Posts

Showing posts from August, 2025

तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग दि ३१ ऑगस्ट (जिमाका वृत्त):- सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार विरसिंग वसावे, चैताली सावंत तसेच महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करुन घेत संवाद साधला. थोडक्यात परिचय- शासकीय सेवेतला प्रवास- IAS अधिकारी म्हणून त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे. • सहायक आयुक्त, GST पुणे- ५ वर्षे महसूल व करसंकलन क्षेत्रात उत्कृ‍ष्ट कामगिरी. • IAS प्रशिक...

दिव्यांग बालकांसाठी 2 ऑक्टोंबर रोजी शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि ३१ (जिमाका):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिव्यांग बालकांची ओळख, तपासणी करण्याकरीता जिल्ह्यामध्ये २ ऑक्टोंबर २०२५ रोजी सावंतवाडी येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शिबाराची रुपरेषा ठरविण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, डॉ. सुधीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील दिव्यांग मुलांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ, दिव्यांग मुलांचे आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, यूनिक डिसेबिलिटी ओळखपत्र व वैद्यकीय तपासणी अशा विविध प्रकारचे लाभ मिळण्याकरीता या शिबीराचे सावंतवाडी येथे ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजन करण्यात येणार आहे,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांनी यावेळी सांगितले. याशिबिरामध्ये आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, दिव्यांग विभाग तसेच जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सर्व शासकीय शाळा व अशासकीय संस्था (NGO) तसेच विविध विभागांचा ...

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 31 (जिमाका):- भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labour & Employment) गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नोंदणी करून घेण्यासाठी पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/self या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी केले आहे. भारतातील Plateform Worker यांना सामाजिक संरक्षण देण्याचे गरज ओळखून सामाजिक सुरक्षा कवच आयुष्यमान भारत अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सुरक्षा लाभ मिळवण्यासाठी आपल्या विभागातील Plateform Worker ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आ...

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा निरोप समारंभ संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) : जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी असलेले आणि जनतेसाठी सदैव तत्पर जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांची ओळख आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्हावासियांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकीचे स्थान आहे. कायम सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना शुक्रवारी ओरोस येथील कराळे मंगल कार्यालयात छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या वतीने श्री पाटील यांचा शॉल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध विभागांच्या वतीने अनिल पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकार...

विशेष लेख व्यवसायातून उन्नती साधूया.. जीवनाचा उत्कर्ष घडवूया

राज्यातील युवक-युवतींमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेला दिशा देण्यासाठी व स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील मागास घटक, बेरोजगार युवक-युवती यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत असून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येत आहेत. युवकांच्या हाताला रोजगार दिला तर ते इतरांसाठीही रोजगार निर्माण करतील. याच विचाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यरत आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी व उद्योग-व्यवसायात तरुणांना संधी देण्यासाठी या महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे महामंडळ आहे. हे महामंडळ प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या महामंडळाची स्थापना 27 नोव्हेंबर 1998 रोजी मराठा समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. या ...

शासकीय वसतीगृहमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका):- राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयासकि व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, बांधकरवाडी कणकवली येथे सुरु झालेले आहे. तरी या वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. या वसतीगृहात सन 2025-26 साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा पुढीलप्रमाणे अ.क्र प्रवर्ग एकूण आरक्षण व्यवसायिक अभ्यासक्रम बिगर व्यवसायिक अभ्यासक्र व्यवसायिक अभ्यासक्रम रिक्त जागा 1 इतर मागास वर्ग 51 टक्के 22 9 22 2 विमुक्त जाती, व भटक्या जमाती 33 टक्के 14 6 14 3 विशेष मागास प्रवर्ग 6 टक्के 3 1 3 4 दिव्यांग 4 टक्के 2 - 2 5 अनाथ 2 टक्के 1 - 1 6 आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) 4 टक्के 1 1 1 एकूण 100 43 17 43 सन 2025-26 करीता अटी व निकष पूर्ण करणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 व...

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका):- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे, आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन 2025-26 योजनेकरीता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने दि. 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. अर्जाची एक प्रत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे जमा करावयाचे आहे. या योजनेअंतर्गत सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांनी पं...

"ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना"चे लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका):- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना" राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तरी पात्र लाभार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे, आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2025-26 योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने दि. 1 ते 18 सप्टेंबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. अर्जाची एक प्रत सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी यांच्याकडे जम...

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप सुरु

सिंधुदुर्गनगरी दि 28 (जिमाका):- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटपाची प्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु करण्यात आली असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी दिली आहे. गृहोपयोगी संच प्राप्त करुन घेण्यासाठी बांधकाम कामगाराने ऑनलाईन पध्दतीने https://hikit.mahabocw.in/appointment या लिंकवर जाऊन अपॉईंटमेंट घेताना वितरण केंद्र निश्चित करुन घेणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्राची वितरण क्षमता 500 इतकी असेल, वितरण दिनांक 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत (शासकीय सुट्या) वगळून खेले ठेवण्यात आलेले आहे, आवश्यकतेनुसार यामध्ये वाढ करण्यात येईल. गृहोपयोगी संच हे पूर्णपणे विनामूल्य देण्यात येणार आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी केले आहे. ०००००

आरोग्य अभियानाअंतर्गत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि 28 (जिमाका):- मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मार्फत सिंधुदुर्ग यांच्यामार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” या आरोग्य अभियांनातर्गत जिल्ह्यामध्ये दि.27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीत सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिएमआरएफ चे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाअंतर्गत रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेली आहेत. या शिबिराच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी तसेच वेगवेगळ्या रक्त चाचण्या व इतर तपासण्या होणार आहेत. आरोग्य तपासणी मध्ये एखाद्या आजाराचे निदान झाल्यास निदान झालेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तसेच इतर योजनेमार्फत पात्र रुग्णास ज्या योजन...

नरडवे धरण प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप नरडवे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ठरणार ' आदर्श पुनर्वसन' - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि. 25 (जिमाका):- नरडवे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्व श्रेय हे प्रकल्पग्रस्तांचे आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला सहकार्य केले. नरडवे धरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी शासनाने उचललेले पाऊल आता आदर्श पुनर्वसनाचे उदाहरण ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. नरडवे प्रकल्पग्रस्तांना शासनाकडून देण्यात आलेल्या भूखंड वाटपाच्या प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शितल जाधव, कार्यकारी अभियंता विनायक जाधव, तहसिलदार दिक्षांत देशपांडे, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संजना सावंत तसेच सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जयराम बापू ढवळ, विष्णू नामदेव ढवळ, श्रीधर सखाराम पालव, अनंत आपा ढवळ, ...

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.):- समाज कल्याण कार्यालयांतर्गत मुला- मुलींच्या शासकीय वसतिगृहाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी, विद्यार्थीनीना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले दिली आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर शासकीय वसतिगृह प्रवेश योजनेचे लाभ ऑनलाईन पध्दतीने https://hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज भरण्यात यावे. तरी गरजू विद्यर्थ्यांनी प्रवेशाबाबत संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्जाची प्रत दि. 15 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करण्याची मुदतवाढ ...

सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व कणकवली पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल बुकिंग सेवांच्या वेळात एक तासाने वाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.):- सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व कणकवली पोस्ट ऑफिस मधील रजिस्टर, स्पीड, पार्सल बुकिंग सेवांची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरी, कुडाळ कणकवली या भागातील सर्व नागरीकांनी तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थानी यांची नोंद घेऊन वाढीव वेळेत जास्तीत जास्त रजिस्टर, स्पीड व पार्सल्स बुक करावीत, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक, नंदकुमार कुरळपकर यांनी केले आहे. भारतीय डाक विभागाव्दारे रजिस्टर, स्पीड, पार्सल तसेच आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग सेवा दिल्या जातात. ग्राहकांची वाढती गरज तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था ई. सर्वच स्तरावरील रजिष्टर, स्पीड, पार्सल ई. बुकिंग मधील वाढती गरज लक्षात घेऊन सिंधुदुर्गगनगरी, कुडाळ व कणकवली या तीन मुख्य डाकघरांमध्ये आता या सेवांचा वेळ एक तासाने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने सकाळी 9 ते 4 या वेळेत सेवेचा लाभ घेता येणार आहे. ०००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 62 आयोजित करण्यात येत आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीस उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Deparment of Sainik Welfare, pune (DSW)यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-62 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. या एस.एस.बी. वर...

तक्रारदारांची ऑनलाईन सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या विभागांकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची ऑनलाईन सभा VC व्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या दालनात संपन्न झाली, असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जयप्रकाश परब यांनी दिली आहे. या सभेत 6 तक्रारदार ऑनलाईन व्हि.सी.व्दारे उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी तक्रारदारांच्या व्यथा ऐकून नियमोचित कार्यवाही करण्याचे संबंधित तक्रारदार यांना आश्वासन दिले. तसेच तक्रारदारांच्या तक्रारी ज्या विभागांशी संबंधित आहेत, त्या विभागांना तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच यापुढे होणाऱ्या तक्रार निवारण सभेचा दिनांक व वेळ जिल्ह्यात प्रसिध्द होणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये देण्यात यावी अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रशासनाला दिल्या. ००००००

गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशाकडून जादा भाडे आकरणी झाल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवा

सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का):- गणेशोत्सव कालावधीमध्ये खासगी कंत्राटी वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशाकडून राज्य परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंद करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे. राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवशांकडून मोठ्या प्रमाणात खासगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अशा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून खासगी कंत्राटी वाहतुकी ने आण करणाऱ्या वाहतुकदारांकडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे, राज्य परिवहन प्राधिकरण (STA) ने ठरवून दिलेल्या दरपत्रक खालीलप्रमाणे असून कोणत्याही खासगी बस वाहतुकदाराने या दराच्या 50 टक्के अधिक (दिडपट) आकारणी करण्यास परवानगी असून या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी करुन नये. अ.क्र मार्गाचे नाव तिकिट दर (साधी) तिकिट दर (शिवशाही ) तिकिट दर (स्लिपर) 1 मुंबई ते सावंतवाडी 865/- 1280/- 1270/- 2 मुंबई ते कुडाळ 835/- 1235/- 1225/- 3 ...

उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का): डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२४-२५ करीता जिल्ह्यातील नोंदणीकृत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांनी तीन प्रतीत प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार" ...

गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाची अंमलबजावणी करा

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.): गणेशोत्सव शांततेत, सुरळीत व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजनाबाबत निर्गमित केलेल्या आदेशाचे अंमलबजावणी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नियोमी साटम यांनी केले आहे. गणेशोत्सवाकरीता मुंबई, पुणे तसेच इतर जिल्हे व राज्यातुन कोकणचे चाकरमनी आपल्या कुंटुंबासह मूळ गावी सिंधुदुर्गात रेल्वे, बसेस व खाजगी वाहनाने मोठ्या संख्येने येतात, त्यावेळी पे-जा करणाऱ्या चाकरमनी, प्रवाशाना प्रवासात कोठे ही गैरसोय होऊ नये, वाहतुक कोंडी होऊ नये, प्रवास सुरळीत व सुरक्षित व्हावा यासाठी दरवर्षी शासन व जिल्हा पोलीस दलाच्यावतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर आवश्यकतेनुसार फिक्स पॉइंट, पेट्रोलींग नेमुन वाहतुकीचे नियोजन करण्यात येते. सन 2025 चा गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा, प्रवाशाना/चाकरमान्याना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये, प्रवास वेळेत व सुरक्षित व्हावा, याकरीता शासनाकडून कोकणवासीयांच्या सोयीसाठी पनवेल ते इन्सुली (सिंधुदुर्ग) या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (रा.म.क्र जुना क्र. 17) वरून होणऱ्या अवजड वाहतुकीच्या निबंधाबाबत पुढीलप्र...

जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी :- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाव्दारे जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा जय गणेश इंग्लीश मिडियम स्कुल मालवण येथे पार पाडल्या, असल्याची माहिती कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी दिली. जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुले प्रथम - जय गणेश इंग्लिश मेडिअम स्कुल, मालवण व्दितीय - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी तृतीय - सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मेडिअम स्कुल, वेंगुर्ला. 14 वर्षाखालील मुली प्रथम - टोपीवाला हायस्कुल, मालवण व्दितीय - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी तृतीय - डॉन बॉस्को ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस १७ वर्षाखालील मुले प्रथम - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी व्दितीय - सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मेडिअम स्कुल, वेंगुर्ला तृतीय - डॉन बॉस्को ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस १७ वर्षाखालील मुली प्रथम - जय गणेश इंग्लिश मेडिअम स्कुल, मालवण व्दितीय - सेंट्रल इंग्लिश मेडिअम स्कुल, सावंतवाडी १९ वर्षाखालील मुले प्रथम - राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज सावंतवाडी व्द...

जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयव्दारे जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या. या स्पर्धेकरीता जिल्ह्यातून 258 खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली होती. जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुली वजनगट 24 किलो खालील प्रथम - अन्वया शशिकांत पाटकर - जिल्हा परिषद शाळा, पाट वजनगट 26 किलो खालील प्रथम - आर्या आनंद मौर्ये - जिल्हा परिषद शाळा, सावंतवाडी द्वितीय - स्वरा अभय वाटवे - कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी वजनगट 30 किलो खालील प्रथम - मिताली आनंद कदम - विद्यामंदिर प्रशाला, कणकवली द्वितीय - प्रीती शिवराज क्षीरसागर - कासार्डे हायस्कूल, कासार्डे तृतीय - हर्षिता सचिन पाटकर - मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी तृतीय - देवकी संदीप जामसांडेकर - शेठ न. म. हायस्कूल, खारेपाटण वजनगट - 34 किलो खालील प्रथम - मुग्धा प्रदीप साव...

प्राधिकरणातील होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड आठ दिवसांत काढावेत

सिंधुदुर्गनगरी दि. २२ (जिमाका) :- सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात विविध प्रकारचे (राजकीय, सामाजिक, वैयक्तिक शुभेच्छा) इ. प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. विनापरवानगी लावण्यात आलेले सर्व प्रकारचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक बोर्ड इ. सदरची सूचना प्रसिध्द झाल्यापासून आठ दिवसांत काढून टाकण्यातबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील अद्याप काही फलक दिसून येत आहेत. फलक तातडीने हटविण्याबाबतच्या अध्यक्ष सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. आठ दिवसात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक, बोर्ड इ. जाहिराती संबंधितांकडून न काढल्यास कोणत्याही प्रकारची सूचना न देता होर्डिंग्ज, पोस्टर्स, फलक, बोर्ड या कार्यालयाकडून काढून टाकण्यात येतील व त्यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार आपणाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच भविष्यात प्राधिकरण क्षेत्रात होर्डिंग्ज, पोस्टर, फलक बोर्ड...

माजी सैनिकांच्या पाल्यास परदेश शिक्षणाकरीता आर्थिक मदत

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 (जिमाका) :- माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत रा. सबनिसवाडा ता. सावंतवाडी यांचे पाल्य स्वप्निल संतोष सावंत हा रशिया येथे MBBS चे शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी माजी सैनिक संतोष सांवत यांना त्यांच्या पाल्याच्या परदेश शिक्षणाकरीता सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने कल्याणकारी निधीतून 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते अदा करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहा. सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मार्फत वेळोवेळी निर्धारित केलेल्या विविध योजनांतून जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये, अवलंबित यांच्याकरीता कल्याणकारी निधीतून शैक्षणिक व पुनर्वसनाच्य विविध प्रकारच्या आर्थिक मदत दिल्या जाते. जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक त्यांची अनाथ पाल्ये, अवलंबित यांनी अश्या प्रकार...

पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि 21 (जिमाका) सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे 25 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. पावसाळ्याचे दिवसांत साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या अधक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री राणे पुढे म्हणाले की, गणेशोत्सवासाठी अनेक ठिकाणांहून चाकरमानी जिल्ह्यात येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याने जिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी, रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथकांची नेमणूक करा. पावसाळा लक्षात घेता साथीचे आजार निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. औषधसाठा कमी पडणार न...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार; रुग्णांना मिळणार तत्पर सेवा NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 21 (जिमाका) नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची हयगय नको. रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य द्या. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करा. रुग्णसेवेबद्दल नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी येता कामा नये असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कारीवडे, सावंतवाडी येथे नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याबाबत उपोषणाचा इशारा दिला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या लवकरच पुर्ण करण्यात येतील असे आश्वासित केले. पालकम...

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे - सांस्कृतिक कार्यमंत्री अॕड आशिष शेलार

सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका):- राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तिन्ही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेत गणेशोत्सव मंडळांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॕड. आशिष शेलार यांनी केले आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक ...

शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनांसाठी 12 वी नंतरचे बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम (बी.ए,बी.कॉम, बी.एस.सी.अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए.,एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) सर्व योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता दि. 27 ऑगस्ट 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती इतर मगास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी दिली आहे. इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनांचे अर्ज अद्यापही भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरुन त्यांची प्रत संबंधित वसतीगृहात, कार्यालयात जमा करावी. ...

जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयव्दारे जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या. जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, 14 वर्षाखलील मुले प्रथम- प्रगत विद्यामंदिर, रामगड व्दितीय- कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ तृतीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरुर 14 वर्षाखालील मुली प्रथम- प्रगत विद्यामंदिर, रामगड व्दितीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरुर तृतीय- कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ 17 वर्षाखालील मुले प्रथम – प्रगत विद्यामंदिर, रामगड व्दितीय –पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली तृतीय – कुडाळ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ 17 वर्षाखालील मुली प्रथम- माध्यमिक विद्यामंदिर, असरोंडी व्दितीय -प्रगत विद्यामंदिर, रामगड तृतीय - सौ. इ.द.वर्दम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, पोईप 19 वर्षाख...

अंगणवाडी सेविकापदासाठी २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :- देवगड तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी सेविका पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारांकडून दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवगड कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन देवगड एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय देवगड. ०२३६२- २६२३१२ किंवा मोबा. ८९७५२४६०२६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ०००००

फळे, फुले, मसाला लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, अळंबी उत्पादन प्रकल्पासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 या वर्षात क्षेत्र विस्तार घटकांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन आणि अळंबी उत्पादन प्रकल्प हा घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या घटकांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करणे तसेच, अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबींचा समावेश आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने या कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे. अ.क्र. घटक खर्च मर्यादा अनुदान मर्यादा 1 फुले लागवड कट फ़्लॉवर्स (गुलाब, ऍ़स्टर, बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनियास, गोल्डन रॉड, शेवंती इ.) रु.1,25,000/- प्रति हेक्टर एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त...

अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. १८ :- राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक रहावे. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावा, असेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटी...

सिंधुरत्न समृध्द योजनेतून पर्यटन विकासाला चालना मिळणार - अध्यक्ष दीपक केसरकर

•आंतराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजेस उभाणीसाठी 15 कोटींचे अनुदान •मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज पुरवठा •कॉटेजस उभारणीसाठी कर्जवितरण सिंधुदुर्गनगरी दि. 18 (जिमाका) जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी व स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने 'सिंधुरत्न समृध्द योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन ते तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजस उभी राहणार आहेत. या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पात्र 45 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढून पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले. सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंततरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजस उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जतिरणाचा कार्यक्रम अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी 45 लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले असून त्यातील 4 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजुरीचा धनादेशाचे वितरण करण्यात ...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून अत्यल्प वेळेत हेरिटेज वास्तूला झळाळी कोल्हापूर, दि.17 (जिमाका): मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमू...

आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहाचे उद्घाटन मायनाक भंडारी यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 (जिमाका) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात नोंदवले आहे. त्यांनी अनेक पराक्रम घडवले आहेत. त्यांचे हे कार्य आणि त्यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक केस‍रकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच मायनाक भंडारी यांचे वारस देखील यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, मायनाक भंडारी यांचे शौर्य अतुलनीय असे आहे. या सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या पराक्रमाचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवरायांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' म्हणून ओळखले जाते. त्यांना हे नाव मिळवून देण्यामध्ये मायनाक भंडारीजींसारख्या असंख्य मावळ्या...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण

सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 (जिमाका) :- स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिल्या जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील ३ जणांना, सावंतवाडी तालुक्यातील २ जणांना तर वैभववाडी, वेंगुर्ला, कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ९ पात्र नवीन तसेच मृत पररवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण करण्यात आले. हे परवाने वितरण शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभानंतर पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग नगरी येथे पार पडले. 00000

सिंधुरत्न समृध्द योजनेतून पर्यटन विकासाला चालना मिळणार - अध्यक्ष दीपक केसरकर

•आंतराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजेस उभाणीसाठी 15 कोटींचे अनुदान •मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज पुरवठा •कॉटेजस उभारणीसाठी कर्जवितरण सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी व स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने 'सिंधुरत्न समृध्द योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन ते तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजस उभी राहणार आहेत. या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पात्र 45 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढून पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले. सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंततरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजस उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जतिरणाचा कार्यक्रम अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी 45 लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले असून त्यातील 4 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजुरीचा धनादेशाचे वितरण करण्या...

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी व रास्तभाव धान्य दुकानदारांचा गुणगौरव सोहळा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच रास्तभाव धान्य दुकानदारांचा गुणगौरव पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. हा समारंभ बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अनिल पाटील, कोकण विभगाचे पुरवठा उपायुक्त अनिल टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या उपस्थित पार पडणार आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 (जिमाका) :- स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी उपस्थित होते. यांचा झाला सन्मान तिलारी घाटात आयशर ट्रक दरीत कोसळून अपघात झाला होता. यावेळी पो. कॉ. विजय जाधव व किरण आडे यांनी स्थानिक रहिवाशी रोहित नाईक व सुरज बाळू पवार यांच्या साथीने दरीत उतरून आयशर चालक शशीकुमार व क्लीनर विजय मनगुप्ते यांना तात्काळ बाहेर काढले व वैद्यकीय उपचाराकरिता चंदगड येथे पाठवून त्यांचा जीव वाचविला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटक निवास, तारकर्ली ता. मालवण येथील समुद्रात काही युवक पर्यटक बुडत असल्याचे कळताच क्षणी MTDC चे पर्यटन अधिकारी, पर्यटक निवास, इसदा स्कूबा डायविंग सेंटर तारकर्लीचे कर्मचार...

स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द -पालकमंत्री नितेश राणे

•सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा UNESCO च्या यादीमध्ये समावेश •सिंधुदुर्ग जिल्हा 'AI' वापरामध्ये देशात प्रथम •वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या संधी सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 (जिमाका) :- सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. अशा अनेक महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास मी पालकमंत्री म्हणून प्राधान्य देणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर समन्वयाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंड मैदानात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या समारंभास खासदार आमदार दिपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष द...

जागतिक अवयवदान दिन श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, यांच्या वतीने श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यांत आला. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्यांत आले आणि अवयवदान करण्याची शपथही देण्यांत आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश ढेले व समाजसेवा अधिक्षक सुनिल कुंडगिर उपस्थित होते. श्री. ढेले यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाच्या सामाजिक आणि वैद्यकीय महत्वाविषयी सविस्तर माहिती दिली. अनेक गरजू रुग्णांना अवयवदान केल्यामुळे कसे नवजीवन मिळू शकते हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच सुनिल कुंडगिर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाद्वारे गरजू रुग्णांना कशा प्रकारे मदत केली जाते याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तकेंद्र आणि रक्त विघटन विभागामार्फत नितीन तुरनर यांनी रक्तदानाचे महत्व...

जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग यांच्याव्दारे जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या. यास्पर्धेकरिता जिल्ह्यातून 78 खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली असून जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, 14 वर्षाखलील मुले प्रथम- श्रीकृष्ण विजय राठोड, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे व्दितीय- रिचर्ड बेंटो रॉड्रीक्स, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुल, कोलगांव तृतीय- सार्थक राजकुमार वायंगणकर, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे चतुर्थ - रोनक राकेश पवार, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कुल, कोलगांव पाचवा - जयेश विश्वनाथ राणे, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कुल 14 वर्षाखालील मुली प्रथम- अस्मी धीरज सावंत, स्टेप...