'सेवा संकल्प अभियान' यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच पीक पाहणी आणि मतदार यादीतील दुरुस्ती या मोहिमांनाही नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित शासकीय सेवा आणि योजनांची व्याप्ती वाढवून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणणे, प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणे आणि विविध दाखले थेट जनतेच्या दारात पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे विशेष 'सेवा संकल्प अभियान' १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जात आहे. य...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचा इंडिया सॅनिटेशन कॉनक्लेव्हमध्ये सहभाग

Image
सिंधुदुर्ग, दि. १७ : स्वच्छता व्यवस्थापनात केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यापेक्षा त्यांची प्रभावी अंमलबजावणी, शाश्वत देखभाल आणि त्यातून साध्य होणाऱ्या परिणामांचे प्रभावी मूल्यांकन हेच प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांची मर्यादित आर्थिक क्षमता, पर्यटनामुळे वाढणारी तरंगती लोकसंख्या आणि त्यातून निर्माण होणारे कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे आव्हान लक्षात घेता, स्थानिक गरजांवर आधारित लवचिक व शाश्वत स्वच्छता व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे झालेल्या १० व्या आयएससी-एफआयसीसीआय सॅनीटेशन अवॉर्ड्स सिरेमनी आणि इंडीया सॅनिटेशन कॉनक्लेव २०२६ मधील ‘अनलॉकिंग वॉश इंपॅक्ट थ्रू पार्टनरशिप्स’ या परिसंवादात त्या मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वच्छता व्यवस्थापनातील आर्थिक अडचणी अधोरेखित करताना सांगितले की, ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार स्वच्छतेची जबाबदारी स्थानिक संस्थांवर सोपविण्यात आली असली, तरी ग्रामपंचायती आणि छोट्या नगरपालिकांची आर्...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नावनोंदणी व दुरुस्तीसाठी बीएलओंशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. १६ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन पात्र मतदारांनी, तसेच मतदार यादीतील नाव, रहिवासी पत्ता किंवा अन्य तपशिलांमध्ये दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असलेल्या मतदारांनी संबंधित केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (BLO) यांच्याशी त्वरित संपर्क साधून आवश्यक अर्ज व कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. ००००००

कुडाळ उपविभागात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी सुनावणी

सिंधुदुर्ग, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व तक्रारी यांचा जलद व गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कुडाळ व मालवण तसेच कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी यांच्या महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने व गतीने निपटारा करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक अपील प्रकरणे, तहसीलदार कुडाळ व मालवण यांच्या न्यायालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक चालू दावे, तसेच मंडळ अधिकारी स्तरावर सुनावणी सुरू असलेल्या तक्रारी व फेरफार नोंदी यांचा प्राधान्याने निपटारा करण्यात येणार आहे. बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ तहसीलदार कार्यालय, कुडाळ तसेच कुडाळ तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये संबंधित कार्यालया...

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 28 सप्टेंबर रोजी

सिंधुदुर्ग, दि. 16 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य सचिव शीतल पुंड यांनी दिली आहे. 00000

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत सिंधुदुर्गात ११ ठिकाणी रोजगार मेळावे जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योग, कंपन्या व आस्थापनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

सिंधुदुर्ग, दि. १६ (जिमाका) : राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर ५०० हून अधिक ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रोजगार मेळावे सावंतवाडी- टोपीवाला स्मारक तंत्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी, कुडाळ- संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ, दोडामार्ग- दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग, वैभववाडी- अनगरसिद्ध खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगुळवाडी, ता. वैभववाडी, सावंतवाडी- यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी, कणकवली- आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, फोंडाघाट, कणकवली- एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवली, कुडाळ- श्री. पुष्पसेन सावंत कृषी/फार्मसी/नर्सिंग महाविद्यालय, वाडी हुमरमळा (डिगस), मालवण- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण, देवगड...

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, हा ‘लोकसंवाद-२०२६’चा प्रमुख उद्देश आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या स्थानिक तसेच जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी नागरिकांना थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. विविध विभागांच्या योजनांची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व मानाच्या गण...

महाराष्ट्राच्या गणेशोत्सव परंपरेचे होणार जागतिक दस्तऐवजीकरण ‘Bappa.org’ मंचावर नागरिकांना सहभागाचे आवाहन

Image
सिंधुदुर्ग, दि. १३ : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवनाशी घट्ट जोडलेला गणेशोत्सव राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केला आहे. या उत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करण्यासाठी bappa.org हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमात केवळ मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचीच नव्हे, तर घराघरातील गणेशोत्सवाचीही नोंद केली जाणार आहे. पिढ्यान्‌पिढ्या जपल्या जाणाऱ्या घरगुती गणपतींच्या परंपरा, कुटुंबाची सजावट, स्थानिक लोककला, गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांना या डिजिटल संग्रहात स्थान मिळणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक गणेशमूर्ती घडविणारे मूर्तिकार आणि विविध हस्तकला कारागिरांच्या कलेचीह...

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा केंद्रांच्या सुविधांवर भर विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व भागधारकांशी सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त

Image
पुणे, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सच्या वतीने पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेची गुणवत्ता, प्रश्नपत्रिका गळतीला प्रतिबंध, पदसंख्या, उत्तरतालिका, परीक्षा केंद्रे, तक्रार निवारण आणि ‘ऑप्टिंग आऊट’ याबाबत विविध सूचना मांडण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) तथा टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. समितीत पोलीस महासंचालक सदानंद दाते, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, संघ लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य एअर मार्शल अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त) आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक श्यामप्रसाद करगड्डे यांचा समावेश आहे. टास्क फोर्स...

आंबा काजू नुसकान भरपाई मिळणेसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) :जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यानुषंगाने नुकसान भरपाई मिळणेकारिता शासनामार्फत आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याप्रमाणे पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आलेला होता, त्यानुसार शासनाने आंबा व काजू पिकासाठी नुकसान भरपाई शासन निर्णयाद्वारे मंजूर केली आहे. तसेच सदर पंचनामे पोर्टल ला अपलोड करण्यात आले आहेत. परंतु अपलोड केलेल्या २४५० शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसल्याने त्यांना नुकसान भरपाई ची रक्कम प्राप्त झालेली नाही. तरी याद्वारे आवाहन करण्यात येते कि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी आपली ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून आंबा व काजू नुकसान आंबा व काजू भरपाई ची रक्कम आपले बँक खात्यावर जमा होईल. 0000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६३९ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र

सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत राज्यातील ३.५५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासनामार्फत आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६३९ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांशी संबंधित २२४ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांकडील ४१५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था कार्यालये, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांची माहिती संबंधित विकास संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू आहे. उर्वरित पात्र कर्जदारां...

‘जीवनदीप’ योजनेतून आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षेची साथ IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; १४९ रुपयांपासून विमा संरक्षण

सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) : गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva Bupa Health Insurance यांच्या सहकार्याने ग्राहकांसाठी ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध विमा संरक्षण पर्याय उपलब्ध असून, १ लाख, ३ लाख आणि ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण घेता येते. करासहित प्रीमियम १४९ रुपयांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांना आपल्या गरजेनुसार विमा संरक्षणाचा पर्याय निवडता येणार आहे. गंभीर आजाराच्या परिस्थितीत दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न सुरक्षा, कमाल तीन महिन्यांपर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजाराच्या काळात उपचारांचा खर्च तसेच आजारपणामुळे निर्माण होणाऱ्या उत्पन्नातील अडचणींचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यास हातभार लागू शकतो. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या उपचारादरम्यान आरोग्य सेवांसोबत आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते. “आजची सुरक्षितता, उद्याचे उज्ज्वल...

‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्ह्यात सामुदायिक आरोग्य शिबिरे दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजन; नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. ११ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ या आरोग्य अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या आरोग्य शिबिरांचे आयोजन मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत रुग्णालये तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणीही आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, विविध रक्तचाचण्या तसेच आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामु...

गणेशोत्सव काळात कणकवली शहरातील वाहतुकीत बदल दि. 12 ते 25 सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. 11 (जिमाका) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच नागरिकांची गैरसोय व अपघात टाळण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून कणकवली शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गणेशोत्सव दि. 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून, या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिक विविध वाहनांतून ये-जा करण्याची शक्यता आहे. तसेच कणकवली शहर व परिसरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 34 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक बदल लागू केले आहेत. अवजड वाहनांना प्रवेश बंदी: पटवर्धन चौक, कणकवली येथून कलमठ मार्गे आचरा जाणारी तसेच आचरा-कलमठ मार्गे कणकवलीकडे येणारी अवजड वाहने पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. हलक्या व इतर वाहनांसाठी एकेरी ...