Posts

Showing posts from July, 2026

मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने पोर्टा केबिन उपयुक्त सिंधुदुर्गनगरी दि. 31 (जिमाका): मालवण बंदर (जेट्टी) येथील सागरी गस्ती केंद्राच्या पोर्टा केबिनचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले पोर्टा केबिन असून यापुढे जिल्ह्यातील १४ संवेदनशील ठिकाणी पोर्टा केबिन बसवण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. मालवण बंदर हे संवेदनशील लँडिंग पॉईंट असून या ठिकाणी बोटींची ये - जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. तसेच या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी भागावर देखरेख ठेवण्यासाठी आणि सतर्कता निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशिक्षित मरीन होमगार्ड व सुरक्षा वॉर्डन यांच्यासाठी मालवण बंदर येथे पोर्टा केबि...

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात - पालकमंत्री नितेश राणे

• छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ • जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जिमाका) : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य साकार करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान'चा शुभारंभ पालकमंत्री श्री. राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्...

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा होणार गौरव सिंधुदुर्ग, दि. ३० (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक प्रशासनापर्यंत महसूल विभागाने लोकाभिमुख शासनव्यवस्थेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट हा 'महसूल दिन' राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात महसूल दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे राहणार असून, महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी-सिंधु...

शेतकरी कर्जमाफीची पुढील यादी 10 ऑगस्टला होणार जाहीर

Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला वेग

Image

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...

एल निनो'च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी भात व नाचणी पिकांचा विमा घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : चालू खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जागतिक हवामान बदलांमुळे आणि ' एल निनो' प्रक्रियेच्या प्रभावामुळे पावसाच्या प्रमाणात अनिश्चितता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पिके असलेल्या भात व नाचणी उत्पादक शेतकरी बांधवांनी संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ३१ जुलै २०२६ पूर्वी 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'त सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८,०३३ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. योजनेचा लाभ घेण्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी अंतिम मुदतीपूर्वी उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी आपले पीक विमा संरक्षण निश्चित करावे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व महत्त्वाच्या अटी • खरीप हंगामासाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही आहे. • पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत महसूल मंडळामध्ये पिकाच्या उत...

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.5 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 29 : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. 30 जुलै 2026 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत समुद्रात 3.2 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अनुषंगाने किनारी भागात सतर्कता बाळगावी. हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान संदेशाचे अवलोकन करून त्यानुसार संबंधित मच्छिमार आणि मच्छिमार सहकारी संस्था यांच्यापर्यंत तातडीने संदेश पोहोचविण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास कळविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. ०००००

कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजना, लोकसेवा हक्कांतर्गत सेवा, महसूल विभागाची प्रमाणपत्रे तसेच आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे शिबिर पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे असणार आहेत. या शिबिरामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषदेचे आमदार सर्वश्री प्रमोद जठार,...

सावंतवाडी मध्ये ३१ जुलै रोजी भव्य महसूल समाधान शिबिर

'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' सावंतवाडी मध्ये ३१ जुलै रोजी भव्य महसूल समाधान शिबिर सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, महसूल विभागाशी संबंधित सेवा, विविध प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा तसेच आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह, नगरपरिषद सावंतवाडी येथे भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अध्यक्षस्थान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक के...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी जानवली येथे भव्य शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी जानवली येथे भव्य शिबीर सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी जानवली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राधेश्याम बँक्वेट अँड लॉन्स, मुंबई-गोवा महामार्ग, कृष्णनगरीजवळ, जानवली येथे संपन्न होणार आहे. या शिबिरास खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषद आमदार प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे, ॲड. निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'

Image
' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. आजच नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्याची आधार क्रमांकाबाबत असहमती असल्यास

Image

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 28: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून ते दि. 29 जुलै 2026 रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत समुद्रात 3.1 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच अनुषंगाने किनारी भागात सतर्कता बाळगावी. हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान संदेशाचे अवलोकन करून त्यानुसार संबंधित मच्छिमार आणि मच्छिमार सहकारी संस्था यांच्यापर्यंत तातडीने संदेश पोहोचविण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उपद्भवल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास कळविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 00000

थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 28: शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व उपकंपन्यांमार्फत इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) मधील 18 ते 55 वयोगटातील महिला व पुरुषांसाठी 1 लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यास 160 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. महामंडळामार्फत राबविण्यात येणारी थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा रक्कम रूपये 1 लाख पर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी हा नियमित 48 महिने (4 वर्षे) इतका असून 2 हजार 85 रुपये या मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करायची आहे. नियमित हप्त्यांची परतफेड करण्याऱ्या लाभार्थीना शुन्य टक्के व्याजदर लागू राहील. या योजनेद्वारे मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण केंद्र, झेरॉक्स सेंटर, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, चहा विक्...

Maharashtra Ek Paul Pudhe पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सिंधुदुर्गातील ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांतील यादी प्रसिद्ध पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे सिंधुदुर्ग ( जि.मा.का ) दि. 27 : - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकांची आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. जिल्ह्यातील ४२० गावांमधील विकास संस्था व जिल्हा बँकेकडील २७५७, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेकडील ९१७ अशा एकुण ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची यादी गावनिहाय प्रसिध्द झालेली आहे. सदर पात्र शेतकऱ्यांची यादी ही संबंधीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय व तालुका सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी श्रेणी ०१ सहकारी संस्था कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य असून ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक न...

सिंधुदुर्गातील 3674 शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांतील यादी प्रसिध्द

Image

स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 24: सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने स्थानिक निधी लेखापरीक्षा दिनानिमित्त दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता सविता आश्रम, पणदूर येथे अनाथ मुले तसेच पणदूर ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहाय्यक संचालक दिनकर चाटे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली. 0000000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा कार्यक्रम साजरा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 24: विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भ. ता. चव्हाण हायस्कूल, चौके येथे मुलांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा योजना-2024 या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास पॅनल विधीज्ञ अॅड. हेमश्री तोरसकर, मुख्याध्यापिका रसिका गोसावी , शिक्षकवृंद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कंत्राटी लिपिक श्वेता सावंत, विधी स्वयंसेवक हरी पांगम तसेच विधी स्वयंसेवक श्रावणी गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात करताना श्वेता सावंत यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध मोफत कायदेशीर सेवा, सहाय्य तसेच बालस्नेही कायदेशीर सेवा योजना-2024 विषयी माहिती दिली. यावेळी अॅड. हेमश्री तोरसकर यांनी बालकांचे हक्क संरक्षित करण्यासाठी, गरजू बालकांना मोफत व वेळेवर कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांचे कायदेशीर संरक्षण सुनिश्चित करण्याच्या...

परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी माजी सैनिकाच्या पाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कल्याणकारी निधी योजनेचा लाभ

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 24: सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गमार्फत विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांची अनाथ पाल्ये व अवलंबितांना शैक्षणिक, स्वयंरोजगार व पुनर्वसनासाठी विविध प्रकारच्या आर्थिक सहाय्याचा लाभ दिला जातो. याच अनुषंगाने कुडाळ तालुक्यातील गावराई येथील माजी सैनिक विठ्ठल जनार्दन काळे यांचे सुपुत्र कु. गणेश विठ्ठल काळे हे किर्गिझस्तान येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधीतून 1 लाख रुपये इतक्या आर्थिक सहाय्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. या धनादेशाचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्या हस्ते 24 जुलै 2026 रोजी करण्यात आले. यावेळी वरिष्ठ लिपिक लक्ष्मण कोळी, कल्याण संघटक आण्णासाहेब माने तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी...

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 24: मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून, आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि ज्ञानपरंपरेची वाहक आहे. जागतिकीकरण आणि डिजिटल युगाच्या पार्श्वभूमीवर नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात, वाचन-लेखनात तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक वापर करावा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित 'विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा 2025-26 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथील मायनाक भंडारी सभागृहात संपन्न झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रतिभा वरळे, शिक्षणतज्ज्ञ प्रविण शेवडे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य वामन पंडित, म. ल. देसाई, डॉ. शरयू आसोलकर, वृंदा कांबळी तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्रीम. तांबे हे उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य, विश्वकोश, चरित्रग्रंथ आणि संदर्भग्रं...

सिंधुदुर्गात कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ; 6 हजार 711 बँक खात्यांची माहिती पोर्टलवर

Image

दोन लाखांच्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ.

Image

पालकमंत्री नितेश राणे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष आरोग्य शिबिराला भेट; रुग्णालयीन व्यवस्थेचा घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जिमाका):- पालकमंत्री नितेश राणे यांनी आज स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित विशेष आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली. पालकमंत्री यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री श्री. राणे यांनी स्तन कर्करोग तपासणी शिबिर, गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी शिबिर, बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिर तसेच नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. पालकमंत्री यांनी अधिष्ठाता समवेत सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली आणि महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णालयीन व्यवस्था तसेच अध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच अ...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विभागीय समितीकडून तुळसुली व अणसुर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन व प्रत्यक्ष पाहणी

सिंधुदुर्ग, दि. २३ (जिमाका) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील तुळसुली आणि वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीने पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रिय तपासणी करुन मुल्यमापन केले. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने ग्रामपंचायतींच्या कामकाजाची, दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या तुळसुली ग्रामपंचायतीची तसेच द्वितीय क्रमांक मिळविलेल्या अणसुर ग्रामपंचायतीची विभागीय स्तरावर निवड झाल्यानंतर या समितीने दोन्ही ग्रामपंचायतींना भेट देत विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले. ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय नोंदी, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांची समितीने बारकाईने पडताळणी केली. यासोबतच प्रत्यक्ष विकासकामांची क्षेत्रीय पाहणी करून त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्...

अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी मोठी संधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी अर्ज सुरू; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या कृषि विभागामार्फत राज्य पुरस्कृत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना -2026-27" राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) अंतर्गत सन 1983 पासून राबविण्यात येणारी ही योजना बदलत्या परिस्थितीनुसार सुधारित करून शासनाने दि. 5 जानेवारी 2017 रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना" या नावाने सुरू केली आहे. शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधा उपलब्ध करून देत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत रु. 115 लाखांची अनुदान तरतूद करण्यात आली आहे. योजनेत नवीन विहीर, ज...

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद 43 विशेष आरोग्य शिबिरांत 2 हजार 464 बालकांची आरोग्य तपासणी

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात आलेल्या ‘निरामय पंधरवाडा आरोग्य अभियानाला’ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. 7 ते 22 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 43 विशेष आरोग्य शिबिरांमध्ये 2 हजार 464 बालकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली. या अभियानांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके व किशोरवयीन मुला-मुलींसाठी कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला आणि देवगड तालुक्यांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये बालकांमधील विविध आजार, जन्मजात दोष, पोषणासंबंधी समस्या तसेच इतर आरोग्यविषयक बाबींची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार पुढील उपचार, तज्ज्ञांचा सल्ला व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या अभियानामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील बालकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली. पालकांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपल्या पाल्या...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026' साठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व असामान्य कामगिरी करणाऱ्या पात्र बालकांनी तसेच त्यांच्या पालकांनी 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार 31 जुलै 2026 रोजी 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षांपर्यंत वय असलेल्या आणि आपल्या उल्लेखनीय कार्याने समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बालकांना प्रदान केला जातो. पुरस्कारासाठी शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व संस्कृती तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी केलेल्या बालकांची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्जदार बालक भारताचा नागरिक व रहिवासी असणे आवश्यक आहे. 31 जुलै 2026 रोजी वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षांपेक्षा कमी असावे. अर्जातील विशेष कामगिरी किंवा शौर्याची घटना अर्जाच्या अंतिम दि...

तिलारी धरणातून पाणी विसर्गाबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या (ROS) व (GOS) नुसार दि. 24 जुलै 2026 रोजी खळग्यातील दगडी धरणाच्या सांडव्यावरून अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या धरण परिसरासह बाहेरील पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून खरारी नाल्यासह विविध प्रवाहांमधून येणारे पाणी तिलारी नदीत मिसळणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. दिनांक 24 जुलै 2026 पासून पुढील कालावधीमध्ये नदी पात्रातील प्रवाह कधीही वाढु शकतो तरी नदी काठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये व सावधानता बाळगावी. तसेच रात्रीच्या वेळी नागरीकांनी नदीपात्रातून ये-जा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. नदीकाठच्या व इतर सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवरुन गावात दवंडी देवून ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण आवश्यक

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 23 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडील 4008 व राष्ट्रीयकृत, ग्रामिण बँकांकडील 2703 कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच टप्प्याटप्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेल्या व 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्जाचा यात समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना कमाल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाईल. थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास, एकवेळ समझोता योजनेनुसार उर्वरित रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. शासनाकडुन आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण...

७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर

Image

शेतकऱ्याच्या कष्टाला दिलासा, समृध्दीची नवी दिशा !

Image

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' अंतर्गत ३१ जुलैला सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भव्य शिबिरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' अंतर्गत ३१ जुलैला सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भव्य शिबिरे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्ग, दि. २२ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' राज्यभर राबविण्यात येत असून, या अभियानाला २२ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, विविध प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्कांतर्गत सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित विशेष आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिरातून करण्यात आला. नागरिकांना दर्जेदार आ...

प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत १०० टक्के पूर्ण करा-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश

• उत्कृष्ट काम करणाऱ्या BLO यांचा सत्कार • कणकवली मतदारसंघाची आढावा बैठक सिंधुदुर्ग, दि. २२ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रगणना (Enumeration) फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. कणकवली विधानसभा मतदारसंघातील SIR-२०२६ मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे, तसेच अधिकारी सूर्यकांत पाटील, शितल जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील नोंदींची शुद्धता सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराकडून प्रगणना फॉर्म भरून घेऊन त्याची योग्य पद्धतीने नोंद करावी. कोणताही पात्र ...

स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्गात विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ

जिल्ह्यातील रुग्णाला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन द्याव्यात - आमदार दीपक केसरकर यांचे निर्देश सिंधुदुर्ग दि २२ (जिमाका): स्व. अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या विशेष आरोग्य शिबिरामुळे जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे शिबिर महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील विविध कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यतील रुग्णाला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक असून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी इतरत्र रेफर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात करण्याचे निर्देश आमदार दिपक केसरकर यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते संपन्...

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रतिमेस पुष्पांजली अर्पण

Image
सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 22- महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राज्याच्या प्रशासनात त्यांनी दिलेले नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी यांचे स्मरण यावेळी करण्यात आले. यावेळी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचे बारकाईने परीक्षण करताना चांगले काम करणाऱ्यांचे मनापासून कौतुक करणे, ही अजितदादा यांची कार्यपद्धती होती. चांगल्या कामाला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तेची दखल घेणे, हा त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा गुण होता. प्रशासनावर असलेली त्यांची भक्कम पकड, निर्णयक्षमता आणि कामातील स्पष्टता यामुळे विकासकामांना नेहमीच गती मिळाली. कोणतेही काम नियोजनबद्ध पद्धतीने, वेळेत आणि परिणामकारक रीतीने पूर्ण व्हावे, यासाठी ते सातत्याने आग्रही असत. वक्तशीरपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त...

शेतकार सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबध्द! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

Image

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे येथे सुरक्षा रक्षक पदासाठी माजी सैनिकांची भरती

सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील निवृत्त झालेले हवलदार व तत्सम पदावरील माजी सैनिकांना भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे येथे सुरक्षा रक्षक या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पात्र माजी सैनिकांनी शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर www.bel-india.in येथे जाऊन विहित मुदतीत ऑनलाइन नोंदणी करावी. भरतीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा 02362-228820/8219285788 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा. 0000000

वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- जिल्ह्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गर्भपाताच्या (Medical Abortion) गोळ्यांची अनधिकृत व नोंदणीकृत वैद्यकीय तज्जांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय जर विक्री होत असेल तर ही गंभीर बाब असून यामुळे महिलांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा गोळ्यांची खरेदी किंवा वापर स्वतःच्या मनाने अथवा प्रिस्क्रिप्शनशिवाय करू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. वैद्यकीय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा वापर केवळ नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच करणे कायदेशीर व सुरक्षित आहे. प्रिस्क्रिप्शनशियाय अशा औषधांचा वापर केल्यास अतिरक्तस्त्राव, अपूर्ण गर्भपात, गंभीर संसर्ग, भविष्यातील प्रजननक्षमतेवर परिणाम तसेच महिलेच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्री परवाना धारकांनी गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केवळ वैध वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनवरच करावी. प्रिस्क्रिप्शनशिवाय किंवा नियमबाह्य पद्धतीने अ...

विशेष लोक अदालतीत 46 धनादेश अनादर प्रकरणांचा तडजोडीने निकाल

सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जुलै 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे NI Act 1881 कलम 138 अंतर्गत प्रलंबित धनादेश अनादर प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या विशेष लोक अदालतीसाठी जिल्हा न्यायालयात एक आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये अशी एकूण सात पॅनेल कार्यरत होती. जिल्हा न्यायालयातील पॅनेलमध्ये दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. जे. पाटील आणि विधीज्ञ प्रसाद सावंत यांनी कामकाज पाहिले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ए. जी. देर्शिगकर उपस्थित होते. विशेष लोक अदालतीला पक्षकार, विधीज्ञ, न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांतील न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घ...

शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेसाठी 22 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी दि : 21 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठीही एकत्रित अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 22 जुलै 2026 पर्यंत https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. याच अर्जाद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचाही लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही किंवा ज्या तालुक्यात शास...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्याच्या कष्टाला दिलासा, समृध्दीची नवी दिशा !

Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जमुक्तीसाठी अग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Image

बेरोजगार युवकांसाठी रोजगार योजना

सिंधुदुर्गनगरी ( जिमाका ) 20 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), पी.एम. विश्वकर्मा योजना तसेच मधकेंद्र योजना,मधाचे गाव योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी "मधकेंद्र योजना" आणि "मधाचे गाव योजना" राबविण्यात येत आहे. या योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य, अनुदान तसेच विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरी इच्छुकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारावा, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्गचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. मधकेंद्र योजनेचा उद्देश मधमाशी पालनाला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्माण करणे आहे. यासाठी मधमाशी पेटी, वेष, स्मोकर, मधमाशी वसाहत व इतर साहित्य ५०% स्वगुंतवणूक व ५०% शासन अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे १० दिवसाच...

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) 20 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध केलेल्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचीत सन्मान व्हावा यासाठी “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी या पुरस्कारासाठी आपले अर्ज दिनांक 28 जुलै 2026 पूर्वी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कुडाळ येथे पाठवण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व उद्योगाच्या वृध्दीसाठी, उदयोगाला चालना व गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या सं...

अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन 22 जुलै ते 1 ऑगस्ट : आरोग्य तपासणी व जनजागृतीचा विशेष उपक्रम नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांमध्ये दि. 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत विशेष आरोग्य शिबिर अभियान आयोजित करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना या विशेष अभियानाच्या आयोजनाबाबत निर्देश दिले आहेत. तसेच दि. 16 जुलै 2026 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. या अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत बाह्यरुग्ण विभागात विविध वि...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियानाचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटनपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता बाह्यरुग्ण विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे होणार आहे. तसेच या शिबिरास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, लोकसभा सदस्य नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलींद नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषचे आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबीर होणार आहे....

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी

Image
सिंधुदुर्गनगरी दि: 20 (जिमाका) :- सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी व पुढील अनुषंगिक कार्यवाही करणेबाबत कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India), मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उप-मंडल चे संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, देवबाग ग्राम महसूल अधिकारी श्री वायाळ व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी नुकतीच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील अलीकडेच ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी दिनांक 19 जुलै 2026 च्या संध्याकाळी केली. या पाहणीदरम्यान ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता, दगडी बांधकामाची अवस्था तसेच समुद्री लाटा, भरती-ओहोटी आणि पावसामुळे झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक तांत्रिक निरीक्षणे व मोजमाप करून...

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा.

Image

#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर #शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 36 हजार 500 कोटींची महाकर्जमुक्ती

Image

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी व पाल्यांचा विशेष गौरव

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सन 2025-26 या वर्षात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच त्यांच्या पाल्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. गौरवप्राप्त व्यक्तींना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे. या गौरव पुरस्कारासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजक, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बहुमोल कार्य करणारे तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता 10 वी परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण व 12 वी च्या परीक्षेमध्ये 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व पाल्यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी व ...

बाह्यरुग्ण विभागातील लघुशस्त्रक्रियागृहाला चांगला प्रतिसाद 300 पेक्षा जास्त मायनर प्रक्रिया पूर्ण

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील लघुशस्त्रक्रियागृहाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संपन्न झाले होते. त्यानंतर मागील दोन महिन्यांत तेथे 300 पेक्षा जास्त मायनर प्रकिया पुर्ण करण्यात आल्या असून शरीरावरील विविध गाठींवरील शस्त्रक्रियांचा त्यात समावेश आहे. या शस्त्रक्रियांकरीता रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसल्याने व शस्त्रक्रिया त्वरित व त्याच दिवशी पुर्ण होत असल्याने या लघुशस्त्रक्रियागृहास रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शरीरावरील विविध गाठींचे शस्त्रक्रियेनंतर अचूक निदान हे याच रुग्णालयात सुरु झालेल्या हिस्टोपॅथोलॉजी विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या नव्याने सुरु करण्यात आलेल्या सुविधेचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी केले आहे. 0000000

माय भारत विशेष नोंदणी अभियानाला जिल्ह्यात प्रारंभ युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जिमाका) : देशातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे. दि. 1 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. युवकांनी मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि आवश्यक कागदपत्रांच्या सहाय्याने माय भारत पोर्टलवर विनामूल्य नोंदणी करून विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा. युवकांना www.mybharat.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातून माय भारत पोर्टलवर सहज नोंदणी करता येणार आहे. माय भारत हा केवळ नोंदणीचा उपक्रम नसून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारा आणि समाजसेवेची संधी उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून युवकांना स्वयंसेवा, सामाजिक बांधिलकी,...

शेतकरी बंधूना सर्वात मोठी महाकर्जमुक्ती आणि परतफेडीचा सन्मान

Image

बळीराजाला मोठा दिलासा: 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी

Image

बळीराजासाठी सरकारचा मेगा दिलासा कर्जमाफीसोबत 48 हजार कोटींचे वीज बिलही माफ #शेतकरी #महाराष्ट्रशासन

Image

सिंधुरत्न समृद्ध योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून सिंधुदुर्गच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण विकासात्मक उपक्रम राबवून जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला चालना दिली जाणार असल्याचे प्रतिपादन सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. १८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला मंजुरी देण्यात आली असून, त्याअनुषंगाने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुरत्न कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांच...

संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न 'अपघातमुक्त सिंधुदुर्ग'चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -खासदार नारायण राणे

जानेवारी ते जून २०२६ कालावधीत अपघाती मृत्यूंमध्ये घट; रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून 'अपघातमुक्त सिंधुदुर्ग' घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व संबंधित विभागांनी अधिक प्रभावी नियोजन करावे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, रस्ते अभियांत्रिकीतील आवश्यक सुधारणा, व्यापक जनजागृती तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना खासदार नारायण राणे यांनी दिल्या. खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सिंधुदुर्ग जिल्हा संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अपघातमुक्त जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने विविध विभागांनी राबविणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा क्षेत्रात राबविण्...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न

विकासकामांच्या गुणवत्तेसह निधीचा वेळेत व प्रभावी वापर करण्याच्या सूचना; लोकाभिमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण, संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा आज पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 'सिंधुनीती' सभागृहात संपन्न झाली. सन २०२६-२७ मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करावा. कोणत्याही विभागाने निधी अखर्चित ठेवू नये, चालू अर्थिक वर्षातील मंजूर निधी प्रत्येक विभागाने माहे डिसेंबर अखेर खर्च करावा. यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधीचा शंभर टक्के व वेळेत विनियोग करणे तसेच विकासकामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी या...

दिशा समितीच्या बैठकीत विविध महत्वाच्या विकास कामांचा आढावा केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे खासदार नारायण राणे यांचे निर्देश

Image
• लोकाभिमुख विकासकामांना गती द्यावी • योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा • कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील विविध विकास योजना तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित कामांचा आढावा आणि नागरिकांपर्यंत योजनांचे लाभ वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)ची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 'सिंधुनीती' सभागृहात संपन्न झाली. समितीच्या अध्यक्षस्थानी खासदार नारायण राणे हे होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक...