ऑनलाईन रोजगार मेळाव्यात उद्योजक व उमेदवारांनी सहभागी व्हावे

सिंधुदुर्गनगरी दि.13 (जि.मा.का):- उद्योजकांनी सिंधुदुर्ग पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा २ मध्ये रिक्तपदे अधिसूचित केल्यानंतर नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर स्वतःच्या लॉगीनने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी अर्ज करावे. जिल्हयातील जास्तीत जास्त उद्योजक व उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने जिल्हयातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दिनांक २८ जून २०२३ रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकांनी आपल्या आस्थापनेवरची रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Sindhudurg Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair २ मध्ये अधिसूचित करावीत. ज्या उद्योग आस्थापनांनी वरील पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी प्रथम वरील पोर्टलवर नोंदणी करून रिक्तपदे अधिसूचित करावीत. अधिक माहितीसाठी संपर्क- ०२३६२-२२८८३५ अथवा sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'