निवृत्तीवेतनधारकांसाठी सिंधुदुर्ग कोषागार कार्यालयात 3 सप्टेंबर रोजी ‘महा-उपलब्धी’ अॅप कार्यशाळा
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या विविध अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी कोषागार कार्यालय, सिंधुदुर्ग येथे गुरुवार, दि. 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांना ‘Maha-UPLABDHI’ (महा-उपलब्धी) मोबाईल अॅप बाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या त्यांच्या मासिक व वार्षिक निवृत्तीवेतनाचा तपशील तसेच उत्पन्नाचा दाखला PDF स्वरूपात उपलब्ध करून घेता येणार आहे. अॅपची नोंदणी व वापराबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नोव्हेंबर 2026 पासून ‘महा-उपलब्धी’ अॅपच्या माध्यमातून हयात दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हे अॅप निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा तसेच त्रैमासिक बैठकीस उपस्थित राहावे, ...