Posts

Showing posts from November, 2024

जिल्हा युथ आयकॉन निवडीकरीता इच्छुकांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 या वर्षापासून दरवर्षी दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो. याकरिता ज्या युवांनी युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वयोगटातील युवांची 10 नावे युथ आयकॉन म्हणून जिल्हास्तरावरून विभागस्तराकरिता निवडण्यात येतील. तरी इच्छुक युवांनी आपल्या कार्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करावी. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड (संपर्क क्रमांक. ९७६६९६५९९६/ ९१०३९३६०९८) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा. ०००००

पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात प्रगणकांना पशुपालकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी 25 (जि.मा.का) :- पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षींनी पशुगणना केली जाते. या अंतर्गत 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस 25 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ होत असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुटपक्षी आदी प्रजातीच्या जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. ग्रामीण भागासाठी 87 आणि शहरी भागासाठी 9 असे एकूण 96 पशुगणनेसाठी प्रगणक तर ग्रामीण भागासाठी 16 आणि शहरी भागासाठी 1 असे एकूण 17 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणकांद्यारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनांसाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी जनावराची अचुक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.सी. बलोलीकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. ठाकूर यांनी केले आहे. 000

ाजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी

र सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 रविवार 1 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्यनियर कॉलेज या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितिन राऊत यांनी दिली आहे. या परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 583 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ (KD001001 ते KD 001192), कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्यनियर कॉलेज (KD 002001 ते KD002391). या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना:- उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दिड तास अगोदर उपस्थित रहावे. येताना सुधारीत प्रवेशप्रमाणपत्र, ओळखीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक आयोग ओळखपत्र, स्मार्ट कार्ड व ड्रायव्ह...

पुस्तके उपलब्ध करुन देण्यसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- समग्र शिक्षा अंतर्गत महावाचन उत्सव 2024 या उपक्रमांतर्गत इयत्ता 3 री ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वयानुरुप वाचनीय पुस्तकांची खरेदी करवयाची आहे. त्यासाठी पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी पुरवठादाराकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. पुरवठादाराकांनी सीलबंद दरपत्रके जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षणाधिकारी यांच्या नावे दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत समग्र शिक्षा जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे. या दरपत्रकांचा नमुना शिक्षण विभाग सिंधुदुर्ग नोटीस बोर्ड व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. अटी व शर्ती सदरची दरपत्रके प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून दि.५/१२/२०२४ पर्यंत दुपारी १४.०० वा. पर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) समग्र शिक्षा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून स्विकारण्यात येतील तसेच सदरची दरपत्रके शक्यतो त्याच दिवशी दुपारी १६.०० वा उघडण्यात येतील. दरपत्रकाच्या लखोट्य...

बंदुक परवान्याच्या नुतणीकरणाची प्रक्रीया

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यांनी परवान्याचे नूतनीकरणासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील असलेल्या उपचिटणीस शाखेत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खालील आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे. 1. शस्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे). 2. शस्र वापरण्यास शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे Form S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र.3. शस्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form - S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्यानिशी सादर करावा.4. शस्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्र पडताळणी प्रमाणपत्र.5.सरपंच/पोलीस पाटील/नगराध्यक्ष / यांच्याकडील रहिवाशी व वर्तवणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड.6. मुळ शस्र परवाना अर्जासोबत जोडावा.7. परवाना नुतनीकरण 5 वर्षाकरीता फी रु. 2500/...

उच्च न्यायालय व खंडपीठांचे दोन दिवस विशेष लोक अदालत पक्षकारांना आभासी पध्दतीने सहभागी होता येणार

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेले खटले सिंधुदुर्गातुन आभासी पध्दतीने विशेष लोक अदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी विधी सेवा प्राधिकरणाने उपलब्ध केली आहे. मुंबई, उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे दि. 30 नोव्हेंबर 2024 व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोक अदालतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे या ठिकाणी प्रलंबित आहेत व ती तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात. या विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी (ऑनलाईन) पध्दतीने सहभागी होऊ शकतात. सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रकरणे उच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन अध...

जिल्ह्यात 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शनिवार दि. 14 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे. सन 2024 वर्षातील हे चौथे लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेणेबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येते. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दि. 14 डिसेंबर 2024 चे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिल यांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झ...

''घर घर संविधान" कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून ''घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान घेण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सोमनाथ कदम, (व्याख्याते) इतिहास विभाग प्रमुख कणकवली कॉलेज कणकवली उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन, संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. त्याचबरोबर सर्व विभागप्रमुख यांनी शासन निर्णयामध्ये शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे वर्षभरामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करुन सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी संविधान आज घराघरात पोहचले पाहिजे ही जबाबदारी सर्व नागरीकाची असून य...

राष्ट्रीय युवा महोत्सवाअंतर्गत "भारत यंग लिडर्स डायलॉग" चर्चासत्रात सहभाग होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 – विकास भारत यंग लीडर्स डायलॉग चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. भारत सरकारने विकसित भारत युवा नेते संवाद म्हणून राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दरम्यान देशभरातून निवडलेले 3 हजार तरुण-तरुणी 12 ते 13 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांसमोर विकसित भारताचे त्यांचे व्हिजन मांडतील आणि सादर करतील. चर्चासत्र काळात तरुणांना देश-विदेशातील तरुण आयकॉन्सशी चर्चा करण्याच्या आणि शिकण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. कार्यक्रमाचा उद्देश देशभरातील तरुण नेतृत्व प्रतिभेचा शोध घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, विकसित भारताची त्यांची दृष्टी स्पष्ट करण्यासाठी तरुणांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना सर्वोच्च निर्णय घेणारे आणि प्रसिद्ध जागतिक आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांशी जोडणे आणि विकसित भारताचे नेतृत्व करण्यासाठी ...

संविधान सप्ताहाचे 2 डिसेंबरपर्यंत आयोजन

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने समाज कल्याण विभागांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2024 या कालावधीत संविधान सप्ताहाचे आयोजन करुन संविधान दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, यांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, विविध महामंडळे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग या कार्यालयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. दि.26 नोव्हेंबर 2024 ते दि. 02 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील शाळा व महाविदयालयांमध्ये तसेच अधिनस्त शासकीय वसतिगृहे, शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिका दर्शनी भागात लावून संविधान रॅली काढण्याचे गृहपाल, मुख्याध्यापक, प्राचार्य यांना सूचित करण्यात आले आहे. संविधानातील माह...

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

सिंधुदुर्गनगरी 26 (जि.मा.का) :- भारताच्या संविधान दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, नितीन राऊत ,आरती देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ०००००

जिल्ह्यात 6 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.२१ (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मतमोजणी, निकाल नंतर मिरवणुका, तसेच दि. ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी/ महापरिनिर्वाण दिन, बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेमुळे हिंदु समाजातर्फे विजय दिवस व मुस्लीम समाजाकडून काळा दिवस पाळला जातो, तसेच जिल्ह्यात वैयक्तिक व सामाईक मागणीकरीता उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विधानसभा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ गृहमतदानात जिल्ह्यात २ हजार ३७० पैकी २ हजार २७३ मतदान

सिंधुदुर्ग, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली.जिल्ह्यात दि १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान गृहमतदानाची प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यात २ हजार ३७० पैकी २ हजार २७३ मतदारांनी गृहमतदान केले. विधानसभा संघनिहाय गृह मतदारांची संख्या व कंसात एकूण मतदान पुढीलप्रमाणे आहे. 268- कणकवली- 1 हजार 116 पैकी 1 हजार 055 , (अपंग- 158, ८५ वर्षांपुढील - 897) 269- कुडाळ- 638 पैकी 612 (अपंग- 60, ८५ वर्षांपुढील - 552) 270- सावंतवाडी- 616 पैकी 606 (अपंग- 91, ८५ वर्षांपुढील - 515) मतदारांनी मतदान केले. 0000000

समाज माध्यमांवर व्हायरल होणारा संदेश चुकीचा मतदार यादीतून नाव वगळल्यास नव्याने नाव नोंदणी करणे बंधनकारक जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती

सिंधुदूर्ग दि १७ (जिमाका) गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत असून या संदेशाद्वारे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. या संदेशामध्ये असे नमूद आहे की ,‘ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा. अशा प्रकारचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. या संदेशाचे जिल्हा प्रशासनाकडून खंडन करण्यात आले असून याबाबत सत्यता पुढीलप्रमाणे.. मतदान यादी मधून मतदाराचे नाव वगळल्यास मतदान करता येत नाही. अशावेळी मतदाराने आपल्या नावाची नव्याने मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदवण्यासाठी नामनिर्देशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदाराला संधी असते, त्यानंतर मतदार यादी मध्ये नाव नोंदविता येत नाही. त्यामुळे सध्या ज्या मतदाराचे नाव मतदार यादीमधून वगळले आहे त्यांना २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क...

विधानसभा निवडणूक - २०२४ निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात, आता मतदानपूर्व काळातील आचारसंहिता उल्लंघनाबाबत योग्य कार्यवाही करा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून प्रशासनाला सूचना

सिंधुदुर्ग, दि.१७ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत आवश्यक तयारी झाली असून मतदानपूर्व काळात आदर्श आचासंहितेचे योग्य पालन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य कार्यवाही करावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहिता उल्लंघन होवू देवू नका. तसे झाल्यास तात्काळ गुन्हे नोंदवावेत अशा सूचना नोडल अधिकारी यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या. शेवटचे ७२ तास, ४८ तास या कालावधीत आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आचारसंहिता पालन झालीच पाहिजे. कुठेही अनियमितता दिसता कामा नये. स्थिर, फिरत्या पथकांची आवश्यकता वाटल्यास अजून त्यांच्या नेमणुका कराव्यात, मात्र कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी श्रीमती श्रध्दा पोवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे, परिवहन उपायुक्त विजय काळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, लिड बँकेचे श्री मेश्राम तसेच संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते. शेवटच्या कालावधीत प्रचार ...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणांना मान्यता

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ, 270- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्राच्या ठिकाणांना भारत निवडणूक आयोगाने खालीलप्रमाणे मान्यता दिली, असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. मतदार संघाचे नाव, कंसात मतमोजणी केंद्राचे ठिकाण 268- कणकवली विधानसभा मतदार संघ (कणकवली कॉलेज कणकवली, HPCL हॉल, तळमजला कणकवली.) 269- कुडाळ विधानसभा मतदार संघ (तहसिलदार कार्यालय कुडाळ येथील मध्यवर्ती सभागृहाची जागा) 270- सावंतवाडी विधानसभा मतदार संघ (तहसिलदार कार्यालय सावंतवाडी येथील आतील मोकळा पॅसेज) अशी आहेत. ०००००

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 गृह मतदानाला सुरुवात

लोकशाही बळकट करण्यासाठी मी मतदान केले, सर्वांनी मतदान करावे झाराप येथील शंकुतला सामंत यांचे मतदारांना आवाहन सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : मी ८६ वर्षांची महिला असून मतदानाच्या दिवशी मला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी खूप अडचण येत होती. भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे आता आमच्यासारख्या वयस्क व्यक्ती घर बसल्या मतदान करु शकतात. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कुडाळ विधानसभा मतदार संघातील ८६ वर्षीय मतदार शकुंतला सिताराम सामंत यांनी. झाराप येथील शकुंतला सामंत यांच्या निवासस्थानी जाऊन गृह मतदान पथकाने मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील हे देखील उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तसेच दिव्यांग मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मतदानाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६९-कुडाळ विधानसभा ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- 2024 अनुचित प्रकार रोखण्यासाठी सागरी किनाऱ्यावरील गस्त वाढवा -केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद · राज्य सीमेवरील वाहनांची कडक तपासणीचे निर्देश · रेल्वे स्थानकांवर यंत्रणा कार्यान्वित करावी · अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवावे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी गोवा कोस्टल गार्ड आणि जिल्हा पोलिस यांनी संयुक्त पथक स्थापण करावे. हे संयुक्त पथके सागरी क्षेत्रात २४ तास गस्त घालून संशयित हालचालींवर लक्ष ठेवतील यासाठी तात्काळ संयुक्त पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद यांनी दिलेत. केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद यांच्या अध्यक्षतेखाली आज सावंतवाडी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक खर्च निरीक्षक दिव्या के.जे., जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील तसेच गोवा राज्यातील उत्पादन शुल्क विभाग, परीवहन विभाग, सागरी सुरक्षा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद म्हणाले, येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान ...

लोकशाही जनजागृती दिंडीस‍ जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवा झेंडा नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे -जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. नवमतदारांनी मतदान तर करायचेच आहे शिवाय त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावायचे आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून कणकवली शहरात आज कणकवली नगर पालिका आणि कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही दिंडी, रॅली, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे , मुख्याधिकारी गौरी प...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक सखी, युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार

सिंधुदुर्ग, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक महिला, एक युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहेत. विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. मतदारांना मतदानासाठी कोणत्याही अडचणी येवू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे जिल्हा प्रशासन सर्व तयारी करीत आहे. आयोगाच्या सुचनांप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक महिला, एक युवा व एक दिव्यांग मतदान केंद्र राहणार आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रात एकूण ३ महिला, ३ युवा आणि ३ दिव्यांग असे एकूण ०९ विशेष मतदान केंद्र राहणार आहेत. महिला मतदान केंद्रावर मतदान अधिकारी पासून सर्व कर्मचारी हे महिला, युवा मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी हे युवा राहणार असून दिव्यांग मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी राहणार आहेत. हे या मतदान केंद्रांचे वैशिष्ट्य असणार...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानाच्या दिवशी मुद्रीत माध्यमात दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान 2 दिवस अगोदर करावा लागणार अर्ज

सिंधुदुर्गनगरी दि.11 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर (१९ नोव्हेंबर) व मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर) मुद्रीत माध्यमातून राजकीय पक्ष व उमेदवारांच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. अशा जाहिरातींसाठी प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या २ दिवस अगोदर समितीकडे अर्ज करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. मतदानाच्या दिवशी (२० नाव्हेंबर) व मतदानाच्या एक दिवसापूर्वी (१९ नोव्हेंबर) प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 तपासणी नाक्यावरील पथकांनी अधिक दक्ष राहण्याचे निर्देशराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची इन्सुली तपासणी नाक्याला भेट

सिंधुदुर्ग नगरी दि ९ (जिमाका) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी इन्सुलि येथील तपासणी नाक्याला (चेक पोस्ट) भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तपासणी नाक्यावरील पथकांनी अधिक दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम डी शेवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आढावा बैठक घेऊन अडीअडचणी समजून घेतल्या. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवरील पथकाने दक्ष राहावे, गोवा राज्यातून येणारे अवैद्य मद्य यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे यांनी विभागाने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले आचारसंहिता लागू झाल्यापासून ते ९ नोव्हेंबर पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण ४४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये १० वाहनासह एकूण ६९ लाखा...

जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्या विविध ठिकाणी भेटी स्ट्रॉंग रूम, मतमोजणी परिसर, आंबोली येथील चेक पोस्टची केली पाहणी

सिंधुदुर्ग नगरी दि १० (जिमाका) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली येथील स्ट्राँग रूमला तसेच सावंतवाडी येथील स्ट्राँग रूम, मतमोजणी परिसराची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, सहायक निवडणूक अधिकारी श्रीधर पाटील, ओंकार ओतारी उपस्थित होते. श्री पाटील यांनी आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्र केंद्राची आणि स्थिर सर्वेक्षण पथकाची पाहणी करून आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना दिल्या.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ कणकवली विधानसभा मतदार संघात १५ ते १७ नोव्हेंबरला होणार गृहमतदान; १११६ वृद्ध, दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सिंधुदुर्ग, दिनांक ९ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार २६८- कणकवली विधानसभा मतदार संघात १ हजार ११६ मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहे. या मतदारांसाठी १५ ते १७ नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती कणकवली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर यांनी दिली आहे. याकरीता कणकवली विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या १ हजार ११६ एवढी आहे. यात ८५ वर्षावरील ९५५ मतदार असून १६१ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारां...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रथम तपासणी पुर्ण

सिंधुदुर्गनगरी दिनांक 9 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त):- निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रथम तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघाची एकत्रीत बैठक संपन्न झाली, असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. या बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे., समन्वय अधिकारी जिल्हा खर्च सनियंत्रण समिती अमित के. मेश्राम व डॉ. शिवप्रसाद खोत, तीनही विधानसभा मतदार संघातील सहाय्यक खर्च निरीक्षक, लेखापथक, व्हिडीओ पाहणी पथक प्रमुख तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार, प्रतिनिधी या बैठकीस उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन दिनांकापासून ते दि.7 नोव्हेंबर 2024 पर्यंतचे सर्व उमेदवारांचे खर्चाच्या नोंदवहीची प्रथम तपासणी करुन यामधील उणिवांबाबत अभिप्राय दिला. खर्च निरीक्षक यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक कालावधी दरम्यान निवडणूक लढवणाऱ्या उमेद...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 12 हजार 316 तर 85 वर्षावरील 10 हजार 198 मतदार

सिंधुदुर्गनगरी दिनांक 5 नोव्हेंबर 2024 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 03 विधानसभा मतदार संघात एकूण 6 लाख 78 हजार 928 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष मतदार 3 लाख 36 हजार 991 , स्त्री मतदार 3 लाख 41 हजार 934 तर 3 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढीलप्रमाणे. 268 कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 31 हजार 740 (पुरूष 1 लाख 14 हजार 379, स्त्री 1 लाख 17 हजार 359 तर 02 तृतीयपंथी एवढे मतदार आहेत. 269- कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 17 हजार 186 (पुरूष 1 लाख 7 हजार 964, स्त्री 1 लाख 9 हजार 221 तर 01 तृतीयपंथी) मतदार आहेत. 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 30 हजार 02 (पुरूष 1 लाख 14 हजार 648 तर स्त्री 1 लाख 15 हजार 354)मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 8 हजार 82 एवढी आहे. यामध्ये पुरूष मतदार 4 हजार 473 तर 3 हजार 609 स्त्री मतदारांचा समावेश आहे. विधानसभा मतदार संघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे खर्च निरीक्षक यांच्याकडून प्रशिक्षण संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 5 नोव्हेंबर 2024 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांनी खर्चाचे लेखे विहीत पध्दतीने उमेदवारांच्या खर्च रजिस्टर मध्ये नोंदविण्याची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी व खर्च विषयक सूचना देण्यासाठी तसेच विहित वेळेत अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रशिक्षण खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे. यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाले, असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 77 नुसार निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा दैनदिन खर्चाचा हिशेब प्रचार कालावधीमध्ये किमान 3 वेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक यांच्याकडून तपासणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणास खर्च निरीक्षक ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 उमेदवारांसाठी दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासण्याच्या तारखा जाहीर

सिंधुदुर्गनगरी दिनांक 6 नोव्हेंबर 2024 (जिमाका) :भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा विडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा दैनदिन खर्चाचा हिशेब प्रचार कालावधी मध्ये किमान 3 वेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक यांच्याकडून तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समिती समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. या वेळापत्रकानुसार तिन्ही मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी दिनांक 9 नोव्हेंबर 2024, व्दितीय तपासणी दिनांक 13 नोव्हेंबर व तृतीय तपासणी दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या तीन्ही तपासण्या जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदशक सूचनांनुसार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांना खर्च करण्याची मर्यादा 40 लाख असून या तपासणीत निवडणूक...

शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 6 (जि.मा.का) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील 4 परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2024चे जिल्हा परिरक्षक यांनी दिली आहे. या परीक्षेकरीता पेपर क्र.01 साठी 936 उमेदवार व पेपर क्र.2 साठी 1 हजार 122 उमेदवार असे एकूण 2 हजार 58 उमेदवार बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4501 एस. एम. हायस्कूल कणकवली, 4502 विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, 4503 कुडाळ हायस्कुल कुडाळ, 4504 कणकवली कॉलेज कणकवली या केंद्रावर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा, जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती अध्यक्ष अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती उपाध्यक्ष मकरंद देशमुख यांच्या उपस्थितीत परीक्षेच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा नियोजनावर चर्चा करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्य...

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

सिंधुदुर्गनगरी दि 7 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी जिल्ह्यातील 268- कणकवली विधानसभा मतदार संघ, 269- कुडाळ मतदार संघ,270- सावंतवाडी मतदार संघात बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता बुधवार दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी निर्गमित केल आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. अ.क्र तालुका दि.20/11/2024 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे गावाचे नाव 1 देवगड मिठबांव, शिरगांव 2 वैभववाडी वैभववाडी शहर बाजारपेठ 3 कणकवली कोळोशी 4 कुडाळ कुडाळ शहर बाजारपेठ 5 मालवण पोईप, मसदे 6 सावंतवाडी आरोस 7 वेंगुर्ला आडेली ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 कुडाळ विधानसभा मतदार संघात 15 ते 17 नोव्हेंबरला होणार गृहमतदान; 634 वृद्ध, दिव्यांग मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सिंधुदुर्ग, दिनांक 7 नोव्हेंबर 2024 (जिमाका वृत्त) : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघात ६३४ मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहे. या मतदारांसाठी १५ ते १७ नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांनी दिली आहे. याकरीता कुडाळ विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या ६३४ एवढी आहे. यात ८५ वर्षावरील ५७४ मतदार असून ६० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जावून म...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची स्थिर सर्वेक्षण पथकास अचानक भेट · सीमेलगत चेकपोस्टवरीन वाहनांची केली तपासणी · सोन्सुरे येथील मतदान केंद्राला भेट

सिंधुदुर्ग, दिनांक ०५ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एंट्री पॉईन्टवर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित करण्यात आली आहे. आज दुपारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अचानक भेटी देऊन स्थिर पथकास आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना दिल्या. आपला जिल्हा दोन राज्याच्या सीमेलगत असल्याने विशेषत: सिमेलगत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील सोन्सुरे येथील मतदान केंद्राला भेट देऊन सोयी सुविधांची पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरातील एंट्री पॉइंट, आंतरराज्य सीमावर्ती भाग, जिल्हामार्गावर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके कार्य...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चिन्ह वाटप

सिंधुदुर्गनगरी दिनांक 5 नोव्हेंबर 2024 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ असून या निवडणुकीसाठी 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह (कंसात) 268 - कणकवली विधानसभा मतदार संघात 06 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात चंद्रकांत आबाजी जाधव- बहुजन समाज पार्टी- (हत्ती), नितेश नारायण राणे- भारतीय जनता पार्टी- (कमळ), संदेश भास्कर पारकर- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- ( मशाल), गणेश अरविंद मान- अपक्ष- (ट्रक), नवाझ ऊर्फ बंदू खानी- अपक्ष- (बॅट), संदेश सुदाम परकर- अपक्ष- (चिमणी) यांचा समावेश आहे. 269- कुडाळ विधानसभा मतदार संघात 05 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात कसालकर रवींद्र हरिश्चंद्र- बहुजन समाज पार्टी- (हत्ती), नाईक वैभव विजय- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)- (मशाल), निलेश नारायण राणे- शिवसेना -(धनुष्यबाण), अनंतराज नंदकिशोर पाटक...

निवडणूक निरीक्षक परवीन कुमार थिंद जनतेच्या भेटीसाठी उपलब्ध

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268-कणकवली, 269-कुडाळ, 270-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून (General Observer) श्री. परवीन कुमार थिंद (भा.प्र.से.) (मोबाईल – 9359614815 कार्यालय दूरध्वनी क्र.02362-223325 ई-मेल आयडी - gen.observer.sindhu2024@gmail.com) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. थिंद हे सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक लढवणारे उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांना भेटण्यासाठी कार्यालयीन दिवशी दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी, 269 - कुडाळ विधानसभा मतदारसंघ यांच्या कार्यालय, उपविभागीय कार्यालय कुडाळ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांचे वास्तव्य एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे असणार आहे. 00000

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, ०४ उमेदवारांची माघार

सिंधुदुर्ग, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ येतात. या निवडणुकीसाठी आज माघारीच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात ०४ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २६८- कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार- (०६) १. श्री चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी) २. श्री नितेश नारायण राणे (भारतीय जनता पार्टी) ३. श्री. संदेश भास्कर पारकर (शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) ४. श्री. गणेश अरविंद माने (अपक्ष) ५. श्री. बंदेनवाझ हुसेन खानी (अपक्ष) ६. श्री. संदेश सुदाम परकर (अपक्ष) उमेदवारी मागे घेतलेले उमेदवार- (०२) १. श्री प्रकाश दत्ताराम नारकर (अपक्ष) २. श्री विश्वनाथ बाबू कदम (अपक्ष) २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघात एकूण ०...