'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी सिंधुदुर्गचा समावेश
सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' पुरस्कारासाठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य अणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India चे सहाय्यक व्यवस्थापक ताशी दोरजी शेर्पा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पडताळणी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संगणकीय साद्रीकरण केले. त्यावेळी काजू आणि काजू उत्पादनाबाबत व काजू प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली. "वेंगुर्ला काजू" यांस सन 2018 मध्ये जीआय (GI) मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72000 हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड झालेली आहे. देशामध्ये काजूप्रक्रियामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, असेही श्री.पाटील म्हणाले. याबाबत में रुक्मीणी फूडस, हुमरस या उद्योग घटकास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी काजू उत्...