Posts
Showing posts from 2020
- Get link
- X
- Other Apps
सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या लालपरीला अधिक सक्षम करणार -परिवहन मंत्री अनिल परब सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.30 :- प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्या यांना शहराशी जोडणारी. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली, प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाच्या लालपरी एस.टी बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन, परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केले. कुडाळ येथील नुतन बसस्थानकाचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता विद्या भिलारकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे ऑनलाईन जोडले गेले होते. प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात आमदार वैभव नाईक, कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली. गट विकास अधिकारी मोहन भोई, जि.प. सदस्य अमरसिंह सावंत, सिंधुदुर्ग एस.टी. विभाग नियंत्...
- Get link
- X
- Other Apps
राज्य शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून स्क्रिनिंग होणार - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 24 : कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी पासून गोवा राज्याच्या सीमेवर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्लाचे तह...
मतदार यादीचा पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित ...उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड /माजी सैनिकांना निवासी इमारत मालमत्ता करातून सूट
- Get link
- X
- Other Apps
मतदार यादीचा पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 24 : भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हताकारी दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली. एकत्रित प्रारुप मतदार यादी मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या नोटीस बोर्डवर व पदनिर्देशित ठिकाणी लावून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची अंतिम मतदार यादी दि. 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करणेत येणार आहे. या मतदार यादीत दावे व हरकती सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2020 ते मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 पर्यन्त स्विकारण्यात येणार आहेत. हे दावे व हरकती स्विकारणेसाठी शनिवार दि. 5 व रविवार दि. 6 डिसेंबर 2020 रोजी तसेच शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 डिसेंबर 202...
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणार कोविड - 19 तपासणी
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणार कोविड - 19 तपासणी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 19 : 23 नोव्हेंबर 2020 रोजी पासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड - 19 ची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यामध्ये अनुदानित व विना अनुदानीत या दोन्ही शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची तपासणी होणार आहे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी इतर काही अजार आहेत किंवा काही त्रास आहे. तसेच ज्याचे वय जास्त आहे अशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. तर इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रॅपीड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये होणारी ही तपासणी संपूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. तसेच या तपासणीसाठी लागणारी किट ही जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत पुरवठा करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सध्या या तपासणीसाठी नमुने घेण्याचे का...
बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप
- Get link
- X
- Other Apps
बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 19 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा संच किटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली. कुडाळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी वासुदेवानंद हॉल, कुडाळ येथे सुरक्षा संच किट वाटप करण्यात येणार आहे. तरी कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा. तसेच इतर तालुक्यातील बांधकाम कामगारांचे सुरक्षा संच किट वाटपाचा कार्यक्रम लवकरच जाहिर करण्यात येणार आहे, असे आवाहन कामगार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 0000
जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान /जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, किल्ले व स्मारके पर्यटकांसाठी खुली /प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे खुली
- Get link
- X
- Other Apps
जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान सिंधुदुर्गनगरी, जि.मा.का. दि. 18- स्वच्छ भारत मिशन ( ग्रामिण )च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त दिनांक 17 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील हागणदापीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय उपबल्धता, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता व निधीचे वाटप, शाळा व अंगणवाडींमधील शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष भर देऊन उपलब्ध शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच या अभियानामध्ये सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शौचालयांना वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तरावर शौचालयांच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरण, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शाळा, अंगणवाडीतील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक शैचालयांचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान...
जलतरण तलाव व इन डोअर गेम्सना परवानगी
- Get link
- X
- Other Apps
जलतरण तलाव व इन डोअर गेम्सना परवानगी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 18 : जलतरण तलाव (स्विमींगपूल) राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जातील, असे जलतरण तलाव (स्विमींगपूल), योगा प्रशिक्षण संस्था व सर्व प्रकारचे इन डोअर गेम्स जसे बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी इत्यादींना शरिरीक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्सेस इत्यादींच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्सेस इत्यादी मध्ये प्रेक्षकांना खाद्य पदार्थ नेण्यास परवानगी असणार नाही. यासंबंधितचे नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन त्या-त्या विभागाने दिलेल्या सुचनांप्रमाणे करण्यात यावे. वरील आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (44) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी का...
वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतींसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात ...जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतींसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात ...जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 13 : जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेबाबतचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेसाठी अनुसुचित जाती व अनुसुचित जमातींच्या स्त्रियांसाठी राखून ठेवायचे प्रभाग नागरीकांच्या मागास प्रभाग (स्त्रियांसाठी राखून ठेवलेला धरुन) व उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणाऱ्या आदेशाचा मसुदा अनुक्रमे क्रमांक NPA-2803/2/2020/261 दि. 12 नोव्हेंबर 2020 (वाभवे-वैभववाडी साठी) आणि मसुदा क्रमांक NPA-2803/2/2020/264 दि. 12 नोव...
इंटरनेट सेवा काळाची गरज आहे लॉकडाऊन काळात इंटरनेटचा प्रभावी वापर - पालकमंत्री उदय सामंत
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 07: इंटरनेट सेवा ही आता आधुनिक काळाची अत्यावश्यक गरज झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा प्रभावी वापर करून विध्यार्थ्यांनी शिक्षण घेतले, त्यामुळे इंटरनेट सेवा काळाची गरज ठरली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. लोरे नं.१ येथील B S N L टॉवर लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, BSNL जिल्हा प्रबंधक एस.आर. मंजे, BSNL मंडळ अधिकारी देवलीकर, जि. प. सदस्य नागेंद्र परब आदि उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, कोविड-19 च्या काळात इंटरनेट मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. त्यामुळे आता मोबाईल वर शिक्षण काळाची गरज झाली आहे. पण ग्रामीण भागात मोबाईलसाठी इंटरनेटची रेंज मिळत नाही. यासाठी टॉवर उभारणीची कामे सुरू झाली आहेत. त्याचबरोबरच ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. लोरे गावच्या मागणीनुसार रस्ते, कालवा याची कामे करण्यात येतील.लोरे गावातील विहीर जिल्हा नियोज...
कबुलायतदार गावकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि.01: जिल्ह्यातील चौकुळ, गेळे व आंबोली येथील गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला कबूलायतदार यांचे जमिनी हक्काबाबतचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू त्यासाठी शासन स्तरावर उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिले. आंबोली येथे कबुलायतदार गावकर जमीन वाटप समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सावंतवाडी सहायक वन संवरक्षक आय. डी. जळगांवकर, सावंतवाडी आर.एफ.ओ.दिगंबर जाधव, गट विकास अधिकारी वासुदेव नाईक व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कबूलायतदार गेले अनेक वर्ष जमीन हक्कासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा अविरत लढा सुरूच असून या लढ्याला आता सत्यात उतरणार आहे. कबुलायतदारांचा हा प्रश्न निकाली निघाल्यानंतर त्यांच्या येणाऱ्या पिढीला ही बाब सुखकारक असणार आहे. कबूलयातदार यांना जमि...
जिल्ह्यात एकूण 4 हजार 135 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 498 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात एकूण 4 हजार 134 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 496 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
पोलिओ निर्मुलन, जागतिक शांतता आणि कोविड रूग्णांचा आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद ---जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : रोटरी इंटरनॅशनलचे पोलिओ निर्मुलन व जागतिक शांततेसाठीचे कार्य खुपच मोठे आहे. कोरोना महामारीच्या काळात रोटरी क्लब ऑफ कुडाळचे कोविड रूग्णांचा आत्मविश्वास वाढवणारे कार्य कौतुकास्पद असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व रोटेरियन्स व डॉक्टर्स यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कुडाळने कोविड योध्दयाप्रमाणे रोटरी उमेद होम आयसोलेशन काऊंन्सलिंग कार्यक्रम, युध्द कोरोनाशी एक जनजागृती, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स, मेडिकल साहित्य वाटप, असे विविध उपक्रम राबवित सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासाला मोलाचे सहकार्य केले आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ सायकल क्लब, रेन्बोरायडर्स सुकळवाड, ब्युटीज ऑन व्हिल्स कट्टा यांच्या संयुक्त भव्य रोटरी पोलिओ जनजागृती सायकल रॅलीचे जिल्हा पोल...
कंटेन्मेंट झोन
- Get link
- X
- Other Apps
मौजे कणकवली शहर बांधकरवाडी-राणेनगर व मौजे वागदे नमसवाडी येथे कंटेन्मेंट झोन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : कणकवली तालुक्यातील मौजे- कणकवली शहर बांधकरवाडी राणेनगर येथील घर क्र. 04/1015 चा परिसर व मौजे वागदे नमसवाडी येथील घर क्र. 47 या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत. ...
जिल्ह्यात एकूण 4 हजार 96 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 502 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps