Posts

Showing posts from June, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : बळीराजाच्या स्वाभिमानाला नवे बळ !

महाराष्ट्र ही संतांची, पुरोगामी विचारांची आणि अहोरात्र कष्ट करणाऱ्या बळीराजाची भूमी आहे. राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण विकास आणि सामाजिक जीवनाची वीण ही शेती व शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांवर उभी आहे. निसर्गाची अनिश्चितता, अवकाळी पाऊस, दुष्काळ, बाजारभावातील चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च अशा असंख्य संकटांचा सामना करत अन्नदाता आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो. अशा या शेतकऱ्याला केवळ सहानुभूतीची नव्हे, तर आर्थिक स्थैर्य, विश्वास आणि शासनाच्या भक्कम पाठबळाची आवश्यकता असते. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६' जाहीर केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीची घोषणा नसून, शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला बळ देणारे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देणारे आणि शेती क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारे एक ऐतिहासिक पाऊल आहे. महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै हा दिवस 'कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आधुनिक शेती...

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' विषयावरील विशेष मुलाखतीचे २ जुलै रोजी प्रसारण

सिंधुदुर्गनगरी, दि. ३० (जिमाका) : राज्य शासनाने शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर करून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेची उद्दिष्टे, पात्रता, निकष, लाभाची प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांच्या मनातील विविध प्रश्नांची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मुलाखतीमध्ये सहाय्यक निबंधक सुनील मरगळ यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले आहे. योजनेचे उद्दिष्ट, लाभार्थी निवडीचे निकष, पात्रता तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी त्यांनी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत माहिती दिली आहे. त्यामुळे या योजनेबाबतची अचूक आणि अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी ही मुलाखत शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ही...

कुडाळ तालुक्यात विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा व्यापक स्तरावर शुभारंभ

* तहसीलदार व संबंधित बी.एल.ओ. यांच्या सातत्यपूर्ण प्रशासकीय प्रयत्नांना यश *चेंदवण येथे सरपंचांना पहिला प्रगणक अर्ज सुपूर्द करत प्रक्रियेची अधिकृत सुरुवात सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 269-कुडाळ विधानसभा मतदार संघात आज दिनांक 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली, तसेच कुडाळ तालुक्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांच्या गतिमान नियोजनाखाली मतदार याद्या अधिक अचूक व अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष प्रारंभ दि. 30 जून 2026 झाला असून ई. एफ. चे वितरण दिनांक 29 जुलै 2026 या कालावधीत पर्यंत करण्यात येतील. यादरम्यान सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer) घरोघरी जाऊन गणक अर्जाचे (Enumeration Forms) वाटप व पडताळणी करत आहेत. चंदवण ग्र...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित 'स्मार्ट' शेती प्रकल्प राबविणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन आढावा घेतला. बागायतदारांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित 'स्मार्ट' शेती प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या समन्वयातून कृषी विभाग सिंधुदुर्ग मार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रायोगिक प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान क्रांतीकारी ठरेल. हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यास संपूर्ण कोकणातील फलोत्पादनासाठी हे एक आदर्श 'स्मार्ट शेती' मॉडेल ठरेल, असा विश्वास प...

वैद्यकीय अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी 'वॉक-इन इंटरव्ह्यू'

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकारी पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्जाचा नमुना व त्याबाबत संक्षिप्त तपशिल जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या www.zpsindhudurg.maharashtra.gov.in व https://sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 000000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गासह विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रोपवाटिका स्थापन करणे, (स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, अवोकॅडो, केळी, अननस, पपई) आदी फळपिकांची लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प, पुष्पोत्पादन, सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, शेततळ्यांचे अस्तरीकरण, हरीतगृह, शेडनेटगृह उभारणी, प्लास्टिक मल्चिंग, फळांना व घडांना कव्हर, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, पॉवर टिलर व पीक संरक्षण उपकरणे) फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच रायपनिंग चेंबर अशा विविध घटकांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharasht...

शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. पिकांचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी वेळेवर पीक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. परिणामी ते थकबाकीदार ठरतात आणि त्यांना पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होतात. या अडचणी दूर करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. २ जून २०२६ रोजी मंत्रिमंडळाने या योजनेस मंजुरी दिली. दोन प्रमुख घटक या योजनेत दोन महत्त्वाचे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि दुसरा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मु...

कर्जमुक्ती ते मन:शांती

शेतकरी हा भारतीय समाजातील अर्थकारणाचा मुख्य कणा आहे. याचा पाया मजबूत करण्यासाठी शासकीय धोरणांच्या अंमलबजावणीची गरज असते. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. ती शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आली आहे. 'कर्जमुक्ती' ही फक्त कागदावरील आकडेमोड नसून, ती शेतकऱ्याच्या मनावर फुंकर घालणारी योजना आहे. अलीकडेच शेतीला व्यवसाय म्हणण्याची प्रथा सुरू झाली. या व्यवसायात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी लागते. यातील कोणतंही काम ठरवून अगदी वेळेनुसार करूनही फायदा होईल याची कुणीही खात्री देऊ शकत नाही, अगदी हवामान खातं सुद्धा. शेतीचा व्यवसाय हा निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असतो. शेतकरी सतत निसर्गाबरोबर झुंजत राहतो. तो काळ्या आईची सेवा करतो वर्षानुवर्षं…. अती पाऊस, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, निसर्गाचं अक्राळ विक्राळ रूप, गारपिटीचे जीवघेणे तडाखे, बाजारभावाच्या दरातील चढउतार, डोक्यावरचा कर्जाचा डोंगर, शेतकऱ्यांच्या मुलांची न होणारी लग्नं, भविष्याची सततची चिंता अशा सगळ्या चक्रव्यूहात शेतकरी अड...

कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी 'शेतकरी मेळावा'

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन कार्यक्राच्या अनुषंगाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता भद्रकाली मंदिर शेजारील सभागृह, आंबडपाल येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास लोकसभा सदस्य नारायण राणे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, दिपक केसरकर, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कबनुरे-पुंड, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य ...

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार

महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही अशाच प्रकारची योजना आहे. ही योजना केवळ कर्जमाफी देणारी योजना नसून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, नव्याने पतपुरवठा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिली जात आहे. 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत शेतीचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील शेती आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चातील वाढ या अनेक कारणांमुळे शेतकरी वारंवार आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत कर्ज हा शेतीचा अविभाज्य भाग बनतो. परंतु जेव्हा हे कर्ज परतफेडीच्या क्षमतेपलीकडे जाते, तेव्हा त्याचे रूप आर्थिक विवंचनेत बदलते. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने यापूर्वीही विविध कर्जमुक्ती योजना राबवल्या होत्या. मात्र या वेळी...

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना” जाहीर केली असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टल...

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर... एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता कोलमडून गेला आहे. कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ते म्हणजेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’.ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे. महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी !*

भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्यांना उपजीविका देण्याचे काम हा महत्वपूर्ण घटक करतो. म्हणूनच शेती हा घटक अन्न सुरक्षा,रोजगार आणि ग्रामीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून सतत होणारे हवामान बदल, जमीन आणि पाण्याची टंचाई, बियाणे आणि खतांवरील वाढता खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते जसे की, शेतीचे उत्पादन वाढविणे, हवामान बदलास अनुकूल आणि शाश्वत शेतीला चालना देणे, सिंचन व्यवस्था आणि जलसंधारणात सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे, शेतकरी गटांना बळकट करणे आणि बाजारपेठ उपलब्धतेत सुधारणा आणणे यासारखेही प्रयत्न केले जात आहेत. मात्र आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी गेली काही वर्षे अनेक नैसर्गिक व आर्थिक संकटांचा ...

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्म...

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना” जाहीर केली असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्य...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि २८ (जिमाका) भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे , कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकांना आवाहन केले की, पाच वर्षांखालील कोणतेही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपक...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक सिंधुदुर्ग, दि. २६ (जिमाका): पर्यावरण संवर्धनाचा दृढ संदेश देत आणि 'हरित जिल्हाधिकारी कार्यालय' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसरात १५५ हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते कार्यालय परिसरातील तुळशी वृंदावनात शास्त्रोक्त पद्धतीने रोप लावून करण्यात आला. यावेळी पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. या वृक्षारोपण मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक शाखेला निश्चित जागा देण्यात आली होती. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षलागवड केली....

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पालकमंत्री नितेश राणे यांचे विनम्र अभिवादन

सिंधुदुर्ग, दि. २६ (जिमाका) : जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ००००००

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा; 'वाटचाल' पुस्तिकेचे प्रकाशन सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (जिमाका) : सामाजिक समता आणि सामाजिक न्याय या संकल्पना केवळ विचारांपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात कृतीत उतरविल्या पाहिजेत. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून दिला. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. बहुजन उद्धारक, शिक्षणाला प्राधान्य देणारे, सामाजिक विषमतेविरुद्ध लढा देणारे आणि आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य आजही प्रेरणादायी असून त्यांचे विचार आजच्या पिढीला दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या धोरणानुसार जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय द...

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत प्रशासकीय तयारी वेगाने सुरू असून, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये आणि अपात्र मतदारांची नावे यादीत राहू नयेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचा आणि शेतीचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. त्याबाबत प्रशासनाकडून आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत मयत स्थलांतरित , दुबार मतदारांची नावे वगळण्यावरही लक्ष दिले जाणार आहे.मतदारांचे मॅपिंग बऱ्यापैकी पूर्ण झाल्यामुळे हे काम सुलभ होणार असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कामात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत १२०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्...

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

• ९२ टक्क्यांहून अधिक मतदार यादी मॅपिंग पूर्ण • ९२१ बीएलओ आणि १२९९ बीएलए नियुक्त • प्रारुप मतदार यादी ५ ऑगस्ट तर अंतिम मतदार यादीची ७ ऑक्टोबरला प्रसिध्दी सिंधुदुर्गनगरी, दि. २५ (जिमाका): मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी घेतल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी व मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या नावाची नोंद, पत्ता व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. लोकशाही अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपल्या भागातील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पूर्ण सहकार्...

क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी निवड चाचणी

सिंधुदुर्ग नगरी दि.२५( जिमाका):- शिवछत्रपती क्रीडा पीठ अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेशा करता निवड चाचण्यांची आयोजन/ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेश सन २०२६-२७ करिता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे .राज्यात आठ क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून यामध्ये प्रवेशा करता पुनःश्च एकदा निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये जिम्नॅस्टिक अँथलेटिक्स सायकलिंग (खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र) शूटिंग, बॉक्सिंग आर्चरी या खेळांच्या सरळ प्रवेश व कौशल्य चाचण्या घेण्यात येणार आहेत. क्रीडा प्रबोधिनी साठी राज्यस्तरावर सरळ प्रवेश चाचणी दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक्स ,सायकलिंग शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे, शूटिंग छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर, बॉक्सिंग ,क्रीडा प्रबोधिनी अकोला, आर्चरी क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे होणार आहेत तसेच सदर खेळाच्या राज्यस्तर खेळनिहाय कौशल्य चाचणी दिनांक ३० जून २०२६ रोजी वर नमूद केलेल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाकरिता स...

जिल्ह्यात स्टॉप डायरीया अभियान सुरू

सिंधुदुर्ग नगरी दि.२५( जिमाका):- पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग च्या वतीने स्टॉप डायरी या हे अभियान दिनांक १६ जून ते ३० जुलै २०२६ कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. अतिसार हा विशेषतः पाच वर्षाखालील बालकांसाठी जीवघेणा ठरु शकणारा आजार असून सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसराची स्वच्छता आणि स्वच्छता विषयक योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते. नागरिकांमध्ये जन जागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक बळकट करणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आरोग्य विभाग ग्रामपंचायत विभाग पाणी व स्वच्छता विभाग शिक्षण विभाग महिला व बालविकास विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून या अभियान प्रभावीपणे राबविले जाणार आहे. अभियानांतर्गत तालुका व ग...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समिती बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. २५ (जिमाका) : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा आढावा व तक्रार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. 24) संपन्न झाली. बैठकीत हवामान केंद्रांची उभारणी, विमा परिगणना अहवाल, शेतकरी तक्रारी आणि योजनेतील आवश्यक सुधारणा यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत महावेध प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या स्थलांतराचा मुद्दा प्राधान्याने चर्चेला आला. जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या 11 महसूल मंडळांमध्ये हवामान केंद्रे उभारण्याबाबत जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर 2024 पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. तथापि, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसकडून विद्यमान हवामान केंद्रांचे स्थलांतर जून 2026 मध्ये करण्यात आले असले, तरी नव्याने स्थापन झालेल्या 11 महसूल मंडळांमध्ये अद्याप हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली नाहीत. याबाबत जिल्हास्तरीय समितीने गंभीर दखल घेत स्कायमेट कंपनीला ...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेऊन विविध बाबींचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ललित गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, महिला व बालविकास अधिकारी बापू शिनगारे, अन्न सुरक्षा अधिकारी तेजश्री ताजणे, अभय चंदनशिवे, करण गावित आदी उपस्थित होते. यावेळी श्री गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांना अन्न सुरक्षा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची, तपासणी मोहिमांची तसेच कायद्याच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. बैठकीत जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय अत्यंत संवेदनशील असल्याच...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला जिल्‍हा उद्योग केंद्रांच्या विविध समित्यांचा आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील उद्योग, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यबल समिती, जिल्हा उद्योग मित्र समिती तसेच आजारी उद्योग पुनर्वसन समितीची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत उद्योगविकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हास्तरावर बांबू मिशन समितीची स्थापना करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच जिल्ह्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विशेष मेळावे आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांना कौशल्याधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी आणि स्वावलंबनाला चालना देण्यासाठी दिव्यांग युवक-युवतींना विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभागी करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दि...

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका) : अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 या अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, संतोष चिकणे पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र दळवी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, समाज कल्याण विभागाचे विशेष अधिकारी तुषार गवळी, संबधीत शाखेचे संतोष परुळेकर आदी उपस्थितीत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदयांतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सदयस्थिती, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, अत्याचार पिडीतांना नुकसान भरपाई इत्यादी बाबीचा आढावा घेतला. यावेळी श्री. संतोष चिकणे यांनी पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणे, मागील बैठकीचे इतिवृत्त व अर्थसहाय्य याबाबतचा आढावा समितीसमोर दिला. 00000

महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलांना राष्ट्रीय पुरस्कारांची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिलांची दखल घेण्यासाठी केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी (पद्मश्री, पद्मविभूषण व इतर) नामांकन सादर करण्यासाठी केंद्रशासनाकडुन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल व संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी पात्र महिलांनी आपली माहिती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत सादर करावी. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. या पुरस्काराची घोषणा 26 जानेवारी 2027 रोजी होणार असल्याचेही प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे. 000000

सामाजिक न्याय दिन 26 जून रोजी

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने 26 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्याक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर व पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या उपस्थिती राहणार आहेत. यावेळी प्रा. अमर कांबळे हे "छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता" या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 000000

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दिव्यांगांसाठी स्वतंत्र ‘दिव्यांग भवन’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, स्वयंरोजगार व उद्योग-व्यवसायासाठी दिव्यांग बंधू आणि भगिनींना आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाईल. तसेच विविध शासकीय विभागांमधील दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित दिव्यांग कल्याण आढावा बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राणे य...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न • ज्येष्ठांचा सन्मान, सुरक्षिततेला प्राधान्य; • कल्याणासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुखकर करण्यासाठी विविध शासकीय योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहायक आुयक्त संतोष चिकणे यांच्यासह ज्येठ नागरीक संघटनेचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणे, त्यांना आरोग्य विषयक सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अधिक स...

सिंधुरत्न समृद्ध योजने'च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व कामे संबंधित यंत्रणेने निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. ‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. १८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पांची स...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज अनिवार्य

सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृहासाठी शालेय अभ्यासक्रमासाठी दिनांक ३० जुन पर्यत आणि ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दिनांक १५ जुलै, २०२६ पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmasnew.mahait.org अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित महाविदयालयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत पात्र विदयार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत सूचित करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांनाच स्वाधार योजनेचा पात्र ठरविले जाईल. मागील परिक्षेत 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत. ते दोन्ही योजंनापासून वंचित राहतील. तसेच ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाहीत. त्या ठिकाणी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल असला तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना योजनेच्या...

राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत नाचणीच्या बियाण्यासाठी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का) :- पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान (NFSM-Nutri Cereals) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत खरीप हंगामासाठी नाचणी (नागली) पिकाचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी योजना’ निवडून आपल्या युझर आयडी-पासवर्ड किंवा आधार क्रमांकाद्वारे लॉगिंन करुन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करुन बियाणे, औषधे व खते ही बाब निवडा. सर्व माहिती भरून अर्ज जतन करून विहित शुल्कासह अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्जासाठी चालू वर्षाचा ७/१२ उतारा, ८-अ उतारा आणि आधार कार्ड आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार प्रमाणित बियाण्यांवर आर्थिक अनुदान दे...

तूर बियाणे संचासाठी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.१२ (जि.मा.का) :- कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत चालू खरीप हंगामासाठी तूर बियाणे संच (मिनीकीट) १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ विभागात लॉगिन करून ‘बियाणे, औषधे व खते’ या घटकाअंतर्गत ‘बियाणे’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर मुख्य पिकामध्ये ‘तूर’ आणि बाबींमध्ये ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान - बियाणे संच (मिनीकीट)’ हा पर्याय निवडून अर्ज करावा.या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना तूर बियाणे संच पूर्णपणे मोफत १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाईल. महिला शेतकरी, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जामाती (ST) तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. एका श...

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी मुंबई, दि. १२ : अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) बालरुग्णांसाठी कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ९४ बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी उमेद जागविण्याचे प्रेरणादायी काम झाले आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेचे कौतुक केले आहे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने २०२५-२६ मध्ये शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य असले तरी आरोग्य क्षेत्रातही महत्वाचे काम केले आहे. देशभरातील कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीची निदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत अफकॉन्सने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून "कर्करोगाचा संशयित आजार असलेल्या बालरुग्णांसाठी आपत्कालीन निदान सहाय्य सेवा" या योजनेसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या सहाय्यामुळे देशभरातील ९४ बालकांना कर्करोगाचे तातडीने निदान आणि आवश्यक वैद्यकीय...

राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार · एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी

क्लीव्हलँड, ओहायो | 10 : ‘मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्...