Posts

Showing posts from July, 2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

मुंबई, दि. 31 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये 2,738 रूग्णांना तब्बल 25 कोटी 86 लाख 37 हजार रूपयांची मदत दिली गेली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. 20 गंभीर आजारांसाठी मदत - कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्षे 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी,...

1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे तर 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीसेस पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे इ. कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आणि वसुलीचे उद्दिष्‍ट पार करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याकरीता तसेच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दरवर्षीप्रमाणे १ ऑगस्ट "महसूल दिन" म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. यावर्षी महसूल दिनापासून म्हणजेच दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभरात "महसूल सप्ताह-२०२५" साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्‍त झालेल्‍या आहेत. त्‍याअनुषंगाने महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्‍य लाभ देण्‍याकरीता तसेच नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्‍या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व सर्व ...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का.) : ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे दि.4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

जलजीवन मिशन कार्यक्रम आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.31 (जि.मा.का.) : जलजीवन मिशन अंतर्गत अपुर्ण कामे व प्रलंबित देयकांच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस उप अभियंता, उपविभागाचे क्षेत्रीय अभियंता,PMC टीम लीडर, PMCचे सर्व क्षेत्रीय अभियंता व TPI चे टीम लीडर, TPI चे क्षेत्रीय अभियंता व जिल्ह्यातील जल जीवन मिशन कामांचे मक्तेदार उपस्थित होते. या सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कंत्राटदार यांच्या अडचणी समजून घेवून त्या दूर करण्याचे निर्देश सर्व कार्यालयीन यंत्रणाना दिले. जलजीवन मिशनची कामे पुर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी पुर्तता करणे आवश्यक आहे. त्या तातडीने कराव्यात, ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. जलजीवन मिशन योजनेचा शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर शासन निर्देशानूसार पैसे वितरीत करण्यात येतील आपल्या जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळणे आवश्यक असल्याने सर्व यंत्रणानी कार्यवाही करावी. मक्तेदाराला त्यांच्या कामामध्ये सहकार्य करणे आवश्यक आहे. क...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न्न झाली. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, वैध मापन विभागाचे मिलींद पावसकर, कृषी उपसंचालक कार्यालयाचे ज्ञानेश्वर बडे, परिवहन विभागाचे अमित नायकवडी आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अशासकीय सदस्य दिवंगत सीताराम कुरतडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. बैठकीमध्ये अशासकीय सदस्यांनी रस्त्यावरील झाडे पावसाळ्यात तोडली जातात परंतु तोडलेल्या फांद्या तशाच लोंबकळत ठेवतात अशी तक्रार केली. यावर सदस्य सचिवांनी झाडे तोडण्यासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील फांद्या बाजूला करुन मार्ग मोकळा करण्याबाबत आदेशित करावे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले. तसेच पेट्रोल पंपावरील शौचालयांमध्ये स्वच्छता ठेवावी, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, दूरसंचार सेवामध्ये सुधारणा करावी, ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन द...

सिंधुदुर्ग विभागातील प्रधान डाकघर आणि शाखा डाकघरांमधील 2 ऑगस्ट रोजी व्यवहार बंद

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- डाक विभागाने पुढील पिढीच्या एपीटी ॲप्लिकेशनच्या अमंलबजावणीची घोषणा करताना अभिमान वाटतो जे डिजिटल प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या परिवर्तनात्मक उपक्रमांतर्गत ही सुधारित प्रणाली सिंधुदुर्ग विभागातील प्रधान डाकघर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपडाकघरांमध्ये तसेच शाखा डाकघरांमध्ये 4 ऑगस्ट 2025 रोजी लागू करण्यात येणार आहे. या प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत आणि सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी 2 ऑगस्ट 2025 रोजी सर्व डाकघरामधील व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे. या दिवशी कोणतेही पोस्टल व्यवहार पोस्ट ऑफिसमध्ये होणार नाहीत. ही तात्पुरती सेवा स्थगिती डेटा स्थलांतर, प्रणाली पडताळणी आणि संरचना प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. जेणेकरुन नवीन प्रणाली सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु करता येईल. एपीटी ॲप्लिकेशनचा उद्देश सुधारित वापरकर्ता अनुभव,जलद सेवा वितरण आणि अधिक ग्राहक-स्नेही इंटरफेस करणे आहे. जो अधिक स्मार्ट, कार्यक्षम आणि भविष्यातील डाकसेवा देण्याच्या आमच्या कटिबध...

केंद्र शासनाची मोफत कोचिंग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या वतीने डीएनटी, एनटी व एसएनटी समुदायातील विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग SEED योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.buddy4study.com/application/FCDNT2/instruction या लिंकवर ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत नोंदणी करण्याचे, आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :- डीएनटी, एनटी व एसएनटी विर्द्यांसाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वाषिक उत्पन्न ८ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थी राज्य सकरकार व केंद्र सरकार च्या कोणत्याही कोचिंग योजनेचा लाभ घेत नसावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थांनी mosje@buddy4study,com या ईमेलवर किंवा 080-474-95118 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. 0000

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा शासन निर्णय खोटा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :-"मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण (CM YKPY)" या योजनेचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्षे इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाजमाध्यमातून प्रसारीत होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. समाज माध्यमांवर प्रसारीत होणारा शासन निर्णय निखालस खोटा असून प्रशिक्षणार्थ्यांच्या तसेच सर्व सामान्य जनतेच्या फसवणुकीचा तसेच दिशाभुल करण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्षे करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नसल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.इ. तडवी यांनी दिली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या कामाचे प्रशिण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता दि. 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्यवे "मुख्यमंत्री युवा काय्रप्रशिक्षण योजना (CM YKPY)"कार्यान्वित करण्यात आली आहे. दि. 10 व 11 मार्च 2025 च्या शासन निर्णयान्वये सदर योजनेचा 6 महिने असणारा कालावधी वाढवून एकूण 11 महिने करण्यात आलेला आहे. तरी या अनुषंगाने संबंधित प्रशिक्षणा...

शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा 2025 अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार इ.3 री ते 10 वी (वयोगट 08 ते 14 वर्षे)साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा-2025 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. या मसुद्यावर जनेतेच्या सूचना व अभिप्राय मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य आर.व्ही कांबळे यांनी दिली आहे. या मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. 28 जुलै पासून सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येत आहे. या शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा 2025 बाबत आपले अभिप्राय दि. 27 ऑगस्ट 2025 पर्यंत https://forms.gle/2rgGA37iYKfJUYKS6 लिंकमध्ये ऑनलाईन नोंदविण्यात यावे, असे आवाहन सर्व शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी, संघटना व समस्त समाज घटकांना करण्यात येत आहे. अभिप्राय नोंदविताना अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण असाव्यात ज्यामध्ये विषय, इयत्ता, स्तर, संबंधित पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील मजकूर, अपेक्षित बदल, दुरुस्ती, बदलाचे कारण, सुधारित म...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क योजनांबाबत प्राचार्यांची ऑनलाईन बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 28 (जिमाका) :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेची मुंबई विभाग समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, अध्यक्षतेखाली व समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची ऑनलाईन (V.C.) व्दारे बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रादेशिक उपायुक्त सोळंकी यांनी सन 2024-25 मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील 100 टक्के विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रलंबित अर्ज दि. 29 जुलै 2025 पर्यंत निकाली काढण्याचे निर्देश संबंधित महाविद्यालयांना दिले. त्याचबरोबर, महाविद्यालयातील प्रवेशित अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूली करु नये, तसेच शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त झालेली नाही या कारणावस्तव कोणत्याही प्रकारची अनुसुचित जाती विद्यार्थ्यांची कागदपत्रे महाविद्यालयांनी अडवू नयेत, विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक व राजकीय संघटना यांची तक्रारी आढळून आल्यास याबाबत महाविद्यालयास जबाबदार ठरविण्यात येऊन संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार फौजदारी स्...

"मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र" विशेष मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात

सिंधुदुर्गनगरी दिनांक 28 (जिमाका) :- राज्यामध्ये २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्व जिल्ह्यामध्ये "मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र" या विशेष मोहिमेची सुरुवात झाली असून जिल्ह्यात २२ जुलै २०२५ रोजी जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्याम पाटील तसेच नेत्रशल्य चिकित्सक डॉ. बी.एस.जोशी, डॉ.सुबोध इंगळे, डॉ. तुषार चिपळुणकर, अनिलकुमार देसाई आदी उपिस्थित होते. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील मोतिबिंदू रुग्णांवर, मोफत उपचार केले जाणार आहेत. या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट मोतिबिंदुच्या रुग्णांचे वेळीच निदान करणे, रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणे, अंधत्व रोखणे, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सेवा पोहचिणे आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जिल्ह्यातील मोतिबिंदुग्रस्त रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन नेत्रचिकित्या अधिकाऱ्यांकडून नेत्रतपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे. ००००

वंचित घटकांना न्याय देणे हे सर्वांचे कर्तव्य -पालकमंत्री नितेश राणे

· वंचित घटकांसाठी जनता दरबाराचे आयोजन · प्राप्त तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश · नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना घटनात्मक अधिकार मिळाले आहेत. सामान्य माणसाला मिळालेले अधिकार आबादित राहिले पाहिजे. आज लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी ,अधिकारी म्हणून जी खुर्ची किंवा अधिकार आपल्याला प्राप्त झाले आहेत ते वंचित घटकांच्या, जनतेच्या सेवेसाठी, त्यांचे भविष्य घडविण्यासाठी आहेत. समाजातील वंचित घटकांच्या अडीअडचणी दूर करुन त्यांना न्याय मिळवून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात 'वंचित घटकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या जनता दरबारात २०० पेक...

पालकमंत्री नितेश राणे रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे रविवार 27 जुलै 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.27 जुलै 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता मोटारीने मिरकरवाडा बंदर, रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता "केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनेअंतर्गत मिरकरवाडा मासेमारी बंदराचा विकास करणे" या कामाच्या भूमिपूजन समारंभास मा.पालकमंत्री, रत्नागिरी यांच्या समवेत उपस्थिती, (स्थळ:- मिरकरवाडा बंदर, रत्नागिरी). सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कणकवली जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ:- भगवती मंगल कार्यालय, कणकवली ) दुपारी 1 वाजता मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता चिपी विमानतळावर आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण. ००००००

ालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

प सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 26 जुलै 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.26 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जागतिक जलतरण क्रीडा स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल कु. पूर्वा रश्मी संदिप गावडे हिच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ:- पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी) दुपारी 2 वाजता अनुसूचित जातीसाठी आयोजित "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्यास उपिस्थिती. (स्थळ:- जिल्हा नियोजन सभागृह सिंधुदुर्गनगरी). सायं.6 वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. ०००००

रास्तभाव धान्य दुकान परवाना मंजुरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या परिपत्रका अन्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खाली नमूद गावांसाठी केवळ रास्तभाव धान्य दुकान परवाने मंजुरीसाठी दिनांक १ जुलै २०२५ रोजी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जाहीरनाम्यानुसार दर्शविलेल्या प्राथम्यक्रमानुसार त्या गावातील, क्षेत्रातील पंचायत, बचत गट, सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलै २०२५ पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे. या जाहीरनाम्यानुसार, सावंतवाडी, कुडाळ, मालवण व देवगड या तालुक्यातील काही गावांमध्ये नव्याने रास्तभाव धान्य दुकाने परवाना मंजूर करण्यात येणार आहेत. सावंतवाडी तालुक्यात केसरी, सावंतवाडी ई वॉर्ड, सावंतवाडी ई १ वॉर्ड, कोंडुरा, तर कुडाळ तालुक्यात कविलगांव, रुमडगांव, कुडाळ नं.१, तसेच मालवण तालुक्यात बांदीवडे, आबेरी, गोठणे, खरारे, ओवळीये, खोटले, तारकर्ली, आणि देवगड तालुक्यात विरवाडी, वाडातर, पाटगांव, पेंढरी, नाद,...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २५ (जिमाका) :- जिल्ह्यातील वंचित घटकाच्या समस्या तात्काळ सोडविणे, प्रशासनात पारदर्शकता व गतीमानता आणणे तसेच प्रशासकीय यंत्रणांचे बळकटीकरण करुन जनता व प्रशासनामध्ये समन्वय साधण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार २६ जुलै रोजी दुपारी २ ते सायं.६ वाजता जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्यास संबंधित सर्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात वंचित घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याने नागरिकांनी आपले प्रश्न, निवेदने, तक्रार अर्ज घेऊन या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ००००

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात भाग घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ३० जुलै पर्यंत संबंधित कृषि अधिकरी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. यामध्ये महिला शेतकरी -१, केंद्र राज्य कृषि पुरस्कार प्राप्त पिक स्पर्धा विजेते शेतकरी -१ व इतर शेतकरी -३ असे एकूण ५ शेकऱ्याचा समावेश असले इच्छकांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. दौऱ्यासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे असावे, तो स्वत:च्या नावे जमीनधारक असावा. उत्पन्नाचे प्रमुख साधन शेतीचे असावे, तसेच चालू सहा महिन्यांचा ७/१२ उतारा, आधार कार्ड, रेशनकार्ड डॉक्टरकडून दिलेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र व वैध पासपोर्टची प्रत अर्जासोबत जोडावी. यापूर्वी शासनाच्या मदतीने दौरा केलेला नसावा. अर्ज व अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधि...

'सैनिक दरबार' संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरपिता, वीरमाता व अवलंबिताना यांच्या कुंटुंबावरील अन्याय, अत्याचारासंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी जाणुन घेवुन त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, हेमंत निकम, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, कार्यालयातील कर्मचारीवृंद, तसेच जिल्ह्यातील वीरमाता-पिता वीरनारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, माजी सैनिक विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सैनिक दरबाराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते पात्र माजी सैनिक पाल्यांना परदेश शिक्षण व व्यावसायिक शिक्षणासाठी कल्याणकारी निधीतुन धनादेशाचे वाटप करण्यात आले. यानंतर माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरपत्न...

जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट तर 24 जुलै रोजी रेड अलर्ट या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.२३ ते २५ जुलै २०२५ या दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर दि. २४ जुलै २०२५ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला असून दि. २६ ते २७ जुलै २०२५ रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी कळविले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४)विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. (६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून...

वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २३ (जिमाका) :- राज्य शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत तसेच नव्याने स्थापन झालेल्या राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (रामोशी समाजासाठी) व पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (वडार समाजासाठी) यांच्या मार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पोपट गिते यांनी दिली. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु. १ लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित फरतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज नाही) व २५ टक्के बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु १५ लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १० लक्ष ते ५० लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. सन २०२५-२६ या वित्तीय वर्षाकरिता विविध कर्ज योजनांचे जिल्हा कार्यालय उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजना (भौति...

विकसित महाराष्ट्र 2047 उपक्रमांतर्गत क्रीडा धोरणासाठी नागरिकांनी सूचना करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का):- "विकसित महाराष्ट्र 2047' या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत क्रीडा क्षेत्रातील नागरिकांचे मौल्यवान मत व सूचना जाणून घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत विशेष प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. ही प्रश्नावली Google Form द्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व स्तरांतील नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक, तसेच क्रीडाप्रेमींनी सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सूचनांवर आधारित पुढील क्रीडा धोरण तयार करण्यात येणार आहे व राज्याच्या क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. Google Form लिंक: https://forms.gle/d9fcxXWje8AphqpX9 या लिंकमध्ये नागरिकांचे मत नमूद करण्याचे सुचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राशी संबंधित नागरीक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा अभ्यासक तसेच क्रीडाप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होवून आपले अमुल्य मत नोंदवावे, असे आवाहन...

पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

• दुरूस्तीसाठी महावितरण विभागाला निधी देणार • तात्काळ खड्डे बुजवा • मोबाईल सेवेला प्राधान्य द्या • बस फेऱ्या वाढवून प्रवाशांना सुविधा द्या सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- गणेशोत्सव काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. सणासुदीच्या दिवसांत वीजपुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्या. बीएसएनएल विभागाने कव्हरेज संदर्भात कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. या दिवसांत बाहेर जिल्ह्यातून बसने येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक राहणार असल्याने परीवहन विभागाने तसे नियोजन करावे. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची सर्व यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबु...

पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी दि 21 (जिमाका) :- भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना व हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अतुल झनकर, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे विनायक पाटील, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे उपस्थित होते. या बैठकीत सुपारी या पिकाचा विमा शेतकऱ्यांना काढता यावा यासाठीचा प्रस्ताव, हवामान आधारित फळ पिक विमा योजना यामध्ये विविध निकष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुधारित करून त्याचा प्रस्ताव, तसेच आंबा तसेच काजू लागवड शेतकऱ्यांचे पोट खराब क्षेत्र पिक विमामध्ये समाविष्ट करणे, ई प...

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोयजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग व कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दि. 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री.येरमे यांनी केले आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त करुन देण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामांकित उद्योजक, इंडस्ट्रिजना या रोजगार मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरी उद्योजकांकडे Accountant, Marketing Executive, Manager ,Service Manager, Back Office, Carpenter, Front office Assistant, Electrician, Mechanic, Fittr, Welder, Ac Repair, Plumber, Receptionist, Advisor, Supervisor, Cook, Waiter अशी विविध 266 पदे उपलब्ध आहेत. उद्योजक, आस्थापना 22 जुलै...

जिल्ह्यात 21 ते 25 जुलैपर्यंत ऑरेज अलर्ट या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.२१ ते २५ जुलै २०२५ रोजी या दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असल्याचे माहिती प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी कळविले आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४)विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. (६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. (७) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. (८) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोब...

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य कारण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2024-25 साठी जिल्हा युवा पुरस्काराठी अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे. राज्याचे युवा धोरण 2012 मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे. यात युवक युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती, आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थान तसेच स्थानिक समस्या इ.बाबत पुरस्कार वर्षापसून गत तीन वर्षात केलेली कार्यकामगिरी या पुरस्कारांसा...

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे'साठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचे अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच दि. 20 जुलै पासून ते दि. 20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे. स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृती तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहीत वातावरण, गणेशभक्तास...

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025, ऑनलाईन स्व:नामांकनासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 वेब पोर्टलवर ऑनलाईन स्व:नामांकन प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत दि.23 जून ते 13 जुलै 2025 पर्यंत होती. मात्र दि.15 जुलै रोजीच्या व्ही.सी.मधील सूचनेनुसार, केंद्रशासनाच्या https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन स्व:नामांकनासाठी 17 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, नोंदणी केलेल्या अथवा अर्धवट भरलेले अर्ज पूर्ण करण्यासाठी 20 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करावे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कविता शिंपी यांनी दिली आहे. ०००००

बांधकाम विभागाची मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग समितीची मासिक सर्वसाधारण सभा दि. 17 जुलै 2025 रोजी दुपारी 1.15 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली, असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी दिली आहे. ०००००

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.): सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनीना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले दिली आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता- आठवी, आकरावी, आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक...

अपील प्रकरणांच्या निपटारासाठी 21 जुलैरोजी लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- भूमी अभिलेख विभाग कोकण प्रदेश, मुंबई यांच्यातर्फे अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी दिनांक 21 जुलै 20025 रोजी सकाळी 11 वाजता उपसंचालक, भूमि अभिलेख, कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयात लोक अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुजितकुमार जाधोर यांनी दिली आहे. या लोक अदालतेमध्ये विभागातील प्रलंबित अपिल प्रकरणांवर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय घेण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकत्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे,जेणेकरुन प्रकरणाचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल. लोक अदालतेफार्फत तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून, यामुळे वेळेची व संसाधनांची बचत होणार आहे. नागरिकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी उपसंचालक, भूमि अभिलेख कोकण विभाग, मुंबई यांच्या कार्यालयाशी अथवा व्हाट्सॲप नंबर 7710961838 वर केवळ व्हाट्सॲप संदेशान्वये संपर्क साधावा. ०००००

कार्यालयात उशिरा आलेल्या 68 कर्मचाऱ्यांना नोटीस

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवार दि. 14 जुलै 2025 रोजी सकाळी 9.45 वाजता अचानक भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी थेट कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकाची तपासणी केली. कार्यालयीन वेळ सुरु झाल्यानंतरही काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उशिरा कार्यालयात उपस्थित झालेल्या एकूण 68 कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या, असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) किशोर काळे यांनी दिली आहे. ०००००

‘विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे -जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- राज्य शासनाच्या 'विकसित महाराष्ट्र 2047' या दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी देखील https://wa.link/o93s9m या उपलब्ध करुन देण्यात लिंकवर अथवा दिलेल्या क्युआर कोडवर 17 जुलै 2025 पर्यंत आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपले योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. राज्य शासनाने 100 दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक 6 मे 2025 ते दिनांक 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत 150 दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये ‘विकसित महाराष्ट्र @2047’करिता 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे.‘विकसित महाराष्ट्र 2047 चे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @2047, मध्यमकालीन उद्दिष्टे महाराष्ट्र @75 व अल्पकालीन उद्दिष्टे @2029 ठरविण्यात आली आहेत. ‘विकसित महाराष्ट्र -2047’ च्या 'व्हिजन डॉक्युमेंट' चा मसुदा तयार करण्य...

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द 21 जुलैपर्यंत हरकती पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती, अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम 58 (1) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत राज्य शासन किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेला अधिकारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेश क्रमांक-साशा/डेस्क-1(4),जिपपंस / प्रापर,2025 दिनांक 14 जुलै 2025 च्या आदेशाच्या मसुद्याची प्रत (शासन राजपत्र,अनुसुची 5अ व 5ब) प्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील फलकावर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील फलकावर, तहसिलदार वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर तसेच पंचायत समिती वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग यांच्या कार्यालयातील फलकावर लावण्यात आली आहे. उक्त मसुदा राज्य शासन किंव...

जिल्ह्यातील साकवांची आणि रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करा - खासदार नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक १४ (जिमाका) :- पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांची डागडूजी व दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करा. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार श्री. राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. खासदार श्री. राणे म्हणाले की, पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत त्यामुळे जिल्ह्यतील सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्तीची गरज आहे. दुरूस्तीचे काम मानकानुसार (नॉर्म्स) होईल याची दक्षता घ्या. ...

खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण

सिंधुदुर्गनगरी दि 14 (जिमाका) :- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज बनली आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, जिल्हा परीषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग संयुक्त वृक्ष लागवड मोहिम राबवित आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आज खासदार नारायण राणे यांच्या हस्ते गरुड चौक ते जेल रोड रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी देखील वृक्ष लागवड केली. यावेळी विभागीय वन अधिकारी राजेंद्र मगदुम, कृषि विकास अधिकारी दिक्षांत कोळप आदी उपस्थित होते. ००००००

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 21 जुलै रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.14 (जि.मा.का): जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.21 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळाव या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा एक उत्तम मार्ग आहे. महिलांनी त्यांच्या अड...

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 स्पर्धेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होवून प्रतिसाद नोंदविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १४ (जिमाका) :- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जिल्हावासियांनी सहभाग घेऊन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण SSG 2025 हे ॲप प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करुन प्रतिसाद नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रसिध्दी प्रत्रकाव्दारे केले आहे. सन 2018 पासुन केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही ग्रामपंचायतींची पडताळणी मोहीम सुरु केली आहे. या सर्वेक्षणातुन ग्रामपंचायत, जिल्हा तसेच राज्यांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे. स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रा. अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचा शाश्वत वापर करणे हा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील ग्रामीण भागात अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (Academy Of Management Studies) या केंद्र पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडुन गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नमुना निवड पध्दतीने गावांची निवड करुन, ॲपच्या माध्यमातू...

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी 19 जुलै 2025 पर्यंत प्रवेशिका सादर करा - माहिती उपसंचालक प्रवीण टाके

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- प्रसार माध्यमातील प्रतिनिधी रोज समाजातील विविध पैलूवर लिखाण करीत असतात, तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांवरही लिखाण करतात. या लिखानाची दखल राज्य शासन घेत असून पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट लिखाणासाठी शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार दिले जातात. कोल्हापूर माहिती विभागातील कोल्हापूर,सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी आपण वर्षभरात केलेल्या लिखानाचे उत्कृष्ट पध्दतीतीने मांडणी करुन त्यांचा तीन प्रतीत प्रस्ताव तयार करुन तो राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी दि. 19 जुलै 2025 पर्यत सादर करावा,असे आवाहन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्य...

मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने शिवप्रेमींचा जल्लोष

सिंधुदुर्गनगरी दिनांक १२ (जिमाका) :- छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मालवण येथे उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यामुळे या आनंदात तमाम मालवणकर सहभागी होत मालवण बंदर जेटी या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आकाशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव असलेले 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले. अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आलाय. त्यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. हा उपलब्धीबद्दल प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणा उत्सव समितीच्या वतीने शिवप्रेमींच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला तसेच शिवप्रार्थना झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेक...

जागतिक वारसा स्थळांमध्ये विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश झाल्याने विजयदुर्गवासियांची जबाबदारी वाढली - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी दिनांक १२ (जिमाका) :- जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश 'युनेस्को' च्या वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. ही नक्कीच सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे.पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना या घटनेमुळे प्रेरणा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या १२ किल्ल्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना अधिक स्फूर्ती देणार आहे. जिल्ह्यातील हे दोन किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांची जबाबदारी देखील वाढली आहे. आता येथे पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने गावकऱ्यांनी पर्यटनातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सरपंच रियाज काझी, प्रदीप मिठबावकर, दिनेश जावकर, इतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिड्ये, शैलेश खडपे उपस्थित होते . ०००००

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते 'नमस्ते' योजनेंतर्गत सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांना संरक्षणात्‍मक उपकरणांचे वितरण

सिंधुदुर्गनगरी,दि.१२ (जि.मा.का.): केंद्र शासनाद्वारे राबविण्‍यात येणाऱ्या 'नमस्‍ते' या योजनेद्वारे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्‍या एकूण ३४ कामगारांना राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाकडून सेफ्टी हेल्मेट, गमबूट, गॉगल, गॅस गार्ड, हॅन्ड ग्लोव्हस, फ्लुरोसेंट जॅकेट, मास्क ही सुरक्षा उपकरणे प्राप्त झालेली असून या उपकरणांचे वितरण प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी नगर विकास विभाग सहआयुक्त विनायक औंधकर, कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू व जिल्हा तांत्रिक तज्ञ निखील नाईक उपस्थित होते. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय व सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे नमस्‍ते म्हणजेच नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम ही योजना सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या हेतूने २०२३ ते २०२६ या तीनवर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. योजनेद्वारे सिवर व सेप्टिक टॅंकच्‍या स्‍वच्छतेसाठी १०० टक्‍के यांत्रिकीकरण करण्यास प्रोत्‍साहन दिले जाणार असुन देशातील...

अप्रेंटिसशिप रोजगार मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी,दि.11(जि.मा.का.): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता ऑफलाईन Apprenticeship रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये आपली Apprenticeship ची रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्ह्यातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित Apprenticeship पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे. दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता उद्योजक तसेच उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य वि...

कृषि विभागाकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, जिल्हास्तरीय भरारी पथकांची स्थापना

सिंधुदुर्गनगरी,दि.11(जि.मा.का.): शासनाच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात आली आहे. याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाकरीता जिल्हास्तरीय भरारी पथक आणि तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची फेररचना करण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी हे असून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष उपविभागीय कृषि अधिकारी हे असून संबंधित तालुक्याचे कृषि अधिकारी (गुनि), तालुका कृषि अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग हे सदस्य सचिव आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथक पुढीलप्रमाणे: पथकप्रमुख, कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद), सिंधुदुर्ग, सदस्य, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, सिंधुदुर्ग, सदस्य 2, तक्रारीशी संबंधित तालुका वगळून अन्य तालुक्यातील तालुकास्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक यांचा भरारी पथकामध्ये समावेश आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पुढीलप्रमाणे: अध्यक्ष – संबंधित उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी, सदस्य – संबंध...

पात्र लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य उचलावे, अन्यथा शिधापत्रिका होईल रद्द किंवा केशरीमध्ये वर्ग

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का.): पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दिनांक 30 जून 2025 पुर्वीपर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांनी धान्य उचल न केल्याचे निदर्शनास आले आहे. तरी जुलै 2025 महिन्यात सुध्दा ई-पॉस मशीनवरुन धान्य उचल करण्याची सुविधा सुरु असल्याने ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही धान्य उचल केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी तात्काळ धान्य उचल करावी, जे लाभार्थी धान्य उचल करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना धान्याची गरज नसल्याची बाब समजून त्यांच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय शिधापत्रिका (APL) केशरी (NPH) मध्ये वर्ग करुन अथवा शिधापत्रिका रद्द करुन त्यांना धान्याचा लाभ घेता येणार नाही याची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी. 00000

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांकडून फी वसुली केल्यास महाविद्यालयांवर फौजदारी कार्यवाही होईल

सिंधुदुर्गनगरी,दि.10 (जि.मा.का.): शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता महाडिबीटी पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर योजना व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसुचित जाती विद्यार्थ्याकडुन सक्तीने फी वसुली करणाऱ्या महाविद्यालयांवर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन समाज कल्याण चे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर योजना व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसुचित जाती विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज भरणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करणेची प्रक्रीया सुरू असून अनुसुचित जाती विद्यार्थ्यांकडून फी वसुली करु नये याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरीष्ठ व व्यावसायिक महाविद्यालयांना पाठविण्यात आलेल्या पत्राची अंमलबजावणी सर्व महाविद्यालयांनी करावी. तसेच महाविद्यालयातील प्रवेशित अनुसुचित जाती विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुली करू नये, तसेच शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त झालेली नाही या कारणास्तव कोणत्याही प्रकारची अनुसुचित जाती विद्यार्थ्यांची कागदपत्रे महाविद्यालयांनी अडवून ठेवण्यात येऊ नये. याबाबत विद्यार्थी...

जिल्ह्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम

सिंधुदुर्गनगरी,दि.10 (जि.मा.का.): सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली़, असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. या मोहिमेमध्ये कॅन्सर तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन जिल्ह्यातील ग्रामिण भागात जाऊन तेथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या मदतीने रुग्णांची तपासणी करणार आहे. कॅन्सर डायग्नेस्टीक व्हॅन दि.9 जुलै 2025 ते एक महिना कालावधीमध्ये जिल्हामधील जिल्हा, उपजिल्हा ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्करोग संशयीत लाभार्थ्यांची तपासणी करणार आहे. ग्रामिण रुग्णालय देवगड येथून या कर्करोग तपासणी सेवेची सुरुवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी शिबिरास भेट देवून कामकाजाची पहाणी केली, तपासणी व्हॅनमध्ये तज्ञ डॉक्टरांबरोबरच तपासणी सुविधा उपलब्ध आहेत. कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅनाचे तालुकानिहाय शिबिरांच्या ठिकाणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. तालुका भेटीचा दिवस व तारीख संस्थेचे नाव देवगड दि....

निवृत्तीवेतनधारकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.10(जि.मा.का.): जिल्ह्यातील राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी अडचणींच्या निराकरणासाठी कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने तिमाही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार, 16 जुलै 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, तळमजला, दालन क्रमांक 124 सिंधुदुर्गनगरी येथे पार पडणार आहे. या बैठकीत निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांना बँक व शासनाच्या सेवा-सुविधांशी संबंधित येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला निवृत्तीवेतनधारक संघटनांचे पदाधिकारी, संबंधित अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारी किंवा हरकतींसह या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी केले आहे. ०००००००

िल्ह्यात टपाल विभागातर्फे आधार कॅम्पचे आयोजन

ज सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) सिंधुदुर्ग टपाल विभागातर्फे ग्रामीण व शहरी भागातील जनतेला आधार अद्यायावतीकरण तसेच नवीन आधार नोंदणी सुलभ व्हावी, याकरीता दि. 10 ते 31 जुलै 2025 या दरम्यान आधार कॅम्पचे आयोजन जिल्ह्यातील विविध टपाल कार्यालयामध्ये करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील जास्तीत जास्त जनतेने यांचे लाभ घ्यावा, असे आवाहन टपाल कार्यालयाने केले आहे. आधार कॅम्पची तारीख व स्थानाची यादी खालीलप्रमाणे: अ.क्र कॅम्पची तारीख तालुका टपाल कार्यालयाचे नाव 1 10 जुलै 2025 मालवण मालवण 2 11 जुलै 2025 सावंतवाडी सावंतवाडी 3 12 जुलै 2025 वेगुर्ला वेंगुर्ला 4 12 जुलै 2025 मालवण परुळे 5 15 जुलै 2025 मालवण कट्टा 6 15 जुलै 2025 कणकवली कणकवली 7 16 जुलै 2025 देवगड जामसंडे 8 17 जुलै 2025 कुडाळ कुडाळ 9 18 जुलै 2025 देवगड देवगड 10 19 जुलै 2025 सावंतवाडी बांदा 11 21 जुलै 2025 मालवण मालवण 12 21 जुलै 2025 मालवण कट्टा 13 21 जुलै 2025 वेंगुर्ला वेंगुर्ला 14 22 जुलै 2025 वेंगुर्ला शिरोडा 15 23 जुलै 2025 कणकवली कणकवली 16 24 जुलै 2025 देवगड ...

अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालतचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सिंधुदुर्ग येथे मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी सुजितकुमार जाधोर यांच्या अध्यक्षतेखाली भूमि लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांचे अधिनस्त उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील जमिन मोजणी प्रकरणे, फेरफार नोंदीची प्रकरणे, एकत्रीकरण योजनेमधील चूक दुरुस्तीची प्रकरण, व कार्यालयीन इतर तक्रारी अर्जाबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुध्द किंवा केलेल्या कार्यवाहीविरुध्द कार्यालयात अपील प्रकरणे प्राप्त होत आहेत. या अपील प्रकरणात कार्यालयाकडून सुनावणीची कार्यवाही पूर्ण होऊन निर्णय पारीत होईपर्यंत जनतेचा वेळ, पैसा व श्रम खर्ची होवूनही पक्षकारांना न्याय मिळण्यासाठी दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे अपील प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी भूमि लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांच्याकडे दाखल अपील प्रकरणात दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा विधिज्ञ यांच्यामार्फत समझोता अथवा तडजोड कर...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये 86 नवीन इंटर्न डॉक्टर्स रुजू, नवे विभाग व सेवा सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे रुग्णसेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येत आहेत. 86 नवीन इंटर्न डॉक्टर्स रुग्णसेवेमध्ये रुजू झाले असून, रुग्णालयात अनेक नवे विभाग व कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे 86 नवीन इंटर्न डॉक्टर्स रुग्णसेवेमध्ये रुजू झाले. नव्याने सुरु करण्यात आलेल्या आय.सी. यु. व विविध कक्षांमध्ये त्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या असून रुग्णसेवेमध्ये प्रभावी बदल करण्यात आला. डॉ. शिल्पा नारायणकर वैद्यकीय अधीक्षक पदावर रुजू रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालय नुकतेच सुरु करण्यात आले असून डॉ. शिल्पा नारायणकर, प्राध्यापक, विकृतीशास्त्र यांनी वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. रुग्णालयामध्ये नवे विभाग/कक्ष सुरु, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केलेल्या मार्गदर्शनानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्...

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2025-26 मध्ये जिल्ह्यासाठी एकूण 19,557 मे. टन खताच्या मागणीच्या प्रमाणात राज्य शासनाकडून 12,259 मे.टन खताचे आवंटन मंजूर करण्यात आलेले आहे. या मंजूर आवंटनानुसार माहे एप्रिल 916 मे.टन, माहे मे 1,422 मे.टन, माहे जून 2,887 मे.टन, माहे जुलै 2,765 मे.टन, माहे ऑगस्ट 2,337 मे.टन आणि माहे सप्टेंबर 1,932 मे.टन याप्रमाणे खताचा पुरवठा करण्याबाबत सर्व खत पुरवठादार कंपनींना आराखडा ठरवून दिला आहे. सद्यस्थितीत माहे 07 जुलै 2025 अखेर एकुण 10,095 मे.टन खताचा पुरवठा झालेला आहे. हे प्रमाण एकूण मंजूर आवंटनाच्या 82 टक्के इतके आहे. आजअखेर जिल्ह्यात युरिया 2,058 MT,एमओपी 117MT,संयुक्त खते 1,233 MT,सिंगल सुपर फॉस्फेट 635 MT आणि सेंद्रिय खत FOM 153 MT असा एकूण 4,197 MTखतांचा साठा उपलब्ध आहे. राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि. (RCF) आणि पॅरादीप फॉस्फेटस लिमिटेड (PPL) या प्रमुख खत पुरवठादार कंपनीमार्फत मागणीनुसार खत पुरवठा करण्याचे काम सुरु असून RCF कंपनीची 7 वी रेक रत्नागिरी येथे जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नियोजित असून खत विक्रेते य...

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात "कौशल्य सप्ताहा"चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का.) : येत्या 15 जुलै 2025 रोजी साजरा होणाऱ्या "जागतिक युवा कौशल्य दिना"निमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने "कौशल्य सप्ताह" (दि. 7 ते 15 जुलै 2025) दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.ई. तडवी यांनी दिली आहे. या उपक्रमांतर्गत दि. ८ जुलै २०२५ रोजी जन शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वर्ष २०२५ च्या पहिल्या कौशल्य विकास बॅच "सहायक ड्रेस मेकर" या प्रशिक्षण बॅचचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त,भैयाजी येरमे, तसेच कौशल्य विकास व रोजगार अधिकारी सूरज देबाजे व भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालय, समुपदेशक निखिल दवणे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक सुधीर पालव यांनी केले आणि प्रशिक्षण बॅचचे औपचारिक उद्घाटन केल...

खरीप हंगाम 2025-26 साठी राज्यस्तरीय भात व नाचणी पीकस्पर्धा जाहीर

सिंधुदुर्गनगरी,दि.9 (जि.मा.का.): राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. त्यानुषंगाने अन्नधान्य,भात, नाचणी (रागी) पीकस्पर्धा सन 2025-26 साठी राज्यस्तरावरुन कृषी विभागामार्फत पीकस्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण व आदिव...

आर.आर.पाटील सुंदर गांव योजना

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : ग्राम विकास व जल संधारण विभागाकडील शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्मार्ट ग्राम योजनेची अंमल बजावणी करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये योजनेच्या अंमल बजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. प्रती तालुका सुंदर गांव ग्रामपंचायतींना 10 लक्ष व जिल्हा सुंदर गांव ग्रामपंचायतींना 40 लक्ष पारितोषिकाची रक्कम वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) यांनी दिली आहे. स्मार्ट ग्राम निवडीसाठीचे निकष खालीलप्रमाणे SANITATION (स्वच्छता), MANAGEMENT (व्यवस्थापन),ACCOUNTABILITY (दायित्व),RENEWABLE ENERGY & ENVIRONMENT (अपारंपारीक उर्जा व पर्यावरण),TRANSPARENCY & TECHNOLOGY (पारदर्शकता व तंत्रज्ञान) वरील निकषांची पुर्तता करीत असलेल्या सन 2023-24 अंतर्गत निवड झालेल्या आर.आर (आबा) पाटील तालुका सुंदर गाव ग्रामपंचायतींची नावे पुढीलप्रमाणे:- तालुका कुडाळ मधुन निरुखे ग्रामपंचायत, ता. मालवण मधुन वराड ग्रामपंचायत, ता. देवगड मधुन बापर्डे ग्रामपंचायत, ता. वेंगुर्ला मधुन पालक...

जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पेन्शन अदालत दि. 15 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी किशोर काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ०००००

तक्रार निवारण समितीची सभेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत केली आहे. यानुसार, प्रत्येक महिन्यात तक्रार निवारण समितीची सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी गुरुवार, दि. 10 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही.सी.) द्वारे होईल. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी या सभेसाठी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे यांनी केले आहे. ००००००

स्वच्छ सर्वेक्षण पडताळणी मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : स्वच्छ भारत मिशन ग्रा.टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 ही पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत पडताळणी उपक्रमांतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेला परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती घेण्यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 साठी सर्व ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन करावे. या सर्वेक्षणात लोकांचा सहभाग वाढवुन, जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. सन 2018 पासुन केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही ग्रामपंचायतींची पडताळणी मोहीम सुरु केली आहे. या सर्वेक्षणातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच राज्य यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे. स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रा. अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आलेल्या स्वच्छवता सुविधांचा शाश्वत वापर करणे हा प्रमुख उद्देश आहे. ...

पात्र लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य उचलावे, अन्यथा शिधापत्रिका केशरीमध्ये वर्

ग सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.): पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य दिनांक 30 जून 2025 पुर्वीपर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांनी धान्य उचल न केल्याचे निदर्शनास आले आहे. तरी जुलै 2025 महिन्यात सुध्दा ई-पॉस मशीनवरुन धान्य उचल करण्याची सुविधा सुरु असल्याने ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही धान्य उचल केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी तात्काळ धान्य उचल करावी जे लाभार्थी धान्य उचल करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना धान्याची गरज नसल्याची बाब समजून त्यांच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय शिधापत्रिका (APL) केशरीमध्ये वर्ग करुन त्यांना धान्याचा लाभ घेता येणार नाही यांची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी. 00000