रिक्त पदांबाबत सामंजस्य करार करावा
सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का):- जिल्ह्यातील सर्व उद्योग आस्थापना समूह, उदयोग आस्थापना व प्लेसमेंट एजन्सी यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांबाबत विहीत नमुन्यात सामंजस्य करार करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त यांनी केले आहे.
कौशल्य , रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मुंबई विभागामध्ये दि. 15 जुलै 2023 रोजी ठाणे येथे इंडस्ट्रि मीट चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांना इंडस्ट्रिजच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून उद्योग आस्थापना समुह, उद्योग आस्थापना व प्लेसमेंट एजन्सी यांनी सदर इंडस्ट्री मीट चे अनुषंगाने रिक्त पदांबाबत विभागासोबत सामंजस्य करार करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362-228835 वर संपर्क साधावा.
000000
Comments
Post a Comment