सोमवारी जागतिक बाल कामगार विरोधी दिन

सिंधुदुर्गनगरी दि.9 (जि.मा.का):- १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ - उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निमार्ण व्हावी, याकरीता सातत्याने शासनाच्या विविध विभागामार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. १४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यास आलेला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामगार ठेवणे हा फोजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महीने ते २ वर्षापर्यंत वाढविता येईल, इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान रुपये २० हजार व कमाल रुपये ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ वर्ष ते ३ वर्षापर्यंत वाढवता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सर्व औद्योगिक संघटना असोशिएशन, व्यापारी असोशिएशन, क्रिडाई बांधकाम व्यवसायातील मालक असोशिएशन व वीटभट्टी असोशिएशन, सर्व शासकीय / निमशासकीय संस्था नागरीक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरीता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा व आपला जिल्हा बालकामगार मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'