Posts

Showing posts from January, 2024

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचा उपक्रम चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान 'चाचा नेहरु बाल महोत्सव – 2023-24' चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ओरोस येथे होणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी कळविले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत, महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील इतर मुले व बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मर्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाब, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव-2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मुले व मुली वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये सहभागी होणार असून यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो खो, रिले, क्रिकेट, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला ...

किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार -पालकमंत्री रविंद्र चव्हाण · पर्यटन चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे · पायाभूत सुविधेत वाढ करणार · नवनवीन प्रकल्पांना मुबलक निधी

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरात नौसेना दिन साजरा झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजकोट किल्लाची पुर्नबांधणी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा 43 फुट उंच पुतळा उभारण्यात आल्याने येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. राजकोटच्या धर्तीवर जिल्ह्यातील गड-किल्यांचे संवर्धन आणि जतन करण्याचा उपक्रम शासन राबवित आहे. या चळवळीमध्ये नागरिकांनी देखील सहभागी होऊन सहकार्य करावे. मालवण परिसरातील मोरयाचा धोंडा या स्थळाचे संवर्धन करण्यात येत असून कामाला सुरूवात झालेली आहे. पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातच होणार असून या प्रकल्पासाठी पुरेसा निधी दिला जाणार आहे. अशा नवनवीन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनात वाढ होऊन तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जिल्हा विकासाकडे घोडदौड करत असून आपला जिल्हा सर्व क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम येथील जिल्हा पोल...

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का): जिल्हा वार्षिक योजना- अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2023-24 साठी सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री श्री चव्हाण यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या....

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का): मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. कुरणे या उपस्थित होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय येथे उपस्थित वाचक वर्ग व विद्यार्थी यांना ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या अनमोल ग्रंथांची माहिती देण्यात आली. व्यक्तीच्या विकासामध्ये ग्रंथांचा महत्वाचा वाटा असून सुजान नागरीक घडण्यासाठी ग्रंथ वाचन व अध्ययन खुप महत्वाचे असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए. बी. कुरणे यांनी ग्रंथ हे आपले गुरु, मार्गदर्शक व मित्र असल्याचे सांगून ग्रंथ वाचनासाठी सर्वांना प्रोत्साहित केले. त्यांनी पुढे असे सांगितले की, "राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. मराठी भाषेच्या वापरांबाबत जागरुकता निर्माण करणे ...

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये जिल्ह्याची समाधानकारक कामगिरी

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का): देशातील जनतेला दर्जेदार, गुणात्मक व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम नियमितपणे राबविले जातात. त्या पैकी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये शासकीय उद्दीष्टामधील मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शस्त्रक्रिया गृह जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे मोफतरित्या केल्या जातात. शासनाने सन २०२३-२४ या वर्षाकरीता ५६६५ एवढ्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट दिलेले असुन, त्या पैकी ४८८० एवढ्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. ८६ टक्के एवढी उद्दीष्ट पुर्तता झालेली आहे. उद्दीष्टातील १३८० मार्च २०२४ अखेर १०० टक्के उद्दीष्ट पुर्तता होईल. कणकवली, देवगड, सावंतवाडी, मालवण, कुडाळ या ठिकाणी आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिरांमध्ये ३५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्या मधुन निवड केलेल्या १३८० रुग्णांच्या मोफत मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत ४० वर्षे वयाचे वरील दृष्टीदोष असणाऱ्या १४...

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घ्याव

ा सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का): विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुधारीत योजना नव्याने राबविण्यातकरीता शासनाने मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ घेवून विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटूंबाचे राहणीमान उंचावणे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चिकणे यांनी केले आहे. या योजनेचे लाभ घेण्यासाठीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत, लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या –क या मुळ प्रवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व...

कब, बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का): भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा जिल्हास्तरीय कब-बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दि. 1 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बॅ.नाथ पै सेंट्रल हायस्कूल (MIDC) ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. स्काऊट गाईड चळवळ हस्तव्यवसाय, आरोग्य, सेवा, चारित्र्य या चार मुलभूत आधार स्तरावर आधारित आहे. या गुणांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी शाळास्तरावर स्काऊट, गाईड कब, बुलबुल पथके स्थापन करण्यात आली आहेत. शाळास्तरावर या पथकांना प्रशिक्षित शिक्षकामार्फत नियमित मार्गदर्शन करुन विद्याथ्यांमध्ये सुसंस्कार, मुल्य रुजविण्याचे काम केले जाते. विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा, यासाठी स्काऊट गाईड चळवळ महत्वाची आहे. दरवर्षी शाळास्तरावरील स्काऊट गाईड पथकांचा जिल्हास्तरीय निवासो मेळावा आयोजीत केला जातो. यावर्षी हा मेळावा दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बॅ.नाथ पे सेंट्रल स्कूल (MIDC) ता. कुडाळ जिल्हा ...

कणकवली उपविभागात 3 महिन्यांत 199 कुणबी दाखल्यांचे वाटप · साडेसहा लाख नोंदीची तपासणी

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजातील मराठा, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील नोंदी शोधण्याची मोहिम सप्टेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. या अंतर्गत कणकवली विभागातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तिन्ही तालुक्यातील 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि कुणबी या जातींच्या 22 हजार 834 एवढ्या नोंदी आढळल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांत सुमारे 199 कुणबी दाखल्यांचे वाटप झाल्याचे उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले. कणकवली उपविभागातील वैभववाडी तालुक्यात 2 लाख 40 हजार 414, देवगड तालुक्यात 49 हजार 296 तर कणकवली तालुक्यात 3 लाख 64 हजार 450 अशा एकूण 6 लाख 54 हजार 160 नोंदीची तपासणी करण्यात आली. या नोंदींच्या तपासणीअंती कुणबी मराठा- 897, मराठा कुणबी-484 तर कुणबी जातीच्या 21 हजार 491 अशा एकुण 22 हजार 834 एवढ्या नोंदी आढळल्या. सन 1986 पासून सप्टेंबर 2023 पर्यंत कणकवली - 795, देवगड-3065 तर वैभववाडी तालुक्यात 1 हजार 724 अशा एकूण 5 हजार 566 कुणबी दा...

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, द: डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 22 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवकांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र...

स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. यायोजने अंतर्गत सिडबीने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते, त्याला सिडबी हमी देईल. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थीनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावयाची आहे. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेवून प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसुचित जाती व नवबौध्द समाजातील उद्योजकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसुचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडि...
तळेरे- वैभववाडी - गगनबावडा - कोल्हापूर मार्ग (करुळ घाट ) 22 जानेवारीपासून ते 31 मार्च पर्यंत बंद रस्ता दुपदरीकरण सुरू पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी,: तळेरे- गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी च्या करूळ घाटातील 5 किमी भागात दुपदरीकरणाचे काम दिनांक 15 जानेवारी पासून ते 31 मार्च 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. या करुळ घाटात एकेरी वातहूक चालू ठेवणे शक्य नसल्याने या भागात काम सुरु असताना पूर्ण वेळ वाहतूक सुरु ठेवणे शक्य होणार नाही व ते धोकादायक ठरणारे आहे. तसेच डोंगराकडील बाजूचे रुंदीकरण, दरीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधणीचा विचार करता चालू कामामध्ये एकेरी वाहतूक ठेवणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरिता दिनांक 15 जानेवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र 166 जी वरील सर्व प्रकारची वाहतूक पुर्णवेळ पूर्णतः बंद करून पुढीलप्रमाणे उपलब्ध पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली असून या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल...

रस्ते सुरक्षा अभियानाचे उदघाटन अपघातातील मृतांची वाढती संख्या चिंताजनक - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर · रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करावी · धोकादायक ठिकाणे निश्चित करा · दिशादर्शक फलक बसवा

सिंधुदुर्गनगरी, दि.18(जि.मा.का): नियमांचे पालन न करणे, अनियंत्रित वेग अशा अनेक कारणांमुळे रस्ते अपघातात वाढ होत असून त्यात प्राण गमावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने परिवहन विभागाने नियमित प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व 2024 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजयकुमार सर्वगोड, जिल्हा...

संपूर्ण स्वच्छता मोहीमेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): शासनाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम दि. २२ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या कालावधीत स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिम राबविण्याबाबत मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडुन सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहिमेमध्ये स्वच्छतेची व्यापक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील सर्व मनुष्यबळ व यंत्रणा यांचा सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते स्वच्छ धूळमुक्त करणे, गल्लीबोळातील कचरा काढणे, गटारे, नाल्यांचे प्रवाह तसेच नाल्यांचा परिसर स्वच्छ करणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, अनाधिकृत फलक, भित्तीपत्रके, बेवारस वाहने हटवि...

लघुचित्रपट स्पर्धेस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): जल जीवन मिशन अंतर्गत खुल्या गटाकरीता लघुचित्रपट स्पर्धाचे दि.१५ जानेवारी २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या स्पर्धास दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीत खुल्या लघुचित्रपट स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी लघुचित्रपटाची निर्मिती स्वता केलेली असावी. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पार्श्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वता केलेले असावे. या अगोदर प्रकाशीत झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकिय विभाग त्यानी त्याच्या कामाकरीता तयार केलेले लघुचित्रपट या स्पर्धेकरीता सादर करण्यात येऊ नयेत. लघुचित्रपट निर्मिती करीता वा...

रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.17 (जि.मा.का): जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे गुरुवार दि. 18 जानेवारी रोजी, सकाळी 11 वाजता रस्ता सुरक्षा अभियान 2024 कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते होणार आहे. निवासी उप जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, लक्ष्मीकांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रिजवान नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ०००००००

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करा

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेंदवारांसाठी कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे.या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याऱ्या ईच्छुक उमेदवारांनी 15 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहान सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी 46 व्या जागतिक स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून देशातील 10000 उमेदवार समाविष्ट झाले होते. या स्पर्धा 15 देशांत 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यावर्षीची जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे. जागतिक कौशल्य विकास स्पर्धा 2024 आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा ए...

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके 31 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www...

संत काशिबा गुरव व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. अंतर्गत राज्य शासनाने राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विका महामंडळ या दोन उपकंपनीची स्थापना केली आहे. या महामंडळामार्फत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील गरजू पात्र व्यक्तींना महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्याकरिता या महामंडळामधून स्वयं: रोजगार करिता आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाचे कामकाज शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग, यांच्याकडून करण्यात येणार आहे. महामंडळांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे. तरी अधिक माहितीसाठी 02362 228119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. समाजातील गुरव व लिंगायत बांधवांनी या महामंडळाच्या ...

एकरकमी परतावा योजनेंत लाभार्थीना 50 सवलत

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबोसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे,असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. ०००००

एनसीसीचे 12 ते 21 जानेवारीपर्यंत प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे 12 ते 21 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये 350 मुली व 80 मुले सहभागी होत आहेत. या कॅम्पमध्ये वेपन प्रशिक्षण, फायरिंग प्रशिक्षण, ड्रिल प्रशिक्षण, हेल्थ आणि हायजीन प्रशिक्षण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम एनजीओ- समाजब्ध, फायर फायटिंग, नेत्र तपासणी शिबीर, प्राकृतिक आपदा प्रशिक्षण (आत्मरक्षा), झुम्बा, योगा प्रशिक्षण तसेच 100 मीटर आणि 200 मीटर धावणे, गोळा फेक, कबड्डी, खो-खो हॉलीबॉल, इत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या शिबिरामध्ये 36 शाळा व 21 कॉलेज सहभागी होणार आहेत. या शिबीराचे आयोजन, समावेशक अधिकारी कर्नल दिपक दयाल, सेना मेडल यांच्या मार्गदर्शनखाली आयोजीत करण्यात आले आहे. ०००००

सिंधुरत्न समृध्द योजना सन 2024-25 याकालावधीत राबविण्यास मान्यता

सिंधुदुर्गनगरी, : जिल्ह्याचा सर्वंकष विकास करण्याच्य दृष्टीने सिंधुरत्न समृध्द ही पथदर्शी योजना सन 2022-23 ते 2024-25 या कालावधीत राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेमधुन पशुसंवर्धन विषयक पुढील योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेंच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यतेसह अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी दिली आहे. दुग्धोत्पादन व्यवसायासाठी पशुपालकांना अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे. मॉडेल क्र. 1-2/4 शुध्द देशी गाई (गीर/ साहीवाल) सुधारीत म्हैसींचा (पंढरपुरी/मु-हा/मेहसाना) गट पुरवठा करणे (वैयक्तिक लाभ).मॉडेल क्र.2-10 बचत गट सदस्यांना 20 गायी 20 म्हैसींचा गट पुरवठा करणे (सामुहीक तत्वावर ) अंशत ठाणबध्द पध्दतीने स्थानिक /कोकण कन्याळ जातीच्या उन्नत शेळीपालनास प्रोत्साहन देणे. (10 शेळ्या 1 बोकड गट पुरवठा). अंड्यावरील 300 पक्षी संगोपनास अर्थसहाय करणे. या योजनेमधुन सर्वसाधारण प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थीस 75 टक्के तर अनु. जाती/ जमाती प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यीस 90 टक्के अ...

पीएम विश्वकर्मा परिसंवाद व जनजागृती कार्यक्रम बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणबरोबरच आर्थिक सहाय्य -जिल्हाधिकारी किशोर तावडे · सरपंचांनी पुढाकार घ्यावा · कौशल्य विकास विभागाचा सहभाग महत्वपूर्ण · जास्तीत जास्त नोंदणी करावी

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमुळे पारंपारिक कारागीर तसेच बारा बलुतेदारांना कौशल्य प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पारंपारिक कुशल व्यवसायांचा वारसा पुढे नेण्याचा हेतू देखील यातून साध्य होणार आहे. या माध्यमातून कौशल्यपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होणार असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. पारंपारिक शिल्पकार आणि कारागीरांच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या पी एम विश्वकर्मा योजनेसंबंधी परिसंवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत, दिपक नारकर, शिखर बँक व्यवस्थापक श्री मेश्राम, लघु व सूक्ष्म उद्योग विभागाचे श्री जोहारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री दामले, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक श्री चिमणकर, खादी आयोगाचे श्री बराटे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.डी. कुरुंदवाडे तसेच जिल्ह्यातील सरपंच तसेच इतर नागरिक उपस्थित ...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 15 जानेवारी रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, : जानेवारी महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्कांचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत दालन क्र. 106,ए-ब्लॉक, तळमजला सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत. अर्ज विहीत नमुन्यात असावा. तक्रार, निवेदन ...

जिल्ह्यात 26 जानेवारीपर्यत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष वाढीसाठी सभा, मेळावे व शिबीराचे आयोजन करण्यात येत असून पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांवर टिकाटिप्पणी करीत असतात. तसेच जिल्ह्यात वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाका...

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांच्या वेतना संबंधित पेन्शन अदालत, वेटरन मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन या बाबतच्या असणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी माहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेन्शन अदालत/ वेटरन मेळावा घेण्याचे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय, यांच्याव्दारे नियोजित आहे. तरी ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन प्रकारच्या अडीअडचणी असल्यास सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधुन अर्जाचा नमूना घेवून दिलेल्या नमून्याप्रमाणे तीन प्रतीत अर्ज 16 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. ०००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र: नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुक्तीसाठी दिनांक ०१ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत CDS कोर्स क्र. ६२ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिल जाते. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील CDS-६२ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. सी.डी. एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीच पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून याव...

जलयानांची (बोटी) नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ला बंदरे समूहातंर्गत कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील सागरी किनारी जलक्रीडा प्रवासी वाहतूक व मालवाहतूक करण्याऱ्या जलयानांची (बोटी) नोंदणी केली नसल्यास प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करुन जलयांनाची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी केले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला समुहातंर्गत कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील सागरी किनारी मालवाहतूक करणाऱ्या जलयानांची बोटी नोंदणी न करता अनधिकृतपणे जलवाहतुकीमुळे जीवीत व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता लक्षात घेता नोंदणी न करण्यात आलेल्या जलयानांची त्वरीत नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून घेण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समूह, वेंगुर्ला यांनी केले आहे. अनधितकृत हातपाटीने रेती उत्खनन व वाहतुक करणारी जलयान तसेच महत्वाचे म्हणजे सागरी सुरक्षा व अतिरेकी कारवायांची शक्यता पाहता स्थानिक जलयांनाची माहिती ओळख असणे महत्वाचे असून विना नोंदणी जलयांनाची नोंदणी झाल्यास सागरी सुरक्षेच्या अन...

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना परिसंवाद व मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का.) उद्योग ,उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी संपुर्ण देशात व राज्यात होत आहे. या योजनेव्दारे अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वागीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सकारने ही योजना सुरु केलेली आहे. गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे परिसंवाद व जनजागृत्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यानी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. लाभार्थीची नोंदणी- नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळील CSC सीएसी सेंन्टरमध्ये जाऊन अर्ज करु शकता. नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे – आधारकार्ड, आधारलिंक मोबाईक क्रं, .स्वत:च्या कुटुबातील सर्वांचे आधार कार्ड, बॅक पासबुक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र पासपोर्ट साईज...

पालकमंत्र्यांनी दिली जिल्हा कारागृहाला भेट कारागृहाच्या समस्या सोडविणार -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) जिल्हा कारागृह येथे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी 6 जानेवारी रोजी भेट देऊन सुविधांची पाहणी केली. यावेळी कारागृहात बंदिवानांना मिळणाऱ्या जेवनाची, निवासाची तसेच उपहारगृहाची पाहणी केली. कारागृहातील बंदीवानांची नियमित आरोग्य तपासणी करावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा अशा सूचना कारागृह प्रशासनास देत कारागृहाच्या समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृह परिसरात बंदिवानांनी केलेल्या भाजीपाल्याच्या शेतीची पाहणी केली तसेच बंदिवानांशी संवाद देखील साधला. कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे यांनी पालकमंत्र्यांना कारागृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. कारागृह परिसरात 1 एकरावर भाजीपाल्याची सेंद्रीय शेती करण्यात येते. बंदिवानांच्या आहारात देखील याच भाजीपाल्याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहास मंजूर झालेला शस्त्रसाठा ठेवण्याकरिता व कारागृह कर्मचारी यांच्याकरिता सुरक्षा रक्षक खोली, शस्त्रसाठा जतन करण्याकरिता शस्त्रगार व बंद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय, कारागृह ते गरुड सर्कल ओरोस या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कर...

विद्यार्थ्यानी निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची सन 2021-22 व सन 2022-23 वर्षातील केंद्र शासनाची 60 टक्के रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संग्लन बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सूरु आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्याच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत जमा होणार आहे. अशा विद्यार्थ्यानी त्या रक्कमे मधुन निर्वाह भत्याची 60 टक्के रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासननिर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची 60 टक्के हिस्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यानी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्ताची रक्कम वजा कर...

सिंधुदुर्गनगरी येथे " पोस्टल पेंन्शन अदालत " चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे दि. 25 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी येथे " पोस्टल पेंन्शन अदालत " चे आयोजन केले आहे. या पोस्टल पेंन्शन अदालती मध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ ज्यांच्या सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्था उत्तराधिकारी ईत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारकानी आपले अर्ज सिंधुदुर्गनगरी चे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले जिल्हा सिंधुदुर्ग, 416812 या पत्यावर दि. 23 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापुर्वी पाठवू शकता, त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही. ०००००

प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी साठी सिंधुरत्न समृद्ध योजना

सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) जिल्ह्यात एकूण फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः १,४२,९४७ हेक्टर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फळ पिकाखालील क्षेत्र असूनही फळांची काढणी करताना साधारणतः १५ ते २० टक्के उत्पन्न हाताळणी करताना शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीत्तोर नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२३-२४ अंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी करीता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली. या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.२० हे. क्षेत्र फळपिकाखालील असावे, एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल, अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद कृषी विभाग सिंधुदुर्ग यांची जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर रु. ४८०/- प्रति प्लास्टिक क्रेट्स आणि रु. २०००/- प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदान प्रमाणे सदर प्लास्टिक क्रेट्स साठी जास्तीत जास्त रु. ३६० प्रति क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री साठी...

राज्यस्तरीय 'दर्पण'पुरस्काराचे वितरण पत्रकारांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गाव ही आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकार क्षेत्रातील महापुरुष होते. आचार्य जांभेकर यांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीत सर्वप्रथम पहिले दर्पण वृत्तपत्र सुरू केले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटी विरोधात ते तेव्हापासूनच लढत होते. दर्पण म्हणजेच आरसा, आचार्य जांभेकर हे पत्रकारितेचे खरे दर्पण आहेत. तेव्हापासून पत्रकारितेला समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. पत्रकार हा समाजातील समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी उपाय सूचवित असतो. आज पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. पत्रकार दिनानिमित्त पोंभुर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी समितीचे राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त आयेाजित राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मरणार्थ राज्यस्तरीय 'दर्पण' पुरस्कार वितरण समारंभ पालकमंत्री...

पत्रकारीता पारदर्शक असली पाहीजे - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का.): पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलं लिखाण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. पत्रकाराने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्या विषयातील समस्या मांडून त्यावर उपाय देखील लिखाणातून मांडणे आवश्यक आहे. पत्रकारिता पारदर्शक असली पाहीजे आणि ती पारदर्शकता टिकवून ठेवता आली पाहीजे असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले. मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशाखी जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संधा मार्फत पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर ताबडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रका...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवड्याचे यशस्वी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) उद्योग मंत्रालयाच्यावतीने 18 ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा घोषित करण्यात आला होता. या पंधरवाड्या दरम्यान जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध योजना, उपक्रम आणि प्रकरणांची माहिती देण्यात आली होती. या पंधरवाड्यात दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला,वैभववाडी, देवगड सावंतवाडी, खारेपाटण, माणगांव, कुडाळ येथे स्वयंराजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात विकसित भारत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या पंधरवाड्याच्या अनुषंगाने बॅंकांनी आपल्याकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा निरंतर सुरु राहण्यासाठी सहकार्य करावे. तसेच बँक शाखांनी किरकोळ कारणास्तव परत केलेल्या प्रस्तावाचे पुनरुज्जीवन व पुनर्विलोकन करुन संबंधित लाभार्थ्याना योग्य न्याय द्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रस्वाव या योजनेमध्ये पात्र करण्यासाठी प्रशासनास नावे कळविण्यात यावीत,...

तिमाही ई आर 1 विवरणपत्र 31 जानेवारीपर्यत ऑनलाईन भरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्य बळाचे डिसेंबर 2023 या तिमाहीचे ई आर 1 हे विविरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग.पां. चिमणकर यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय/ निमशासकीय/ खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकार आहे. डिसेबर 2023 रोजी संपलेल्या तिमाईचे विवरणपत्र ई आर 1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर दि. 31 जानेवारी 2024 पर्यत ऑनलाई पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक/ आस्थापना विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील अशांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02362 228835 मोबा. 9421262085 वर संपर्क साधावा. ०००००

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 22 जानेवारीपर्यत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ट क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांच्याकडून दि. 8 ते 22 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात येत आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 2023 ची विहित केले आहे. या नियामावलीनुसार सन 2023-23 यावर्षाच्या पुरस्कारासाठी 8 त...

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक 1. अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (र...

ध्वजनिधीसाठी भालचंद्र जोशी यांच्याकडून 25 हजारांचा धनादेश

सिंधुदूर्गनगरी दि 2 (जिमाका) तोंडवली मालवण येथील हॉटेल नित्यानंद प्राइड होम स्टेचे मालक भालचंद्र पांडुरंग जोशी यांनी ध्वजदिन निधीसाठी 25 हजारांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश आज सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील अशा दानशूर व्यक्तींनी देशासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. ०००००

रास्त भाव ध्यान्य दुकान परवान्यांबाबत जाहीरनाम प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.) : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 च्या कलम 12 (2)(ई) मधील तरतूद पुढीलप्रमाणे आहे. पंचायती, स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांसारख्या सार्वजनिक संस्थाना किंवा सार्वजनिक न्यासांना रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यास प्राथम्य देणे आणि महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे दुकानांचे व्यवस्थापन करणे. सध्याची रास्त भाव दुकाने/ किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेली किंवा यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने खालील प्राथम्यक्रमानुसार मंजूर करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. रास्त भाव दुकाने मंजुरीसाठी प्राथम्यक्रम- पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था). नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था. संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास वरील प्राथम्य क्र...