Posts

Showing posts from November, 2022

सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल आजअखेर एकूण सरपंचसाठी १४२ तर सदस्यसाठी ५०० नामनिर्देशन पत्र दाखल

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १४२ तर सदस्यपदासाठी ५०० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली. तालुका निहाय दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे: कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी २१, सदस्य पदासाठी १०७,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३१,सदस्य पदासाठी १२९. वैभववाडी - ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी ४, सदस्य पदासाठी १४,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ५, सदस्य पदासाठी १६. देवगड - ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी १३, सदस्य पदासाठी ४०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १९, सदस्य पदासाठी ६१. मालवण - ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी ३, सदस्य पदासाठी १४,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६, सदस्य पदासाठी २१. कुडाळ - ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी २७, सदस्य पदासाठी ८०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३२, सदस्य पदासा...

जागतिक एड्स दिनानिमित्त लेख एड्सला करण्या हद्दपार प्रतिबंध हाच आधार

एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जनजागृती व्हावी, आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्त व्हावा, म्हणून हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर या दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात ही संकल्पना मांडली. प्रथम १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळण्यात येऊ लागला. अशा या महाभंयकर रोगाबद्दल जाणून घेवूया…. नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच खरा आधार या उक्तीप्रमाणे आजही जगामध्ये एचआयव्ही/एड्स यावर कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. म्हणूनच जागतिक स्तरावरून एचआयव्ही नियंत्रणात्मक कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. भारतामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून नियंत्रणाचे कार्य केले जाते. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हानिहाय जि...

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्‍पर्धेच्या तारखा व ठिकाणांमध्ये बदल - अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य पुणे व जिल्‍हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शालेय क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन केले जाते. सन 2022-23 या वर्षाच्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट, बेसबॉल, कुस्ती,डॉजबॉल, किक बॉक्सींग या सर्व गटाच्या स्पर्धाच्या तारखांमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी बेसबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी किक बॉक्सींग स्पर्धा. अ.कृ.केळकर हायस्कुल वाडा देवगड येथे दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी डॉजबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2022 रोजी क्रिकेट स्पर्धा. कुडाळ हास्कुल कुडाळ येथे 2 डिसेंबर 2022 रोजी सॉफ्टबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुले व मुली यांची कुस्ती फ्री स्टाईल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथ...

"स्वच्छ जल से सुरक्षा" अभियानात ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा - प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : जलजीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित पुरवठा व्हावे, या उद्दात हेतूने दिनांक १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात "स्वच्छ जल से सुरक्षा" हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. दूषित पाण्यामूळे विविध जलजन्य आजार पसरु शकतात. पाण्याची गुणवत्ता राखणे ही सर्व ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांनी दिलेल्या सूचनानुसार दिनांक १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात "स्वच्छ जल से सुरक्षा" हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे रिपोर्ट ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या ५ हजार ६५६ स्त्रोताचे जिओ टॅग करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षीत करण्यात आले अस...

पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज सादर करावयाची मुदत 15 डिसेंबर 2022 पर्यंत -पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी,दि.30 (जि.मा.का.) : पोलीस भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होता यावे, या दृष्टीकोनातून पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. पोलीस भरती 2021 मधील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार आवेदनपत्रे स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली होती. 00000

सरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी ९७ नामनिर्देशन पत्र दाखल आजअखेर एकूण सरपंचसाठी ३९ तर सदस्यसाठी १०३ नामनिर्देशन पत्र दाखल

सिंधुदुर्गनगरी, दि. २९ (जि.मा.का.) : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी सरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी ९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३९ तर सदस्यपदासाठी १०३ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली. तालुका निहाय दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे: कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी १०, सदस्य पदासाठी २०,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १०,सदस्य पदासाठी २२. वैभववाडी - ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी १, सदस्य पदासाठी २,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १, सदस्य पदासाठी २. देवगड - ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी २०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६,सदस्य पदासाठी २१. मालवण - ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी ३, सदस्य पदासाठी ७,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३, सदस्य पदासाठी ७. कुडाळ - ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी ११, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ५, सदस्य पदासाठी ११. सावंतव...

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग, कॅरम, बुध्दीबळ स्पर्धा यशस्वी कराव्यात -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जिमाका)- राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग, कॅरम तसेच बुध्दीबळ स्पर्धेचे यजमान पद सन 2022-23 साठी आपल्या जिल्ह्यास प्राप्त झाले आहे.स्पर्धेच्या विविध आयोजन समित्यांनी या स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले. जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक आज घेण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी सर्वांचे स्वागत करुन सविस्तर माहिती दिली. 17 ते 19 वर्षा आतील मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धा, संभाव्य 11 ते 13 डिसेंबर 2022 रोजी, 14 वर्षाच्या आतील मुले व मुलींसाठी बुध्दीबळ स्पर्धा संभाव्य 29 ते 31 डिसेंबर 2022 रोजी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथील मामाचा गाव रिसॉर्ट येथे होणार आहेत. 19 वर्षाआतील मुले- मुलींसाठी कॅरम स्पर्धा संभाव्य 24 ते 25 डिसेंबर 2022 रोजी सावंतवाडी येथे यशवंतराव भोसले महाविद्यालयात होणार आहेत. या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत होणार आहेत. वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी आठ ...

नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था, गट, उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटीवर अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : कृषी औजारे बँक या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट,नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपनी यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांनी केले आहे. कोकण विभागात कृषी क्षेत्राकरिता कृषी यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेतीकामाकरिता मजूरांची कमतरता भासत आहे. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरीकरण तसेच इत्यादीमुळे कृषी क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत तसेच मजुरांचे दर परवडत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रात कृषी औजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. विभागात भात हे प्रमुख पिक असून चिखलणी, उखळणी, लागवड, फवारणी, काढणी सह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्र उपलब्ध आहेत. कोकणातील धारणा क्षेत्र कमी असल्याने वैयक्तिक यंत्रे खरेदी करण्यास मर्यादा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी अवजारे बँक स्थापनेकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादक...

व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : क्रीडा विभागामार्फत सन 2022-23 साठी राबविल्या जाणाऱ्या व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी पात्र संस्थानी प्रस्ताव सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. अनुदानासाठी पात्र संस्था, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कँटोनमेंट बोर्ड) शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभाग मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उपजिल्हा रुग्णालय शासकीय जिल्हा रूग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून 5 वर्षे पुर्ण झालेले आहेत. अशी शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र अस...

पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती वभटक्या जमाती विद्ययानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक 12 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात येणार असल्याची, माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांनी दिली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8 वी मध्ये प्रेवश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व ht...

कृषि योजनांच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत .एस. दिवेकर

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : कृषि अवजारे बँक या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादन कंपन्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत -जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, डी.एस. दिवेकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षाकरीता कृषि यांत्रिकिकरण उपअभियान योजनेंतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ६० लाख ३६ हजार व राष्ट्रीय कृषि योजना कृषि यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ३ लाख ५६ हजार असे एकूण ४ कोटी २१ लाख २५ हजार निधी प्रस्तावित आहे. त्यापैकि कृषि यांत्रिकिकरण उपअभियान योजनेतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकिकरण योजनेतर्गत एकूण १ कोटी ४४ लाख ९२ हजार व राष्ट्रीय कृषि योजना कृषि यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण ९८ लाख ९१ हजार असे एकूण ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थीच्या खाती रक्कम वर्ग केला आहे. (पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर विडर, ब्रश कटर, मळणी यंत्र, कापणी यंत्र, रीपर व इतर) जिल्ह...

धान खरेदी विक्रीसाठी 41 नोंदणी केंद्रे सुरु

Image

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संविधान दिनानिमित्त समता पर्वाचे उद्घाटन

Image

आज अखेर 56 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 0 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

राष्ट्रीय तंबाखू धाड सत्रात दंडात्मक 400 हजार रुपयांची वसुली /सामाजिक न्याय पर्वाचे आजपासून आयोजन/ मुक्त विद्यालय नोंदणीसाठी 30 पर्यंत मुदतवाढ

Image

मुक्त विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणीसाठी मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. २4 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी मध्ये परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यासाठी बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिली. प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी आणि उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परिक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज यापूर्वी दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत दिली होती. तथापि, पु:श्च बुधवार दि. 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळ आपली नावनोंदणी करण्यात यावी. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रासह अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर पर्यंत जमा करावे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, वि...

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. २4 (जि.मा.का.) : सामाजिक न्याय भवन येथे शनिवार दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत "सामाजिक न्याय पर्व" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे शनिवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करुन, संविधान वाचनाने कार्यक्रमास सुरवात केली जाणार आहे. तसेच विभागात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची यशोगाथा पुस्तक, उत्कृष्ट कार्याचा लघू माहितीपट यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. जिल्ह्यातील समतादूतमार्फत सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत पथनाटय सादर करुन प्रचार प्रसार केला जाणार आहे. शिवाय या कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता संवाद उपक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हा जात पडताळणी समिती यांच्याकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृ...

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण धाडसत्रात कुडाळ तालुक्यात 4 हजार 400 रुपयांची दंडात्मक वसुली

सिंधुदुर्गनगरी, दि. २4 (जि.मा.का.) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा-2003 (कोटपा) मधील प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सामितीमार्फत धाड टाकण्यात आली, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, सहकारी संस्था, बिगर सरकारी संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणी व पान टपरी, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, हॉटेलस् अशा ठिकाणी कुडाळ तालुक्यामध्ये तंबाखू नियंत्रण समितीने धाड सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या धाडसत्रामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अधिकारी व कुडाळ पोलिस विभागामार्फत तालुक्यातील 11 ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुपये 2 हजार 200 व पोलिस प्रशासन मार्फत रुपये 2 हजार 200 असे एकूण रुपये 4 हजार 400 एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या धाड पथकाध्ये जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा सल्लागार, संतोष खानविलकर, सायकॉलॉजिस्ट किरण कनकुटे, सामाजिक कार्यकर्ते कार्मिस अल्मेडा, समुपदेशक गायत्री कुडाळकर तस...

सारथीच्या योजनांच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. २3 (जि.मा.का.) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज पोस्टव्दारे 30 नोव्हेंबर अखेर पर्यंत पाठवावेत, असे आवाहन सारथी उपकेंद्र कोल्हापूरच्या सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती, Mpsc Mains Sponsorship,Probationary Officer/Clerical Staff Banking,Mpsc (CJJD & JMFC) ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अद्याप भरले नाहीत. त्यांनी ते विहित मुदतीत भरावेत व ज्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यांनी त्यांच्या अर्जाच्या प्रती आवश्यक त्या कागदपत्रांच्य छायांकीत प्रतींसहीत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे, बालचित्रवाणी आगरकड रोड शिवाजीनगर पुणे 411004 या पत्यावर दि. 30 नोव्हेंबर अखेर पर्यंत सादर करावित. 0000

राज्यस्तरीय युवा संसदसाठी संरक्षण मंत्री पदासाठी यशोधन देवधर यांची तर संसद सदस्यपदी सिध्दी गोसावी

सिंधुदुर्गनगरी, दि. २3 (जि.मा.का.) : युनिसेफ आणि नेहरु युवा केंद्र यांच्यावतीने 14 ते 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय युवा संसदेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकूण 72 युवकांची निवड करण्यात आली. युवा संसदेसाठी मंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातून संरक्षण मंत्री पदासाठी यशोधन प्रसाद देवधर यांची तर संसद सदस्यपदी सिध्दी गोसावी यांची निवड करण्यात आली. नव्याने सादर केलेल्या अग्निपथ योजनेसह गुप्तचर यंत्रणातटीय सुरक्षा यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवशी मुंबई येथील विधानभवन, राजभवन यांची भेट घेतली. तेथील कामकाज केसे चालते याबद्दल युवकांना माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर युवा संसदेला सुरुवात झाली सर्व मंत्री मंडळ आणि सदस्यांना सामुहिक शपथ घेतली. देशातील विविध प्रश्न विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात मांडण्यात आले. त्याला मंत्रिमंडळाने अपेक्षित अशी उत्तरे हि दिली. यावेळी...

नव्याने समावेश झालेल्या एकविध खेळ संघटनेची बैठक 29 नोब्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का): जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नव्याने समावेश झालेल्या एकविध खेळ संघटनेची पुनश्च बैठक दि.29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रातील जिल्हास्तरीय स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत याआधी दिनांक 7 ऑक्टोंबर 2022 रोजी (नव्याने समावेश झालेल्या) एकविध खेळ संघटना यांची सभा घेण्यात आली होती. या सभेस अल्प प्रतिसाद मिळाला होता. तरी पुन:श्च जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन करण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खालील नव्याने समावेश झालेल्या खेळ प्रकारातील अधिकृत राज्य संघटनेशी संलग्न जिल्हा एकविध खेळ संघटनांचे अध्यक्ष/सचिव यांची बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शालेय निबंध व वक्तृत्च स्पर्धा संपन्न

Image

रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे श्रध्दांजली

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जिमाका)- येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्यावतीने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्याबरोबर रस्ता सुरक्षा शपथही घेण्यात आली. रस्ते अपघातात बळी गेलेल्यांच्या स्मरणार्थ आम्ही सर्व वाहनचालक अशी शपथ घेतो की, रस्ता अपघातात कोणीही बळी पडू नये. यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. तसेच सर्व वाहतूक नियमांचे पालन करुन रस्ता सुरक्षा आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघात ग्रस्तांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्त्यव्य राहील. रस्ता सुरक्षा नियमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही पुर्णपणे कटिबध्द आहोत अशी शपथ यावेळी घेण्यात आली. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्यासह कुडाळ एस.टी. डेपो येथील अधिकारी कर्मचारी, ट्रक चालक- मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रवासी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सोबत :- फोटो जोडला आहे. 00000

जिद्दीने प्रयत्न केल्यास प्रशासकीय सेवेत यश -प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जिमाका)- प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्यासाचा नियमित सराव चालू ठेवा. वाचनामध्ये सातत्य ठेवा. प्रशासकीय सेवांबाबतच्या परीक्षांची सखोल माहिती घेण्याबरोबरच चालू घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रीत करा. त्यासाठी वृत्तपत्रांचे नियमितपणे वाचन करा. कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा. अपयश आले तरी खचून जावू नका. नेहमी सकारात्मक विचार करत रहा. झालेल्या चुकांचा शोध घ्या आणि जिद्दीने प्रयत्न करत रहा. यश हमखास मिळेल, असा सल्ला प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर यांनी दिला. मूळ केरळच्या असणाऱ्या व सध्या जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. असलेल्या करिष्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना फेसबुक लाईव्ह व्दारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, तहसिलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. श्रीम. नायर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे, हे प्रथम निश्चित करा.त्या दृष्टीने प्रयत्न सुरु करा. आपल्या आवडीचे विषय व आपल्याला सोपे जाणारे विषय निवडून त्याप्रमाणे अभ्यासाची दिशा ठरवावी. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी अभ्या...

जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धाचे 21 नोव्हेंबरला आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सन 2022-23 मध्ये करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धाचे आयोजन दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी येथे करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि काही तांत्रिक कारणास्तव स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात येत असून सदर स्पर्धा दि. 21 नोव्हेंबर 2022 रोजी मराठा मंडळ मैदान, कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे येणार आहे. इच्छूक शाळा व महाविद्यालयांनी आपल्या खेळाडूंना उपरोक्त दिवशी स्पर्धा स्थळी उपस्थित रहाण्याबाबत सूचित करावे,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. 0000

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्‍पर्धेच्या तारखांमध्ये बदल - जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य पुणे व जिल्‍हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शालेय क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन केले जाते सन 2022-23 या वर्षाच्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो, सॉफ्टबॉल, कुस्ती, कबड्डी, बेसबॉल व कॅरम, नेटबॉल या सर्व गटाच्या स्पर्धांच्या तारीखामध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहेत. कुडाळ हायस्कुल कुडाळ ता.कुडाळ येथे 1 डिसेंबर 2022 रोजी सॉफ्टबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे 1 ते 3 डिसेंबर 2022 रोजी खो-खो स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दि. 3 डिसेंबर 2022 रोजी बेसबॉल स्पर्धा. तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ला ता.वेंगुर्ला येथे दि. 5 ते 6 डिसेंबर 2022 रोजी कुस्ती स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे 8 ते 10 डिसेंबर 2022 रोजी कबड्डी स्पर्धा. श्री वा.स. विद्यालय मागणगाव ता. कुडाळ येथे दि. 7 ते 8 डिसेंबर 2022 रोजी कॅरम स्पर्धा. रेकोबा हायस्कुल वायरी ता. मालवण येथे दि.7 डिसेंबर 2022 रोजी नेटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शाले...

प्रेरणा अंतर्गत "यूपीएससी" साठी सोमवारी फेसबुक लाईव्ह प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर यांचे मार्गदर्शन

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जिमाका)- यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी मुळच्या केरळ राज्यातील असणाऱ्या व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. असलेल्या करिष्मा नायर सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता फेसबुक लाईव्ह व्दारे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी होणाऱ्या फेसबुक लाईव्ह मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासानाच्या वतीने करण्यात आले आहे. श्रीम. नायर सन २०२० मध्ये युपीएससीच्या ऑल इंडिया रँक १४ व्या क्रमांकाने उर्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी हे यश दुसऱ्या प्रयत्नात मिळविले आहे. श्रीम. नायर यांनी पब्लिक ॲडमिनीस्ट्रेशन हा वैकल्पिक विषय घेवून युपीएससीची परिक्षा दिली. सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. म्हणून कार्यरत आहेत. यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मा...

शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी परवानाधारकांनी अर्ज दाखल करावाशस्त्र परवाना नुतनीकरणासाठी परवानाधारकांनी अर्ज दाखल करावा

Image

जिल्ह्यात 3 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

Image

सागरी किनाऱ्यांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सतर्क -पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व त्यावर वेळीच प्रतिबंध व्हावा, या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सतर्क व कटिबध्द असल्याचे प्रतिपादन, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातुन भारतीय नौदलातर्फे दि. 15 नोव्हेंबर 2022 ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 36 तासाकरिता See Vigil 2022 अभियान आयोजित करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यावेळी म्हणाले, सागर किनारा हा अत्यंत मोठा व लांब असल्याने किनारपट्टीवरील ठिकाणे अतिरिकी कारवाया करण्यासाठी तसेच अतिरेकी प्रवेश करण्याकरिता इतर कोणत्याही मार्गापेक्षा सागरी मार्ग हा सोईस्कर असल्याने आतापर्यंत देशाच्या सरहद्दीमध्ये प्रवेश करण्यसाठी सागरी मार्गाचा वापर केला आहे. अतिरेक्यांकडून सागरी मार्गाने प्रवेश करुन मच्छिमार बोटी, ट्रॉलर्स इत्यादी मासेमारी करणाऱ्या बोटी व जहाजे यांचा वापर करुन समुद्रामार्ग किनाऱ्यावर येऊन देशाची संपत्ती...

गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा -डॉ.महेश खलिपे

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का.) : गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याव्दारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वासन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राची संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे. गोवरची सर्वसाधारण लक्षणे :- ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे,डोळे लाल होणे, गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाणा कमी होते. अ जीवनसत्व कमी झालेल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते...

तलाठी स्तरावरील पीक पहाणीसाठी मुदत 25 नोव्हेंबर पर्यंत

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : तलाठी स्तरावरील पीक पहाणी करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार तलाठी स्तरावरील पिक पाहणीची खरीप हंगामासाठी कालमर्यादा 15 नोव्हेंबर 2022 ऐवजी 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणून द्यावे,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांचे कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. 0000

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धां 22 व 23 डिसेंबर एवजी 22 नोव्हेबर रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पधेचे आयोजन केले जाते. सन 2022-23 या वर्षीच्या जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ सर्व गटाच्या स्पर्धा दि. 22 व 23 डिसेंबर 2022 रोजी निश्चित करण्यात आल्या होत्या. सदरच्या बुध्दीबळ क्रीडा स्पर्धाच्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला असून सर्व गटाच्या स्पर्धा मंगळवार 22 नोव्हेंबर 2022 रोजी माध्यमिक विद्यामंदीर कनेडी ता. कणकवली येथे होणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी याची नोंद घ्यावी व आपल्या खेळाडूंना बुध्दीबळ स्पर्धाच्या ठिकाणी उपस्थिती द्यावी असे आवाहन, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. 0000

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना 16 नोव्हेंबर 1966 रोजी झाली. तेव्हापासून 16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक रणजित पवार,बाळ खडपकर, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर,विनोद दळवी, गिरीष परब, नंदकुमार आयरे, विनोद परब, देवयानी वरसकर आदी उपस्थित होते. • सोबत फोटो जोडला आहे. 00000

शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, खासगी 17 नं. फॉर्म भरुन परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी तसेच खासगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी शुक्रवार दि. 25/11/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेला बसावयाचे आहे त्यांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव भावना राजनीर यांनी केले आहे. 000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान हक्क असे मूलभूतअधिकार दिलेले आहेत. समस्यग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्या तक्रारी /अडचणीचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे-नोव्हेंबर 2022 मधील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. 21/11/2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. समस्यग्रस्त व पिडीत महिलांनी आपले प्रश्न मांडून त्यांचे हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी याची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा उत्तम मार्ग आहे. समस्यग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दालन क्र. 106, ए-ब्ल...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी इ.11 वी व इ.12 वी, विज्ञान या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. 12 वी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकिय, अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, फार्मसी, कृषी, L.L.B, B.F.A, हॉटेल व्यवस्थापन अशा शाखेच्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यासाठी त्यांना सी.ई.टी, निट, जे.ई.ई, नाटा अशा प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in किंवा bartievalidaty.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर CCVIS येथे ऑनलाईन अर्ज भरावेत. स्वत:,पालक,म...

शामराव पेजे महामंडळ एकरकमी परतावा योजनेत व्याज रकमेवर 50 टक्के सवलत

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) - इतर मागासावर्गीय आर्थिक विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागास महामंडळ (ओबीसी महामंडळ) कर्जाच्या परतफेडीचा कालावधी संपलेल्या लाभार्थींसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार थकीत कर्जाची एकरकमी परतफेड केल्यास थकीत व्याज रकमेवर 50 टक्के सवलत देण्यात येईल. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली. सदर ची योजना ठराविक कालावधीसाठी आहे. खाते बंद केल्यानंतर महामंडळाच्या नवीन 10 लाख रुपये व्याज परताना योजनेंतर्गत लाभ घेता येईल. तरी संबंधितांनी योजनेचा लाभ घेऊ थकीत कर्जाची परतफेड करावी व कर्ज खाते बंद करावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, दूरध्वनी क्र. 02362-228119,8668898950 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुध्द व शाश्वत पाणी देण्याकरिता जिल्हा परिषद कठिबध्द -मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) -जलजीवन मिशनच्या माध्यमातून 55 लिटर शुध्द व शाश्वत पाणी देण्याकरिता जिल्हा परिषद कठिबध्द आहे. शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी देणे हि आपली जबाबदारी असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व 5 हजार 656 पिण्याच्या पाण्याच्या सोर्सची एकाचवेळी जैविक तपासणी करण्यात आली होती. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या सोर्सची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे असे प्रतिपादन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. पाणी गुणवत्ता सनियत्रंण व सर्वेक्षण अंतर्गत रासायनिक फिल्ड टेस्ट किटव्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे पाणी नमुने तपासणी प्रशिक्षण कार्यशाळा शिवाजी महाराज सभागृह येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस,पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी मान्यवर अपस्थित होते. यावेळी रासायनिक पाणी नमुने तपासणी किट वितरणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. ज...
Image

महाशिबीरास लोकांची उपस्थिती ही न्यायदानावर असलेला विश्वास दर्शविते - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जि.मा.का.) : राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत महाशिबीराचे आयोजित करण्यात आले. लोकांनी या महाशिबीरास लावलेली उपस्थिती ही न्यायदानावर असलेला विश्वास दर्शविते असे उद्गार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी काढले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग या कार्यालया मार्फत बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका म्हणाले, समाजातील दुर्लभ घटकातील लोकांना विनामुल्य तसेच कायदेशीर सेवा पुरविणे हे राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे मुख्य उदिष्ट्य आहे. यामुळे जनतेला योग्य माहिती मिळण्यास मदत होईल असे ते यावेळी म्हणाले. भारतात दरवर्षी वर्षी ९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक ११ ऑक्टोबर १९८७ रोजी कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा १९८७ जाहीर करण्यात आला होता. सदर कायदा नोव्हेंबर १९९५ मध्ये लागू करण्यात आला. सर्वोच न्यायालयामार...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष 2023 मधील स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सन 2023 या वर्षाचे विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगामार्फत जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती सह सचिव जाहिरात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध स्पर्धांत्मक परिक्षा दरवर्षी घेतल्या जातात. या परिक्षांचे नियोजन करताना, संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठ, परिक्षा घेणा-या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन, आयोगाने त्या परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित केले आहे. राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरू उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित परिक्षांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने सन 2023 या वर्षाचे वेळापत्रक तयार केले आहे. तरी राज्यातील सर्व होतकरु उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. * सोबत-वेळापत्रक जोडले आहे.

शासकीय धान (भात) खरेदी विक्रीसाठी 41 नोंदणी केंद्रे सुरु 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जि.मा.का.) : धान विक्री शेतकऱ्यांनी हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करणार आहे, त्यांनी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए. एस. देसाई यांनी दिली. जिल्ह्यात 41 ठिकाणी धान (भात) विक्री नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली असून, यापूर्वी नोंदणीसाठी शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहिती नुसार व मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नसल्याने शासनाने हंगाम 2022-23 करिता किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत धान खरेदीकरिता ऑनलाईन पध्दतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 41 धान खरेदी केंद्रावरती व महा नोंदणी ॲप वरती शेतकरी नोंदणी करता दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन त्वरीत शेतकरी नोंदणी करुन शासकीय धान खरेदी योजनेचा ...

गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये १७ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल www.mis https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ...

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.५ वी व ८ वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्र.सचिव माणिक बागर महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी दिली आहे. ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे. बुधवार दि. २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे. शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्याचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे. वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व ८ वी. साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in...

आज अखेर 56 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 0 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. - प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) : कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देवून सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. अनाथ बालकांना पालकत्व मिळावे, यासाठी महिला बाल विकास विभागासह इतर संबंधित यंत्रणांनीही प्रयत्न करावेत, अशा सूचना प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दल,जिल्हा बाल संरक्षण समिती त्रैमासिक आढावा व बाल कल्याण समितीची आढावा बैठक प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. याबैठकीला प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. करिष्मा नायर, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, बाल कल्याण समिती सदस्य ॲङ अरुण पणदूरकर, बाल कल्याण समिती सदस्य ॲड. नम्रता नेवगी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक विश्वनाथ कांबळी, सहा.पोलीस निरिक्षक कल्पना शिरदवाडे, सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत जावडेकर,वैभववाडी न...

12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Image

19 नोव्हेंबर पर्यंत जागतिक शौचालय दिवस राबविणार -जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

Image

आज अखेर 56 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 0 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

9.11.2022 News Paper Catting -आता आगाऊ नोंदणीचा पर्याय // वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी /// धान विक्रीसाठी महानोंदणी ॲपद्यारे नोंदणी करावी

Image