मतदार नोंदणी व जनजागृती अभियान संपन्न
सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका): जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार कुडाळ तसेच नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्गनगरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नर्सिंग परिचर्या महाविद्यलय ओरोस येथे मतदार नोंदणी व जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला,असल्याची माहिती नायब तहसिलदार प्रमोद पिळणकर यांनी दिली. यावेळी तहसिलदार कुडाळ विरसिंग वसावे, नेहरु युवा केंद्र राष्ट्रीय युवा स्वयं सेवक विल्सन फर्नांडीस, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल मोहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना घटनेने बहाल करण्यात आलेला आहे. तो हक्क बजावता यावा म्हणून 18 वर्षावरील युवक युवती व नागरिकांनी मतदार म्हणून आपल नाव नोंदविणे करणे आवश्यक आहे. जनजागृती करण्याच्या दृष्टीने तहसीलदार कुडाळ विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय युवा स्व...