Posts

Showing posts from July, 2022

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.700 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.900 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 356.935 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.79 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 237.333 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.1980 (59.37), अरुणा -31.1236 (40.32), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.069 (47.36), ओटाव- 2.482 (53.03), देंदोनवाडी – 0.339 (3.46), तरंदळे - 2.255 (49.47), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2-548 (79.63), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.522 (63.26), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.493 (59.62), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – ...

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.5 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1898.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 0.3 (1515.0), मालवण- 0.3 (1767.5 ), सावंतवाडी- 0.4 (2231.4), वेंगुर्ला-0.0 (1903.1), कणकवली-1.3 (1828.1), कुडाळ-1.6 (2065.6), वैभववाडी- 1.2 (2023.8 ), दोडामार्ग- 9.5 (2189.0) असा पाऊस झाला आहे. 00000

खरीप पीक पाहणी सोमवारपासून ई-पीक पाहणी व्हर्जन-2 द्वारे शेतकऱ्यांनी पूर्ण करण्याचे जमाबंदी आयुक्तांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2022 च्या पीक पाहणीची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल अॅप व्हर्जन-2 गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सुधारित मोबाईल अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून खरीप हंगामातील पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाचा ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. गतवर्षीपासून ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी ॲपव्दारे आता पर्यंत सुमारे 1 कोटी 11 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी भ्रमणध्वनी अॅपमध्ये नोदणी केली आहे. मागील खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करून या प्रकल्पास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. गतवर्षी खरीप हंगामामध्ये 99 लाख 57 हजार 944 हेक्टर, रब्बी हंगामामध्ये 22 लाख 52 हजार 56 हेक्टर, उन्हाळी हंगा...

आजअखेर 56 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 68 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने कोविड-19 च्या कालखंडानंतर प्रथमच सन 2022-23 या वर्षासाठी असलेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी दिनांक 04 ऑगस्ट 2022 पर्यंत नोंदणी करावी. जवाहरलाल नेहरु हॉकी टुर्नांमेट सोसायटी नवी दिल्ली च्या वतीने सन 2022-23 या वर्षातील ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 2 सप्टेंबर 2022 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) आणि 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनिअर) या गटांमध्ये हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख पुढीलप्रमाणे असावी. 15 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) साठी दि. 01 नोव्हेंबर ...

आजअखेर 56 हजार 272 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 84 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

सन 2021-22 साठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत परुळेबाजार व निरवडे दोन्ही ग्रामपंचायतीची विभागस्तरासाठी निवड

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का) : जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी प्रथम तर ग्रामपंचायत निरवडे, ता. सावंतवाडी व्दितीत क्रमांक प्राप्त केला असून या दोन्ही ग्रामपंयतीची निवड विभागस्तरासाठी संत गाडगेबाबा अभियानाकरीता करण्यात आली आहे. या स्पर्धेत ग्रामपंचायत खांबाळे ता. वैभववाडी यांनी तृतीत क्रमांक पटकावला आहे. लवकरच विभागस्तर तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2021-22 अंतर्गत जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ वार्ड जाहिर करुन रक्कम रुपये 10000/- दहा हजार चे पारितोषिक देण्यात देय आहे. ग्रामपंचायती मधुन तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी करुन जिल्हा परिषद प्रभागातील एका ग्रामपंचायतीची निवड जि...

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का) : क्रांतीज्‍योती सावित्रीमाई फुले राज्‍य शिक्षण गुणगौरव पुरस्‍कार सन 2022 चे अर्ज दि. 7 ऑगस्‍ट 2022 रोजी पर्यंत ऑनलाईन मा‍गविण्‍यात येत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पिंत वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रिमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. जिल्‍ह्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षिकांनी आपली अर्ज https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4EYXWyvrLvF7E4F448GWvW9Q/viewForm?pli=1 या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करावी. 0000

ग्रामीण भागातील गरजू लाभार्थीसाठी महात्मा फुले महामंडळाचा सुधारित चुली कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत सन 2021 पासून महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्या. (महाप्रित) कंपनी स्थापन करण्यात आली आहे. मे.एनकिंग कंपनी व महाप्रित कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुधारित चुली गरजू लाभार्थी कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही. लोहकरे यांनी दिली. जिल्ह्यातील रहिवाश्यांकरिता पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चुल मोफत वाटपासाठी निकषयोग्य रहिवाश्यांकडून अर्ज आमंत्रित करीत आहे.रहिवाश्यांसाठी पात्रता व निकष – अनुसूचित जातीचा असावा. गरिबी रेषेखाली असावा. LPG गॅस कनेक्शन नसावे. जिल्हयातील इच्छुक रहिवाश्यांनी दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत RM/DM-MPBCDC शी संवाद साधावा. सर्व तपशिल https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in वर पाहता येईल. असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

आजअखेर 56 हजार 272 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 84 - जिल्हा शल्य चिकित्सक

सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला नगरपरिषदेचा प्रभाग मुसदा प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दिनांक 22 जुलै 2022 रोजीचे पत्र, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 मधील कलम 10 नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद सावंतवाडी मालवण व वेंगुर्ला क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती त्याचप्रमाणे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रिंयासाठी राखून ठेवावयाचे प्रभाग धरुन) व उर्वरित स्त्रिंयासाठी जे प्रभाग राखून ठेवण्यात आलेले आहेत ते प्रभाग दर्शविणारा आदेशाचा मसुद्दा ची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर आज दिनांक 29 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच या तिन्ही नगरपरिषद यांचे कार्यालयामध्ये नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहे. या आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखा निवेदन संबंधित नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे नावे नगरपरिषद कार्यालय येथे सोमवार दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यत पोहचेल असे पाठवावे. सदर तारखेनंतर संबंधित ठिकाणी प्राप्त झालेले अर...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.600 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.920 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 357.670 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.95 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 349.407 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.6540 (59.84), अरुणा -30.8196 (39.93), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.102 (48.12), ओटाव- 2.482 (53.03), देंदोनवाडी – 0.362 (3.69), तरंदळे - 2.255 (49.47), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2-548 (79.63), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.522 (63.26), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.480 (59.11), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – ...

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 3.2 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 3.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 1.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1896.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 0.7 (1514.7), मालवण- 3.1 (1767.2), सावंतवाडी- 0.2 (2231.0 ), वेंगुर्ला-3.2 (1903.1), कणकवली-0.1 (1826.8), कुडाळ-0.0 (2064.0), वैभववाडी- 0.3 (2022.6 ), दोडामार्ग- 0.0 (2179.5) असा पाऊस झाला आहे. 00000

लोकशाही दिन 1 ऑगस्ट रोज

ी सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): माहे ऑगस्ट 2022 या महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्‍या पहिल्या सोमवारी दि.1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार, असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली . 0000

डाक विभागामार्फत विशेष राखी लखोट्याची विक्री सुरु

सिंधुदुर्गनगरी दि.29 (जि.मा.का): सन 2022 मध्ये रक्षाबंधन सण गुरुवार 11 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत विशेष राखी लखोट्यांची विक्री सुरु करण्यात आलेली आहे. राखी लखोटे रंगीत व उत्तम दर्जाच्या कागदापासून बनविलेले असून एका राखी लखोट्याची किंमत 10 रुपये इतकी आहे. राखी लखोटे सिंधुदुर्ग विभागातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीकरीता उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तरी या सेवेचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर विभागाचे अधीक्षक जी.जे. रेड्डी यांनी केले आहे. आधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. 00000

जिल्हयात 12 ऑगस्ट पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का) : दिनांक 31 जुलै 2022 ते 9 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम उत्सव, दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा सण पारंपारिक पद्धतीने साजरे होणार आहेत. तसेच कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शालांत्न प्रमाणपत्र परीक्षा -2022 (12 वी) दि. 21 जुलै 2022 ते 12 ऑगस्ट 2022, माध्यमिक शालांत्न परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा 2022 (10 वी) दि. 27 जुलै 2022 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत होत आहेत. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपापल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष करत असून त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के...

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 39.5मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 39.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 11.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1895.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 2.5 (1514.0), मालवण- 2.5 (1764.1), सावंतवाडी- 8.0 (2230.8 ), वेंगुर्ला- 6.1 (1899.9), कणकवली- 18.6 (1826.7), कुडाळ- 9.1 (2064.0), वैभववाडी- 30.3 (2022.3 ), दोडामार्ग- 39.5 (2179.5) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 359.140 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.28 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 589.868 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 59.3370 (60.54), अरुणा -30.4327 (39.43), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.135 (48.89), ओटाव- 2.482 (53.03), देंदोनवाडी – 0.384 (3.92), तरंदळे - 2.255 (49.47), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2-521 (78.78), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.522 (63.26), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.480 (59.11), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385 (100), धामाप...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.700 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.920 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.400 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.200 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.600 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.920 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 359.287 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.31 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 615.115 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 59.3370 (60.54), अरुणा -30.1452 (39.05), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.135 (48.89), ओटाव- 2.482 (53.03), देंदोनवाडी – 0.339 (3.46), तरंदळे - 2.290 (50.24), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.521(78.78), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.522 (63.26), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.467 (58.59), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1....

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 26.1 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 26.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 12.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1884.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 6.7 (1511.5), मालवण- 8.3 (1761.6), सावंतवाडी- 9.0 (2222.8), वेंगुर्ला- 10.4 (1893.8), कणकवली-26.1 (1808.1), कुडाळ- 18.5 (2054.9), वैभववाडी- 13.4 (1992.0), दोडामार्ग- 4.1 (2140.0) असा पाऊस झाला आहे. 00000

आजअखेर 56 हजार 261 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 71 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

शिष्यवृत्ती परीक्षा 31 जुलै राजी

सिंधुदुर्गनगरी, दि.26(जि.मा.का.): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8वी) परीक्षा रविवार दि.31 जुलै 2022 रोजी जिल्ह्यातील इ.5वी - 44 केंद्र व इ.8वी- 29 केंद्र असून, एकुण 73 केंद्रावर परीक्षा होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यानी दिली आहे. या परीक्षेसाठी इ.5वीसाठी 3496 विद्यार्थी व इ.8 वीसाठी 1959 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्र परीक्षेच्या ठिकाणी अनिवार्य आहे. रविवार दि.31 जुलै 2022 रोजी परीक्षा दोन सत्रात होणार असून सकाळी 11.ते 12.30 पेपर क्रमाक -1 होणार व पेपर क्रमाक -2 दुपारी 1.30 ते 3 यावेळेत होणार आहे. सर्व पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी. कोणतीही शंका असल्यास जवळच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय व केंद्रशाळामध्ये संपर्क करावा. विद्यार्थ्यांनी परीक्षेला संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी किमान 30 मिनीटे अगोदर उपस्थित राहावे. सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्यावतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. 00000

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.100 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.800 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.920 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 360.022 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.48 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 744 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.1090 (60.30), अरुणा -29.6156 (38.37), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.171 (49.71), ओटाव- 2.482 (53.03), देंदोनवाडी – 0.362 (3.69), तरंदळे - 2.290 (50.24), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.495(77.97), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.522 (63.26), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.467 (58.59), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385...

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 12.8 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 12.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 7.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1872.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 5.2 (1504.8), मालवण- 5.4 (1753.3), सावंतवाडी- 7.4 (2213.8), वेंगुर्ला- 5.3 (1883.4), कणकवली- 12.8 (1782.0), कुडाळ- 9.3 (2036.4), वैभववाडी- 3.9 (1978.6), दोडामार्ग- 5.8 (2135.9) असा पाऊस झाला आहे. 00000

आजअखेर 56 हजार 245 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 84 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image
Image

आजअखेर 56 हजार 238 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 87 - जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.): महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम (1) कलम 58 (1)अ प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता आरक्षण निश्चित करणेकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणचे प्रारुप प्रसिध्द करुन त्यावर हरकती व सूचना करण्यासाठी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहिर केले आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सभेची तारीख 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील जुना नियोजन सभागृह येथे, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक 29 जुलै 2022 आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी दि . 29 जुलै 2022 ते 2 ऑगस्ट 2022 पर्यंत. पंचायत समि...

मतदार यादीतील तपशीलाशी आधार क्रमांक सलग्न करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक सलग्न करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, निवडणूक आयोगाकडील पत्रान्वये केंद्र शासन विधी व न्याय मंत्रालयाने निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्याचे कळवले आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून एच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब नुसार फॉर्म नं 6 ब तयार करण्यात आला आहे. सदर सुधारणांची अंमलबजावणी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे. मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र.6 बभारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO N...

यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाची 'यशस्वी' कथा काजू प्रक्रियेतून यशस्वी महिला बचत गटाची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण

Image
महिला आर्थिक विकास महामंडळ, माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारा संचलित सातार्डा, घोगळवाडी येथील यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांची आर्थिक बाजू स्वयंपूर्ण केली आहे. महिला बचतगट म्हटल की आपसूकच लोणची पापड, मसाले ही उत्पादने समोर येतात. परंतू याला फाटा देत यशस्वी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने काजू प्रक्रिया उद्योग यशस्वी केला आहे. काजू बी खरेदीपासून त्याच्या विविध प्रतवारी नुसार विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवत आहे. शिवाय काजूच्या राहिलेल्या तुकड्यांमधून काजू मोदक, बर्फी, लाडू, खारे काजू, मसाला काजू अशा उत्पादनानेही बाजारपेठ मिळवली आहे. याबाबत राजश्री पारितपते यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, 2007 साली माविम अंतर्गत आमचा महिला बचतगट स्थापन झाला. या बचत गटात 10 महिला असून 2012 ला सेंट्रल बँकेकडून 2 लक्ष 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जातून सुरुवातीला 2 ते 3 वर्ष आम्ही काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. परंतु त्यामधील मार्केटिंगची बाजू हाताळण्यासाठी सीएमआरसीचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेतले. सद्या ...

समुपदेशनानंतर सखी वन स्टॉप केंद्राकडून अल्पवयीन पीडितेची अंकुर महिला वसतीगृहात रवानगी

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- कणकवली पोलीस ठाणे यांनी मु.पो.नरडवे, ता.कणकवली येथील अल्पवयीन पीडित मुलीला तात्पुरत्या निवाऱ्यासाठी व समुपदेशन होण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग येथे दाखल केले. पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला बालकल्याण समिती, सिंधुदुर्ग यांचेसमोर हजर करण्यात आले व तिच्या पुढील निवासाच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला अंकुर महिला वसतिगृह सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले. तरी यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी.एस.पाटील, कणकवली पोलीस ठाणे, वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक ॲड.पूजा काजरेकर, सल्लागार ॲड.रुपाली प्रभू, केस वर्कर चैत्राली राऊळ, ॲड. मीनाक्षी नाईक, पॅरामेडिकल स्टाफ नर्स योगिता परब, स्नेहा मोरे, पॅरालिगल लॉयर ॲड. सुवर्णा हरमलकर, मेड सरिता कुंभार, सूरक्षारक्षक अभिषेक मयेकर, विजय पांग्रडकर, देवेंद्र नाईक, IT स्टाफ आर.बी साईल, आदी उपस्थित होते. यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, विधी सल्लागार श्रीनिधी देशपांडे, बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड.संदेश तायशेटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. * सोबत फोटो जोडला...

58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्गचा प्रतीक घाडीगावकर एनसीसी राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत अव्वल

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- इंटर डायरेक्ट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज, एनसीसी युनिटचा लान्स कार्पोरल प्रतीक पांडुरंग घाडीगावकर यांने महाराष्ट्राच्या संघात 58 महाराष्ट्र बटालियन( ओरस)सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत महाराष्ट्र डायरेक्टरने एकूण बारा पदकासह अव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पियनशिप जिंकली . 58 महाराष्ट्र बटालियन तर्फे कर्नल दीपक दयाल सेना मेडल प्राप्त व सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एनसीसी कॅडेट्स, सर्व पीआय स्टाफ व ANO कॅप्टन आवटे उपस्थित होते. त्याला 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ , कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंद्र सुभेदार इंद्र केस व सुभेदार जितेंद्र तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले .बटालियन कडून त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर देवगड कॉलेज प्राध्यापिका ANO डॉ सुनेत्रा ढेरे यांचेही मार्गदर्शन लाभले. प्रतीक घाडीगावकरची प्री नॅशनल चॅम्पियनशिपसाठी...

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 18.4 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 18.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1864.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 7.3 (1499.6), मालवण- 5.2 (1747.9), सावंतवाडी- 8.0 (2206.4), वेंगुर्ला- 9.0 (1878.1), कणकवली- 18.4 (1769.2), कुडाळ- 5.4 (2027.1), वैभववाडी- 8.0 (1974.7), दोडामार्ग- 15.8 (2130.1) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 358.699 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.18 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 515 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.6540 (59.84), अरुणा -29.0100 (37.58), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.207 (50.53), ओटाव- 2.401 (51.30), देंदोनवाडी – 0.384 (3.92), तरंदळे - 2.325 (51.01), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.495(77.97), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.509 (62.72), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.454 (58.07), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.385...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.200 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.700 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.920 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

आजअखेर 56 हजार 238 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 85 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

24 जुलै 2022 बातमी पाऊस पाणीसाठा

Image

आजअखेर 56 हजार 224 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 72 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

23 जूलै 2022 बातमी पाऊस पाणीसाठा

Image
Image

आजअखेर 56 हजार 224 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 57 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 1.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.700 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.900 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000 --

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठ

ा सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 361.345 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 80.77 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 1 हजार 989 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.1980 (80.77), अरुणा -25.8300 (33.46), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648 (100), नाधवडे- 2.351 (53.82), ओटाव- 2.320 (49.56), देंदोनवाडी – 0.546 (5.57), तरंदळे - 2.431 (53.33), आडेली- 1.288(100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.469(77.16), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.483 (61.64), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.429 (57.07), दाभाचीवाडी- 1.865 (77.03), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.35...

कुडाळ ताक्यात सर्वाधिक 16.5 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 16.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 10.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1837.7 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 6.8 (1480.1), मालवण- 9.7 (1734.5), सावंतवाडी- 10.7 (2188.6), वेंगुर्ला- 4.0 (1858.0), कणकवली- 14.2 (1722.4), कुडाळ- 16.5 (2009.2), वैभववाडी- 15.1 (1908.1), दोडामार्ग- 8.9 (2087.8) असा पाऊस झाला आहे. 00000

इतर मागास घटकांच्या आर्थिक विकासासाठी शामराव पेजे महामंडळाच्या योजना

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.)- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातर्फे (ओबोसी महामंडळ) इतर मागास घटकांसाठी 20 टक्के बीज भांडवल, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा 1.00 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजनांतर्गत महामंडळाकडून खालील योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना - या योजनेत कर्ज मर्यादा रु. 5 लाख असून कर्जाची मुदत 5 वर्ष आहे. योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असतो. महामंडळाच्या कर्ज रकमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाते. याकरिता लाभार्थ्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. उमेदवाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असणे गरजेचे आहे. या योजनचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना - या योजनेत कर्जाची मर्यादा 10 लाख रुपये असून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास 12 टक्के व्याजरकमेच्या प्रमाणे व्...

जिल्हा परिषदेच्या 10 टक्के सेस अनुदानातील महिला व बालविकास विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या 10 टक्के सेस अनुदानातून महिला व बालविकास विभागामार्फत मुलींना व महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. जिल्ह्यातील मुली व महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. 10 टक्के सेस अनुदानातून मुलींना व महिलांना व्यवसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे, मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक हितासाठी प्रशिक्षण देणे, इयत्ता 7 वी ते इ. 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देणे, महिलांना साहित्या पुरवणे, शाळेत जाणाऱ्या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्याती अर्ज गावातील अंगणवाडी केंद्र किंवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय यांच्याशी संपर्क साधुन परिपूर्ण प्रस्ताव तयार करावेत असे आवाहनी महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. 00000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसाठी आय टी असिस्टंट पदासाठी 29 जुलै पर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलबजावणीसाठी 20 हजार प्रति महिना मानधनावर केवळ कंत्राटी स्वरुपात तात्पुर्त्या कालावधीसाठी आय टी असिस्टंट या पदांची बाह्यस्थ पद्धतीने सेतू समितीमार्फत भरती करण्यात येणार आहे. 22 जुलै ते 29 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सेतू समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यापदासाठी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, मुलभूत संगणक कौशल्यासह एमएस-सीआयटी प्रमाणपत्र किंवा समकक्ष अर्हता आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखेत नियुक्तीचे ठिकाण असेल. 30 गुणांची तोंडी मुलाखत असणार आहे. या पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखा येथे 500 रुपये भरून उपलब्ध होतील. 1 ऑगस्ट रोजी अर्ज छाननी, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजलेपासून पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत आणि 3 ऑगस्ट रोजी गुणवत्ते नुसार पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. एखाद्या उमेदवाराने / अर्जदाराने त्याची निवड करण्यासाठी निवड समितीवरील अध्यक्ष, सदस्य तसेच अधिकाऱ्यांवर प्रत्य...

कृषीला सौर ऊर्जेची जोड देणारी प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जिल्ह्यातील 4 हजार लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : राज्यात महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक - ब योजनेत पात्र शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील 4 हजार लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तर राज्यभरात सद्य:स्थितीत 52 हजार 750 लाभार्थी निश्चित झाले असून यापैरी पात्र 35 हजार 578 लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी कळवण्यात आले आहे. 27 हजार 26 लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा जमा केला असून 18 हजार 357 ठिकाणी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे 4 हजार सौर कृषी पंप आस्थापित झाले असल्याची माहिती रविंद्र जगताप, महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांनी दिली आहे. राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास करण्यासाठी प्रत्साहनात्मक धोरण जाहीर केली आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षांपासून स्वयंअर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ए...

जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर इतकी आहे.कणकवली-वागदे,राष्ट्रीय महामार्ग 66 पूलाजवळ गडनदीची पातळी 34.600 मीटर इतकी असून इशारापातळी 36.764 मीटर व धोका पातळी 37.920 मीटर इतकी आहे. तेरेखोल नदीची पाणी पातळी इन्सुली चेकपोस्ट पुलाजवळ 0.900 मीटर इतकी असून इशारा पातळी 4.260 मीटर व धोका पातळी 6.260 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 9.7 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : गेल्या चौवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 9.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 4.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1826.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 7.8 (1473.3), मालवण- 2.6 (1724.8), सावंतवाडी- 3.0 (2177.9), वेंगुर्ला- 0.9 (1854.0), कणकवली- 9.7 (1708.2), कुडाळ- 4.6 (1992.7), वैभववाडी- 5.4 (1893.0), दोडामार्ग- 2.8 (2078.9) असा पाऊस झाला आहे. 00000

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.553 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.26 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 2 हजार 433 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 58.6540, अरुणा -24.5400, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 2.648, नाधवडे- 2.387, ओटाव- 2.320, देंदोनवाडी – 0.601, तरंदळे - 2.537, आडेली- 1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 2.443, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक- 1.470, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.416, दाभाचीवाडी- 1.865, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.330, कारिवडे – 1.343, धामापूर – 1.191, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.339, ओझरम – 1.819, पोईप – 0.746, शिरगाव – 0.622, तिथवली – 1.723, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.812...

उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवांतर्गत २६ जुलै रोजी सिंधुदुर्गात विशेष कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी,दि.२० (जि.मा.का.): आजादी का अमृतमहोत्सवातंर्गत केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. राज्यात ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व इतर भागिदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या दि. 25 ते 30 जुलै 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवार दि.26 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यान आले आहे. सिंधुदुर्ग येथे दि.26 जुलै रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सव कार्यक्रमास केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक हे उपस्थिती असणार आहेत. दुपारच्या सत्रात कणकवली येथे भगवती मंगल कार्यालयात दुपारी 3.00 वा. आयोजित कार्यक्रमास खासदार विनायक राऊत, आमदार निलेश राणे हे उपस्थिती असणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची उपस्थिती असेल. गत ...

आजअखेर 56 हजार 202 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 54 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

आयटीआय सावंतवाडी प्रवेशासाठी २३ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी,दि.२० (जि.मा.का.): सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट 2022 करीता मंजूर असलेल्या 1) सुईंग टेक्नॉलॉजी, 2) कारपेंटर, 3) कोपा, 4) इलेक्ट्रीशियन 5) मोटर मेकॅनिक होईल, 6) फिटर 7) टर्नर, 8) वायरमन तसेच 9) आयसीटीएसएम या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चित करणे व ट्रेड विकल्प भरणेबाबतची प्रक्रीया https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 23 जुलै 2022 रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र.फ.पाटील, यांनी केले आहे.. प्राथमिक गुणवत्ता यादी दिनांक २५.७.२०२२ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध होईल व उमेदवारांना SMS द्वारे कळविले जाईल किंवा स्वतःच्या Login मधून आपला गुणवत्ता क्रमांक पहाता येईल. गुणवत्तेबाबत कोणताही आक्षेप, हरकत असल्यास तसेच अर्जातील काही निवडक माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास उमेदवारांने आपल्या नजिकच्या आयटीआयमध्ये जाऊन दिनांक २५.७.२०२२ ते २६.७.२०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत हरकती नोंदवाव्यात. त्यानंतर बदल करता येणार ...

307 एनसीसी कॅडेट्सनी घेतला ओरोस येथे योगा प्रशिक्षणाचा लाभ

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) : 58, महाराष्ट्र बटालियन ओरस सिंधुदुर्ग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भारतीय थल सेना कॅम्प व कम्बाईन ॲन्युयल ट्रेनिंग कॅम्प मध्ये लायन्स ग्रुप मालवण यांच्या वतीने योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कॅम्पला उपस्थिती 307 एनसीसी कॅडेट्सनी या योग प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी लायन अध्यक्ष वैशाली शंकरदास, लायन सेक्रेटरी व योग साधक अनुष्का चव्हाण, लायन खजिनदार अंजली आचरेकर, योग गुरु व लायन जयश्री हडकर, योग गुरु सिद्धी माणगावकर, योग साधक केतकी सावजी, योग साधक मीरा बांदकर योग साधक व नंदिनी गावकर या उपस्थित होते. योग गुरु व योगसाधक यांनी योगाचे महत्त्व योगाची आसने करून दाखवली. या प्रशिक्षणामुळे एनसीसी विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न राहण्यासाठी प्रेरणा मिळाली. कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ, सेना मेडल प्राप्त, ॲडम ऑफिसर कर्नल लेखराज, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, सुभेदार देवेंद्र सिंह, सुभेदार तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्र केस, नायब सुभेदार जितेंद्र तिवारी, सुभेदार आर. एन. भांजा, यांच्या अधिनस्त हे शिबीर सुरू आहे. तसेच एन...