आय.ए.एस साठी निवड झालेल्या वसंत दाभोळकरचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मान

सिंधुदुर्गनगरी दि.14 (जि.मा.का):- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस) निवड झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र वसंत प्रसाद दाभोळकर यांचा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात श्री. दाभोळकर यांचा सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचे रहिवासी असलेले प्रसाद दाभोळकर यांचे चिरंजीव वसंत दाभोळकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. वसंत दाभोळकर यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळविले. श्री. दाभोळकर यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ला येथे व १२ वी पर्यंतचे शिक्षण कुडाळ येथे झाले. रत्नागिरीत फिनोलेक्स कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरीगंचे शिक्षण पूर्ण केले. दिनांक २३ मे २०२३ रोजी त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. श्री. दाभोळकर यांचे वडील राज्य परिवहन महामंडळात (एस.टी) मध्ये लिपिक या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहे. * सोबत फोटो जोडला आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'