अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची सदिच्छा भेट
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजाकरीता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनांची सविस्तर माहिती, योजनांची कार्यपद्धती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.यावेळी प्रत्यक्षात मंत्री महोदयांनी संगणकावर बसून LOI निर्माण करण्याची प्रक्रीया, कर्ज मंजूरीची प्रक्रीया व्याज परतावा कशा प्रकार देण्यात येतो याची प्रक्रीया सविस्तर समजून घेतली व लगेचच ४,३३३ लाभार्थ्यांना रु 3 कोटी ७५ लाख व्याज परताव्याची रक्कम स्वत: लामार्थ्यांना वितरीत केली व महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यंत ६१,४११ लाभार्थ्यांना ब...