‘ शासन आपल्या दारी ’ वारकऱ्यांना संरक्षण देणारी "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना"

जाता पंढरीसी सुख वाटे जिवा, आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. या अंभगाप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे १५ ते २० लाख वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात व मृत्यू यासाठी विमा छत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासनाने असा निर्णय घेतला आहे की, पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" या योजनेच्या माध्यमातून विमा छत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. या योजनेबद्दल अधिक जाणून घेवूया... "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" :- (१) दिंडीच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेत, अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी रु.५,००,०००/- (रुपये पाच लाख फक्त) शासनाकडून वारसास सानुग्रह अनुदान देण्यात येईल. (२) या व्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीच्या सहाय्याने विमा योजना राबविण्यात येईल. योजनेचे स्वरुप :- (१) दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येईल :- (अ) दोन्ही हात, दोन्ही पाय दोन्ही डोळे, एक हात, पाय व एक डोळा निकामी झाल्यास रु.१,००,०००/- ( एक लाख रुपये फक्त) ब) एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास रु.५०,०००/-( पन्नास हजार रुपये फक्त) २) वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी रु. ३५,०००/-( पस्तीस हजार रुपये फक्त) किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येईल. ३) सदर विमा योजनेसंबंधीच्या अटी, शर्ती व अन्य तरतुदी परिशिष्ट-अ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.४) सदर विमा योजनेबाबत आवश्यकतेनुसार विमा संचालनालयाचा सल्ला घेण्यात येईल. "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" या योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण तसेच विमाहप्ता भरण्याची कार्यवाही शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येईल. "विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना" राबविण्याकरिता विमा हप्ता भरण्यासाठी रु.२,७०,००,०००/- (अक्षरी रुपये दोन कोटी सत्तर लाख फक्त) इतकी रक्कम Iffco Tokio General Insurance Co. Ltd., या कंपनीस अदा करण्यास याव्दारे मान्यता देण्यात आली आहे. सदरची योजना आषाढी वारी २०२३ करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी / सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरिता लागू राहील. या योजनेचा विमा कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३० दिवसाचा राहील. या योजनेंतर्गत विमा कंपनीकडे दावा करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील. संबंधित वारकरी आषाढी वारी २०२३ करिता श्री. क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे वारकरी राज्यातील ज्या गावाचा / शहराचा सर्वसाधारण रहिवासी आहे. त्या गावाच्या / शहराच्या संबंधित तहसिलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. सर्व तहसिलदार यांनी संबंधित वारकरी आषाढी वारी २०२३ करिता गेल्याची खात्री करून तशा स्वरुपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी अथवा त्याचे वारसदार यांना निर्गमित करावे. योजनेंतर्गत एखाद्या दुर्घटनेत, अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास या वारकऱ्याच्या वारसास रु.१.०० लक्ष इतकी रक्कम विमा कंपनी कडून देण्यात येणार आहे. तसेच दिंडीच्या दरम्यान अपघातात कायमचे अपंगत्व वा विकलांगता आल्यास विमा कंपनीकडून खालीलप्रमाणे प्रतिव्यक्ती विमा रक्कम प्रदान करण्यात येणार आहे :- (अ) दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही डोळे, एक हात पाय व एक डोळा निकामी झाल्यास रु.१,००,०००/- (ब) एक हात, एक पाय किंवा एक डोळा निकामी झाल्यास रु.५०,०००/- याव्यतिरिक्त वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी रु.३५००००/- किंवा प्रत्यक्ष वैद्यकीय खर्च यापैकी जी कमी असेल तेवढी रक्कम विमा कंपनीकडून प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गंत एखाद्या दुर्घटनेत/अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास रु.१.०० लक्ष विमा रकमेव्यतिरिक्त या वारकऱ्याच्या वारसास रु.४.०० लक्ष इतकी रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येईल. याकरिता संबंधित वारकरी यांच्या वारसाने जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. 0000 -रणजित पवार, उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'