Posts

Showing posts from November, 2023

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि 30 (जिमाका) - मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल तसेच नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि राजकोट किल्ल्याच्या कामाची पाहणी केली. तसेच टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथील हेलिपॅडची देखील पाहणी करून काही मौलिक सूचना केल्यात. ०००००

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि. 1 व 2 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा), गोवा येथे आगमन व केसरी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, येथे आगमन व भारतीय नौसेना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात आढावा. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गगरी. सायं. 5.30 वाजता सिंधुदुर्ग येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून मनोहर विमानतळ, मोपा (गोवा) कडे प्रयाण. 000000

आरोग्य सुविधा अधिक बळकट करा -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका) : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे अवश्यक आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा, तसेच अद्यावत पॅथालॉजी लॅब तयार करुन गरजूंना अवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय येथे आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अधिष्ठाता डॉ. सुनीता रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ श्याम पाटील, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. औषधसाठा पुरेसा ठेवावा, सुविधांबाबत नियमित आढावा घेण्यात यावा, पदभरती कंत्राटी पध्दतीने करा, एनएचआरएम मधून औषध खरेदी करा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव पत्त्यासह यादी तयार करा ते कुठे जेवतात त्यांना येणारा खर्च याबाबत माहिती घ्या अशाही सुचना त...
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर रोजी राजकोट, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या निमित्ताने या सोहळ्याची माहिती देणारी माहिती पुस्तिका सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी यासंदर्भातील समन्वय पुस्तिका, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्वांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. या माहिती पुस्तिकेत किल्ले राजकोट आराखडा, नौदल दिन सोहळा, कार्यक्रम प्रसिध्दी, नियंत्रण कक्ष व्यवस्थापन, तारकर्ली येथील कार्यक्रम स्थळाचा नकाशा, सोहळ्याचे संपूर्ण सनियंत्रण, हेलीपॅड व अनुषंगिक व्...

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दि. 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष नोंदणी अभियान (पंजीकरण अभियान) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. माता व बालकांच्या आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, मातामृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केले आहे. योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राअंतर्गत 30 नोव्हेबर ते...

कट्टा, चौके, मालवण नगरपरिषद येथील आठवडा बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान यांच्या संभाव्य दौऱ्याचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने व वाहतुकीचे योग्य विनियमन करण्यासाठी मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, मालवण नगरपरिषद याठिकाणाचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. मालवण येथील राजकोट व तारकर्ली येथे दि. 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल विभागामार्फत नौदल दिन 2023 या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नौदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यमास पंतप्रधान महोदयांसह इतर अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने VVIP यांचे वाहन ताफे मौजे देऊळवाडा- बोडींग ग्राउंड- राजकोट – तारकर्ली MTDC मालवण शहरातून जाणार आहेत. तसेच VIP यांचे वाहन ताफे कसाल मालवण असे मालवण शहरातून जाणार आहेत. यावेळी आवठवडा बाजार भरला तर मोठ्या प्रमाणावर वाहनाची गर्दी होऊन VVIP यांचे वाहन ताफ्याला अडथळा निमार्ण होऊ शकतो. त्यादृष्टीने पोलीस अधीक्षक यांनी पंतप्रधान भारत सरकार यांच्या संभाव्य दौऱ्याच...

सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिन आढावा बैठक

सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे ही माझ्यासह तमाम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा काही दिवसांवर आला असल्याने सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नौदलाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम आणखी गतीने करावे, तसेच तारकर्ली येथील एमटीडीसी परिसरातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत, कार्यक्रमाच्या ठि...

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका) : मालवण किनारपट्टीवरील मोरयाचा धोंडा येथील किल्ले सिंधुदुर्गच्या पायभरणी सोहळ्याचा वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. पालकमंत्री यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा करण्यात आली. याचबरोबर किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरातील दररोज होणाऱ्या पुजेसाठी शासकीय यंत्रणांकडून आवश्यक ते सहकार्यही उभे केले जातील असे पालकमंत्री यांनी जाहीर केले. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला भुमिपूजन वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते. श्री चव्हाण पुढे म्हणाले, 350 वर्षा पासून महाराजांचा इतिहास जपण्याचे काम गावातील सर्व मंडळींनी केले आहे. त्याच धर्तीवर राम राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेऊन देश महासत्तेच्या दिशेने नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रामराज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आप...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वंचित घटकाने लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी, दि.24(जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वंचित घटकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करते प्रसंगी केले. विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमातंर्गत तळागळातील जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत ओरोस येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे, किशोर काळे, आरोस ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती आशा मुरमुरे, उपसरपंच श्री घाडीगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते. संकल्प यात्रेच्या चित्ररथात मोठया स्क्रीनवर लोकांशी निगडीत योजनांची माहिती द...

परीक्षेच्या अनुषंगाने 24 रोजी मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): जिल्ह्यातील SSPM Collegs Of Engineering, Harkul Budruk Nardave Road Tal Kanakavali Dist Sindhudurg या परीक्षा केंद्रावर दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षेचे आयोजन करणेत आलेले असून परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी SSPM Collegs Of Engineering, Harkul Budruk Nardave Road Tal Knakavali Dist Sindhudurg परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात सकाळी ०७.०० वाजेपासून सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केला आहे. परीक्षा केंद्रावर परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा येईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एस.टी.डी.बुथ, झेरॉक्स, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाध...

धान विक्री 31 जानेवारी पर्यंत करावी

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): हंगाम 2023-24 मधील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान विक्री दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात यावी. अशी माहिती डी. आर. पाटील जिल्हा मार्केटींग अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील 44 धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी सुरु आहे. त्याचा तालुका निहाय तपशिल पुढीलप्रमाणे 1) सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, डेंगवे, तळवडे, भेडशी, इन्सुली, मडुरा 2) कुडाळ तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कुडाळ, माणगाव, कडावल, घोडगे, कसाल, निवजे, निरुखे, आंब्रड, पिंगुळी, गोठोस, वेताळ बांबार्डे, पणदुर, पाठ, हिर्लोक, केरवडे, तुळस, 3) शेतकरी सह तालुका खरेदी-विक्री संघ लि. कणकवली - कणकवली, सांगवे, घोणसरी, लोरे नं.1, फोंडा 4) वेंगुर्ला तालुका सह. खरेदी विक्री संघ लि.- वेंगुर्ला, होडावडा 5) देवगड तालुका सह खरेदी- विक्री संघ लि. देवगड, पाटगाव, पडेल 6) मालवण तालुका सह खरेदी विक्री संघ लि. पेंडुर, गोठणे 7) वैभववाडी तालुका सह खरेदी विक्री सं...

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी राज्यातील नामांकित उद्योजक/इंडस्ट्रिज समवेत नागपूर येथे दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन ग.पां.चिंमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांनी केले आहे. राज्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्हयातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर अधिसूचित रिक्त पदांसाठी आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे, किंवा दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५ ईमेल आयडी :- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क सा...

सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्ह्यात सखी निवास योजना राबविण्यास इच्छुक संस्था/एजन्सी यांनी विहित वेळेत प्रस्ताव सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या ०२३६२-२२८८६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीच्या पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता मिशन शक्ती अंतर्गत सखी निवास या योजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नवीन ५० सखी निवास आहेत. भाडे तत्वावरील इमारती मध्ये प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन याकरिता अनुदानासह कार्यान्वित करावयाची आहेत. महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून ०३.०६.२०२३ रोजी सर्व जिल्ह्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रांत प्रसिध्द जाहिरातीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १ सखी निवास कार्यान्वित करायचे आहे. जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना न...

एन.एम.एम.एस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात येणारी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृती करीता बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वर दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असून राज्यात दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ अखेर एन. एम. एम. एस साठी मागील परीक्षेत शिष्यवृत्तीधारक घोषित झालेल्या १९.६८२ पैकी ६.३३५ नवीन अर्ज तर नूतनीकरणाचे ३५,०४१ पैकी १६,०५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दिव्यांग मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे २४२ नवीन व नूतनीकरणाचे २३६ पैकी ६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळेचे शाळा प्रमुख (एच.ओ.आय), नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ) यांचे या शिष्यवृत्ती योजनांकरीता चालू वर्षी पहिल्यांदाच बायोमॅ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी जमीन हस्तांतरीत

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): मालवण येथे 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या अनुषंगाने मालवण येथील स.न. 199/2 क्षेत्र 0.33.60 हे. आर ही शासकीय जमीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांना हस्तांतरीत करण्यात येत आहे. भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने व कब्जाहक्काने पुढील अटीं व शर्तींच्या अधीन राहून हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. 1.जमीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली जि.सिंधुदुर्ग हे भोगवटादार वर्ग २- म्हणून धारण करतील. 2. सदर जमिनींचा ताबा आहे त्या स्थितीत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली जि.सिंधुदुर्ग यांना देण्यात यावा. 3. मंजूर करावयाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमणे असल्यास ती निष्कासित करण्याची अथवा त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली जि. सिंधुदुर्ग यांची राहील. तसेच, मंजूर केलेल्या जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ...

मराठा कुणबी नोंद अभिलेखाची नागरीकांकडून मागणी

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की, जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज, इ. जुनी अभिलेख या कार्यालयातील विशेष कक्षात (सामान्य शाखेत) दिनांक २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. राज्यातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करणेसाठी मा. न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये अवलंब करावयाच्या कार्यपध्दती बाबत...

मिलेट च्या वापरातून खाद्य पदार्थाचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा मेळावा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): ईट राइट इंडिया या उपक्रमांतर्गत भरड धान्य किंवा तृणधान्य (मिलेट) यांचे दैनंदिन आहारातील महत्व व त्यांचे शरीराला होणारे फायदे लक्षात घेता. मिलेट चा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा मेळावा कणकवली येथे संपन्न झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मो.शं. केंबळकर यांनी दिली. तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग कार्यालय, रिगल कॉलेज, जानवली, ता. कणकवली आणि योगतज्ञ गावडे काका यांच्या ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे दि. ८ नोव्हेंबरला मिलेट मेळा व योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये FSSAI, नवी दिल्ली यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या ईट राईट इंडीया या उपक्रमाअंतर्गत भरड धान्य किंवा तृणधान्य (मिलेट) यांचे दैनदिन आहारातील महत्व व त्यांचे शरीराला होणारे फायदे यासंदर्भात रिगल कॉलेज मधील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व भरडधान्य (मिलेट) चा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये वाढावा तसेच सदर मिलेटच्या वापराबाबत व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, या हेतुने विद्यार्थ्यांकडून मिले...

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांकरीता ऑनलाईन प्रणालीव्दारे इच्छुक लाभार्थ्यांनी 8 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जे.एन.खरे यांनी केले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. सन 2021-22 ...

संस्था मान्यतेसाठीच्या प्रस्तावास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यासाठी संस्था मान्यतेसाठीच्या प्रस्तावास मुदतवाढ देण्यात आली आहे. नविन प्रस्ताव 17 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, दुर्धर आजारी पालकांची मुले कैद्यांची मुले, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे. या उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना दि.30/05/2023 च्या शासन निर्णयानुसार कार्यन्वित करण्यात आलेली आहे. शासननिर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने बालसंगोपन योजना जिल्हास्तरावर राबविण्याकरीता विहित पात्रतेचे निकष पुर्ण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची निवड करण्याकरीता शासन निर्णयातील परिशिष्ट ब, क, ड, फ. व इ नुसार संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी शासनाच्या www.mahara...

शस्त्र परवाना नुतणीकरणाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना शस्त्र परवान्यांची मुदत दि. 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. त्यांनी आपल्या परवान्यांची नुतणीकरणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे असलेल्या उपचिटणीस शाखेत दुपारी 1 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे. शस्त्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेल Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा.(अर्जावर फोटो आवश्यक आहे.) शस्त्र वापरणेस शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्यात S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र. शस्त्र परवाना नुतणीकरण करीता आवश्यक असलेला Form- S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्कानिशी सादर करावा. शस्त्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलिस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्त्र पडताळणी प्रमाणपत्र. सरपंच/पोलिस पाटील नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तवणुकीचा दाखला, किंवा आधारकार्ड. मुळ शस्त्र परवाना अर्जासोबत जोडावा. परवाना नुतणीकरण पाच वर्षोकरीला फ...

पोलीस पाटील पदाकरीता 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

सिंधुदुर्गनगरी दि.8 (जि.मा.का) : सावंतवाडी उपविभागातील तहसिल सावंतवाडी, वेंगुर्ला, आणि दोडामार्ग या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता, सावंतवाडी तालुक्यातील- 36, वेंगुर्ला तालुक्यातील -72 आणि दोडामार्ग तालुक्यातील -17, अशा एकूण 125 पदांकरीता दि. 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत होणार आहे. मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चित संबंधित गावाचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीव्दारे करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढण्याकरीता दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 5 वाजता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष प्रशांत पानवेकर यांनी कळविले केले आहे. सांवतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असणारी गावे पुढीलप्रमाणे आहेत. सावंतवाडी- कलंबिस्त, डिंगणे,मासुरे, नाणोस, साटेली त. सातार्डा, केगद ,सोनुर्ली, मळगांव, ब्राहमणपाट, गुळदुवे, उडेली, कुंभारवाडा, पारपोली, धाकोरा, बांदा, सरमळे, कोंडूरा...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.7(जि.मा.का): शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु. जाती. इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज व जुन्या अर्जांचे नुतनीकरण करण्याची प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकडून महाडिबिटी प्रणालीवरील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज कल्याण विभागामार्फत दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून महाडिबीटी पोर्टल विद्यार्थ्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. तथापि, शिष्यवृत्ती योजने संदर्भात खूप कमी प्रमाणात मागासवर्गीय विद्यार्थ्याचे अर्ज प्राप्त होत आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतीग...

मराठा समाजातील पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याचे काम सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का): जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी त्यांचे जवळ असलेल्या मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या जातीचा कागदोपत्री पुरावा, सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रासह तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावेत. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा - कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने, या कार्यालयास जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, पत्नी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा. ०००००

"चक्रीवादळ" विषयावर रंगीत तालीम · नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन · 7 व 9 नोव्हेंबर रोजी आयोजन · कोळंब, उभादांडा, व देवगड येथे प्रत्यक्ष रंगीत तालीम

सिंधुदुर्गनगरी दि.6 (जि.मा.का) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दिनांक ७ व ९ नोव्हेंबर २०२३ रोजी 'चक्रीवादळ' या विषयावर रंगीत तालीमीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहे. रंगीत तालीम कार्यक्रमात दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी Table Top Exercise हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम व्ही. सी. द्वारे घेतला जाणार असून या कार्यक्रमात चक्रीवादळ या आपत्तीच्या अनुषंगाने विविध घटना, प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्यातील यंत्रणा कशा रीतीने प्रतिसाद देणार आहे. याची माहिती विविध जिल्हास्तरीय यंत्रणांकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली घेणार आहे. हा कार्यक्रम जिल्हधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे होणार असून या Table Top Exercise साठी महसूल, ग्राम विकास, पोलीस, महावितरण, प्रादेशिक बंदर अधि...

पोलीस पाटील पदाकरीता 7 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

सिंधुदुर्गनगरी दि.6 (जि.मा.का) : कुडाळ महसूल उपविभागातील तहसिल कुडाळ व मालवण या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता कुडाळ तालुक्यातील 66, व मालवण तालुक्यातील 89, अशा एकूण 155 पदांकरीता दि. 7 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत होणार आहे. मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार संबंधित गावाचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीव्दारे आरक्षण निश्चिती करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढण्याकरीता दि. 7 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष ऐश्वर्या काळुशे यांनी कळविले केले आहे. कुडाळ व मालवण तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असणारे सजा पुढीलप्रमाणे – मडगांव, कांडरगांव, गोंधळपुर, गुढीपुर, टेबधुरीनगर, देऊळवाडी, पिंगुळी, रुमडगांव, कारीवणे, टेंबगांव, पांग्रड, निरुखे, भरणी, सोनवडे तर्फ कळसुली, घाडीगांव, दुर्गानगर, साईगांव, माणकादेवी, कविलगांव, कुटगांव, बेलनदी, बोरभाट, मिटक्याचीवाडी, नाईकवाड...

दिवाळी मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दि.6 (जि.मा.का) : (नवतेजस्विनी) महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत दिवाळी या सणाचे औचित्य साधून ग्रामीण भागांतील माविम बचत गटांनी दिवाळीनिमित्त उत्पादित केलेले विविध खाद्यपदार्थ व दिवाळी साहित्याचे जिल्हास्तरीय "दिवाळी मेळावा " दि. 8 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती कुडाळ याठिकाणी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्वाधार लोकसंचलित साधन केंद्राचे अध्यक्ष मानसी गोविंद धुरी यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ नगरपंचायतचे नगराध्यक्ष अक्षता अनंत खटावकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात शालेय मुलांचे गोफ नृत्य, महिला फुगडी, महिला नृत्य, खेळ पैठणीचा इ. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महाराष्ट्र शासन अंगीकृत जिल्‍हा कार्यालय या कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्य...

सायबर सुरक्षेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का): ऑक्टोबर महिना हा "वर्ल्ड सायबर सिक्युरीटी अवेअरनेस मंथ " म्हणून गणला जातो. जिल्ह्यामधील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेतील विदयार्थी जे मोबाईल इंटरनेटचा जास्त वापर करतात. देशाच्या भावी पिढीला "सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस" बाबत अवगत करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी. जेणेकरून तरूण पिढी स्वत:चे व आपल्या परीवाराचा संभाव्य सायबर गुन्ह्यांपासून काही प्रमाणात बचाव करु शकतील. यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलीस दल व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) सिंधुदुर्ग यांनी एकत्रितपणे दि. १६ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजीचे मुदतीत "सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस" या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा व विद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील २५८ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रत्यक्ष जावून तेथील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेसबाबत मार्गदर्शन करण...

मतदानाच्या दिवशी आचरा येथील आठवडा बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का): जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, पोट निवडणूक 2023 करीता रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा गावातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. या दिवशी भरविण्यात येणारे आठवडा बाजार अन्य दिवशी भरविण्यास अनुमती देण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक, पोट निवडणूक 2023 दि. 3 ऑक्टोबर 2023 पासून जाहिर झाला असून रविवार दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचयातीसाठी मतदान होत असून उपरोक्त दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या- ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो. त्या- त्या ठिकाणचा आठवडा बाजर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने बंद ठेवणे आवश्यक आहे. ००००००

जिल्ह्यात २० नोव्हेंबर पासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दि. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत " कुष्ठरुग्ण शोध (LCDC)" आणि "सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम (ACF)" राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक, आरोग्य सेवाचे डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे. या मोहीमेच्या अनुषंगाने राज्यातील १०० टक्के ग्रामीण व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत सर्व लोकांची शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत. संयुक्त कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध उद्देश :- 'समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने व एक्स रे तपासणी आवश्यकतेनुसार इतर तपा...

थकबाकीदार लाभार्थीनी एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय "ओबीसी" महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थीनी एकरक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा व्यवस्थापक प्रिती आर पटेल यांनी केले आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास ओबीसी प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. "ओबीसी" महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे. असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. ००००

सिंधुदुर्गनगरीत २३ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का): युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२३-२४ या वर्षातील युवा महात्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी "1. तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर 2. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान " ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2023-24 मध्ये दि. 23 नोव्हेंबर 2023 रो...

पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवपुतळा भूमिपूजन सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी अनेक गोष्टींतून जाणवते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणून आरमाराची उभारणी केली. 4 डिसेंबर रेाजी नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार असल्याने या किल्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सर्वांनी पुढच्या पिढीला द्यावा असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 32 गड किल्ल्यांतील गोळा करण्यात आलेली माती एकत्र करुन शिवपुतळा उभारणीच्या स्थळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या 'माती कलश' रॅलीचा शुभारंभ देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आदी उपस्थित होते. ...

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का): राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक/ कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांनी ज्या बँकेमधून निवृत्तीवेतन स्विकारत आहेत, त्या बँकेत अथवा जवळच्या जिल्हा कोषागार, उपकोषागार कार्यालयात 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जाऊन हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन अप्पर कोषागार अधिकारी संजय गोविंद घोगळे यांनी केले आहे. ही सुविधा जीवन प्रमाणपत्र या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीनेही उपलब्ध आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर न केल्यास 1 डिसेंबर पासून हयातीचा दाखला सादर करेपर्यंत निवृत्तीवेतन रोखून धरले जाऊ शकते. त्यामुळे विहित कालावधीत हयातीचा दाखला सादर करावेत. निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि. 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक वर्षीच्या नोव्हेंबर अखेर सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयमार्फत सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या याद्या संबंधित बँकाकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. ही मोहिम 1 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधित राबविण्यात येत आहे. सर्व राज्य शासकीय निवृत...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : माहे नोव्हेंबर महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली आहे. 0000