Posts

‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध आरोग्य उपक्रमांना गती नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ व तत्पर आरोग्यसेवा देण्यासाठी विविध उपक्रम सुरू

सिंधुदुर्ग, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रम सध्या सुरू आहेत. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ, तत्पर व नागरिककेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर अभियानामध्ये विशेष भर देण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, महिलांचे आरोग्य, अवयवदान संकल्प अभियान, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्त भारत, क्षयरोग निर्मूलन, जन्म-मृत्यू नोंदणी आदी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजना व सेवांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृतीही करण्यात येत आहे. असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीला विशेष गती जिल्ह्यात उच्च रक्तदाब (Hypertension) व मधुमेह (Diabetes) यासाठी विशेष मोहीम सुरू असून, असंसर्गजन्य आजारांसाठी ३० वर्षे व त्यावरील वयोगटातील ना...

नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम

Image
सिंधुदुर्ग, दि. 19 : साटेली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांशी संवाद साधणे तसेच त्यांच्या अडचणी व प्रतिक्रिया जाणून घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी ग्रामस्थ, तरुण मंडळी आणि गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांशी थेट संवाद साधून शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या प्रतिक्रिया व अपेक्षा जाणून घेतल्या. ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या योजना व सेवांची माहिती देण्यात येत आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अडसूळ यांनी पर्यावरणपूरक उपक्रम, सायबर सिक्युरिटीबाबत मार्गदर्शन करत डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याचे आ...

कुडाळ नगरपंचायतीतर्फे गणेश घाटावर आभार आणि संकल्पाची रांगोळी 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश

Image
सिंधुदुर्ग, दि.१८ : शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि शहर सुंदर व आरोग्यदायी बनवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या देशव्यापी 'सेवा संकल्प अभियाना'चा भाग म्हणून कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन (दि.१७ रोजी) करण्यात आले. येथील प्रसिद्ध गणेश घाटावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकाभिमुख कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नागरिकांना विहित मुदतीत शासकीय व नागरी सेवा पारदर्शकपणे मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत केवळ कागदोपत्री कामे न करता प्रत्यक्ष जनतेच्या सहभागातून परिसर स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरी समस्यांचे जलद निवारण आणि सार्वजनिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाचे औचित्य साधून गणेश घाटावर एकत्र आलेल्या सर्व घटकांनी एकजुटीचे दर्शन घडवत भव्य मानवी साखळी तयार केली. राष्ट्रीय एकात्मता...

सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ आरोग्य जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी व निरोगी जीवनशैलीच्या प्रसारावर भर

Image
सिंधुदुर्ग, दि. 18 (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत चराठे येथे करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, चराठे गावच्या सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि आजाराचा धोका असलेल्या व्यक्तींची लवकर ओळख करण्यावर विशेष भर देण्यात य...

भेडशीतील गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-2026’

Image
सिंधुदुर्ग, दि. 18 (जिमाका): गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भेडशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना, अडचणींना आणि शासनाच्या योजनांबाबतच्या अपेक्षांना जाणून घेण्यात आले. ‘लोकसंवाद-2026’च्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळे ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची केंद्रे न राहता शासकीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, शासकीय सेवा आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल युगातील सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर सुरक्षेबाबत तसेच गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणाऱ्या ‘Bappa.org’ पोर्टलबाबतही माहिती देण्यात आली. महसूल विभागामार्फत उपलब्ध विविध सेवांची माहिती मंडळ अधिकारी सचिन गोरे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या...

मंगेश पाडगावकरांच्या उभादांडा गावाला साहित्य पर्यटनाचे नवे रूप देणार दोन महिन्यांत ‘कवितांचे गाव’ दिमाखदार करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

Image
सिंधुदुर्ग, दि. 18(जिमाका) : कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक स्मृतींशी जोडलेल्या उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ उपक्रमाला नावाला साजेसे दिमाखदार स्वरूप देण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत विकासकामांना गती देण्यात येईल. यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘कवितांचे गाव’ अधिक प्रभावी करण्यासाठी मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेचे, शून्य पटसंख्या असलेल्या शाळेचे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनाचे तसेच त्यांनी भेट दिलेल्या दालनाचे, अशा महत्त्वाच्या पाच दालनांना प्राधान्याने विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात मंत्री सामंत यांनी भाषा संचालकांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या. भाषा संचालक उद्या उभादांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असून त्यानंतर प्रभावी नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. उभादांड्याच्या विकासासाठी गावातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्य...

गणपती उत्सव काळात टपाल विभागातर्फे विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’ सावंतवाडी व कुडाळ येथे २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान विविध टपाल, वित्तीय व विमा सेवा उपलब्ध

सिंधुदुर्ग, दि. १७ (जिमाका) : गणपती उत्सवाच्या काळात नागरिकांना टपाल, वित्तीय, विमा आणि पार्सल सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष ‘गणपती नाईट कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात टपाल सेवा नागरिकांच्या अधिक जवळ नेण्याचा हा अभिनव उपक्रम असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना टपाल विभागाच्या विविध सेवांची माहिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक मार्गदर्शन मिळणार आहे. मेल सेवा, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) व ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI), पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB) आणि नागरिक केंद्रीत सेवा (CCS) यांसह विविध सुविधांची माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सुरक्षित बचत व वित्तीय सेवांची माहिती पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेच्या माध्यमातून नागरिकांना विविध बचत योजना, ठेव व पैसे काढण्याची सुविधा, नामनिर्देशन तसेच इंटरनेट व मोबाईल बँकिंगसारख्या डिजिटल बँकिंग सुविधांच...