Posts

Showing posts from October, 2025

फळ पीक विमा नुकसान भरपाई वितरण • पालकमंत्री नितेश राणे यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती

• प्रतिकात्मक धनादेशाचे वितरण • दिवाळीपूर्वी पूर्णतः नुकसान भरपाई देण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व पात्र आंबा-काजू बागायतदार यांना विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर प्रत्यक्ष कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक बी. प्रभाकर भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई, अनिल कुंभारे सहाय्यक महाप्रबंधक भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई हे उपस्थित होते. यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात नुकसान भरपाई धनादेशाचे वितरण करण्यात आले. धनादेश वितरणानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या वर्षी ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या तशा प्रकारच्या त्...

वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का):- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने जिल्हा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, यांच्या हस्ते करण्यात आले. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथालयात आलेली नवीन पुस्तके तसेच, दिवाळी अंक ठेवण्यात आले आहेत. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई , जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्तलचे ग्रंथप्रदर्शन 15 ते 17 ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिधुदु‌र्ग येथे सर्वासाठी मोफत खुले राहिल. तरी वाचक, सभासद, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांनी आयोजि...

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी • पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभाग निहाय आढावा • निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग नगरी दिनांक १५ (जिमाका वृत्तसेवा) जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाकरीता सन २०२५-२६ करीता रु २८२.०० कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययापैकी ३० टक्के रक्कम म्हणजेच रु ८४.६० कोटी रुपये दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी प्राप्त झालेले होते. जिल्हा नियोजन समितीकडून १५ ऑक्टोबर पर्यन्त १५१.३० कोटी रुपये रक्कमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीस प्राप्त रु.८४.६० कोटी रुपये निधीपैकी ५८.२६ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. वितरीत निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे प्रत्येक यंत्रणा निहाय आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील निधी वितरणाची टक्केवारी ६८.८७ एवढी आहे. राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांना प्राप्त ३० टक्के निधीपैकी यंत्रणाना निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडून विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आलेल्या असुन प्रशासकीय मान्यतेची व निधी वितरणाची कार्य...

सैनिक स्कूल प्रवेशासाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक १४ (जिमाका) :- लेप्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), कमांडंट, सैनिक स्कुल, यशवंतराव भोसले मिलीटरी स्कुल, सावंतवाडी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास पत्रान्वये कळविले आहे. सावंतवाडी येथे लवकरच सैनिक स्कुलची स्थापना होणार आहे. त्याकरीता शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवारत व माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी सैनिक स्कूल प्रवेशासाठी करिअर कौन्सिलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक सेवारत सैनिक व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहीतीसाठी लेप्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), कमांडंट, सैनिक स्कुल, यशवंतराव भोसले मिलीटरी स्कुल, सावंतवाडी यांचा Mob No, ९९७१४०५०९९ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच कार्यालयाचा दूरध्वनी क्र-०२३६२-२२८८२० वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. ००००००

बांधकाम विभागाची सर्वसाधारण सभेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या समितीची मासिक सर्वसाधारण सभा दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी 5.45 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली, असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांनी दिली आहे. ०००००

जिल्हा परिषद आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 14 (जिमाका) :- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम,1961 (सन 1962 चा अधिनियम,5)चे तरतुदी अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रिंयासह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 च्या प्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत, प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्र. उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे. या आरक्षणाची माहिती पाहण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तहसिलदार कार्यालय, व जिल्ह्यातील सर्व पंचयात समिती कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आह...

लिपिक टंकलेखक पदासाठी माजी सैनिकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका) सैनिक कल्याण विभागाच्या अधीपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (ग-क) एकुण-72 पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैकिन कल्याण अधिकारी यांनी केले आहे. वरील पदापैकी 1 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवरामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टिसीएस – आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकरण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. ०००००००

तक्रार समिती गठीत करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम,2013 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमांचे कलम 4 अन्वये ज्या कार्यालयांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बा.भि शिणगारे यांनी दिली आहे. आस्थपनेंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम,2013 च्या कलम 23 नुसार कार्यालयाअंतर्गत तक्रार समिती गठीत न केल्यास, वार्षिक अहवाल सादर न केल्यास अथवा या अनिनियमातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन न केल्यास (अंतर्गत समितीचे गठन न केल्यास ) नियोक्त कार्यालयप्रमुख यांना 50,000/ (रु. पन्नास हजार ) पर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच हाच गुन्हा पुन्हा केल्यास त्यासाठी लायसन्स रद्द किंवा दुप्पट दंड अशा कठोर शिक्षेची तरतूद आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना तसेच इंटरप्...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 13 (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालय, सिंधुदुर्ग संस्थेच्या 100 विद्यार्थी क्षमता व 500 खाटांचे रुग्णालय तसेच इतर अनुषंगिक बांधकाम सुरु आहे. त्यामुळे सध्याचा रुग्णालयात येण्यासाठी असलेला मुख्य मार्ग दिनांक 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे. या कालावधी दरम्यान रुग्णांना ये जा करण्याकरिता रुग्णालयाच्या मागील बाजुने विश्रामगृह सिंधुदुर्गनगरी रोड येथून पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. वाहतुकीसाठी आवश्यक दिशादर्शक फलक व माहीती या मार्गावर जागोजागी लावण्यात आली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी बसचालक आणि अन्य वाहनचालकांना नवीन पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोबत: पर्यायी मार्गाचा, नकाशा) ००००

समुद्र किनाऱ्यावरील जीवितहानी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 रोबोटिक वॉटर क्राफ्ट

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- जिल्ह्यात समुद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. समुद्रात बुडत असणाऱ्या व्यक्तीला तात्काळ वाचविता यावे या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एकूण १३ स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग च्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावास पालकमंत्री नितेश राणे, यांनी मंजुरी देवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना १३ स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत क्राफ्टची खरेदी करून त्याचा पुढीलप्रमाणे पुरवठा करण्यात आलेला आहे. अ.क्र. तालुका नगरपालिका/ नगरपंचायत/ ग्रामपंचायतीचे नाव नग संख्या 1 वेंगुर्ला नगरपालिका वेंगुर्ला 01 2 ग्रामपंचायत सागरतीर्थ 01 3 ग्रामपंचायत उभादांडा 01 4 ग्रामपंचायत शिरोडा 01 5 देवगड नगरपंचायत देवगड जामसंडे ...

क्रिटीकल केअर ब्लॉक रुग्णालयाचे काम दर्जेदार व मुदतीत पूर्ण करा - पालक सचिव विरेंद्र सिंह यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि. १० (जि.मा.का.) -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या उन्नतीसाठी सुरू असलेल्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेताना जिल्ह्याचे पालक सचिव तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी आयुष इमारत, क्रिटिकल केअर ब्लॉक (सी.सी.बी.एच.) हॉस्पिटल बांधकाम जागा आणि जिल्हा औषध भांडार येथे भेट देऊन सखोल पाहणी केली. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा औषध भांडार याची उभारणी करीता आवश्यक जागा जिल्हा मुख्यालयात उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिल्या. हे जिल्हा औषध भांडार जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आरोग्य संस्थांकरीता कार्यरत असणार आहेत. या पाहणीदरम्यान श्री. सिंह यांनी क्रिटिकल केअर ब्लॉकच्या बांधकामाविषयी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली आणि बांधकाम निर्धारित मुदतीत व उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी ते म्हणाले की, शासनाच्या सर्व आरोग्य योजना आणि सेवा या नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहि...

‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या ‘स्टँन्ड अप इंडिया’ योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता 15 टक्के मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक, सूचना www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याकडे अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. 00000

अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे आभासी उद्घाटन संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रमांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने उद्घाटन संपन्न झाल्याची माहिती ओरोस येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्य ए.एस.मोहारे यांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवी मुंबई विमानळाच्या उद्घाटनाचा थेट प्रक्षेपण उपस्थित प्रमुख मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, शाळांचे शिक्षक व विद्यार्थी यांना दाखविण्यात आला. त्यानंतर अल्पमुदतीच्या उद्घटनाचा कार्यक्रमाचा Live देखिल सर्व उपस्थित मान्यवर अधिकारी, प्रशिक्षणार्थी, शाळांचे विद्यार्थी यांना दाखविण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे 300 प्रशिक्षणार्थी शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे प्राचार्य, ए.एस.मोहारे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे गटनिदेशक श्री.गोरे यांनी केले. पद्मश्री रम...

"शासन आपल्या दारी­" मोहिमेत अंतर्गत मोबदला वाटप शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- "शासन आपल्या दारी­" मोहिमेअंतर्गत ज्या मोबदला धारकांनी अद्याप पर्यंत मोबदला घेतलेला नाही. अशा मोबदला धारकांना मोबदला वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ऐणारी ता. वैभववाडी येथे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये भूसंपादन प्रस्ताव क्र. २२/२००७ ऐणारी मधील एकूण 24 मोबदला धारकांना मोबदला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. तसेच इतर खातेदारांना कागदपत्रांविषयी व त्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची,माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिरोडकर यांनी दिली. या शिबिरास भुसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, सरपंच श्रीमती सुर्वे, पोलीस पाटील, ग्रामस्थ, भुईबावडा येथील मंडळ अधिकारी, तलाठी व उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. ००००००

भूसंपादन मोबदला वाटपासाठी विशेष कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का):- लघु पाटबंधारे योजना कुंभवडे यांचा भूसंपादन प्रस्ताव क्र.12/2019 या प्रस्तवांमधील खातेदारांना मोबदला वाटप करण्यासाठी दिनांक 7 ते 10 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय कुंभवडे येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी सं.शिरोडकर यांनी दिली आहे. तरी संबंधीत खातेदारांची यादी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी यादीतील खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह नमूद दिवशी मोबदला स्विकारण्यासाठी उपस्थित रहावे. मोबदलला वाटपाची कार्यवाही उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) जिल्हा मुख्याल, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रे रेशनकार्ड झेरॉक्स प्रत, खातेदारांचा 1 फोटो, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्सप्रत, रद्द झालेला धनादेश, बोजा विरहीत अद्यावत 7/12, जर 7/12 मध्ये इतर हक्कामध्ये बोजा असल्यास संबंधित संस्था,बँक यांचे रक्कम स्विकारण्यासाठी नाहरकत दाखला. खातेदार मयत असल्यास वारस हक्काचा पुरवा, खातेदार 18 वर्षाखालील असल्यास पालन पोषण...

व्यसनमुक्त गड किल्ले संवर्धन मोहिमेचा 11 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड- किल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे, यांच्या हस्ते 11 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता वेंगुर्ला तालुक्यातील यशवंतगड, रेडी येथे होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आदी उपस्थित राहणार आहेत. नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस विभाग, दुर्गा मावळा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि दुर्गा रक्षक प्रतिष्ठान रेडी यांचा सहभागाने व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आयोजनातून राबवण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्यांवर अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जगाच्या नकाशावर ऐतिहासिक वारसा स्थळे असणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले हे शिवप्रमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणादायी स्थळे असली तरी सध्या अनेक ठिकाणी नशेच्या पदार्थाचा वापर व अस्वच्छता वाढलेली आहे. या पार्श्वभूम...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 27 ऑक्टोंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का):- ऑक्टोंबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.20 ऑक्टोंबर 2025 रोजी स्थानिक सुट्टी घोषित केलेली आहे. त्यामुळे माहे ऑक्टोंबरचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 27 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी प्रश्न मांडून त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हा...

जिल्ह्यात 7 ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत यलो अलर्ट या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- जिल्ह्यात ७ ते १० ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची आणि ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४)विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. (६) विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. (७) धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. (८) वीज पडण्याची पूर्...

दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यतील 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी · पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स · 25 गावे इको सेन्सिटीव्ह

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. 198/2014 सह 179/2012 मध्ये दि.5 डिसेंबर 2018 व दि 22 मार्च 2024 च्या आदेशाचे संपूर्ण दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे. अशी माहिती सावंतवाडी दोडामार्ग टॉस्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे. पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या भारत सरकार यांच्याकडील प्रस्तावीत अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यातील एकूण 25 गावांचा इको सेन्सिटीव्ह एरीयामध्ये समावेश आहे. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडोल जनहीत याचिका क्र. 198/2014 मध्ये दि. 5 डिसेंबर 2018 व दि.22 मार्च 2024 चे आदेशान्वये अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणेकामी व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समीती तयार करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलिस विभाग मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग Task Force समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी अस...

समन्वयक म्हणुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैन्य अधिकारी यांनी शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अल्पकालीन अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग येथे नाव नोंदणी करण्याचे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संख्या व शासकीय तांत्रिक विद्यालय यामध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधांचा सदुपयोग करुन अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्मिती करावयाची असल्याने या संस्थामध्ये स्थानिक गरजेनुसार अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. हे अभ्यासक्रम शासनाकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या संख्या व्यवस्थापन समितीव्दारे दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ पासुन चालविण्यात येणार आहेत. त्याकरीता लष्करी सेवेनंतर सेवनिवृत्त झालेल्या सशस्त्र दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा या अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या प्रभावी संचलनासाठी व्हावा, असा शासनाचा मानस आहे. जिल्ह्यातील इच्छुक सेवा निवृत्त सैन्य अधिकारी यांनी आपल्या नजीकच्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- उद्योग 4.0 युगामध्ये तंत्रज्ञानधिष्ठित कौशल्ययुक्त मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना तसेच सामान्य इच्छुक उमेदवारांना आधुनिक तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण देऊन औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ पुरविणे या उद्देशाने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्रातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये या अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस, येथे पहाता येणार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमामार्फत अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता जिल्ह्यातील विविध कार्यलयामार्फत औद्योगिक आस्थापना, औद्योगिक संघटना, लाडकी बहिण योजनाचे...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 ही रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचा कालावधी दि. 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोंबर पर्यंत होती. परंतु महाराष्ट्रत काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पुरस्थिती निर्माण झाल्याने परीक्षार्थी, उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अडचणींना सामोरे जावे लागल्याने परीक्षार्थी, उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. 4 ते 9 ऑक्टोंबर 2025 रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच विद्यार्थी, उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा शुल्क भरता न आल्यामुळे संबंधित परीक्षार्थी, उमेदवारांना नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डव्दारे दि. 9 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्री 11.59 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. संबंधित परीक्षार्थी, उमेदवारांन...

कोल्ड्रिफ सिरपमध्ये विषारी पदार्थ आढळल्याने वापर थांविण्याचे, अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 7 (जिमाका) :- कोल्ड्रिफ सिरप, (बॅच नं एस.आर 13) या कफ सिरफमध्ये विषारी पदार्थ आढळल्यामुळे त्याचा वापर नागरिकांनी तत्काळ थांबवावा. जर हे औषध कुणाकडे उपलब्ध असेल, तर ते जवळच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयास त्वरीत कळवावे किंवा ईमेल: acfdasnd2023@gmail.com माध्यमातून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्राशासनाचे सहाय्यक आयुक्त (औषध) श्री यादव यांनी केले आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. Coldrif Syrup (Batch No. SR-93) Mfg. Dr. May-२०२५, Exp. Dt. April-२०२७, manufactured by Sresan Pharma, Sunguvarchathiram, Kancheepuram District, Tamil Nadu यांच्याद्वारे उत्पादित केलेले असून त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol - DEG) हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्याकरिता अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्...

जिल्ह्यात 5 ते 8 ऑक्टोंबर या कालावधीत हलक्या व मध्यम पावसाची शक्यता या कालावधीत नागरिकांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त संदेश तसेच प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार अरबी समुद्रात शक्ती नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे या कालावधीत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच ५ ते ८ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागने वर्तविलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्य...

शिरोडा- वेळागर समुद्रातील घटना • आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले • मृतांची एकुण संख्या- 5 • 2 पर्यटक अद्यापही बेपत्ता

सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :- काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा - वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले होते. यातील 3 पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) श्रीमती. इसरा इमरान कित्तूर, वय 17 रा. लोढा, बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले होते. तीन मयत पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे 1. श्रीम. नहिदा फरीन इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत) 2. श्री. इबाद इरफान कित्तूर , वय 13, रा. लोंढा, बेळगाव (मयत) 3. श्रीमती नमीरा अफताब अख्तार, वय 16, रा. अल्लावर, बेळगाव (मयत) बेपत्ता पर्यटकांची शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध माहिमेत 4 ऑक्टोंबर रोजी पुढील 2 पर्यटकांचे मृतदेह शोध व बचाव पथकास मिळालेले आहेत. 1. श्री. इकवान इमरान कित्तूर, वय 15, रा. लोढा, बेळगाव (मयत) 2. श्री. फरहान मोहम्मद मणियार, वय 20 रा. कुडाळ, सिंधुदुर्ग (मयत) उर्वरित बेपत्ता पर्यकांची नावे पुढीलप्रमाणे 1. श्री. इरफान मोहम्मद इसाक, कित्तूर, वय 36, रा. लोंढा, बेळगाव 2. श्री. जाकीर निसार मणियार,वय 13,...
राज्य रोजगार मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम https://youtube.com/live/OCb9BESt0S0

प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा सन्मान करावा- प्रा.डॉ. नंदकुमार मोरे अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य विशेष मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) :भाषा जितकी व्यवहारात अधिक असेल तितकी ती समृद्ध होते. त्या भाषेची उपयोगिता वाढते.त्यामुळे शक्य असेल ते सर्व व्यवहार मराठीतून व्हावे मराठीतून संभाषण व्हावे आणि मराठीतूनच प्राथमिक शिक्षण व्हावे,असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांनी आज येथे केले. जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य विशेष मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके होते.या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर,जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सहायक संचालक वृषाली पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव आणि साहित्य संपदेला प्रोत्साहन देण्यासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनांक 3...

अनुकंपा तत्त्वावरील व लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते 4 ऑक्टोबरला होणार कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी दिनांक 03(जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडणार आहे. यावेळी मुंबई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था देखील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमास आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील तरुणाईसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह शासकीय सेवेत नव्या उमेदवारांचे स्वागत करण्याचा हा उपक्रम जिल्ह्यातील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. कार्यक्रमाची रुपरेषा- जिल्हास्तरावरील कार्...

ई आर 1 विवरणपत्र 31 ऑक्टोंबरपर्यत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.03 (जि.मा.का): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्यबळाचे माहे सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 31 ऑक्टोंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय,निमशासकीय, खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकार आहे. सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक, आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02362 228835 वर संपर्क साधावा. 000000

2 ऑक्टोबर गांधी जयंती विशेष लेख गांधीजी आणि मानवता

2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस.महात्मा गांधी यांचे कार्य,त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम,दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले. त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे निस्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तूपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्या...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय व्याज परताव्यासोबतच आता उद्योजकता प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेव पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महामंडळ आता केवळ बैंक कर्जावरील व्याज परतावा (Interest Reimbursement) योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व Mentorship देखील देणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना केवळ आर्थिक मदत न देता, त्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीनेउद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. ज्यामध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारमध्ये "पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय" या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गद...

‘दिव्यांग बालक सक्षमीकरण’ शिबीर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिव्यांग बालकांची ओळख / तपासणी करण्यासाठी जिल्हयामध्ये दिनांक २७ सप्टेंबर, 2025 रोजी दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश विद्या देशमुख, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, सावंतवाडी तालुका वकील संघ अध्यक्ष बाळाजी रणशूर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत राबविल्या जाणा-या विविध योजना व सेवा, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गमार्फत दिव्यांग बालकांसाठी मोफत ओळख व तपासणी तसेच आरोग्य तपासणी, आरोग्य विभागामार्फत दिव्यांग बालकांचे आभाकार्ड/आयुष्यमान कार्ड काढणे, तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी मार्फत दिव्यांग बालकांना जातीचे दाखले देणे, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, सावंतवाडी, यांच्यामार्फत नेत्र तपासणी व पोस्ट ऑफिस, सिंधुदु...

“पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजने”साठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना” शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सन २०२५-२६ योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्याक्रमध्ये (बिगर व्यावसायिक अभ्यसक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाचे आहे. ०००००

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने’साठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थीनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सन 2025-26 योजनेकरिता विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील (बिगर व्यावसायिक अभ्यासक्र वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने 26 ऑक्टोबर पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग. यांच्याकडे जमा करावयाचे आहे. ००००००

शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेशाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 1 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन 2025-26 करीता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या (बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने 26 ऑक्टोबर, 2025 पर्यंत अर्ज https://hmas.mahail.org या संकेतस्थळावर भरावा. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक संचालक, इतर मागास बहून कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयाकडे जमा करावी असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावयायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, बांधकरवाडी कणकवली येथे सुरु झाले आहे. या वसतीगृहात सन २०२५-२६ साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा दर्शविणारे विवरणपत्र खालील प्रमाणे. अ.क्र प्रवर्ग एकुण आक्षण व्य...

समूह साधन केंद्र समन्वयक विभागीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने 1 ते 5 डिसेंबर कालवधीत

सिंधुदुर्गनगरी दिनांक 1 (जिमाका) :- जिल्हा परिषदमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि.1 ते 5 डिसेंबर, 2025 या कालवधीत आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्‍ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे. 000000

शैक्षणिक प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 1 (जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सन २०२४-२५ ची शैक्षणिक प्रकरणे के. एस. बी. (KENDRIYA SAINIK BOARD) ला ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची On Line Site दिनांक २४ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. तरी पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी यांनी आपली के. एस. बी. प्रकरणे (जसे की पाल्यांची १ ली ते ९ वी पर्यंतची शैक्षिणक प्रकरणे, १० वी ते १२ वी ची शैक्षिणक प्रकरणे, PM Scholarship, Pemury Grant व मुलीचा विवाह) केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांना सादर करावयाचे आहे. संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी प्रकरण सादर करताना घ्यायवाची दक्षता – सैनिक कल्याण विभाग पुणे यांचे DSW PUNE या संकेतस्थळावर माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीर नारी यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे. अर्जात सर्व माहीती केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या नमुन्यात सर्व माहीती पूर्ण भरावयाची आहे. त्यासाठी आता नवीन प्रणालीसाठी स्वतःचा ई-मेल आयडी अनिवार्य आहे. सर्व मुळ कागदपत्रे Upload करावी. कोणत्याही प...