जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दि. 1 नोव्हेंबर 2023 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.3 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाचे प्रतिस्पर्धा गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव कार्यकर्ते मेळावे, कॉर्नर सभा घेऊन एकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यात आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होताना दिसत आहेत. त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि. 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी दि. 12 नोव्हेंबर...