Posts

Showing posts from February, 2026

‘हिंद-दी-चादर’ समागमात नऊ समाजांचे सामाजिक ऐक्य

नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नऊ समाजांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. विविध समाज, पंथ आणि घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले. या समागमात सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीयम, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी (भगत नामदेव) संप्रदायातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समागमात सर्व समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून एकता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. श्रद्धा, सेवा आणि समतेच्या विचारांवर आधारित कार्यक्रमात सर्वांनी शांततेत आणि शिस्तीत सहभाग घेतला. कार्यक्रमस्थळी सर्व समाजांनी परंपरा, संस्कृती आणि धार्मिक मूल्यांचा सन्मान राखत शांततेत सहभाग घेतला. विविध समाजांच्या उपस्थितीमुळे हा समागम केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ठरला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु ग्रंथ साहिब यांच्या शिकवणीनुसार समता व मानवतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध समाजांच्या सहभागामुळे हा समागम क...

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटक्या जमाती मधिल सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्यंकरणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करावा. त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्ममश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले,आंबेडकर पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार उपरोक्त पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्था याना प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यामधील इच्छुक व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील प्रस्ताव 15 मार्च 2026 पर्यंत 4 प्रतित सर्व कागदपत्रासह सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यानी केले आहे. ००००००

मालवण येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य कायदेविषयक सेवा शिबिराच्या निमित्ताने रा.ब.अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल, ता.मालवण येथे १ मार्च २०२६ रोजी एकूण ४५ जागांकरिता प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खाली पदांसाठी आवश्यक पात्रता तपासून सहभाग नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे. उपलब्ध पदे व पात्रता पुढीलप्रमाणे :- कुडाळ येथील लक्ष्मी नारायण होंडा, येथे मेकेंनिक-आय.टीप.आय.मेकेंनिक/डिप्लोमा मेकेंनिक, सेल्स एक्झिक्युटिव्ह- १०वी/१२वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर, बॅक ऑफीस असिस्टंट- कोणत्याही शाखेतील पदवीधर व एमएससीआयटी प्रमाणपत्र. एकूण पदसंख्या-२५ कुडाळ येथील बजाज शोरुम कुडाळ:- बॅक ऑफीस असिस्टंट- कोणत्याही शाखेतील पदवीधर व एमएससीआयटी प्रमाणपत्र, सेल्स एक्झिक्युटिव्ह- १०वी/१२वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर, मेकॅनिक-आय.टीप.आय.मेकॅनिक/...

दहावी –बारावीच्या विद्यार्थ्याना ग्रेस गुणांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिली जाणारी ग्रेस मार्क्स मिळवण्याची ऑनलाईन सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा फायदा मिळणार असून विद्यार्थ्यांना प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी पात्र खेळाडूंचे अर्ज क्रीडा संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षात सवलतीचे गुण मिळावेत, यासाठी ही सुविधा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जाते. क्रीडा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना पोर्टलवर जाऊन आपला अर्ज सादर करता येणार आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :- सवलत गुण मिळवण्यासाठी अर्ज करताना खेळाडू व...

विधी सेवा व शासकीय सेवा योजनांच्या महाशिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जिमाका):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई, यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्ह्यातील सर्व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १ मार्च २०२६ ला सकाळी १०.३० वाजता रा.ब.अनंत शिवाजी देसाई, टोपीवाला हायस्कूल ता.मालवण येथे विधी सेवा, शासकीय सेवा व योजनांचे महाशिबिर आयोजीत करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संपुर्णा गुंडेवाडी यांनी दिली आहे. शासकीय योजनांची माहिती समाजातील तळागाळापर्यंत पोहचविणे व जनजागृती करण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराचे उद्घाटन न्यायमूर्ती श्याम चांडक, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते न्यायमूर्ती फरहान दुभाष, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती, सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच डॉ.सुधीर देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश त...

हिंद दी चादर : मराठी मातीत गुंजणारा मानवतेचा झरा...

महाराष्ट्राच्या मराठी मातीत क्रांतीकारी आणि अध्यात्माचा एक अद्वितीय संगम आहे. या मातीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची गाथा संपूर्ण देशभर पसरवली. याच मातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ऐतिहासिक पराक्रम ऐकला आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अजोड बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असल्याने या ऐतिहासिक औचित्यावर 'हिंद दी चादर' हा उपक्रम महाराष्ट्र शासन राबवित आहे. केवळ एका धार्मिक उत्सवाचा भाग म्हणून नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एका विस्मृतीत गेलेल्या सुवर्ण धड्याची उजळणी होण्यासाठीच शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानंतर सुरु झालेला हा लोकजागर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मुख्य कारण म्हणजे या महामानवाचा आणि महाराष्ट्राचा असलेला एकअत्यंत घट्ट असा ऐतिहासिक बंध आहे. नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी भव्य शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुरु तेग बहादूरजींना 'हिंद दी चादर' म्हंटले जाते, कारण त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन म...

"हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी

वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनच्या सूक्ष्म नियोजनासह प्रशासन सज्ज नवी मुंबई,दि.२६ (विमाका) : ‘हिंद-दी- चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणांची पूर्वतयारीची सविस्तर बैठक घेऊन आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांसाठी फूड स्टॉल, लंगर, आदीबाबत शुद्धता राखत गुणवत्ता ठेवण्याची सूचना केली. तसेच भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीदरम्यान कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागातील संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा सविस्तरअहवाल सादर केला...

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीसाठी विशेष लेख मायबोलीत बोलू या! चला… मराठीतच बोलू या!!

मराठी भाषा हजारो वर्षांच्या इतिहासाने समृद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचे, ऐतिहासिक परंपरेचे आणि सृजनशीलतेचे जिवंत प्रतीक आहे. ‘माय मराठी’ या संकल्पनेत तिचे शुद्ध, प्रमाण आणि अभिजात रूप जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विविध उपभाषांनी वाढवलेले तिचे वैविध्यही महत्त्वाचे आहे. मराठी ही उपभाषांनी समृद्ध झालेली भारतातील एक प्रमुख भाषा आहे.मातृभाषा आपले अस्तित्व असते.बोलीभाषा माणसाची अस्मिता असते. प्रत्येक बोलीत तिचा वेगळा रंग, वेगळी लय आणि वेगळे चैतन्य तसेच लोकजीवनाचे प्रतिबिंब सामावलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना जगातील एका अभिमानास्पद भाषेला आपण ‘माय मराठी’ म्हणतो, याचा आत्मीय अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे. हा दिवस प्रत्येक मराठी माणसाने व्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, माध्यमांमध्ये आणि दैनंदिन संभाषणात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा संकल्प करण्याचा आहे. मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, म्हणजेच 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्धी...

उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे २७ फेब्रुवारीला ‘विशेष मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प’चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- जिल्ह्यातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दु.३ यावेळेत उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे 'विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प' चे आयोजित करण्यात आला आहे. या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तपासले जाणारे आजार व लक्षणे: या मोहिमेअंतर्गत खालील आजारांच्या रुग्णांची तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाईल: हृदयरोग: छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित असणे कर्करोग (कॅन्सर): स्तनातील गाठ, तोंडात न भरणारी जखम किंवा गर्भाशय मुखाचे आजार स्त्री रोग: मासिक पाळीच्या समस्या, पांढरे पाणी जाणे किंवा वंध्यत्व। अस्थिरोग: हाडे, सांधे व मणक्याचे आजार किंवा जुनी दुखापत शल्यचिकित्सा/पोटाचे विकार:...

“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी दि.१० मार्चपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विदयार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना" ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.२५ फेब्रुवारी ते दि.१० मार्च २०२६ पर्यंत https://h...

"पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना"चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी "पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी १० मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धीने अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना " पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. या पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.२५ फेब्रुवारी ते दि.१० मार्च २०२६ पर्यंत https://h...

सिंधुदुर्गमध्ये ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयातर्फे जिल्ह्यामध्ये ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेशन २०२६’ अंतर्गत शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी मायनाक भंडारी सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु ,मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक ,नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक, संशोधक, बॅका ई.नी उपस्थित राहून मार्गदर्शन केले . ००००००

हलक्या पावसानंतर दाट धुके; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका):- जिल्ह्यात दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. त्यानंतर दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दाट धुके पसरलेले आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर धुक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी पुढील प्रमाणे खबरदारीच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत प्रसारित करण्यात येत आहेत. धुके म्हणजे काय? पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्मकण हवेमध्ये तरंगत असल्यामुळे दृष्यमानता कमी होते. किमान १ किलोमिटर वरील दृष्य न पाहता येण्यासारखो स्थिती म्हणजे धुके होय. तर साधारणतः २०० ते ५०० मिटर अंतरावरील दृष्य न दिसण्यास मध्यम (Moderate) प्रकारचे धुके संबोधले जाते, ५० ते २०० मिटर अंतरावरील दृष्य न दिसण्यास दाट (Dense) प्रकारचे धुके संबोधले जाते तर ५० मिटर पेक्षा कमी अंतरावरील दृष्य न दिसण्यास घनदाट (Very Dense) प्रकारचे धुके संबोधले जाते. धुक्याच्या परिस्थितीत सार्वजनिक सुरक्षेसाठी व रस्ता अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील प्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान मुख्य रस्त्यावर वाहन उभे क...

विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन

कोल्हापूर दि २५ : कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा विभागामार्फत दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला ३ ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामुळे ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून, तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमा निमित्त निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय मराठी भाषेच्या संवर्धन व समृद्धी या विषयावर...

उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे २७ फेब्रुवारीला ‘विशेष मेगा स्पेशालिटी मेडिकल कॅम्प’चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- जिल्ह्यातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दु.३ यावेळेत उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे 'विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प' चे आयोजित करण्यात आला आहे. या विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तपासले जाणारे आजार व लक्षणे: या मोहिमेअंतर्गत खालील आजारांच्या रुग्णांची तज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाईल: हृदयरोग: छातीत दुखणे, धाप लागणे, घाम येणे किंवा हृदयाचे ठोके अनियमित असणे कर्करोग (कॅन्सर): स्तनातील गाठ, तोंडात न भरणारी जखम किंवा गर्भाशय मुखाचे आजार स्त्री रोग: मासिक पाळीच्या समस्या, पांढरे पाणी जाणे किंवा वंध्यत्व। अस्थिरोग: हाडे, सांधे व मणक्याचे आजार किंवा जुनी दुखापत शल्यचिकित्सा/पोटाचे विकार: ...

“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना”चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी दि.१० मार्चपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विदयार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना" ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.२५ फेब्रुवारी ते दि.१० मार्च २०२६ पर्यंत https://h...

"पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना"चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी "पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी १० मार्च २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धीने अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना " पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना" राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. या पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि.२५ फेब्रुवारी ते दि.१० मार्च २०२६ पर्यंत https://h...

सिंधुदुर्गमध्ये ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जिमाका):- जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग कार्यालयातर्फे जिल्ह्यामध्ये ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेशन २०२६’ अंतर्गत शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी मायनाक भंडारी सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु ,मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक ,नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधित कामकाज करणारे घटक, संशोधक, बॅका ई.नी उपस्थित राहून मार्गदर्शन केले . ००००००

श्री गुरु तेग बहादूर यांच्या विचार, कार्यावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे शुक्रवारी बक्षीस वितरण

कोल्हापूर, दि. 25 : विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचार व कार्यावर आधारित निबंध व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थी व खुल्या गटामध्ये घेण्यात आलेल्या या निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता विभागीय माहिती कार्यालयात होणार आहे. विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवन, कार्यावर आधारित कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून निबंध प्राप्त झाले. तर घोषवाक्य स्पर्धेसाठी खुल्या व विद्यार्थी गटातून मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधून घोषवाक्य प्राप्त झाले. राज्य शासनामार्फत नवी मुंबई येथील खारघर येथे 'हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवा पिढीच्या मनात त्याग, शौर्य आणि श्री गुरु तेग बहादुर यांच्य...

धर्म, धैर्य, शौर्य आणि सहिष्णुतेचे प्रतीक – ‘हिंद-दी-चादर’

राज्य शासनामार्फत तीन टप्प्यांत ‘हिंद-दी-चादर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरु तेग बहादुर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे योगदान महाराष्ट्र, देश तसेच परदेशात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक ऐक्य बळकट करणे आणि नव्या पिढीपर्यंत गुरु तेग बहादुर यांचे विचार पोहोचविणे हा राज्य शासनाचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभर ३५०व्या शहीदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा हेतू युवा पिढीच्या मनामनांत त्याग, शौर्य आणि धर्मस्वातंत्र्याच्या मूल्यांची ज्योत प्रज्वलित करणे हा आहे. ‘हिंद-दी-चादर’ म्हणून पूजनीय असलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि मानवतेच्या रक्षणासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. त्यांचा शहिदी दिवस हा केवळ एका व्यक्तीच्या स्मृतीचा दिवस नसून, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या धैर्याचा, स्वातंत्र्याच्या जपणुकीचा आणि सर्वधर्मसमभावाच्या उदात्त विचारांचा संदेश देणारा दिवस आहे. त्यांचे बलिदान भारतीय इतिहासातील तेजस्वी अध्याय असून...

हिंद- दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - आमदार अमल महाडिक

कोल्हापूर दिनांक 23 : महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर येथे करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केले आहे. 350 व्या शहीदी समागमानिमित्त कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी निबंध व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धकांनी 25 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवावयाच्या आहेत. या निबंध व घोषवाक्य स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन आमदार श्री महाडिक त्यांनी केले आहे. श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राण दिले. धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. त्यांच्या शौर्याचे, बलिदान...

श्री. गुरु तेग बहादुर साहेबजी : धर्मस्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे महान गुरु

भारताच्या इतिहासात अनेक संत, महात्मे आणि क्रांतिकारकांनी आपल्या विचारांनी व कार्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यापैकी शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सहिष्णुतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. म्हणूनच त्यांना हिंद दी चादर (हिंदुस्थानचे रक्षण करणारी ढाल) असेही संबोधले जाते. त्यांचे जीवनकार्य हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. जन्म आणि बालपण गुरु तेग बहादुर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. बालपणी त्यांचे नाव त्यागमल असे होते. लहान वयातच त्यांनी शौर्य, संयम आणि आध्यात्मिकतेची चिन्हे दाखवली. वडिलांकडून त्यांनी शस्त्रविद्या आणि धर्मज्ञान यांचे शिक्षण घेतले. एकदा मुघल सैन्याविरुद्ध झालेल्या युद्धात त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्यामुळे त्यांना तेग बहादुर (तेग म्हणजे तलवार, बहादुर म्हणजे शूर) हे नाव देण्यात आले. पुढे ते याच नावाने ओळखले जाऊ लागले. आध्यात्मिक साधना आणि समाजकार्य गुरु तेग ...

गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 फेब्रुवारी (जिमाका) :- श्री गुरु तेग बहादूर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण झाले. शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या समूहगानातून आपण गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून या उपक्रमातून नवप्रेरणा मिळत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या. ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त हा समूहगान उपक्रम कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या प्रसंगी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, मुख्याधिकारी गौरी पाटील, तसेच मुख्य...

गुरु तेग बहादूर यांच्या शौर्यगाथेचे समूहगानातून अभिवादन ‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कणकवलीत प्रेरणादायी उपक्रम

सिंधुदुर्गनगरी, दि. २३ फेब्रुवारी (जिमाका) :- श्री गुरु तेग बहादूर यांनी तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या या अद्वितीय बलिदानामुळे भारताच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक अस्मितेचे रक्षण झाले. शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा गौरवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या समूहगानातून आपण गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असून या उपक्रमातून नवप्रेरणा मिळत असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या. ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त हा समूहगान उपक्रम कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, धर्मनिरपेक्षता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली. या प्रसंगी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, मुख्याधिकारी गौरी पाटील, तसेच मुख्य...

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अभिवादन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २० (जिमाका): मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील पत्रकार भवनात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून समाजजागृतीची नवी दिशा मिळाली. सत्य, विवेक आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारी पत्रकारिता आजही त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेते. लोकशाही बळकट करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्ण आणि जबाबदार पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपाध्यक्ष संतोष राऊळ, सचिव बाळ खडपकर, सदस्य संजय वालावलकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लवु महाडेश्वर, संदीप गावडे तसेच दत्तप्रसाद वा...

कणकवलीत ‘मराठा सांस्कृतिक भवन’चे भूमिपूजन; ८ कोटींच्या निधीतून शहराच्या वैभवात भर शिवजयंतीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांचा शब्द पूर्ण; वर्षभरात काम पूर्ण करण्याचा निर्धार

सिंधुदुर्ग नगरी, दि. १९ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणारे पारदर्शक व गतीमान प्रशासन देणे हे आमचे कर्तव्य आहे. कणकवलीकरांना दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. पुढील वर्षी याच दिवशी या भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या भवनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. कला, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारे हे भवन सर्वांसाठी खुले असेल. ही वास्तू अधिक दर्जेदार व्हावी यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच या वास्तूचा सांभाळ करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्...

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आवळेगाव येथे ‘पॉक्सो’ कायद्याबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आवळेगाव नं. 1 यांच्या सहकार्याने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी 'पॉक्सो' (POCSO) कायद्याबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड.प्रणिता कोटकर-राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या 'पॉक्सो' कायद्याची व्याप्ती आणि त्यातील कायदेशीर तरतुदींची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, याउद्देशाने हे शिबीर घेण्यात आले. कायद्याचे ज्ञान हीच संरक्षणाची ढाल हे ब्रीदवाक्य घेऊन ॲड.प्रणिता कोटकर-राऊळ यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, पॉक्सो कायदा सर्व मुलांनी पालकांनी आणि शिक्षकांनी जाणू...

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी शहीदी 350 वा शहीदी समागम निमित्त "हिंद-दी-चादर" आरोग्य शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि. १८ (जिमाका):- दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गुरु तेग बहादूर साहिब जी शहीदी ३५० वा शहीदी समागम निमित्त "हिंद-दी-चादर" आरोग्य शिबिर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे संपन्न झाले. उपरोक्त जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग मार्फत ३५० लाभार्थी व ग्रामीण रुग्णालय कुडाळ मार्फत १४० लाभार्थ्यांना विशेष सेवा देण्यात आल्या. यामध्ये डायबिटीस, उच्च रक्तदाब, कॅन्सर निदान व उपचार, गरोदर माता तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात सेवा, लसीकरण, सिटी स्कॅन,फिजिओथेरपी, पॅलिएटिव्ह केअर, सोनोग्राफी, अपंग प्रमाणपत्र, क्ष किरण तपासणी, सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, आहार व पोषण समुपदेशन इत्यादींचा समावेश होता. या 'आरोग्य शिबिरा' करिता ग्रामीण रुग्णालय कुडाळ मार्फत डॉ.संजय वाळके (वैद्यकीय अधिक्षक), डॉ.करंबळेकर (वैद्यकीय अधिकारी), डॉ.बोरवडे (वैद्यकीय अधिकारी) डॉ. दुधगावकर (आरबीएसके वैद्यकीय अधिकारी) डॉ. गंगावणे (आरबीएसके वैद्यकीय अधिकारी) यांनी सेवा दिली. जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद ...

*सहिष्णुतेची बीजे पेरणारा ‘एक ओंकार’*

महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे होत आहे. 350 व्या शहीदी समागमानिमित्त विशेष लेखमाला.. कोणत्याही भूभागावर होणारे आक्रमण हे तेथील संस्कृतीवर, धार्मिक अटल निष्ठांवर असते. अशा आक्रमणांना शौर्याच्या गाथेत मोजता येणार नाही. संस्कृतीवर आक्रमण होते तिथे शौर्य नाही तर क्रौर्य म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे. आपल्या भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तरेतील विशेषत: सिंध प्रांत, पंजाब, काश्मिर यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, पूर्वेतील राज्य व इतर भूभाग आपल्या डोळ्यासमोर येतात. भारताच्या उत्तर सीमेपूरता विचार केल्यास आपल्याला अकराव्या-बाराव्या शतकात डोकावून पहावे लागेल. इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिम याने सिंध प्रदेशावर मोठे आक्रमण केले. हा एक अरब लष्करी सेनापती होता. त्यानंतर कासिमने सिंध आणि मूलतान काबीज केले. ...

_सुधारित _ महाशिबिराच्या पार्श्वभूमीवर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती स्वाती पाटील यांची आकाशवाणीवर मुलाखत

सिंधुदुर्ग नगरी दिनांक १७ (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचेमार्फत मालवण येथे रविवार दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी विधी सेवा, शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने डॉ. सुधीर देशपांडे, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती स्वाती जे पाटील ३रे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांची मुलाखत आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दिनांक १८.०२.२०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनीटांनी आकाशवाणी सिंधुदुर्ग एफ एम 103.6 मेगाहर्टझ / NewsOnAir अॅपवर प्रसारीत केली जाणार आहे. ही मुलाखत अॅड. श्रीमती प्रणिता कोटकर राऊळ यांनी घेतली आहे. ***

कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांचे “माझी वसुंधरा अभियान 5.0” मध्ये उल्लेखनीय यश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांना मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, स्वच्छता, हरित उपक्रम आणि पंचतत्वांवर आधारित विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील नगरपालिकांनी विशेष यश संपादन केले आहे: वेंगुर्ला नगरपरिषद – 15 हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक कुडाळ नगरपंचायत – 15 हजार ते 25 हजार लोकसंख्या गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक तसेच ग्रामपंचायत स्तरावरही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी लक्षणीय प्रगती दर्शवली असून, पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. या अभियानात राज्यातील 28,000 हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. डेस्कटॉप व फिल्ड मूल्यांकनाच्या आधारे गुणांकन करून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. विजेत्या संस्थांना शासनामार्फत रोख पारितोषिक देण्...

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

- सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२६ मधील ही पहिली राष्ट्रीय लोक अदालत आहे. लोक अदालत ही सर्वसामान्य नागरिकांना जलद, कमी खर्चात व सामोपचाराने न्याय मिळवून देणारी प्रभावी यंत्रणा आहे.जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात दावा प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक वाद, धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणे, वीज बिल व पाणीपट्टी देयके, बँका व अन्य वित्तीय संस्थांची तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी लोक अदालत हे प्रभावी व्यासपीठ आहे. लोक अदालतीतील प्रक्रिया सुलभ व अनौपचारिक असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनाही न्याय मिळवणे सोपे ...

आरवली टांक, वेंगूर्ला येथे रक्तदान शिबिर यशस्वी संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील रक्तकेंद्र आणि रक्तसंकलन विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे सातत्याने आयोजित केली जातात . या उपक्रमाचा एक भाग म्हणुन, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी आरवली टांक ता. वेंगूर्ला येथे भव्य रक्तदान शिबीर यशस्वी पार पडले. या शिबीराला तेथील शिव प्रेमी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच आरवली टांक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात शिव प्रेमी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील अनुभवी टीम उपस्थित होती, त्यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले आणि रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत केली. या उपक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व शिव प्रेमी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच आरवली टांक या गावातील ग्रामस्थ यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले. ००००००००

फोंड्यात अंतरराज्यीय रक्तदान शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आणि सार्थक फाँडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतरराज्य रक्तदान शिबिर गोवा राज्यातील फोंडा या ठिकाणी संपन्न झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे यांनी दिली. या शिबीराला गोवा राज्यातील विविध सामाजिक संस्था, पदाधिकारी, स्थानिक नागरिक, पत्रकार तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबीरात अनेक नागरिकांनी स्व-इच्छेने रक्तदान केले. या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील अनुभवी टीम उपस्थित होती, त्यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले आणि रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत केली. या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले. ००००००

कॅन्सर जागरूकता अभियान कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी कॅन्सर जागरूकता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. अविनाश सावजी, संचालक, प्रयास संस्था, अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. प्रयास संस्था, अमरावती यांच्या माध्यमातून दि. ९ फेब्रुवारी ते दि. १४ फेब्रुवारी या कालावधीत कोकणातील सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोली व माणगांव या ठिकाणी कॅन्सर प्रबोधन यात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, कॅन्सर आजाराविषयी भीती व अज्ञानता दूर करण्यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड यासारख्या इतर आजरांचा धोका कमी करण्यासाठी आपली जिवनशैली कशी असवी याबाबत डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांच्या चमूतील कॅन्सरवर मात केलेल्या कॅन्सर योध्यांची ओळख उपस्थितांना करून दिली. अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी कॅन्सर तसेच इतर गंभीर व क्रोनिक आजारांवर प्रतिबं...

आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- बालकांचा मोफत व सवलतीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ नुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक स्तरावर प्रवेश देण्यात येणार आहे. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. १७ फेब्रुवारी ते दि. १० मार्च २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी निलिमा नाईक यांनी केले आहे. शासन निर्णय दि.१२ फेब्रुवारी २०२६ नुसार बालकांचा मोफत व सवलतीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनी खालील सुचनांची काटेकोरपणे अं...

आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्ला येथे लिपिक पदासाठी भरती

सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्ला या नोंदणीकृत संस्थेच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी लिपिक वर्गीय एक पद तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासह सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे घेऊन दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्ला, म्हाडा कॉलनी समोर, महिला काथ्या कारखाना नजीक, वेंगुर्ला येथे मुलाखतीसाठी स्वतः उपस्थित राहण्याचे आवाहन वेंगुर्ला आयएमसी ऑफ आयटीआयचे सचिव जे.एल. गवस यांनी केले आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता पदवीधर (वाणीज्य) असून उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील आयत्या वेळच्या विषय क्र. ३ च्या ठरावानुसार ही भरती ठोक मानधनावर ११ महिन्यांच्या कालावधीकरिता करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्ला आयएमसी ऑफ आयटीआयचे सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ०००००००

थकबाकीदारांना व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

सिंधुदुर्गनगरी,:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (ओबीसी महामंडळाच्या) संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेच्या 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा ( OTS) योजना 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या सर्व थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग (ओबीसी महामंडळ) यांच्यामार्फत व्यवसायाकरिता पात्र लाभार्थींना मुदती कर्ज, बीज भांडवली कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना,इ.योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील कर्जवाटप करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय...

‘महाविस्तार AI ॲप’ वर ३२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी

सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार AI ॲप’ च्या माध्यातून जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार १०१ शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहय्याने हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करुन देते. मराठी भाषेत उपब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला, आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते. ‘महाविस्तार AI ॲप’ मधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरीत उत्तरे देतो. रिअल – टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल- टाइममध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी, आणि विमा यो...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2025 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च, 2026 असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती अ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक 1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) रु.1 लाख रुपये...

‘कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 (जिमाका) :- कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आज त्यांनी प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिर येथे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. दर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, “कुणकेश्वर हा केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. या भागाच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, यात्राकाळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे प...

महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे होत आहे.

शीख समाजातील लंगर सेवा : मानवतेचा समतेचा आणि सेवाभावाचा तेजस्वी आदर्श भारतीय संस्कृती आणि धर्मपरंपरा विविधतेत एकतेचा संदेश देणारी आहे. या महान परंपरेतील शीख धर्म हा मानवता, समता, सेवा आणि बंधुभाव यांचा संदेश देणारा एक प्रभावी धर्म म्हणून ओळखला जातो. शीख धर्माची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर आदर्श ठरलेली परंपरा म्हणजे लंगर सेवा. लंगर सेवा ही केवळ धार्मिक विधी नसून, ती सामाजिक समतेची, परोपकाराची आणि मानवी करुणेची जिवंत परंपरा आहे. लंगर सेवेचा ऐतिहासिक उद्गम लंगर सेवेची संकल्पना शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव जी यांनी 15 व्या शतकात मांडली. त्या काळात भारतीय समाजात जातिभेद आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. गुरू नानक देव जी यांनी या अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत सर्व मानव समान असल्याचा संदेश दिला. त्यांनी गुरुद्वारामध्ये सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था सुरू करून समाजातील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पुढील गुरूंनी लंगर परंपरेला अधिक सुसंगठित आणि व्यापक स्वरूप दिले. विशेषतः गुरू अमरदास जी यांनी ‘पंगत’ आणि ‘संगत’ या संकल्पनांचा प्रचार करून ...