मौजे कणकवली शहर गांगोवाडी येथे कंटेन्मेंट झोन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 31 : कणकवली तालुक्यातील मौजे कणकवली शहर गांगोवाडी येथील सुरेश दिगंबर परुळेकर यांचे घर व परिसर, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना , दुकाने , वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा , सार्वजनिक वितरण व्यवस्था , वैद्यकिय उपचार व्यवस्था , बँक , सेवा देणारे अधिकारी , कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम , 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहित...