बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठीच्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २१ जून २०२३ रोजी दु. ३ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सिंधुदुर्ग सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५) सुधारित अधिनियम २०२१ व महाराष्ट्र नियम २०१८ मधील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी बाल न्याय मंडळ गठीत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल न्याय मंडळ रिक्त सदस्य पदासाठी विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून नामांकने मागविण्यासाठीची जाहिरात दि. ७ जून २०२३ रोजी, दैनिक सकाळ. सिंधुदुर्ग आवृत्ती मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठीची पात्रता : वय ३५ वर्षापेक्षा कमी नसावे शिक्षण आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रातील बालकांसोबत काम करण्याचा किमान सात वर्षाचा अनुभव असावा आणि शिक्षणशास्त्र समाज किंवा मानसशास्त्रामध्ये पदवीत्तर पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा कायद्यातील पदवी अशी शैक्षणिक अहर्ता असावी. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठीच्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. २१ जून २०२३ रोजी दु. ३ वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत ए ब्लॉक, तळमजला,ओरोस सिंधुदुर्गनगरी दूरध्वनी क्र. (०२३६२-२२८८६९) येथे सादर करावा. सदरचा विहित नमुना अर्ज व अर्जासोबत सादर करावयाची हमीपत्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. तसेच शासनाच्या www.maharashtra.gov.in व महिला व बालविकास आयुक्तालयाच्या www.wedcommpune.com या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'