भूजल व्यवस्थापन आराखडा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर

सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का):- जल शक्ती मंत्रालयाच्या पुणे येथील केंद्रीय भूमी जल बोर्डाच्यावतीने शास्त्रज्ञ डॉ. जे. दावितुराज व संदीप वाघमारे यांनी जिल्ह्याचा भूजल व्यवस्थापन आराखडा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केला. भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा तयार करण्यासाठी प्रचार प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. भूजलाचा अनियोजित मार्गाने गैर वापर होत राहिल्यास सांडपाण्यातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नकेल्यास भविष्यात जल प्रदूषणला सामोरे जावे लागेल. या हस्तक्षेपांना रोकण्यासाठी 60 मिटर पेक्षा जास्त खोलीच्या विंधन विहिरी, नलिका विहिरी, यावर बंधी घालणे आवश्यक आहे. जेणेकरुन पुढील पिढीसाठी आणि संकटाच्या, दुष्काळात भूजल स्त्रोत संरक्षित केले जातील. त्याचबरोबर 233 चेक डॅम आणि 81 पाझर तलाव करण्याचेही यात सूचविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'