Posts

Showing posts from March, 2026

'पत्रकार पुरस्कार' प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जिमाका) :- जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रम आणि जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार आणि प्रचार करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे सादर करावेत. यासाठीची अंतिम मुदत पूर्वी २३ मार्च २०२६ होती; मात्र आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी आपले प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करताना १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या लिखाणाचा समावेश असणे आवश्यक असून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. तसेच संबंधित कालावधीत प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख यांची प्रत प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील शासकीय योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करून जनतेपर्यंत माहिती पोहोचविणाऱ्या पत्रकारांना या उपक्रमातून सन्मानित ...

एप्रिलमध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; राज्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30(जिमाका) :- हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता "हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान" सुरू केले आहे. हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठ...

‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अॅथलेटिक्स खेळाडू निवड चाचणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30(जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता सद्यस्थितीत अॅथलेटिक्स, या खेळांकरिता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील क्रीडा प्रतिभा विकास केंद्र हे अनिवासी केंद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्हास्तर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, ओरोस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी https://forms.gle/४kq६VfWkoJrcAvUh८ या लिंकवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व राज्यातील क्रीडा विकासाकरिता मिशन लक्ष्यवेध हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, स्पर्धाचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करिअर मार्गदर्शन खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी-विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित होण्याच्या दृष्टीने मिशन लक्ष्यवेध ही योजना कार्यान्वित करण्यात आले...

सिंधुदुर्गमध्ये अंमली पदार्थांविरोधात संयुक्त कारवाईचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30(जिमाका) :- जिल्ह्यात अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन होण्याचे दृष्टीने सर्व विभागांनी पोलीस विभागासोबत एकत्रितरित्या कामकाज करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी सुचना दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेली अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक, सेवन याबाबत गोपनिय बातमिदारांमार्फत माहिती काढून असे करत असलेल्या व्यक्तिविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे N-CORD संदर्भातील मासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते. तसेच अशाप्रकारचे बेकादेशीर कृत्य करणाऱ्यांवर प्रतिबंध करणेसाठी, शाळा / कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थांचे परिसरात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री होत असल्यास त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी संबधीत विभागांना आदेशीत केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यत्त्वे लगतचे गोवा राज्य आहे. त्या राज्यातून शिरोडा, वेळागर याठिकाणी परदेशी नागरीक मोटार सायकल किंवा बोटीद्वारे प्रवास करीत ...

जिल्ह्यात 31 मार्च व 01 एप्रिल या कालावधीत यलो अलर्ट नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30(जिमाका) :- जिल्ह्यात ३० मार्च २०२६ रोजी गडगडाटासह हलाक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. दि.३१ मार्च व दि.१ एप्रिल २०२६ या कालावधीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४) विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. ...

व्यावसायिक एलपीजी वाटपासाठी PNG (Piped Natural Gas) जोडणी आवश्यक; सिंधुदुर्गातील ग्राहकांना अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, :केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, व्यावसायिक एलपीजी (Commercial LPG) वाटपाबाबत सर्व राज्यांच्‍या मुख्य सचिवांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक/औद्योगिक (हॉटेल, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्‍टीन, अन्‍न प्रक्रिया / दुग्‍धव्‍यवसाय, सामुदायिक स्‍वयंपाकघरे इ.) एलपीजी (Commercial ) ग्राहकांना सूचित करण्यात येते की, व्यावसायिक एलपीजीच्या एकूण 50% वाटपातून पात्र होण्‍यासाठी संबंधित ग्राहकांनी प्रथम या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या City Gas Distribution (CGD) संस्थेकडे Piped Natural Gas (PNG) जोडणीसाठी अर्ज करण्‍यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या २७ मार्च २०२६च्या पत्रान्वये सुचवले आहे. त्‍याकरिता ग्राहकांनी खालील दिलेल्‍या नंबरवर अथवा कंपनीकडे संपर्क साधावा. Address – Maharashtra Natural Gas Limited, Shree Saikala, House No- 3192, Opp. Nakshatra Nagari, Sangirdewadi, Kudal, Tal. Kudal, Dist.- Sindhudurg Pin Code – 416 520. Contact number – 7588090505/ 989074...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी विभागवार वाटप करण्यात आलेला निधी, त्या निधीअंतर्गत करण्यात आलेली कामे आदी. बाबींचा सविस्तर आढाव घेत सर्व यंत्रणांनी BDS वर वितरित केलेला निधी ३१ मार्च २०२६ पूर्वी १००% खर्च करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही विभागाचा निधी समर्पित होणार नाही याची सर्व जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांची असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, अनुसुचित जाती योजनेच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी सर्व यंत्रणांना देण्यात आलेल्या निधी विषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २८२ कोटी रुपये एवढी मूळ अर्थसंकल्पीत तरतूद असून १०० टक्के निधी प्राप्त झालेला आहे. २९६ कोटी ३० लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्य...

पेट्रोल-डिझेल अनधिकृतरीत्या साठवू नकाः नियमभंग केल्यास प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा

• बाटली, प्लास्टिक कॅन, बॅरलमध्ये इंधन देण्यास बंदी सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा पुरेसा आहे. काही नागरिक आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कॅन, लोखंडी बॅरल, बाटल्या किंवा इतर असुरक्षित साधनांमध्ये पेट्रोल-डिझेलची साठवणूक करीत असल्याबाबत आढळून आले आहे. पेट्रोल आणि डिझेल हे अति-ज्वलनशील पदार्थ आहेत. निवासी क्षेत्रांमध्ये, गजबजलेल्या ठिकाणी किंवा अनधिकृत गोदामांमध्ये अशा प्रकारे इंधनाचा साठा करणे हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे. निवासी भागात किंवा असुरक्षित ठिकाणी त्यांचा साठा करणे हे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि मानवी जीवनासाठी गंभीर धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अनिवार्य आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १५२ (ब) व १५२ (क...

सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) प्रकल्प राबविण्यात येणार- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, २७ मार्च, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसंदर्भात A.I. चा वापर करण्याबाबत एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे निलेश नलावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, संचालक (कृषी व नवोपक्रम) डॉ. भूषण गोसावी, एडीटी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय तज्ज्ञ (मृदा विज्ञान) डॉ. विवेक भोईटे, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग डॉ. वैभव शिंदे , धोरणात्मक सल्लागार डॉ. संतोष देशमुख, शास्त्रज्ञ डॉ. संजनी साळुंखे उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, प्रकल्पसाठी शेतकऱ्यांचा मूलभूत डेटा, नाव, संपर्क क्रमांक, गाव आदी माहिती संकलित करून त्यां...

जिल्ह्यात 25 ते 26 मार्च या कालावधीत यलो अलर्ट या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- जिल्ह्यात २५ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची आणि ३० ते ४० किमी प्रतीतास वेगाने सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४)विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. (६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. (७) धातूच्य...

कुडाळ येथे २७ व २८ मार्च रोजी ग्रंथोत्सव २०२५ चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २५ (जिमाका) :- ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तथा सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील गुलमोहर हॉटेलच्या महालक्ष्मी सभागृहात शुक्रवार दिनांक 27 मार्च व शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन 27 मार्च 2026 रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी विद्यार्थ्यांचा दशावतार कार्यक्रम तसेच कै. गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर अभिवाचन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. 28 मार्च 2026 रोजी प्रसाद कुलकर्णी यांचा आनंद यात्रा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथपालाची भूमिका हा परिसंवाद होणार आहे .तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतायु ग्रंथालये सन्मान सोहळा हा कार्यक्रम दुपारी 3 वाजता होणार आहे. या ग्रंथोत्सवामध्ये विविध ग्रंथ विक्रीचे स्टॉलही उपलब्ध असणार आहेत. तरी नागरिकांनी व पुस्तकप्र...

सिंधुदुर्गनगरी विकासाला गती; रस्ते, स्मारक सुशोभीकरण व सोलार हायमास्टसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत प्राधिकरण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले. बैठकीला प्राधिकरणाच्या सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत, महेश ऊर्फ छोटू पारकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे यांनी प्राधिकरणाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्राधिकरण क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सुशोभीकरण, व्यापारी संकुल उभारणी तसेच जिल्हा मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी स्वागत कमानीचा आराखडा सादर करण्यास सांगितले. शहरातील पायाभूत सुविधांवर भर देत जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्ती करणे, तसेच पाणी गळती र...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली भात खरेदी संदर्भात बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि २४ (जिमाका)खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिक पाहणी DCS प्रणालीत नोंद न झाल्याने त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंद दिसत नसून, त्यामुळे पणन विभागाकडून भात खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. पालकमंत्री नितेश राणे यांनी हा विषय शासन स्तरावर गांभीर्याने मांडणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले आहे. ऑफलाईन पंचनाम्याद्वारे पिक पाहणी झालेल्या, परंतु ऑनलाईन ७/१२ वर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या भात खरेदीचा प्रश्न सोडवण्यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष ...

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर

सिंधुदुर्गनगरी, दि. २४ (जिमाका) :- मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या या शिबिराचा मुख्य उद्देश दुर्बल व वंचित घटकांतील रुग्णांना सर्व प्रकारच्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा आहे. दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर सहज उपलब्ध होत नसल्याने, पालकमंत्री नितेश राणे यांनी इतर जिल्ह्यांमधून स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची उपलब्धता करून दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरखडेकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अन...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. २४ (जिमाका) पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. पेट्रोलपंप चालक व इंधन कंपन्यांचे सेल्स अधिकारी यांनी एकमेकांमध्ये योग्य समन्वय ठेवून काम करावे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या प्रमुख तेल कंपन्यांचे सेल्स अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोलपंप डिलर्स यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला व उपलब्धतेबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी प्रशासन तुमच्या सोबत असल्याचा विश्वास देत, नागरिकांनी कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन केले. तसेच अफवा ...

राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जिमाका) :- समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2025-26 या उपक्रमांतर्गत “Exposure Visit Inside State” या शैक्षणिक सहलीसाठी ज्या शाळा सर्वांत जास्त प्रगत झालेल्य आहेत. ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, अशा शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस (Reward) देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील (इ.6 वी ते इ.8 वी) 23 मुली व 22 मुलगे अशा गुणवंत विद्यार्थ्यांना दि.23 ते 24 मार्च 2026 या कालावधीमध्ये सहल आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयप्रकाश परब यांनी दिली आहे. सहल कार्यक्रमानुसार पहिल्या दिवशी सिंधुदुर्गनगरी येथून कणेरी मठ, बाहुबली गार्डन, वारणा समूहाचा दूध उत्पादन प्रकल्प, साखर कारखाना, सुतगिरणी, जयसिंगपूर तसेच कोल्हापूर शहर दर्शनाचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी उद्यमनगर व एमआयडीसी कोल्हापूर भेट, पन्हाळा गड दर्शन करून सहल परत सिंधुदुर्गनगरी येथे येणार आहे. या अंतर्गत आपल्या राज्यातील मुलांनी भेटी दिल्यास विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाण घेवाण, सांस...

वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जिमाका) :- कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यवसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज मत्स्यबोटूकली संवर्धक तसेच मत्स्यव्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे. या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत देण्यात येणार असून ही सवलत लघुदाब, उच्चदाब तसेच अतिउच्चदाब वीज जोडण्यांसाठी लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरून सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयार्मात करण्यात आले आहे. अर्जाचा नमुना तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, दूरध्वनी क्र. ०२३६५ २५२००७ किंवा acfsdurg@gmail.com ईमेल वर संपर्क साधावा. सोबत : QR कोड ००००००

शहीद दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सिंधुदुर्गनगरी, दि. २२ (जिमाका) :- शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी अत्यंत कमी वयात प्रगल्भ विचारसरणी, देशभक्ती आणि त्यागाची भावना जोपासली. त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. शहीद दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यानुसार आचरण करण्याचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे , निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ०००००

कणकवली येथे २४ मार्च रोजी 'खरेदीदार-विक्रेता' (Buyer-Seller) संमेलनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २२ (जिमाका) :- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), शेतकरी गट आणि सूक्ष्म उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे मंगळवारी, २४ मार्च २०२६ रोजी 'खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सकाळी ०९ ते सायंकाळी ६ या वेळेत कणकवली कॉलेज, कणकवली येथे संपन्न होणार असून खरेदीदार विक्रेता यांचे करार दुपारी ३ ते ६ या वेळेत होतील. संमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये: 1) थेट बाजारपेठ: प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट मोठ्या खरेदीदारांसमोर (Big Buyers/Retailers) सादर करण्याची संधी मिळेल. २) व्यावसायिक करार: खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात सामंजस्य करार (MoU) घडवून आणण्यासाठी विशेष व्यासपीठ. ३) मार्गदर्शन कार्यशाळा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पिके जसे की काजू, कोकम, आंबा आणि फणस यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटिंग आणि पॅकेजिंग यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र. ४) व्यवसाय विस्तार: नवीन व्यवसाय संधी आणि थेट व्यवहार करण्य...

कुडाळमध्ये ‘सिंधुसरस’चा उत्साहपूर्ण जल्लोष महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘सिंधुसरस’चे बळ -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची ताकद मोठी असून त्या अधिक सक्षम झाल्यास जिल्ह्याचे अर्थकारण अधिक भक्कम होणार आहे. ‘सिंधुसरस’ व ‘मिनी सरस’ प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील असंख्य माता-भगिनींना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उपक्रमामुळे महिलांना केवळ बाजारपेठ मिळत नाही, तर त्यांच्या कौशल्याचा विकास होत आर्थिक स्वावलंबनाचा मार्गही खुला होत आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत असून त्यांच्या आर्थिक उन्नतीस नवे बळ मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, यांच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ च्या प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूल पटांगण, कुडाळ येथे करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी ...

‘सिंधु आरोग्य मेळावा २०२६’ चे प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत यावर्षी ‘सिंधु आरोग्य मेळावा 2026’ हा दि. 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा, ता. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या आरोग्य मेळाव्यात विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत तपासणी, सल्ला व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक तसेच हृदयरोग तज्ञांचा समावेश आहे. तसेच, सर्वसाधारण आरोग्य तपासणी (ब्लड प्रेशर, ब्लड शुगर), विविध रक्त तपासण्या (हिमोग्लोबिन, लिव्हर व किडनी फंक्शन) तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग (मुख, स्तन, गर्भाशय मुख) यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरादरम्यान आयुष्यमान कार्ड व वंदना कार्ड देखील काढण्याच...

नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) :- प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांचेकडून दि.२२ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील काही भागात उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. उष्णतेत होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्राप्त पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणोचे मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. काय करावे १) पुरेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. २) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. ३) दुपारी बारा ते तीन वाजे दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा. ४) सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. ५) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. ६) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. ७) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ८...

विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अनुषंगाने सर्व पक्षांची आढावा बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जिमाका) :- मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः सन २००२ च्या मतदार यादीतील मतदारांचे सध्याच्या यादीशी मॅपिंग करून अचूकता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच मतदार यादीतील मृत (Dead), दुबार (Duplicate) नावे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे तातडीने वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदार यादी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ओ. (BLO) सोबत राजकीय पक्षांनी बी.एल.ए. (BLA) यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अद्याप बी.एल.ए. नियुक्त झालेले नाहीत, त्या ठिकाणी तात्काळ नेमणुका करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बी.एल.ओ. आणि बी.एल.ए. यांनी समन्वयाने काम करताना नाव वगळणे किंवा दुरुस्ती प्रक्रियेत पूर्ण पारदर्...

पालकमंत्री नितेश राणे घेतला व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा आढावा; हॉटेल व व्यापारी संघटनांच्या समस्याही जाणून घेतल्या

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ (जिमाका) : व्यावसायिक गॅस पुरवठ्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली BPCL, IOCL आणि HPCL या तीनही कंपन्यांच्या समन्वयकांची तसेच जिल्ह्यातील हॉटेल व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, याचा थेट परिणाम जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर होत आहे. हॉटेल व व्यापारी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सहारे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. हॉटेल चालकांनी संयम बाळगून काम करावे आणि नागरिकांमध्ये कोणताही गैरसमज किंवा असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधण्या...

जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जिमाका) :- ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग, यांच्या वतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ च्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ ते २५ मार्च २०२६ च्या कालावधीत कुडाळ हायस्कूल पटांगण कुडाळ येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनासाठी आमदार सवश्री, डॉ. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे , दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ नगरपंचायतचे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या प्रदर्शनासाठी निमंत्रित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ख...

वैभववाडी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जिमाका) :- पंचायत समिती वैभववाडीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती वैभववाडीच्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती वैभववाडीचे पंचायत समितीचे सचिव तथा गट विकास अधिकारी प्रिमेश वाघ यांनी दिली आहे. ०००००

विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अनुषंगाने सर्व पक्षांची आढावा बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जिमाका) :- मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः सन २००२ च्या मतदार यादीतील मतदारांचे सध्याच्या यादीशी मॅपिंग करून अचूकता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच मतदार यादीतील मृत (Dead), दुबार (Duplicate) नावे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे तातडीने वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदार यादी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ओ. (BLO) सोबत राजकीय पक्षांनी बी.एल.ए. (BLA) यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अद्याप बी.एल.ए. नियुक्त झालेले नाहीत, त्या ठिकाणी तात्काळ नेमणुका करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बी.एल.ओ. आणि बी.एल.ए. यांनी समन्वयाने काम करताना नाव वगळणे किंवा दुरुस्ती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकत...

ई-पीक नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जिमाका) :- रब्बी हंगाम २०२५-२०२६ अंतर्गत ई-पीक पाहणी (Digital Crop Survey - DCS) अंतर्गत मोबाईल ॲपव्दारे पीक नोंदणीस शासनाकडून दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन डी.डी.ई.तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा शासन निर्णय दि.१४.१०.२०२४ अन्वये संपूर्ण राज्यामध्ये ई-पीक पाहणी Digital Crop Survey (DCS) अंतर्गत मोबाईल अॅपद्वारे पीक नोंदणी करण्यात येते. राज्यात रब्बी हंगाम २०२५-२०२६ हा दि. १० डिसेंबर, २०२५ पासून सुरु असून त्या अंतर्गत दि. १० डिसेंबर, २०२५ ते २४ जानेवारी, २०२६ या कालावधीत शेतकरी स्तरावरून ई-पीक नोंदणी झाली होती. तसेच दि. २५ जानेवारी, २०२६ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली असून त्याची अंतिम मुदत दि.१० मार्च, २०२६ अशी होती. आज अखेर रब्बी हंगाम २०२५-२०२६ साठी एकूण पीक पाहणी क्षेत्रापैकी ५५.६९ टक्के इतक्या क्षेत्राची पीक नोंदणी करण्यात आली आहे. पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती,...

पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलासाठी अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत -पालकमंत्री नितेश राणे

सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार -गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर • २८ वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल • सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना सिंधुदुर्गनगरी, दि. १९ (जिमाका) सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलीस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालकमंत्री नितेश राणे व गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते पोलीस दलासाठी २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण करण्यात आल...

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जिमाका) :- आखाती देशातील तथा अमेरिका, इस्राइल व इराण या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून दररोज कंपनीमार्फत एजन्सीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची आवक होत आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. त्यामुळे एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. गॅस सिलेंडरचे बुकिंग करताना OTP बुकिंग ऐवजी IOCL/BPCL/HPCL या कंपनीमार्फत दिलेल्या नवीन ऍपद्वारे बुकिंग करावे. बुकिंग केल्यानंतर तात्काळ गॅस सिलेंडर मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. तसेच गॅस बुकिंगसाठी कंपनीने बदलेल्या प्रक्रियेनुसार शहरी भागात 25 दिवस व ग्रामीण भागात 45 दिवस गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जाईल. याची नोंद घ्यावी व कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. याबाबत काही अडचणी उ‌द्भवल्यास हेल्पलाईन क्र. 02362-228847 /1077, मोबाईल क्र. 7498067835 या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा तात्काळ संबंधित तालुक्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. सर्व तालुक्यातील तक...

जिल्हा परिषद समिती सभापती पदांसाठी २५ मार्चला निवडणूक

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विद्यमान सदस्यांमधून सभापती, समाज कल्याण समिती- एक पद, सभापती, महिला व बालकल्याण समिती- एक पद व विषय समिती सभापती- दोन पदांचे निवडणूकीसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता बैठक आयोजित करुन निवडणूक घेण्यात येणार आल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तसेच विद्यमान पंचायत समिती सभापती यांना या सभेस उपस्थित रहाणेबाबत या कार्यालयाकडून दि. १८ मार्च २०२६ रोजी नोटीसा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पाठविण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग येथे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सभापती, समाज कल्याण समिती - एक पद, सभापती, महिला व बालकल्याण समिती- एक पद आणि विषय समिती सभापती- दोन पदांचे निवडीच्या बैठकीस उपस...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली प्राणी जन्म नियंत्रण केंद्राला भेट

सिंधुदुर्गनगरी, दि. १८ (जिमाका) :- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यांनी कणकवली येथील ABC (Animal Birth Control) केंद्राला सोमवार (दि १६ मार्च) रोजी भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान केंद्रातील विविध नोंदी, स्वच्छता व्यवस्था, कुत्र्यांच्या देखभालीची सुविधा तसेच शस्त्रक्रिया प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. पाहणीदरम्यान काही बाबींमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित यंत्रणेला कामकाज अधिक शिस्तबद्ध व नियमांनुसार करावे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO WRIT PETITION (Civil) No(s). 5 of 2025 तसेच प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियम, 2023 नुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत व नियमानुसार पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त विनायक औंधकर, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, पशुसंवर्धन विभागाचे श्री बिलोलीकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. भेटीदरम्यान ABC केंद्राच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे का तसेच त्या ...

कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदत जाहीर करण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• आंबा व काजू प्रश्नाबाबत बैठक मुंबई, दि.17 :- आंबा व काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहोळ गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधान भवनात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, दीपक केसरकर, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, निलेश राणे, राजेंद्र गावित, प्रसाद लाड, किरण सामंत, ज्ञानेश्वर म्हात्रे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण कृषी विद्याप...

जागतिक ग्राहक दिन साजरा ग्राहकांनी हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवावी -रवींद्र खेबुडकर

सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) : ग्राहकांनी केवळ आपल्या हक्कांची जाणीव न ठेवता ग्राहक म्हणून आपली कर्तव्येही जबाबदारीने पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. जागरूक, सजग आणि जबाबदार ग्राहक हा सशक्त व सुदृढ समाजाचा पाया असतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. ग्राहक संरक्षणाबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागच्यावतीने 'जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, जिल्हा ग्राहक समिती सदस्य ॲङ नकुल पार्सेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते. प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या की, ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहक जागरूक असेल तरच बा...

पत्रकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. १७ (जिमाका) :- जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रम आणि जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार आणि प्रचार करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी आपले प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले आहे. इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या नावे दि. २३ मार्च २०२६ पर्यंत सादर करावेत. प्रस्ताव सादर करताना १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत केलेल्या लिखाणाचा समावेश असणे आवश्यक असून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. तसेच संबंधित कालावधीत प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख यांची प्रत प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील शासकीय योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करून जनतेपर्यंत माहिती पोहोचविणाऱ्या पत्रकारांना या उपक्रमातून सन्मानित करण्यात येणार असल्याने पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आ...

जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात येणारे सण-उत्सव हे सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन आनंदाने साजरे करण्याची परंपरा आहे. या काळात जिल्ह्यात सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सर्व समाजघटकांमध्ये संवाद वाढणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेहमीच शांतता आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण राहिले असून प्रशासनाला सर्व बांधवांचे सहकार्य मिळत आले आहे. आगामी सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनीही यावेळी कायदा व...

ग्राहक हक्कांबाबत जनजागृतीसाठी ‘जागतिक ग्राहक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. १६ (जिमाका) : ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी तसेच ग्राहक संरक्षण कायद्याविषयी व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष तृप्ती धोडमिसे भूषविणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथील पत्रकार भवन सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी ...

‘मी सिंधुकन्या’ स्वाक्षरी मोहिमेतून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश; ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा उत्साहात • तज्ञांचे मार्गदर्शन, आरोग्य-कायदे व ताण-तणाव व्यवस्थापनावर सत्रे • एक हजारांहून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जिमाका) :- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय क्षमता बांधणी शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम व मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवसीय मेळावा शुक्रवार (दि १३) आयोजित करण्यात आला होता. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात एक हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सिंधुकन्या’ लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच ‘मी सिंधुकन्या…’ या संकल्पनेतून स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. मुलींच्या सन्मान व सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी पालखी आणि दिंडी काढण्यात आली. याचवेळी जनजागृतीसाठी सजविण्यात आलेल्या चित्ररथाचेही उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या महिला...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरामुळे नागरिकांना दिलासा; प्रशासन-नागरिकांमध्ये सुसंवाद वाढविण्यासाठी उपयुक्त - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरामुळे नागरिकांना दिलासा; प्रशासन-नागरिकांमध्ये सुसंवाद वाढविण्यासाठी उपयुक्त - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे वेंगुर्ले येथे १३४४ नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) :- नागरिकांना विविध दाखल्यांमध्ये दुरुस्ती करणे किंवा शासकीय सेवा मिळविण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे तत्काळ निराकरण होण्यास मदत होते. अशा शिबिरांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात सुसंवाद निर्माण होतो. नागरिकांच्या विविध प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फ...

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागामार्फत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी केले आहे. प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन खालील समस्या जाणवू शकतात. अतिसार (Diarrhea) आणि उलट्या, चक्कर येणे किंवा प्रचंड थकवा जावणणे. डोकेदुखी आणि अस्वस्थता. त्वचेला खाज येणे किंवा घामोळ्या होणे. उष्माघात हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात शरीराचे तापमान अचानक वाढते आणि रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. काय करावे ? भरपूर पाणी प्या, तहान लागलेली नसली तरही दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी प्या. घराबाहेर पडताना काळजी, डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा. पेय पदार्थांचे सेवन,लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS), नारळ पाणी आणि घरगुती नैसर्गिक पेयांचे सेवन वा...

काचबिंदू डोळ्यांचा ‘सायलेंट किलर’ वेळेवर निदान गरजेचे

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) :- काचबिंदू हा डोळ्यांचा ‘सायलेंट किलर’ असून वेळेवर निदान होणे गरजेचे आहे. ८ मार्च ते १४ मार्च हा कालावधी जागतिक काचबिंदू आठवडा म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डोळ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. अंधत्व येण्याच्या कारणांपैकी मोतिबिंदूच्या खालोखाल काचबिंदू हे कारण आहे. यामध्ये रुग्णाची नजर हळूहळू कमी होत असल्याने त्याची लवकर जाणीव होत नाही. त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा जातो.तेव्हा त्यांची नजर कायमस्वरूपी गेलेली असते. त्यामुळे काचबिंदूला डोळ्यांचा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर गेलेली नजर संपूर्ण येते. तर काचबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर असलेली नजर टिकविण्याचा प्रयत्न असतो. काचबिंदू हा वाढत जाणारा आजार असून वयाच्या चाळीशीनंतर होणारा आजार आहे. वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, सभोवतालचे कमी दिसणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. डोळ्यांशी संबंधित अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्रतज्ञांकडे तपासणी करून...

डायबेटिक व हायपरटेन्सीव्ह रेटिनोपॅथी संदर्भात जिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जिमाका) :- डायबेटिक रेटिनोपॅथी व हायपरटेन्सीव्ह रेटिनोपॅथी या आजारासंबंधी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब सिंधुदुर्ग, मिरज, सांगली व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या महाआरोग्य शिबिराचा लाभ ७५ रुग्णांनी घेतला. तपासणीदरम्यान डायबेटिक रेटिनोपॅथी असलेले ८ रुग्ण पुढील उपचारासाठी मिरज येथे संदर्भित करण्यात आले आहे. डोळ्यांसंबंधी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्रतज्ञांकडे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांनी केले आहे. ००००००

नगर पालिका/ नगर पंचायत आढावा बैठक ‘नमो उद्यान’ विकासास गती द्या; ३० जूनपर्यंत काम पूर्ण करा -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी, दि. १४ (जिमाका) : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कामकाजाचा तसेच शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी घेतला. यावेळी नगर प्रशासन विभागाचे सह आयुक्त विनयाक औंधकर यांच्यासह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी प्रत्येक नगरी परिषदेला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उत्कृष्ट उद्यान विकसित करणाऱ्या नगरी परिषदेसाठी स्पर्धेचे निकषही निश्चित करण्यात आले असून याबाबतची कार्यवाही ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद तसेच कुडाळ, देवगड व कणकवली नगरपंचायतींनी उद्यानासाठी जागा निश्चित केली आहे, तर वेंगुर्ला नगरपरिषदेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत मालवण नगरपरिषद तसेच वाभवे-वैभववाडी आणि कसई-दोडामार्ग नगरपंचायतींनी तात्काळ जागा निश्चित करावी, असे निर्देशही त्या...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा; गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या

सिंधुदुर्गनगरी दि. १३ (जिमाका) :जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर माहिती घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गॅस एजन्सी धारक तसेच तहसीलदारांना आवश्यक सूचना दिल्या. सर्व गॅस वितरकांनी संयमाने काम करावे व नागरिकांमध्ये अनावश्यक घबराट निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय आस्थापना, रुग्णालये तसेच वसतिगृहे यांना व्यावसायिक सिलिंडर प्राधान्याने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले. केंद्र शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी...

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज - जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जिमाका) : आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य करत असून प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे महिलांना सक्षम करण्याची नव्हे तर त्यांना योग्य संधी देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्य साधून जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने 'क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमा'सह जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, आरती देसाई, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार चैताली सावंत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे,प्रमुख वक्ते डॉ. सुभाष दळव...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जिमाका):- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा चे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. आस्थापना, उद्योगासाठी पात्रता पुढील प्रमाणे असेल किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र असतील. खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेवू शकतात. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, सहकारी संस्थांना किमान 20 मंजूर पदाच्या 5 टक्के प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. आस्थापना, उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षा पुर्वीची असावी. आस्थापना, उद्योगांनी EPF, ESIC, GST, GST Certificte o...

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जिमाका):- गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली सुरू केली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. प्रणालीची वैशिष्ट्ये आणि महत्त्व ब्लॉकचेन तंत्रज्ञानः ही प्रणाली ब्लॉकचेन (Blockchain) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही, ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल. त्वरित पडताळणीः खेळाडूने माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटाशी ती जुळल्यास, अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होतो. QR कोड सुरक्षाः प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय QR कोड असेल, जो स्कॅन करून संबंधित नियुक्ती प्राधिकारी (उदा. MPSC, पोलीस भरती) प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील. आगामी पदभरतीसाठी क्रीडा ई-प्रमाणपत्र बंधनकारक महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना ख...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे महिला दिन संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : - महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय संकुलातील सर्व महिला अधिकारी, वकील व कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रमांचे उत्साहत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्या देशमुख, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव संपूर्णा गुंडेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात अॅड. प्रणिता कोटकर यांनी 'स्त्री शक्तीचा सन्मान' हा संदेश देत या कार्यक्रमात खेळांच्या माध्यमातून विरंगुळा आणि भाषणांतून प्रबोधन करण्यात आले. खेळ आणि आनंददायी वातावरण दैनंदिन न्यायालयीन कामकाजाच्या व्यापातून वेळ काढत महिलांनी या कार्यक्रमात उ...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जिमाका):- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. ००००००

कुडाळ येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनाक 11 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बजाज शोरूम, आर. एस. एन. हॉटेल समोर, कुडाळ येथे दि.13 मार्च 2026 रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत एकूण 30 पदांसाठी भरती होणार असून जिल्ह्यातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये बजाज शोरूम, कुडाळ येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी 10वी / 12वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर पदसंख्या 10 पदे उपलब्ध आहेत. तसेच मेकॅनिक पदासाठी आयटीआय मेकॅनिक / इलेक्ट्रिकल किंवा डिप्लोमा मेकॅनिक, इलेक्ट्रीकल पदसंख्या-20 पदे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे एकूण 30 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर प्लेसमेंट ड्राइव्ह प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे बजाज शोरूम, आर. एस. एन. हॉटेल समोर, कुडाळ ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे होणार असून इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहावे. अधिक माह...

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तेल कंपन्या व गॅस वितरकांची बैठक अवैध गॅस वापरावर भरारी पथकाची कारवाई

सिंधुदुर्गनगरी दि. १० (जिमाका) पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅससाठ्यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक तसेच पेट्रोल पंप डिलर्स यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. बैठकीदरम्यान BPCL, IOCL आणि HPCL या तीनही तेल कंपन्यांच्या समन्वयकांशी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही, असेही तीनही कंपन्यांच्या समन्वयकांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी किंवा गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्य...

गुणवंत विद्यार्थ्यांचा कर्नाटक राज्य अभ्यास दौरा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा

सिंधुदुर्गनगरी दिनाक 10 (जिमाका) :- समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2025-26 या उपक्रमांतर्गत Exposure Visits Outside the State या सहलीसाठी ज्या शाळा सर्वांत जास्त प्रगत झालेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) सर्वोत्तम आहेत, अशा शाळांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षीस (Reward) देण्यासाठी तसेच यावर्षी प्रथमच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी औद्योगिक क्षेत्र भेटीसाठी सूचना केल्या त्यानुसार बेळगाव येथील मेघा इंजिनिअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड तसेच Atlas कंपनीला विद्यार्थ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती (प्राथमिक) शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी दिली आहे. आज दि. १० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यास दौऱ्यास शुभेच्छा दिल्या. या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता ६ वी ते ८ वी मधील २२ मुलगे व २३ मुली असे एकूण ४५ गुणवंत विद्यार्थी दि. १० मार्च त...

जल जीवन मिशन अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान

सिंधुदुर्गनगरी दिनाक 10 (जिमाका) :- जल जीवन मिशन अंतर्गत महिला दिन ८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभर राष्ट्रीय जल महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने या महोत्सवासाठी राज्यस्तरावर नामांकन मागविण्यात आले होते. त्यामध्ये १०० टक्के वापरकर्ता शुल्क वसुलीद्वारे आर्थिक शाश्वतता साधणारी गाव व गावाची नळपाणी योजना आखण्यात सरपंच यांचा असणारा वाटा या घटकांतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार गावाची निवड करण्यात आली आहे. दिनांक ११ मार्च २०२६ रोजी राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमात ग्रामपंचायत परुळेबाजार सरपंच श्रीमती प्रणीती आबंडपालकर यांना सहभागी होण्याचा सन्मान मिळाला आहे. जल जीवन मिशन हा ग्रामीण भारतासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला गुणवत्तापूर्ण, नियमित, पुरेसे व शाश्वत पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि शाश्वत क...

विधी सेवा प्राधिकरण मार्फत महिला दिनानिमित्त पोक्सो कायद्यावर मार्गदर्शन शिबिर संपन्न

· बालकांचे संरक्षण ही काळाची गरजः 'अॅड. प्रणिता कोटकर- राऊळ यांचे प्रतिपादन · महिला दिनाचे औचित्य; विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'पोक्सों' वर जनजागृती सिंधुदुर्गनगरी दिनाक 10 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘पोक्सो’ (Protection of Children from Sexual Offences – POCSO) कायद्यावर विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली. या शिबिरात मुख्य वक्त्या म्हणून अॅड. प्रणिता कोटकर-राऊळ यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आजच्या काळात महिलांच्या सक्षमीकरणासोबतच बालकांची सुरक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. पोक्सो कायद्यातील तरतुदींची माहिती केवळ कायदेतज्ज...