Posts

Showing posts from December, 2022

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी,दि.31 (जि.मा.का.) : मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२२ अंतर्गत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यास आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तरी या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. ०००००

आपदा मित्र' समाजाचे ऋण फेडण्याची संधी-डाॕ जयकृष्ण फड

Image
सिंधुदुर्ग दि.३० (जिमाका) 'आपदा मित्र' म्हणून काम करत समाजाचे ऋण फेडण्याची एक चांगली संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचा आपण सुयोग्य वापर कराल, अशी अपेक्षा प्र. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण  फड यांनी व्यक्त केली.      आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात आज झाला. डाॕ फड म्हणाले, आपदा मित्र म्हणून प्रशासनाने आपल्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे.आपल्या स्थानिक भागात निर्माण झालेल्या आपत्तीवर उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने आपण विजय मिळवाल. तरुणांनी ध्येय वेडे असले पाहिजे. आपल्याला आपले ध्येय ठरवणे आवश्यक आहे.      प्रथमतः प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व आपदा साहित्य किट चे वाटप करण्यात आले. यावेळी आपदा मित्रांच्यावतीने सहदेव नारायण सनाम,   प्रथमेश पांडुरंग पावसकर,   दत्ताराम जगन्नाथ मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. १२ दिवस चाललेल्या या निवासी प्रशिक्षण वर्गात योगा, झूंबा डान्स, दोरीपासून गाठी बनविणे, आग लागल्यास त्यावर करावयाच्या उपाययोजना, जखमी ...

अंमली पदार्थांची तस्करी,वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती

सिंधुदुर्गनगरी,दि.30 (जि.मा.का.) : अंमली पदार्थांची होणारी तस्करी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करुन कारवाई करावी.अंमली पदार्थ लागवडीबाबत संबंधित विभागांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी. अंमली पदार्थ सेवन व विक्री करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप भोसले यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. तसेच विभाग निहाय आढावा घेतला. अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक उपाय-योजना अंमलबजावणीबाबत गृह विभाग व सर्व संबंधित विभागाव्दारे सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी श्री. मठपती म्हणाले, अंमली पदार्थ तस्करी, वाहतूक व लागवडीस आळा घालण्यासाठी लोकसहभागाचीही आवश्यकता आहे. त्यासाठी जनतेनेही शासकीय यंत्रणेला मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अंमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्पपरिणामांची माहिती व्हावी, य...

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 2 जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरीत

सिंधुदुर्गनगरी,दि.30 (जि.मा.का.) : युवा महोत्‍सवाच्‍या आयेाजनाची सुरुवात जिल्‍हा पातळीवरुन होते. जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने सन 2022-23 मध्‍ये दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. युवा महोत्‍सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धापूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी. तसेच सहभागाबाबत प्रवेशिका sindhusports@yahoo.com या ईमेल आयडीवर दिनांक 1 जानेवारी 2023 पर्यंत पाठविण्यात यावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक - युवती / संघांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. या युवा महोत्‍सवामध्‍ये लोकनृत्‍य, लोकगीत या बाबींचा समावेश आहे. जिल्‍हास्‍तर युवा महोत्‍सवामध्‍ये सहभागी होण्‍याकरीता जिल्‍ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. केंद्र शासनाच्‍या क्रीडा व युवक कल्‍याण विभागाच्‍या वतीने प्रतिवर्षी 12 ...

पी एम किसान योजनेवर भर द्या; बँकांनी आपली कामगिरी वाढवावी - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) - पीक कर्ज तसेच शासनाच्या अन्य योजनांमध्ये बँकांनी आपली कामगिरी वाढवून उद्दिष्ट पूर्ती करावी. पी एम किसान आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज झाली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अजय थुटे, रिझर्व बँकेचे नरेंद्र कुमार कोकरे, आरसीटीचे संचालक राजाराम परब आदी उपस्थित होते. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकेश मेश्राम यांनी जिल्ह्यातील बँकांच्या कामगिरीचा आढावा देताना जिल्ह्याच्या सीडी रेशो सप्टेंबर २०२२ मध्ये ५०.०९ टक्के असल्याचे सांगितले. पीक कर्ज वाटपामध्ये उद्दिष्ट ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ७१ टक्के साध्य झाले आहे. जिल्ह्यात २८६.६८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, पीक कर्जाबाबत ज्या बँकांची कामगिरी असमाधानकारक आहे, त्यांनी हा विषय गंभीरतेने घेण्याबाबत पाठपुरावा करावा. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गंत शेतकऱ्यांना किसान क्रेड...

पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय्य द्या -रवींद्र मठपती

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) पीडितांना लवकरात लवकर अर्थसहाय द्यावे, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. मठपती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रभारी सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. बैठकीत मागील इतिवृत्ताचे वाचन करुन मान्यता देण्‍यात आली. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) 1989 अंतर्गत माहे जानेवारी 1995 ते 28 डिसेंबर 2022 अखेर गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच पीडित लाभार्थ्यास देय अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीस समाज कल्याण कार्यालयाचे पोलीस निरीक्षक एस.बी.गावडे उपस्थित होत्या. 0000

दशपूर्ती झालेल्या धारकांनी आधार कार्ड अद्ययावत करावे

सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का.) प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडील 9 नोव्हेंबर 2022 मधील अधिसूचनेत नमूद केलेल्या 16 क कागदपत्रांच्या अद्ययावत नियमावलीनुसार दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्ड धारकांनी, आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे, असे आवाहन प्र.निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले आहे. केंद्र शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधार कार्ड नोंदणीची मोहीम राबवण्यात येऊन बहुतांश नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आली आहेत. तसेच आधार कार्ड बनवून दहा वर्षे झाली असतील या दहा वर्षाच्या कालावधीत एकही आधार कार्डचा कोठेही वापर केला नसेल अशा व्यक्तीने ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रे अपडेट करुन घ्यावी. त्यामूळे आधार मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर होतील. आधार कार्ड अपडेट कुठे कराल आधार कार्ड ऑफलाईन किंवा ऑनलाईन अपडेट करु शकता ‘माय आधार’ पोर्टल वर जाऊन माहिती अपडेट करता येऊ शकते. तसेच जवळच्या आधार सेंटरवर जाऊन माहिती अपडेट करु शकतात. कोणती कागदपत्रे आश्यक आधार कार्ड धारकांच्या पत्ता बदल करायचा असेल तर त्यांचा पुरावा आधार कार...

चैतन्य परब याची विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) येथील शासकीय बालगृहातील आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविदयालय पणदूर तिठा येथील इ.11वी तील चैतन्य परब याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड झाली. तालुका व जिल्हा स्तरावर शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला असून, सातारा येथे होणाऱ्या पुढील विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी तो रवाना झाला असल्याची माहिती अधीक्षक बी.जी . काटकर यांनी दिली. 0000

2 जानेवारी रोजी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्याप्रमाणे माहे जानेवारी महिन्यातील लोकशाही दिन सोमवार दि. 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत राबविण्यात येणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली आहे. 0000

ग्राहक प्रशिक्षित आणि जागृत हवा - दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी,दि.28 (जि.मा.का.) खरेदी विक्री व्यवस्थेतील ग्राहक हा राजा आहे. याची फसवणूक होऊ नये, म्हणून कायमच यंत्रणेने जागृत राहणे गरजेचे आहे. कायद्याने ग्राहकांचे हक्क मिळवून देण्यासाठी यंत्रणा निर्माण केलेली असली तरी ग्राहक प्रशिक्षित होऊन जागृत झाला पाहिजे, असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गीते यांनी व्यक्त केले. जिल्ह्याचा राष्ट्रीय ग्राहक दिन देवगड येथे घेण्यात आला यानिमित्त ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, एसटीचे विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर, कृषी अधिकारी कैलास ढेपे, जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष सुरेश पाटील तसेच ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी आपल्या भाषणात ग्राहकांचे अधिकार , ग्राहकांना न्याय देणारी शासनाची त्रिस्तरीय यंत्रणा व स्वयंसेवी संघटना म्हणून काम करणारी ग्राहक पंचायत याबाबत सविस्तर माहिती विशद केली....

‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ जामसंडे येथे बुधवारी

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या बुधवार दि.28 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्री. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तहसिलदार स्वाती देसाई यांनी दिली. 000

‘चला जाणुया नदीला’ अभियानांतर्गत कडशी नदी संवाद यात्रा पुढे ढकलली

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) जिल्ह्यातील ‘चला जाणूया नदीला’ या संवाद यात्रा सुरु करण्यापुर्वी संबंधित विभागाकडून कडशी नदी मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये आयोजित केलेली कडशी नदी संवाद यात्रा अतंर्गत चर्चासत्र व बैठकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून या बैठका व चर्चासत्र जानेवारी 2023 च्या पहिल्या व दुसऱ्या सप्ताहात घेण्याचे नियोजन,असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गो. ह. श्रीमंगले यांनी दिली आहे. तथापि या गावांमध्ये आताच ग्रामपंचायत निवडणुका होवून नविन ग्रामपंचायत सदस्यांची नियुक्ती झालेली असून दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत या गावांमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची बैठक व उपसरपंच पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम नियोजित आहे. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत ‘चला जाणुया नदीला’ या अभियानांतर्गत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यातील कडशी नदीच्‍या काठावर वसलेल्‍या मोरगाव,पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे डोंगरपाल व नेतर्डे या सहा गावांमध्ये कडशी नदी संवाद यात्रेचे आयोजन दि. 28 ते 29 डिसेंबर रोजी करण्...

कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या लाभासाठी प्रयत्न करावेत. - प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : कोविड-19 मुळे एक व दोन पालक गमावलेल्या अनाथ बालकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देवून सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी गृहभेटी देऊन चर्चा करुन संबंधिताचे शंका निरसन करावे, अशा सूचना प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय कृती दलाची आज बैठक झाली. या बैठकीला जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर, बाल कल्याण समिती सदस्य ॲङ अरुण पणदूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी काटकर, डॉ.सई धुरी, माविमचे जिल्हा समन्यवक नितीन काळे, डॉ.सुमित नागणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक विश्वनाथ कांबळी, चाईल्ड लाईनच्या प्रियंका घाडी, प्रथमेश पेडणेकर आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी, कोविड-19 मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. त्याचबरोबर पती गमावलेल्या विधवांनाही शासनाकडून विविध योजनांचे लाभ देण...
Image
जिल्हा महिला व बाल विकास विभागाचा हातभार अपराधी बनले उद्योजक;सातजणांनी उभारले व्‍यवसाय परिविक्षाधीन व शिक्षा भोगून आलेल्या मुक्त बंद्यांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान दिले जाते. शिवाय संबंधित व्यवसायासाठीचे प्रशिक्षण देखील दिले जाते. याचाच लाभ घेतलेले जिल्ह्यातील 5 परिविक्षा आणि दोन मुक्तबंदी अशा सातजणांनी आपला व्यवसाय उत्तमरित्या उभारुन चरितार्थ चालवत आहेत. जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी याबाबत माहिती दिली.अपराधी परिविक्षा अधिनियम 1958 (अधिनियम क्र.20) नुसार न्यायालयामध्ये खटले दाखल असतात. न्यायालयाकडून अशा आरोपींना सुधारण्याची संधी दिली जाते. जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्या देखरेखीखाली सोडण्यात येते. परिविक्षा अधिकारी गृहभेट करुन त्या व्यक्तींचा अहवाल न्यायालयात देत असतो. त्याची पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने रोजगारासाठी 25 हजार अर्थसहाय दिले जाते. सुरुवातीला हे अनुदान 20 हजार होते,14 ऑक्टोबर 2016 मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन यात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...

अपघातग्रस्त वृध्द महिलेसह जखमींना एलसीबीची तात्काळ मदत

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.) मुंबई -गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी येथे आज सकाळी मोटरसायकल घसरुन झालेल्या अपघातातील वृध्द महिलेसह दोघा जखमींना एलसीबी पथकातील पोलीसांनी तात्काळ शासकीय वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोहचवले. त्यामुळे वेळेत वैद्यकीय उपचार सुरु झाले. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील शुभांगी आत्माराम गावडे (वय 68) सत्यवान आत्माराम गावडे (वय 39 ) अशी जखमींची नावे आहेत. आई आणि मुलगा दोघेही ओरोस येथे कामानिमित्त मोटरसायकलवरुन जात होते. उड्डाणपुलावर लक्षात न आल्यामुळे ते ओरोस ऐवजी पुढे कणकवलीपर्यंत आले. चौकशी केली असता त्यांना ओरोस मागे राहिल्याचे लक्षात आल्यानंतर सत्यवानने मोटरसायकल पुन्हा ओरोस च्या दिशेने वळवली. दरम्यान वागदे येथे रस्त्यावर मांजर आडवे आल्यामुळे मोटरसायकल रस्त्यावर घसरली. यात दोघेही जखमी झाले. कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एलसीबी च्या पथकातील हवालदार राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, चालक रवी इंगळे यांनी तात्काळ आपल्या शासकीय वाहनातून दोघांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे ड...

सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

Image
सिंधुदुर्गनगरी दि.26 (जि.मा.का): आपली आणि इतरांची सुरक्षितता म्हणून नागरिकांनी मास्क चा आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. कोवीडबाबत पूर्वतयारी आणि सतर्कता म्हणून आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकही रुग्ण नसल्याने सध्या जिल्ह्यात कोणतीही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु, सतर्कता आणि पूर्वतयारी असावी म्हणून सर्व यंत्रणांनी विशेषत: आरोग्य यंत्रणेने काळजी घ्यावी. यंत्रसामग्री, साधनसामग्री, ऑक्सीजन प्लॅंट, औषधे, सीसीसी, डी.सी.एच, डी.सी एच.सी, बेड याबाबत सतर्क रहावे. तालुकास्तरावरील यंत्रणांनीही सतर्कता म्हणून सर्व विभागाची बैठक घेवून सावधानता बाळगावी अवश्यक सुविधा तयार ठेवाव्यात. पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनीही मास्क आणि सॅनिटायझर वापराबाबत आवाहन केले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, प्रशांत पानवेकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब ...

माहे डिसेंबर करिता मंजूर केरोसिन नियतन

सिंधुदुर्गनगरी दि.26 (जि.मा.का): माहे डिसेंबर 2022 करिता 12 के.एल.केरोसिन नियतन, प्रति टँकरच्या प्रमाणात, जिल्ह्यात एकूण 108 के.एल. केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. तालुका निहाय मंजूर नियतन पुढिलप्रमाणे असून सर्व आकडे किलो लीटरमध्ये आहेत. दोडामार्ग -5, सावंतवाडी -15, वेंगुर्ला -16, कुडाळ -12, मालवण -18, कणकवली -20, देवगड -12, वैभववाडी- 10, असे एकूण 108 कि.लो. मंजूर केरोसिन नियतन असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे. 0000

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगळवारी समुद्र किनारे स्वच्छता

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का):- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरिता समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्हावासियांनी या समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांत सहभाग घ्यावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटकांची मोठ्याप्रमाणात रेलचेल जिल्ह्यात असते जिल्ह्यात येणारा पर्यटक समुद्र किनारी भेटी देत असतो. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ सुंदर समुद्र किनारे पाहता यावेत या हेतूने दिनांक 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन श्रमदानातून होणार आहे. तरी जिल्हावासियांनी आपल्या नजिकच्या समुद्र किनारी जाऊन श्रमदान करुन समुद्र किनारे स्वच्छ करावेत असे आवाहन ही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर यांनी केले आहे. मालवण ग्रामप...

दोन वर्षापासून फरारी आरोपीला एलसीबी कडून अटक

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) :कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकारणी गेल्या 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने गोव्यातील कोलवाळ पोलीस ठाणे हद्दीत अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. सावंतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. 292 / 2020 भा. दं.वि. क. 406,420,34 हा गुन्हा दि. 22.10.2020 रोजी दाखल आहे. या गुन्हयातील दोन आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने फिर्यादी व अन्य 15 साक्षीदार यांना प्रत्येकी 1 लाख रुपये कर्ज देण्याचे अमिष दाखवून फिर्यादी व अन्य 15 साक्षीदारांकडून प्रत्येकी 3000 रु. कर्ज मिळवून देण्यासाठी एकूण 48000 रु. स्वीकारुन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी क्र.1 हा गुन्हा दाखल झाल्यापासून तो आपले राहण्याची ठिकाणे वारंवार बदलून पोलीसांना चकवा देत होता. अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यां मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले व सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या पथकाने सुमारे 2 वर्षापासून फरारी असलेला आरोपीला जेरबंद करण्यसाठी विशेष मोहीम राबवून, तांत्रिक मदतीच्या स...

शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजनेचा लाभ घ्यावा -सोमनाथ रसाळ

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) :जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जिल्हा नियोजन समिती मार्फत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल सामूहिक, नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते.या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले. महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक, नोंदणीकृत विवाह केलेल्या खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीय संवर्गातील वधूच्या आईला रुपये 10 हजार इतक्या अनूदानाचा लाभ देण्याची योजना या कार्यालयामार्फत राबविण्यात येते. सुधारीत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता. सरळ विवाह नोंदणी कार्यालयात ( Office of the Registrar of Marriage) जावून नोंदणीकृत विवाह Registered Marriage) करतात त्यांना सुध्दा रुपये 10 हजार इतके अनुदान देण्यात येते. शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील वधूच्या आईला शुभमंगल सामूहिक,नोदणीकृत विवाह, तसेच निराधार, परितक्त्या आणि विधवा महिलेच्या दोनमुलीच्या विवाहास योजनेचा अ...

प्रशिक्षण, पूर्वतयारीमुळे आपत्तीची तीव्रता कमी - प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) : आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी असेल तर, येणाऱ्या आपत्तीची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे प्रशिक्षण आवश्यक असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आज उद्घाटन झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना दिलेले शिक्षण, संस्कार जीवनात दीर्घकाळ टिकतात. शिक्षकांकडून आपत्ती व्यवस्थापनाचे योग्य धडे विद्यार्थ्यांना देण्यास उत्तम मदत होते. जीवनात पुढे त्याचा फायदा होतो. त्यासाठीच आज या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यात शिक्षकांचा फार मोठा हातभार लावला जात असतो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्र.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड म्हणाले, शालेय शिक्षणात शिक्षकांकडून विद्यार्थितील मिळालेल्या शिक्षणाचा फायदा ...

शिक्षकांसाठी शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.): जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी आज शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे,अशी माहिती प्राचार्य अनुपमा तावशीकर यांनी दिली. येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात सकाळी 11 ते 5.30 या वेळेत हे प्रशिक्षण होणार असून, यशदाचे प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी अभिरुप प्रात्यक्षिक देखील होणार आहेत. 00000

कृषीमाल निर्यातदार व्हायचंय.. कृषी पणन मंडळाचे प्रशिक्षण घ्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे पुण्यात 5 दिवसाचे प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.): नवे निर्यातदार घडवणे, कृषी मालाचे निर्यातवृद्धी करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मूल्यवर्धन करणे आणि परकीय चलन प्राप्त करणे या प्रमुख उद्देशांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे पुणे येथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रशिक्षण देण्यात येते. हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्समध्ये कृषिमाल निर्यातदार होण्यास इच्छुक व्यक्ती सहभाग घेवू शकते. त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा व किमान पात्रता आवश्यक नाही. या प्रशिक्षणासाठी निवासी 11 हजार 505, अनिवासी 9 हजार 735 तसेच महिलांसाठी 8 हजार 638 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशिक्षणाचे ठिकाण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे 411037 https://maps.app.९००.९I/3i3jty+B+op989wv8 समन्वयक शैलेंद्र जाधव- ९४०३७६१२६७ विराज पाटील ८७८८८७३७५३ दूरध्वनी (०२०) २४५२८१००/२०० पणन टोल फ्री क्र.१८००२३३०२४४ ई-मेल hetc@msamb.com, export@msamb.com,संकेतस्थळ www.msamb.com वर संपर्क करावा. 0000

राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा शनिवारी

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.): क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे होणाऱ्या या स्पर्धा 19 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी आहेत. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस, तहसीलदार अरुण उंडे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर आणि यशवंतराव भोसले एज्युकेशन ट्रस्टचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत- भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 0000

'चल जाणूया नदीला' अभियानांतर्गत तांत्रिक अहवाल तयार करा - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.): 'चल जाणूया नदीला' अभियानांतर्गत जिल्ह्यातील केडशी नदीचा समावेश झालेला आहे. या नदी बाबत संबंधित विभागाच्या मदतीने तांत्रिक अहवाल तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चल जाणूया नदीला या अभियानाची आज बैठक झाली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी संगणकीय सादरीकरण केले. अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनीही कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्‍मी म्‍हणाल्‍या, केडशी नदीच्या काठावर असणाऱ्या मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल नेतर्डे या सहा गावांमधील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश करून उपसमिती तयार करा. संबंधित विभागांच्या मदतीने अहवाल तयार करा, त्याबाबत चर्चासत्र व आवश्यक कामांचे नियोजन करा. याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एस दिवेकर, उपविभागीय जल संधारण अधिकारी भूषण नार्वेकर, छोटे पाटबंधारे क...

‘मंडणगड पॅटर्न’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.): जिल्हा जात प्रमाणपत्र समिती मार्फत ‘मंडणगड पॅटर्न’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर कासार्डे कॉलेज कासार्डे येथे 20 डिसेंबर रोजी संपन्न झाले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी दिली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मूळ गावी जात प्रमाणपत्र प्राप्त करुन त्या जिल्ह्याच्या समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा. आपल्या जात प्रमाणपत्रावरिल नोंदी योग्य आहेत काय याची खात्री करावी. प्रवेश प्रक्रियेच्या 5 महिन्या पुर्वी अर्ज सादर करावा. मानीव दिनांकापुर्वीचा जात नोंद असणारा सर्वात जुना पूरावा हा महत्वाचा आहे. मूळ कागदपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वत: बदल करु नये. महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी असल्यास त्याला महाराष्ट्र राज्यातील लाभ मिळतील. न्यु ऑनलाईन प्रणालीमध्ये सर्व मुळ कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर 30 ...

सागरी मत्स्यव्यवसाय नौका नयनशास्त्र, डिझेल इंजिन देखभाल, परिचलण प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत - मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के सुर्वे

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का):- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय नौका नयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षणाचे 81 वे सत्र दिनांक 1 जानेवारी 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग,मालवण येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रांसाठी जिल्ह्यातील मच्छिमार युवकांकडून दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के सुर्वे यांनी दिली आहे. 81 व्या प्रशिक्षण सत्राचा तपशील पुढील प्रमाणे :- प्रशिक्षण कालावधी : दिनांक 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 . आवश्यक पात्रता : उमेदवारांचे वय 18 ते 35 असावे.(आधार कार्ड व रेशन कार्डची छायाप्रत जोडणे). उमेवार किमान चौथी पास असणे आवश्यक (शाळा सोडल्याचा दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक). क्रियाशील मच्छिमार असावा. (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी). उमेदवारास पोहता येणे आवश्यक. प्रशिक्षण शुल्क:- सहा महिन्याचे रु 2700/- मात्र. दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. 600/- मात्र (...

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी प्रवेशिका 31 जानेवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्...

स्टँड अप इंडिया योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता 15 टक्के मार्जिन मनी या योजनेसाठी पात्र लाभार्थीनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. जिल्हयातील अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर ,बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यांनतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येतील. केंद्र शासनाने सन -2015 मध्ये स्टँड अप इंडिया हि योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत सिडबीने रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्याना जे कर्ज दिले जाते,त्याला सिडबी हमी देईल. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थींनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावयाची आहे. सन- 2022-23 या वर्षात जिल्हयाकरिता एकुण 05 पाच उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. योजनेचा लाभ घेण्याक...

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल पहावयास उपलब्ध - मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- जिल्हा परिषदेचा सन 2021-22 चा वार्षिक प्रशासन अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासकीय आदेश क्र.114 दिनांक 14.10.2022 ने मंजूर केला आहे. सदर अहवाल जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात, कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध होणार, असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. 0000

वेतन पडताळणी पथक 26 ते 30 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी वेतन पथक दिनांक 26 ते 30 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती कोकण विभागाचे लेखा अधिकारी सुधीर समुद्रे यांनी दिली. कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यास्तरीय शासकीय कार्यालयतील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकांची महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 नुसार सातव्य वेतन आयोगाची पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथकाचा दौरा जिल्ह्याच्या कोषागार कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. 0000

'आपदा मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाचे कुडाळमध्ये उद्घाटन आपतकालीन परिस्थितीत अचूक निर्णयक्षमता महत्वाची -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.) : आपतकालीन प्रतिकूल परिस्थितीमध्ये जलद योग्य प्रतिसाद देण्याच्या दृष्टीकोनातून अचूक निर्णयक्षमता अत्यंत महत्वाची असते. सामाजिक बांधिलकी म्हणून सदैव उपयुक्त असणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी तयार रहा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत आयोजीत कुडाळ येथील आर.एस.एन हॉटेलच्या सभागृहात 'आपदा मित्र ' प्रशिक्षण कार्यक्रम 2022-23चे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, कोकणपट्टा हा आपत्ती पट्टा म्हणून ओळखला जातो. निसर्ग, तौक्ते यासारखी चक्री वादळे,दरडी कोसळणे,महापूर अशा आपत्तींना तोंड द्यावे लागले.वादळांसारख्या व अतिवृष्टींची पूर्वसूचना मिळत असल्याने पूर्वतयारी करुन जिवीत हानी टाळता येवू शकते. परंतु अचानक उद्भवणाऱ्या आपत्तींमध्ये अचूक निर्णय क्षमता असावी लागते. जलद प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्ष...

प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. दि. 16 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आलेली होती. 0000

‘मंडणगड पॅटर्न’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.): जिल्हा जात प्रमाणपत्र समिती मार्फत ‘मंडणगड पॅटर्न’ या उपक्रमांतर्गत ‘सहज सुलभ’ जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीर कणकवली कॉलेज कणकवली येथे 15 डिसेंबर रोजी संपन्न झाले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी दिली. 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकीय,अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, फार्मसी अशा उच्च व्यावसायिक अभ्यास क्रमास प्रवेश घेतात. प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांना जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करणे, प्रमाणपत्र देणे इ. प्रक्रिया करण्यासाठी समितीला पुरेसा वेळ आवश्यक असतो. 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास व प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये. हा हेतू लक्षात घेवून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्गमार्फत सहज,सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी हा मार्गदर्शन पर उपक्रम कणकवली कॉलेज कणकवली येथे राबविण्यात आला. समिती मार्फत ‘मडणगड पॅटन’ या उ...

'आपदा मित्र' पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का.): राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने उद्या सोमवार दि. 19 डिसेंबर रोजी कुडाळ येथील आर एस एन हॉटेल येथे 'आपदा मित्र' प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. 19 ते 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात 200 स्वयंसेवकांना 'आपदा मित्र' चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पैकी 100 जणांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण उद्यापासून सुरु होणार आहे. 0000

विभागस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत सांगलीची जिया महात प्रथम तर दिशा पाटील व्दितीय

Image
सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.): विभागस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात सांगलीची जिया महात प्रथम तर कोल्हापूरची दिशा पाटील हिने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयातून एकुण 212 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा पार पडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी दिपक वायचळ, शार्दुल तपासे, चिंतामणी लिमये, स्वानंद चोथे, श्रीकृष्ण आडेलकर इत्यादी पंचांच्या सहकार्याने विभागस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या. बुद्धीबळ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - 14 वर्षाखालील मुली प्रथम- जिया महात सांगली, व्दितीय- दिशा पाटील कोल्हापूर, तृतीय- महिमा शिर्के कोल्हापूर, चतुर्थ- अरिना मोदी कोल्हापूर, पाचवा- सई प्रभुदेसाई रत्नागिरी. 14 वर्षाखालील मुले प्रथम- विक्रमादित्य चव्हाण सांगली, व्दितीय- ईशान कुलकर्णी सांगली, तृतीय- मानस महाडेश्वर कोल्हापूर, चतुर्थ- व्यकटेश खांडेपाटील कोल्हापूर, पाचवा- अथर्व तावरे कोल्हापूर. 17 वर्षाखा...

जिल्ह्यास्तरीय लोकशाही दिन रद्द

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.): माहे डिसेंबर 2022 चा जिल्ह्यास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.19 डिसेंबर 2022 रोजी होता. परंतु, सद्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक 2022 आचारसंहिता असल्याने माहे डिसेंबर 2022 चा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन रद्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. 0000

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जानेवारी ते जून शिबीरे

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.): उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जानेवार ते जून 2023 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली. जिल्ह्यातील शिबीरे कार्यालयाचे माहे जानेवारी ते जून 2023 या कालावधीकरिता वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. माहे जानेवारी 2023 मध्ये देवगड 2, कणकवली-3, मालवण -10, वेगुर्लां-11, सावंतवाडी-17, दोडामार्ग-18. माहे फेब्रुवारी 2023 मध्ये देवगड-6, कणकवली-7, मालवण- 14, वेगुर्लां-15, सावंतवाडी-21, दोडामार्ग-22. माहे मार्च 2023 मध्ये देवगड-6, कणकवली-8, मालवण- 14, वेगुर्लां-15, सावंतवाडी-21, दोडामार्ग- 23. माहे एप्रिल 2023 मध्ये देवगड-3, कणकवली-5, मालवण- 11, वेगुर्लां-12, सावंतवाडी-18, दोडामार्ग- 19. माहे मे 2023 मध्ये देवगड-2, कणकवली-3, मालवण- 9, वेगुर्लां-10, सावंतवाडी-15, दोडामार्ग- 16. माहे जुन 2023 मध्ये देवगड-5, कणकवली-6, मालवण- 13, वेगुर्लां-14, सावंतवाडी-20 दोडामार्ग- 21 होतील. या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अध...

भारतीय शेती व हवामान बदल विषयावर २१,२२ डिसेंबरला दोडामार्गात राष्ट्रीय चर्चासत्र

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.): आय सी एस एस आर मुंबई व लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ व २२ डिसेंबर रोजी 'भारतीय शेती व हवामान बदल' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी दिली. महाविद्यालयात होणाऱ्या या चर्चासत्राला २१ डिसेंबर रोजी सकाळी १०-३० वा सुरुवात होणार आहे. दोन दिवसीय होणाऱ्या या राष्ट्रीय चर्चासत्राला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी या चर्चासत्राला उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. 0000

मतदानासाठी दोन तासांची सवलत - उपजिल्‍हाधिकारी रवींद्र मठपती

सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.): मतदारांना मतदानाच्‍या दिवशी मतदान करण्‍यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्‍याबाबतचे परिपत्रक शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाने 15 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द केले आहे. अशी माहिती सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी दिली. या शासन परिपत्रकात म्हटले आहे, आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये 100 टक्के मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 (भाग-2) मधील नियम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येत किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था, आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते,जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे ...

‘पेन्शनर्स डे’ 16 डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.): जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे सर्व निवृत्तीवेतन धारकांना वेळेत व उत्तम दर्जाची सेवा देण्यात अग्रणी आहे. 17 डिसेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी व निवडणुक कर्तव्यात कोषागारातील बहुतांशी कर्मचारी व्यस्त असल्याने या वर्षी शुक्रवार 16 डिसेंबर रोजी ‘पेन्शनर्स डे’ आयाजित करण्यात आला आहे. जिल्हा कोषागार कार्यालय येथे यानिमित्ताने शुभेच्छा फलक, रांगोळी, निवृत्तीवेतन धारक यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच निवृत्ती वेतन बाबत काही अडचणी असल्यास त्याबाबत चर्चा आदी उपमक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी दिली. 0000

मतदान व मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार - अपर जिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.): जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी व दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हयातील खाली नमुद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करणेत येत आहेत. तसेच सदर दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार वरील दिवस बदलून अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात येत आहे. दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्‍यात येणाऱ्या तालुकानिहाय गावांची नावे पुढीलप्रमाणे मालवण- चौके, कणकवली - नांदगाव,कनेडी. देवगड - मोंड, दाभोळे.- वैभववाडी- उंबर्डे. वेंगुर्ला - शिरोडा, म्हापण, कोचरा.कुडाळ- ओरोस बुद्रुक, नेरुर तर्फे हवेली. सावंतवाडी- दाणोली बाजार,तसेच मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर रोजी सावंतवाडी शहर आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती अपर जिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिनांक 9 नोव्हेबर 2022 रोजी जाहीर झालेला असून रविवार दिनाक 18 डि...

क्रीडा स्पर्धा व साहित्य मागणीसाठी युवक मंडळांनी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.): केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या जिल्ह्यातील युवक मंडळानी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व जिल्हा स्तरीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्यास इच्छुक असतील तर कार्यालयाशी संपर्क करावा. क्रीडा स्पर्धा व क्रीडा साहित्यासाठी इच्छुक युवा मंडळानी नेहरू युवा केंद्राच्या, कार्यालयात अर्ज भरून द्यावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी केले आहे. या स्पर्धेमध्ये 5 क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. यामध्ये 3 वैयक्तिक स्पर्धा 2 ग्रुप स्पर्धाचे आयोजन करणे आवश्यक आहे. ग्रुप स्पर्धेमध्ये फुटबॉल, कबड्डी, हॉकी, हैंडबॉल, बास्केट बॉल, खो खो, हॉलीबॉल, टग ऑफ वार यापैकी 2 क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये अॅथ्लेटीक्स, रेसलिंग, आर्चरी, स्विमिंग, जीमन्यास्टिक, टेबल टेनिस, सायकलिंग, वेट लिफ्टिंग, ताक्वनदो, बॉक्सींग, जुदो, बॅडमिंटन इ. यापैकी 3 क्रीडा प्रकाराचे आयोजन करायचे आहे. एका स्थानिक क्रीडा प्रकाराचे आयोजन करू शकता. नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळाना मोफत क्रीडा साहित्य वित...

विभागस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोक यांच्या सहकार्याने आयोजित दिनांक 15 ते 16 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या विभागस्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन लेखाधिकारी प्रमोद चिंदरकर,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन अध्यक्ष चिंतामणी लिमये, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पुष्पलता मंगल, मामाचो गाव रिसॉर्ट हिर्लोकचे संचालक आनंद सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस आदी उपस्थित होते. विभागस्तरीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयांतून एकूण 212 खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धा पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धीबळ असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी दिपक वायचळ, शार्दुल तपासे, चिंताम...

14 वर्षाखाली थ्रोबॉल स्पर्धेत सांगली प्रथम

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल 14, वर्षाखालील मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेत सांगली प्रथम, सांगली मनपा व्दितीय तर कोल्हापूरने तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, इचलकरंजी मनपा, सांगली मनपा, कोल्हापूर मनपा या जिल्हयातून एकुण 576 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनचे पंच व तांत्रिक अधिकारी अजय शिंदे, सुनिल भाटिवडेकर, पंकज राणे, सचिन पाताडे, सोमनाथ गोधळी, कदम इत्यादी पंचांच्या सहकार्याने थ्रोबॉल स्पर्धा पार पाडण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुली, प्रथम सांगली, व्दितीय- सांगली मनपा, तृतीय- कोल्हापूर, 14 वर्षाखालील मुले प्रथम- सांगली, व्दितीय- सांगली मनपा, तृतीय- कोल्हापू. 17 वर्षाखालील मुली प्रथम- कोल्हापूर, व्दितीय -सांगली मनपा, तृतीय- सांगली. 17 वर्षाखाली मुले प्रथम- सांगली व्दितीय- सांगली मनपा, तृतीय- रत्नागिरी. 19 वर्षाखालील मुली प्रथम- सांगली मनपा, व्दितीय -कोल्हापूर, तृतीय- सांगली. 19 वर्षाखीलील मुले प्रथम -सांगली, ...

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.): पशुसंवर्धन खात्यांतर्गत नाविण्यपुर्ण व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत 11 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज https//ah.mahabms.com या संकेस्थळावर किंवा Google play स्टोरवरील मोबाईल ॲपवर स्विकारण्यात येणार आहेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी 1962 किंवा 18002330418 टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, तरी पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकां...

क्रीडा सुविधांचा लाभ घेवून व्यक्तीमत्वाचा विकास साधावा क्रीडा उपसंचालक - संजय सबनीस

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.): शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या क्रीडा सुविधांचा जास्तीत लाभ घेवून आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास साधावा असे प्रतिपादन कोल्हापुर विभागाचे क्रीडा व युवा उपसंचालक, संजय सबनीस यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत करण्यात आलेले होते. स्पर्धेच्या उदघाटनाच्या कार्यक्रमास भारतीय वेटलिफ्टींग असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने,अनिल माऊली, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टींग असो. संजय मिसाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह खेळाडू, पंच, प्रशिक्षक आदी उपस्थित होते. देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कै. पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, यांनी केले तर अध्यक्षीय समारोप संजय मिसाळ यांनी...

विभागीय थ्रो बॉल स्पर्धांना सुरुवात

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आजपासून येथील क्रीडा संकुलात विभागीय थ्रो बॉल स्पर्धांना सुरुवात झाली. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नाणेफेक करुन स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील विद्यार्थी- विद्यार्थीनी खेळाडूंच्या यास्पर्धा होत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तालूका क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन करुन सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते,कोल्हापूर थ्रो बॉल संघटनेचे अध्यक्ष दशरथ माने, महाराष्ट्र थ्रो बॉल संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कदम, सहसचिव सुरेश हादीमनी, सिंधुदुर्ग थ्रो बॉल संघटनेचे सचिव सुनिल भाटीवडेकर, कोल्हापूर थ्रो बॉलचे संचालक भरत कुंभार, थ्रो बॉल संघटनेचे अध्यक्ष अजय शिंदे उपस्थित होते. 00000

बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता नोंदणी व नूतनीकरण करुन घ्यावे. याबाबातीत आपली फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार रहाणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्ती विरुध्द नजिकच्या पोलीस ठाण्यामध्ये परस्पर तक्रार नोंदवावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी स.ध. कोल्हाळ यांनी केले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या असंघटित कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी , सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत केले जाते. या कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. संबंधीत कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक 1 रु. व नूतीनकरणसाठी वार्षीक 1 रु. शुल्क आकारण्यात येत असून त्याची रितसर पावतीही देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. 0000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.१२ (जि.मा.का.) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन (मॅन्यूअल) पध्दतीने अर्ज मागविणेत येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढालीप्रमाणे आहेत. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा, विद्यार्थी जिल्हा ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी परिसरातील असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास टक्यापेक्षा जास्त गुण असावेत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मर्यादा 40 टक्के इतकी राहील. जिल्ह्यानिहाय अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रम...

शासकीय धान (भात) खरेदी विक्रीसाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.१२(जि.मा.का.) : खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीकरिता दिनांक 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने शेतकरी नोंदणी करिता जिल्ह्यात एकूण 41 ठिकाणी धान खरेदी केंद्रावरती शेतकरी नोंदणी सुरु आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए. एस. देसाई यांनी दिली. सावंतवाडी तालुका- खरेदी विक्री- संघामार्फत कोलगाव,सावंतवाडी,मळगाव,मळेवाड,डेगवे तळवडे, भेडशी, इंन्सुली, मडुरा. कुडाळ तालुका- खरेदी- विक्री संघामार्फत कुडाळ, पिंगुळी, माणगाव, कडावल, आंब्रड,घोडगे, गोठोस, कसाल, वेताळबांबार्डे, पणदूर, तुळस, निरुखे,निवजे,फोंडा, मालवण तालुका- खेरदी विक्री संघामार्फत पेंडूर, गोठणे, मालवण, विरण, वेंगुर्ला तालुका- खरेदी विक्री संघमार्फत वेंगुर्ला व होडावडा. देवगड तालुका- खरेदी विक्री संघामार्फत देवगड, पडेल, पाटगाव. वैभववाडी तालुका- खरेदी विक्र संघामार्फत वैभववाडी आणि करुळ .कणकवली तालुका- खरेदी विक्री संघामार्फत कणकवली, लोरे नं.1, घोणसरी, सांगवे. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघ लि. मार्फत...

समृद्धी महामार्गाचे अनावरण शिर्डी येथून लाईव्ह प्रेक्षपण

Image

फ्रीडम पार्क खापरी मेट्रो प्रवास आणि नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस

Image

नागपूर मेट्रो लोकार्पण आणि समृद्धी महामार्ग अनावरण

Image

आज अखेर 56 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 - जिल्हा शल्य चिकित्सक

Image

11.12.202 News paper Catting शरीर स्वस्थासाठी व्यायाम व खेळ महत्त्वाचा

Image