जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता उमेदवारांनी सहभागी व्हावे प्र. सहायक आयुक्त, ग. प्र. बिटोडे
सिंधुदुर्गनगरी दि.16 (जि.मा.का):- जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC- National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक स्पर्धा २०२४ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, २००२ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच काही सेक्टरसाठी उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. जिल्हयात कार्यरत असलेल्या ITIs, Polytechnics, MSME Tools Rooms, CIPET, Engineering College, IHM / Hospitality Institutes, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Institute of Jewellery Making Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील, तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग. प्र. बिटोडे, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी ४६ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ सेक्टरमधून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट असून सदर स्पर्धा १५ देशात १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे. अधिक माहितीसाठी लिंक पुढीलप्रमाणे आहे. - To know more about WorldSkills: https://worldskills.org/skills/To know more about WorldSkills India: https://www.worldskillsindia.co.in/ To download" Technical Description" https://www.worldskillsindia.co.in/downloads.php Skill https://www.instagram.com/worldskillsindia/
Join hands at our social media channels: https://www.youtube.com/@indiaskills११६६ https://twitter.com/WorldSkillsind :https://www.facebook.com/IndiaSkills
०००००
Comments
Post a Comment