स्वाधार योजनेचा लाभासाठी 14 जुलै पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत - सहायक आयुक्त संतोष चिकणे

सिंधुदुर्गनगरी दि.27 (जि.मा.का):- जिल्हाच्या ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ. 11 वी व इ. 12 वी तसेच इ.12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत ,असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रर्गातील ज्या विद्यार्थ्याना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्याना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्याना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजनेसाठी सन 2022-23 मधील अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे. सन 2022 -23 करीता भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थ्यी वंचित राहु नये, यासाठी सदर योजनेंतर्गत अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थंचे अर्ज स्विकारण्याची मुदत आता दिनांक 14 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्याता दिलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यानी इ.11 वी इ.12 वी तसेच इ. 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, अभ्यासक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्हच्या ठिकाणी असलेल्या 5 किंमी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालय, शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेला असावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी इ.10 वी, इ.12वी, पदवी, पदविका परीक्षेमध्ये 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल . आरक्षण असेल दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणतत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. सन 2022-23 मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा पात्र व गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर सहायक आयुक्त, समाज कल्याण सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाच्या 5 कि.मी अंतरावरील तसेच संबंधित महाविद्यालयने आपल्या महाविद्यालयात जे पात्र विद्यार्थी सन 2022-23 करीता स्वाधार योजनेपासून वंचित असतील अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या स्तरावरुन कळविण्यात यावे, असे आहवान जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. चिकणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सिंधुदुर्ग 02362- 228882 यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'