माहे जुलै महिन्यातील मंजूर केरोसिन नियतन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 13 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माहे जुलै 2020 साठी तालुकानिहाय 132 कि.ली केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे. तालुकानिहाय केरोसिन नियतन पुढीलप्रमाणे दोडामार्ग तालुका- 2, सावंतवाडी तालुका- 9, वेंगुला तालुका- 8, कुडाळ तालुका- 8, मालवण तालुका- 8, कणकवली तालुका- 9 , देवगड तालुका- 9 व वैभववाडी- 7 असे एकूण 132 कि.ली. केरोसिन मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली. 00000 पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 1 3 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत मंगळवार दि. 14 जुलै ते शुक्रवार दि. 17 जुलै या दरम्यान ऑनलाई रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पनवेल, पुणे या जिल्ह्यातून अनेक उद्योजकांकडून पेन्टर, सर्व्हिसिंग मॅन, सर्व्हिसिं...