Posts

Showing posts from April, 2024

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिन समारंभ बुधवार 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येणार असून ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8.00 वाजता पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड येथे होईल अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे. ध्वजारोहणानंतर सकाळी 8.15 वा. पोलीस व राखीव व पोलीस दल यांचे संचलन होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, विरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे. दि 1 मे 2024 रोजी सकाळी 7.15 ते 9.00 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 वाजेच्या पूर्वी किंवा 9.00 वाजेनंतर आयोजित करावा. समारंभाला राष्ट्रीय पोषाखात यावे...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानादिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे. नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) सर्व आस्थापनांनी, कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थि...

निवडणुका पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे -एस.चोक्कलिंगम

सिंधुदुर्गनगरी दि.28 (जिमाका): मतदारांना सुलभपणे तसेच शांततापूर्ण वातावरणात मतदान करता यावे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, त्यादृष्टीने मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन त्याची माहिती मतदारांना द्यावी, आगामी लोकसभा निवडणुका मुक्त, निर्भय, व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे तसेच सर्व समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. श्री. चोक्कलिंगम म्हणाले, जिल्ह्यातील मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, इपिक कार्ड घरोघरी जाऊन वाटप करा, जिल्ह्याच्या लगत असणाऱ्या चेक पोस्टवर वि...

जिल्ह्यात 4 ठिकाणी एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती उपक्रम

सिंधुदुर्गनगरी दि.25 (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 'स्विप' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 4 ठिकाणी महाकाय अशा एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. आरोस येथे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या उपस्थितीत एअर बलुन हवेत सोडण्यात आला. या बलुन वर लोकशाहीचा खरा आधार…मतदार, प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे, सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे….अशा प्रकारची जनजागृतीपर वाक्ये या बलुनवर लिहीण्यात आलेली आहेत. कुडाळ येथे कुडाळ विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सावंतवाडी येथे सावंतवाडी विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, कणकवली विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या उपस्थितीत बलुन हवेत सोडण्यात आला. ०००००

विदेशी जिवंत प्राणी प्रजातीची नोंदणी अनिवार्य

सिंधुदुर्गनगरी, : केंद्र शासनाने सजीव प्राण्यांच्या प्रजाती (Reporting and Registration) नियम २०२४ अधिसूचित केले आहे. त्यानुषंगाने वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ चे अनुसूची IV Appendix- I. II व III मध्ये समाविष्ठ विदेशी जिवंत प्राणी प्रजातीची नोंदणी अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.एन.रेड्डी यांनी दिली आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कायद्यात सुधारणा करुन दि. १.४.२०२३ पासून Wildlife (Protection) Amendment Act लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये Chapter- IVB मध्ये कलम ४९M वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ चे अनुसूचि- IV Appendix- I, II व III मध्ये समाविष्ठ विदेशी जिवंत प्राणी प्रजातीची नोंद करण्यासाठी विशेष तरतुद करण्यात आलेली आहे. यासाठी संबंधितांनी त्यांच्याकडे असलेले विदेशी प्राणी (अनुसुची-IV) ची नोंदणी करण्याची मुदत ६ महिन्यांची दिलेली आहे. याकामी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांना व्यवस्थापन प्राधिकरणाचे (Management Authority) कार्य करण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले आहे. अधिकार प्रदान केल्याप्रमाणे परिवेश-२ पो...

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. 22 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून तापमान उष्ण व दमट राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. काय करावे 1) पुरेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. 2) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. 3) दुपारी बारा ते तीनवाजे दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा. 4) सुर्य प्रकशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. 5) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. 6) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. 7) प्रवासात पिण्य...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 20 ते 29 मे 2024 या कालावधीत SSB कोर्स क्र. 57 आयोजित करण्यात येत, आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या कार्स कालवधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दिनांक 15 मे 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare,Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB 57 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिषिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे. या एस.एस.बी. वर्गामध्ये ...

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा • 'स्वीप' अंतर्गत उपक्रम •जिल्हाभर करणार जनजागृती

सिंधुदुर्गनगरी दि.20(जिमाका): लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती,उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, संदीप शिंदे आदी उपस्थित होते. या एलईडी रथाद्वारे मतदान जनजागृतीच्या चित्रफिती, नागरिकांनी मतदान करावे यासंदर्भातील जिंगलस दाखविल्या जाणार आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या रथाद्वारे जिल्ह्यातील तीनही मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. ००००००

जिल्ह्यात 4 मे पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 4 मे 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात दिनांक २१ एप्रिल रोजी महावीर जयंती दि.२३ एप्रिल रोजी हनुमान जयंती दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन/ कामगार दिन, असे उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापुर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीलय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्या लोकसभा निवडणुक २०२४ प्रक्रीया सुरु झालेली आहे. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन उपोषण / आंदोलने करत आह...

केंद्रीय सैनिक बोर्डाच्या ऑनलाईन प्रकरणाची पडताळणी

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सन 2023-24 ची शैक्ष‍णिक प्रकरणे के. एस. बी. (KENDRIYA SAINIK BOARD) ला ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची On Line Site ‍ दिनांक 01 एप्रिल पासुन सुरू असल्याची माहिती सहाय्यक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. तरी पात्र माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी आपली के. एस. बी. प्रकरणे (जसे की पाल्यांची 1 ली ते 9 वी पर्यंतची शैक्ष‍णिक प्रकरणे 10 वी ते 12 वी ची शैक्ष‍णिक प्रकरणे, PM Scholarship, Penury Grant व मुलीचा विवाह) केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्धारीत वेळेतच सादर करावयाचे आहे. संबधित माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांनी प्रकरण सादर करताना पुढील दक्षता घ्यावयाची आहे. अर्जात सर्व माहीती केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांनी दिलेल्या नमुन्यात भरावयाची आहे.अर्जात सर्व माहीती पुर्ण भरावयाची आहे. सर्व मुळ कागदपत्रे Upload करावी. कोणत्याही प्रकारची Zerox Upload करू नये. प्रकरण सादर करताना ऑनलाईन पध्दतीने स्वत: Upload कराव...

‘समता पंधरवडा’ निमित्ताने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता "त्रुटी पुर्तता विशेष शिबिराचे" आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): सन 2024-25 या चालू शैक्षणीक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Common Entrance Test, Joint Entrance Examination (JEE) , National Eligibility Cum Entrance Test (NEET) , Graduate Aptitude Test in Engineering (GATE) , National Aptitude Test in Architecture (NATA) तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. ज्या अर्जदारांनी समितीकडे अर्ज सादर केलेले आहे व ज्यांना त्रुटी बाबत ई-मेलद्वारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. अशा अर्जदारांनी दि. 15 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह / मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह उपस्थित रहावे. तरी या "त्रुटी पुर...

तिमाही ई आर 1 चे विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग या कार्यालयाचे मनुष्यबळाचे मार्च 2024 या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 30 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी दिली आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय / निमशासकीय/ खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर- 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे प्रत्येक आस्थापनेस बंधनकारक आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र ई आर- 1 वेबसाईटवर दि. 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक/ आस्थापना यांना ऑनलाईन व्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार...

उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध पथकांमार्फत महसुल वसुली

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध पथकामार्फत तसेच इन्सुली येथील सीमा तपासणी नाक्यामार्फत पुढीलप्रमाणे महसुल वसुली केलेला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे. सन 2023 -24 मधील जमा महसुलाचा आढाव (रु. लाखात ) तपशील रक्कम वार्षिक लक्षांक 69.23 वार्षिक पुर्तता 57.67 टक्केवारी 83.30 आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देण्यात आलेल्या उद्दीष्टापैकी 83.30 टक्के इतकी महसुल वसुली झालेली आहे. वायुवेग पथकाच्या कामगिरीचा आढावा (रु. लाखात) तपशील सिंधुदुर्ग वार्षिक लक्षांक (तडजोड शुल्क ) 125 वार्षिक पुर्तता 135.01 टक्केवारी 108 आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वायुवेग पथकास देण्यात आलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्तीचे म्हणजेच 108 टक्के इतकी महसुल वसुली झालेली आहे. सीमा तपासणी नाक्यांवरील कामगिरीचा आढावा (रु. लाखात) तपशील तडजोड शुल्क वार्षिक लक्षांक 200.00 वार्षिक पुर्तता 198.72 टक्केवारी 99 आर्थिक वर्ष 2023-24 ...

जिल्हा पोलीस दलाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने करण्यात आलेली कारवाई

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): पोलीस दलाने लोकसभा निवडणुक -२०२४ शांततेत पार पडावी, निवडणुक पूर्व काळात व निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे, शस्त्रे, अंमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या इसमांवर कडक कारवाई केलेली आहे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासुन १२ ठिकाणी आंतरजिल्हा चेकपोस्ट १० ठिकाणी आंतरराज्य चेकपोस्ट तसेच इतर विभागासह १९ ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके व ८ भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कारवाई करून २ सिंगल बॅरल बोअर बंदुका, १ रिव्हॉल्वर, १८ जिवंत काडतुसे, २००० जिलेटिनच्या कांड्या,१००० डिटोनेटर असे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. अवैध मद्य विक्री, वाहतुक, करणाऱ्या ८६ इसमांवर ७६ गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन त्यांच्याकडुन १०८६४.९९४ लिटर दारु किंमत ५०,०८,९५३/- रुपयाची दारु, १३ वाहने किंमत ३७,८५,०००/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ३ इसमांवर कारवाई करण्यात आलेली असु...

जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता

सिंधुदुर्गनगरी, दि.16 (जि.मा.का): प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. 17 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. काय करावे 1) परेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. 2) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. 3) दुपारी बारा ते तीन दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा. 4) सुर्यप्राकशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. 5) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा. 6) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. 7) प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. 8) उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने ...

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार 30 एप्रिलपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.16 (जि.मा.का): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दि. 16 ते 30 एप्रिलच्या कालावधीत पालकांना बालकांच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्यची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.गणपती कमळकर यांनी दिली. शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील सुधारित अधिसूचना दिंनाक ०९/०२/२०२४ नुसार वंचित,दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकिय शाळा/ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्व शाळा असतील. वंचित,दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकिय शाळा/ स्थानिक ...

विविध उपक्रमांव्दारे मतदान जनजागृती दशावतार नाटकातून जनजागृती नऊ हजार बचत गट सरसावले

सिंधुदुर्गनगरी दि 15 (जिमाका) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, शाळा, महाविद्यालये यांच्या माध्यमातून मतदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूभगीनींना केले आहे. समाजातील सर्वच घटकांना मतदान प्रक्रियेत सामील करून घेऊन नवे मतदार तसेच महिला मतदार...

एमएचटी सीईटीचे वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का): शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी २०२४ ची सामाईक प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने दि. २२ ते ३० एप्रिल २०२४ रोजी (दि. २५, २६ एप्रिल २०२४ वगळून) (PCB) तसेच दि. २ ते १७ मे २०२४ रोजी (दि. ०५,०६,०७,०८,१२,१३,१४ मे २०२४ वगळून) (PCM) सकाळी ७.३० ते सायं ६.४५ या वेळेत एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ बु. ता. कणकवली या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. 00000

मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2024 रोजी जाहीर झाली असून 46 रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतदान दिवशी भरविण्यात येणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याकरीता मंगळवार दि.7 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील खाली नमूद केलेले आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्गमित केल आहेत. तसेच या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात आलेली आहे. अ.क्र तालुका दि. 7/5/2024 रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद करण्याचे गावाचे नाव 1 कुडाळ माणगांव, वालावल 2 सावंतवाडी सावंतवाडी (शहर), चौकुळ 3 वेंगुर्ला होडावडा 4 कणकवली कणकवली (शहर), तळेरे 00000

माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रशिक्षण संपन्न जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण तसेच पेड न्यूजवर लक्षे ठेवणे हे 'एमसीएमसी' चे प्रमुख कार्य -जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि.10 (जिमाका) राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख, पॉम्प्लेट, हॅन्डविल यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव तपासणे, जाहिराती व पेड न्यूजचा खर्चाचा अहवाल एक्सपेंडिचर ( खर्च ) विभागाला देणे ही प्रमुख कामे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे (एमसीएमसी )असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच उमेदवारी निश्चित झाल्‍यानंतर प्रमाणिकरण व संनियंत्रण कार्यामध्‍ये गती देण्‍यात यावी, असे निर्देश यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले. माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण (एमसीएमसी ) समितीचे प्रशिक्षण जिल्‍हाधिकारी कार्यालयात पार पडले. यावेळी प्रशिक्षण व्यवस्थापणाच्या नोडल अधिकारी पद्मश्री बैनाडे, एमसीएमसीचे सदस्य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे, सायबर सेलचे प्रमुख उदय झावरे, पोलिस उपनिरिक्षक अनिल व्हटकर, तसेच तालुकास्तरीय मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्यांची उपस्थिती यावेळी होती. भारत ...

क्षेत्रीय पेालिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक संपन्न निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका महतत्वपूर्ण -जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि 08 (जिमाका) : निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यामधील दुवा म्हणून काम करावे असे जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले. कुडाळ येथे क्षेत्रीय पेालिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच 269 कुडाळ विधानसभा मतदारसंघामधील सर्व अधिकाऱ्यांची आज मराठा समाज हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी श्री तावडे यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेबाबत विस्तारित व सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीला सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, अतिरिक्त पेालिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी कुडाळ तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, कुडाळचे तहसिलदार श्री वसावे आणि मालवणच्या तहसिलदार वर्षा झाल्टे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. श्री तावडे म्हणाले, निवडणूक कामकाज करत असताना सर्वांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी पार पाडायची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्र...

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट मतदान प्रक्रीयेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अभ्यास करण्याचे निर्देश निवडणूक प्रक्रियेत प्रशिक्षण महत्वाचे - जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि 06 (जिमाका) निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये या सुचनांचा काटेकोर अभ्यास करावा. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाद्वारे विविधस्तरीय कार्यवाही सातत्याने व योग्य प्रकारे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी कि...

जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात दिनांक १२.०३.२०२४ रोजीपासुन रमजान मास प्रारंभ, दिनांक ०९.०४.२०२४ रोजी गुढीपाडवा, दिनांक ११.०४.२०२४ रोजी रमजान ईद, दिनांक १४.०४.२०२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक १७.०४.२०२४ रोजी रामनवमी असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असुन त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटुन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्या लोकसभा निवडणुक २०२४ प्रक्री...

लोकसभा निवडणूक संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वयन ठेवुन जबाबदारी पार पाडावी -जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी, दि.02 (जि.मा.का): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकविषयक नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. तावडे बोलत होते. पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी र‍वी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, स्वीपचे नोडल अधिकारी उदय पाटील, तसेच नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये प्रत्येक नोडल अधिकारी यांनी निवडणूक तयारीसंदर्भात माहिती दिली. यामध्ये स्वीप नोडल अधिकारी यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक खर्च समिती, प्रसारमाध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, नामनिर्देशन ...