Posts

Showing posts from April, 2026

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ

सिंधुदुर्गनगरी दिनांक ३० (जिमाका) :- महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. ध्वजारोहणानंतर 8.25 वाजता पोलीस दल व राखीव पोलीस दलाचे संचलन होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर कार्यालये अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 7.15 पूर्वी किंवा सकाळी 9 वाजल्यानंतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सभारंभासाठी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी सकाळी 7.45 वाजेपर्यंत आपापल्या जागांवर स्थानापन्न व्हावे, तसेच राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ००००००

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला दोडामार्ग तालुका दौरा जनगणना प्रशिक्षणाला भेट आणि नगरपंचायत कामकाजाचा घेतला सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमा का) जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दोडामार्ग तालुक्याचा दौरा करत जनगणना २०२७ प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण आणि पंचायत स्तरावरील कामांचा प्रत्यक्ष आढावा घेत त्यांनी विकासकामांना गती देण्याचे निर्देशही यावेळी दिले. दौऱ्यादरम्यान नगरपंचायत सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विकासकामांची प्रगती, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, वित्तीय व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांचा सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीस नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक रामराव गावकर, मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पारंपरिक पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. बैठकीच्या विषयसूचीत समाविष्ट असलेल्या १९ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शहरातील सुरू असलेल्या विकासकामांची माहिती सादर करत पायाभूत सुविधा, रस्...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल, मोबाईल अॅपद्वारे लाभार्थ्यांना थेट सेवा

सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमाका) :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने डिजिटल युगाकडे महत्त्वपूर्ण पाऊल टाकत “Annasaheb Patil Mahamandal App” हे मोबाईल अॅप सुरू केले आहे. हे अॅप Google Play Store वर उपलब्ध असून, लाभार्थ्यांना आता योजनांची संपूर्ण प्रक्रिया थेट त्यांच्या मोबाईलवरून करता येणार आहे. महामंडळाच्या कार्यान्वित योजनांसाठी www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळ देखील कार्यान्वित असून, महामंडळाची संपूर्ण कार्यपध्दती ऑनलाई स्वरूपात राबविण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यानी दिली आहे. योजनांच्या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांना संगणकाचा वापर करावा लागत असल्याने किंवा सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत होता. काही प्रकरणांमध्ये एजंटमार्फत फसवणुकीच्या घटना निदर्शनास आल्यामुळे लाभार्थ्यांना वेळ, खर्च आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महामंडळाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी नागरी सुविधा केंद्र व आपले सरकार केंद्रांशी करार करून योजनांच्या सेवा प्रति सेवा रु. ८५ दराने उपलब्ध करून दिल्या...

उष्माघात व उष्माघात रुग्णांवर करावयाची उपाययोजना

सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमाका):- सर्वसाधारण प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे या महिन्यामध्ये तापमानात वाढ झाल्याने उष्माघात संभवतो, उष्माघाताची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. उष्माघाताच्या अनुषंगाने खालील प्रमाणे जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्यात येत आहे. अति जोखमीचे घटक:-१)६५वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती,१ वर्षाखालील व १ते ५ वयोगटातील मूले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलिक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणारे व्यक्ती. उष्माघात होण्याची कारणे:- १) उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, २) कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे काच कारखान्यातील कामे करणे,३) जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे,४)घट्ट कपड्यांचा वापर करणे,अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थिती सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. लक्षणे :-१)थकवा येणे ,ताप येणे, त्वचा कोरडी पडणे २) भूक न लागणे ,चक्कर येणे, निरुत्साही होणे ,डोके दुखणे...

एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर 'एल-निनो' (El-Nino) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. 'एल-निनो'मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने 'जिल्हा नियोजन व विकास समिती' अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बियाणांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांना तातडीने देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ५ मे २०२६ पूर्वी हे आदेश देऊन...

"ललद्यदस् ललबाय" कवितासंग्रह अभिवाचन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २८ (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमांतर्गत कवयित्री मीनाक्षी पाटील लिखित "ललद्यदस् ललबाय" या कवितासंग्रहाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात श्री वामन मधुसूदन पंडित हे अभिवाचन सादर करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. ०००००

*हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व सी- आर्म मशीनचा लोकार्पण सोहळा*

सिंधुदुर्गनगरी दिनांक २८ (जिमाका) :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून प्राप्त हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व सी- आर्म मशीनचा मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख उपस्थिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, पंचायत समिती सभापती मिलींद नाईक यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुषचे आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहीकर आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ. अनंत ...

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक २८ (जिमाका) :- जिल्ह्यातील न्यायप्रक्रियेला गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना जलद, व परवडणाऱ्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे. या वर्षातील ही दुसरी लोक अदालत असून, या लोकअदालतीतून विविध प्रकारची तडजोडपात्र प्रकरणे एकाच दिवशी सामोपचाराने निकाली काढण्यावर भर देण्यात येणार असून, नागरिकांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळणार आहे. सध्या अनेक प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असून, त्यांचा निकाल लागण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे. अशा परिस्थितीत लोक अदालत ही नागरिकांसाठी एक प्रभावी पर्याय ठरत आहे. येथे वाद परस्पर संमतीने सोडवले जात असल्यामुळे दोन्ही पक्षांना समाधानकारक तोड...

'सेवा हक्क दिन' कार्यक्रम उत्साहात संपन्न नागरिकांच्या हक्कांसाठी प्रशासन कटिबद्ध: पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

• आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन • उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान सिंधुदुर्गनगरी दिनांक २८ (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि नागरिकाना विहित वेळेत सेवा देणे हे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार करावा. 'आपली सेवा - आमचे कर्तव्य' या भावनेतून प्रशासन नागरिकांसाठी कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक आणि जबाबदारीने मिळाव्यात यासाठी साजरा करण्यात येणारा 'सेवा हक्क दिन' जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, शारदा पोवार यांच्यासह विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी तसेच संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी सेवेची ब...

जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा

सिंधुदुर्गनगरी दिनांक २७ (जिमाका) :- राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये नामनिर्देशनाने सदस्यांची नियुक्ती बाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या अधिनियमास महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( दुसरी सुधारणा) अधिनियम,२०२६ असे नाव देण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. या अधिनियमान्वये सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ यांच्या कलम ९ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. नवीन कलम १०-१अ हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित सभासद म्हणून नामनिर्देशित करावयाच्या निवडून आलेल्या सभासदांच्या एकूण संख्येच्या दहा टक्के किंवा किमान पाच सभासद यापैकी जे अधिक असेल तितक्या जिल्हा परिषदांच्या प्रशासनातील विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करावयाची आहे. तसेच या अधिनियमान्वये सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५ याच्या कलम ५७ मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे व नवीन कलम ५९ अ हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित सदस्...

पनीर व चीज ॲनालॉग संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

सिंधुदुर्गनगरी दिनांक २७ (जिमाका) :- जिल्ह्यातील रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स /फास्ट फूड विक्रेते, चीज ॲनालॉगचे उत्पादर,पनीरचे उत्पादक, पुरवठादार यांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट चालकानी पनीर ॲनालॉग व चीज ॲनालॉग उत्पादकांकडून खरेदी करताना खरेदी बिलावर सदर अन्नपदार्थाचा स्पष्टपणे उल्लेख आहे की नाही याची खात्री करावी नंतरच सदरचे अन्नपदार्थ खरेदी करावेत असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी केले आहे. अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ हा जनहित व जन आरोग्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कायदा असून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश व उद्दिष्ट आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून, पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्टच नाहीतर पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याच्या आहारात विशेष स्थान आहे .पनीरमध्ये प्रथिने,...

बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा २९ रोजी

सिंधुदुर्गनगरी दिनांक २७ (जिमाका) :- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेच्या बॅ. नाथ पै समिती सभागृह, सिंधुदुर्गनरी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता तथा बांधकाम समिती सचिव राजेंद्र सावंत यांनी दिली आहे. ०००००

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 88 रुग्णांना सुमारे 77.64 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

सिंधुदुर्गनगरी दिनांक २७ (जिमाका) :- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक वर्षात 88 रुग्णांना सुमारे 77 लाख 64 हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. 20 गंभीर आजारासाठी मदत : कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्...

अंमली पदार्थ नियंत्रण जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी दिनांक २७ (जिमाका) :- आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. अंमली पदार्थ अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को ऑर्डनेशन समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे प्रत्यक्ष तर सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन एस.पी. यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सई धुरी, तसेच शिक्षण विभाग, उत्पादन शुल्क विभाग, बंदर विकास विभाग, समाज कल्याण विभाग, पोस्ट ऑफिस व इतर विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाल्या की, तरुण ...

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग नगरी दि २५ (जिमाका): दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी सविस्तर अहवाल सादर केला असून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागामध्ये ६१ घरांचे नुकसान झालेले आहे. त्याचे देखील त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या हानीची प्रत्यक्ष पाहणी करून ...

आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांप्रश्नी आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.):- सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तिलारी ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर चर्चा झाली. या योजनेसाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव तातडीने पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या निर्णयामुळे शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच, सावंतवाडी येथील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात पुनर्वसन विभाग व इतर आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्...

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २६ एप्रिल रोजी डॉक्टरांनी मतदानाचा हक्क बजवावा

सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) ची निवडणूक रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी, बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग या मतदान केंद्रावर पार पडणार आहे. सर्व नोंदणीकृत डॉक्टर मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क जबाबादारीने पार पाडावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ही निवडणूक दि.२६ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ११ मध्ये होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ दस्तऐवज सोबत ठेवणे अनिवार्य आहे. १) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेली नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate) जर यावर छायाचित्र नसेल तर त्यासोबत अन्य फोटो आयडी पुरवा जोडणे आवश्यक आहे. २) महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिलेले ओळखपत्र (Identity Card). ३) भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी मान्यता दिलेले छायाचित्रासंहित ओळखपत्र....

मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. मंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. मधमाशी पालन व्यवसायास गती मिळावी व मधपालनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशी पालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपालांना प्रथम/द्वितीय/तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांकासाठी रु. ११,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ७,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. ५,००० अशी आहे. दि. २० मे २०२६ रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’चे औचित्य साधून पुणे जिल्ह्यात आयोजित जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ...

महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा द्या -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी दि २३ (जिमाका): जिल्ह्यातील महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी विविध कायदे व धोरणांतील सुधारणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली महसूल अधिकारी यांची आढावा बैठक मायनाक भंडारी सभागृहात पार पडली. या बैठकीत महसूल, निवडणूक तसेच जनगणना या विषयांचा आढावा घेण्‍यात आला. या बैठकीदरम्‍यान महसूल व वनविभाग महराष्‍ट्र शासन यांचेकडून नव्‍याने निर्गमित करण्‍यात आलेले विविध शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना याबाबत उपजिल्‍हाधिकारी तसेच तहसिलदार यांनी सादरीकरण केले. बैठकीदरम्यान महसूल विभागाशी निगडित अनेक महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, अकृषक परवानगी प्रक्रियेतील सुलभीकरण, सनद वितरण, तसेच अकृषक आकारणी रद्द करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी यांचा समावेश होता. याशिवाय कुळ कायद्यातील सुधारणा, सिलिंगमधील जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याबाबतच्या सूचनांची अ...

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा; विकासकामांना गती देण्याच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. २३ : सावंतवाडी नगरपरिषदेतील विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, वित्तीय व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी आज नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला नगरपरिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर विषयसूचीत असलेल्या 19 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेताना, शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रशासकीय सुधारणा करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नगरपरिषदेच्या प्रलंबित कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन केंद्रासह व...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला इंधन व गॅस पुरवठ्याचा सखोल आढावा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) दि. 22 एप्रिल 2026 : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात IOCL, BPCL व HPCL या तेल कंपन्यांच्या गॅस तसेच पेट्रोल/डिझेल विभागाच्या सेल्स अधिकाऱ्यांसह MNGL कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील इंधन व गॅस पुरवठ्याची स्थिती सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली असून प्रशासनाकडून आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत सर्वप्रथम जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. उपलब्ध साठा, पुरवठा साखळी व भविष्यातील गरज यांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप वितरकांशी सातत्याने समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. तसेच एलपीजी गॅस साठ्याबाबतही बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्व सेल्स अधिकाऱ्यांनी वितरकांशी समन्वय साधून मागणीनुसार वेळेवर पुरवठा करावा, अशा सूचना देण्यात आल्या. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार...

मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक १५ मेपूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा; आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जिमाका): आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांना मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, वीज वितरण, ग्रामविकास, नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांचा सहभाग होता. प्रत्येक विभागाने आपापल्या तयारीचा आढावा सादर करताना संभाव्य अडचणी व उपाययोजना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांन...

अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; एका रात्रीत १५ वाहनांवर कारवाई

सिंधुदुर्गनगरी: दिनांक 18 (जिमाका):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वय साधत व्यापक आणि नियोजित 'सर्जिकल स्ट्राईक' राबवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून अवैध वाळू वाहतुकीवर एकाचवेळी अनेक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, कणकवलीचे तहसीलदार दीक्षात देशपांडे, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी तसेच कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. कारवाईदरम्यान विविध मार्गांवर वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत अवैध वाहतुकीला आळा घातला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने २ वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या ३ वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने ३ वाहने पकडली, तोंडवली येथे सावंतवाडी पथकाने ३ वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ परिसरात कुडा...

जिल्हास्तरावर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- क्रीडा प्रतिभा विकास प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडूंची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी होणाऱ्या निवडचाचणीत सहभाग घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाने क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादन करून ऑलिंपिक, आशियाई कॉमनवेल्थ इत्यादी स्पर्धा मध्ये भारताचे व राज्याचे नाव उज्वल करणे या उद्देशाने मिशन लक्षवेधी महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रकरिता सध्य स्थितीत अथलेटिक्स या खेळाचे अनिवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तरी ईच्छुक खेळाडूंनी https://docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSddaNtflwENEHm५i२-tedkly...

क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी नोंदणी सुरू

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यामार्फत शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन 2026-27 या वर्षासाठी 9 क्रीडा प्रबोधिनीत निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीत सहभागी होण्यासाठी 23 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत 9 क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश प्रक्रियेत 50 टक्के सरळप्रवेश पद्धतीने तर 50 टक्के कौशल्य चाचणीद्वारे प्रक्रीयेअंतर्गत खालील निकषानुसार प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश प्रकीयासाठी नियम अटी व शर्ती पुढीलप्रमाणे १. क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे- राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली...

अण्णासाहेब पाटील महामंडळाची सुधारित व सुलभ कार्यपद्धती लागू

सिंधुदुर्गनगरी दिनांक 18 (जिमाका) :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सुधारित व सुलभ कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनद्वारे प्रकरणांची स्थिती पाहणे, अपूर्ण कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे, तसेच Hold, Reject व Block स्थितीतील प्रकरणांचे निराकरण करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा समन्वयक स्नेहल पुजारी व गोविंद परब यांनी दिली. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ व पारदर्शक करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत बँक मंजुरी स्तरावर Reject Incomplete Documents अर्थात अपूर्ण कागदपत्रामुळे Reject स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगीनद्वारे पाहता येणार आहे. त्यामधील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना स्वतः ऑनलाईन अपलोड करून करता येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याचे आवश्यकता राहणार नाही. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्यावत केल्यानंतर संबंधि...

महिला सक्षमीकरणासाठी 'नारी शक्ती वंदन कायदा' महत्वपूर्ण

'नारी शक्ती वंदन कायदा २०२३' च्या अंमलबजावणीसाठीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. त्यादृष्टीने नवीन संसद भवनाच्या इमारतीत 'नारी शक्ती अधिनियम' हे पहिले विधेयक केंद्र सरकारने पारित केले. महिलांचा सर्वांगीण विकास व त्यांच्या प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या अधिनियमावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी झाली आणि या अधिनियमाचे विधेयकात रुपांतर झाले. या कायद्यामुळे लोकसभा, राज्यांच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा आरक्षित होतील. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नवीन संसद भवनातील पहिले विधेयक: महिलांच्या सर्वांगीण प्रगतीला अधिक चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नवीन संसद भवनाच्या इमारतीत नारी शक्ती वंदन हे पहिले विधेयक पारित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीने या अधिनियमाचे विधेयकात रुपांतर झाले असून या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात महिलांना...

नारी शक्ती : मूलभूत सन्मानापासून स्वतःचे अवकाश

"स्त्रियांना फक्त गृहिणी म्हणून पाहण्याचे दिवस गेले; आता त्यांना राष्ट्रनिर्माते म्हणून पाहण्याची गरज आहे." : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भारतातील एखाद्या गावातील तिशीतली स्त्री डोळ्यासमोर आणा. काही वर्षांपूर्वी ती पहाटे अंधारात, भीतीच्या छायेत घराबाहेर जाऊन नैसर्गिक विधी आटोपत असे. घरातील सर्वांसाठी पाणी दूरवरून आणणे, लाकडाच्या धुरात स्वयंपाक करणे, स्वतःच्या नावावर घर नसणे, बँक खाते नसणे—अशा अनेक मर्यादांमध्ये तिचे आयुष्य अडकलेले होते. पण आज ही परिस्थिती बदलली आहे. या परिवर्तनाला नाव आहे—“नारी शक्ती”. गेल्या काही वर्षांत महिलांच्या जीवनातील प्रत्येक पैलू एकमेकांशी जोडून बदल घडविण्याचा प्रयत्न झाला आहे. सन्मानाला प्राधान्य : महिलांच्या सन्मानाची सुरुवात मूलभूत गरजांपासून झाली. स्वच्छ भारत अभियानातून कोट्यवधी शौचालयांची निर्मिती झाली आणि ग्रामीण भारत खुले शौचालयमुक्त झाला. यामुळे महिलांची सुरक्षितता वाढली. जल जीवन मिशनमुळे घराघरात नळजोडणी झाली आणि पाण्यासाठी होणारी दररोजची कसरत कमी झाली. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन मिळाले, धुरामुळे होणारे आरोग्याचे त्रा...

कोल्हापूर जिल्ह्यात ३९२२ रुग्णांना सुमारे २८.०६ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

कोल्हापूर, दि.१७ : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३९२२ रुग्णांना सुमारे २८ कोटी ०६ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस...

उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. मुलांच्या परीक्षा संपल्यात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायचे? मुलांना वेळ घालविण्याकरीता काय घ्यायचे? असा विचार पालकांच्या मनात आला असेलच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे कुस्ती या खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही प्रशिक्षण शिबिर हे अनिवासी तसेच निशुल्क आहे. कुस्ती या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण दि. 23 एप्रिल ते 2 मे 2026 सकाळी 8 ते 10 या वेळेत न्यू इंग्लिश स्क...

देवगड येथे २४ एप्रिलला रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग व देवगड महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळत देवगड महाविद्यालय देवगड येथे भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी दिली आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार असून, विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे. सुमारे ६०० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या मेळाव्यात अधिराज मेनपावर मार्फत Skoda Auto Volkswagen India, Atomberg Technologies, Excel Autocomp Industries Pvt. Ltd., Mahindra & Mahindra तसेच IAC International Automotive India या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी विविध क्...

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी Service Selection Board (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे SSB कोर्स क्रमांक ६५ आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स दि. ४ ते १३ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण सिंधुदुर्ग कार्यालय येथे दिनांक 29 एप्रिल 26 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील SSB-65 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परि...

पोषण पंधरवड्यानिमित्त शपथ

सिंधुदुर्गनगरी दिनांक १७ (जिमाका) :- महिला व बालकल्याण विभागामार्फत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहार, आरोग्यदायी सवयी तसेच स्क्रीन टाईम कमी करण्यावर विशेष भर देण्यात यावा. दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यात यावे. मोठ्या मुलांसाठी स्क्रीन वापर मर्यादित ठेवावा तसेच घरात मोबाईल फ्री वातावरण निर्माण करण्याची शपथ आज देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या १५ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर पोषण पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही शपथ घेण्यात आली. या माध्यमातून पालक व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण समिती सभापती रुहिता तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सभापती, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात दि. १४ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीपर्यंत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त यांनी केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य केवळ एका निबंधात मांडणे शक्य नाही. त्यामुळे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य महिला सक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान” या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे स्व...

खत साठ्यात तफावत आढळल्यास खत विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सिंधुदुर्गनगरी दिनांक 17 (जिमाका) :- राज्यातील कृषी केंद्र चालक आणि त्यांच्याकडील खतविक्रीनंतरचा शिल्लक साठा आणि पॉस मशीन मधील साठा यांचा दररोज ताळमेळ असणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये तफावत आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिले आहेत.या महिनाअखेर राज्यभर कृषी विभागाकडून खतांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास दोषीवर खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत कृषी आयुक्तांनी दिले आहेत. खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या खतांचा व कृषी निविष्ठांच्या पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने मोहीम स्वरूपात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खत विक्री केंद्रावर साठा फलक व किंमत सूची अद्ययावत असणे, खतांचा साठा व विक्री नोंदवही प्रत्यक्ष साठ्याशी जुळणे, लिंकिंगला नाही म्हणा (say no to Linking ) बोर्ड विक्री केंद्रावर प्रदर्शित करणे, अनधिकृत व विनापरवाना खत विक्रीवर बंदी, जास्त युरिया खरेदी करणाऱ्यांची तपासणी करणे व ई पॉस मशीन व प्रत्यक्ष साठ्...

नद्यांमधील गाळ काढल्याने पाणी वहन क्षमतेत वाढ

• मागील वर्षी 4 लाख 63 हजार तर यावर्षी मार्च पर्यंत 3 लाख घनमीटर गाळ काढला सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- जलसंपदा विभागाकडे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व महसूल विभागाकडून प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील तिलारी, तेरेखोल, वेंगुर्ला, कर्ली, देवगड, वाघोटन, आचरा, गड व महादयी या उपखोऱ्यांतील नद्यांमधील गाळ काढण्याची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. मागील वर्षी जून २०२५ पर्यंत यांत्रिकी विभाग, नाम फाउंडेशन व मागणीदार अभिकरणांच्या माध्यमातून एकूण १४,८०,१४० घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी यांत्रिकी विभागामार्फत ३,३९,६९४ घ.मी., नाम फाउंडेशनमार्फत १,११,७९७ घ.मी. आणि मागणीदार अभिकरणांकडून १२,४७५ घ.मी. असा एकूण ४,६३,९६६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. नद्यांमधील गाळ काढल्यामुळे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढली असून, पावसाळ्यात पाणी पात्राबाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी शेतजमिनी व गावांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनांमध्ये घट झाली असून, नदीकाठच्या गावांना बसणारा पुराचा फटका कमी झाला आहे. तसेच पाणी साचण्या...

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- अक्षय तृतीया दिवशी होणारे बाल विवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिला,असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये कलम 16 (1) नुसार ग्रामीण भागातील ग्रामसेवक शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्त्वाची व सामाजिक क्रिया आहे. साहजिकच शुभमुहूर्तावर विवाह विधी केले जातात. अक्षतृतीयेच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात .त्या अनुषंगाने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. बालविवाहात सहभागी होणारे व सहकार्य करणारे व्यक्ती ,धार्मिक गुरु, पंडित, सेवा देणारे व्यावसायिक, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यवसायिक आणि वाजंत्री यांच्यावरह...

वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी ची नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 16 (जिमाका) :- वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी नागरी सुविधा केंद्र मार्फत (CSC) राज्यभर सीएस नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी ची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी केले आहे. राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार अॅग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी Farmer ID फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. वन हक्क अधिनियम 2006 अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वन जमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वन पट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्याजवळील नागरी सुविधा केंद्र( CSC) सीएससी येथे भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह फार्मर आयडी नोंदणी करून घ्यावी, या नोंदणीसाठी ...

सिंधुदुर्गात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय : योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीने महिलांना नवी उभारी

विशेष लेख- सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक संरक्षण आणि पुनर्वसन या तिन्ही पातळ्यांवर महिलांना सक्षम करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या योजनांमुळे महिलांना केवळ आर्थिक आधारच मिळत नाही, तर त्यांच्या जीवनमानातही सकारात्मक बदल घडून येत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना : आर्थिक स्वातंत्र्याची दिशा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरत आहे. पात्र महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये थेट जमा केले जात असून, जिल्ह्यातून तब्बल १,९४,०५२ अर्ज राज्यस्तरावर अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. या योजनेमुळे महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याबरोबरच त्यांना आर्थिक निर्णयक्षमता मिळत आहे. लाडकी बहीण क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी : बचतीतून उद्योगाकडे वाटचाल या योजनेतून मिळणाऱ्या निधीची योग्य गुंतवणूक करून महिलांना उद्योगक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात ‘लाडकी बहीण क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोस...

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा उपक्रम; लाभार्थ्यांना ‘लोकल ते ग्लोबल’कडे वाटचाल

सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जिमाका ):- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून “लोकल ते ग्लोबल” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लहान व्यवसायांनाही महामंडळाच्या पोर्टलमार्फत व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक स्नेहल पुजारे व गोविंद परब यांनी केले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरतेच मर्यादित न राहता, लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम व Marketing Tab सारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ देण्यात येत आहे. व्यवसाय वर्धन (Marketing Tab): स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ आजच्या स्पर्धात्मक युगात उत्पादन तयार करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे ही आवश्यक आहे. अनेक लघुउद्योजकाकडे दर्जेदार उत्पादने असली तरी त्यां...

समाज कल्याण विभागातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजर

ी सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जिमाका ):- समाज कल्याण, विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या औचित्याने महिला मेळावा व जनजागृती शिबिर संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सहायक आयुक्त संतोष चिकणे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन, कार्य व सामाजिक संघर्ष यावर मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते श्री. नचिकेत पवार यांनी ‘महात्मा फुले यांचे शिक्षणविषयक विचार आणि आजची सामाजिक स्थिती’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच बार्टी समतादूत यांच्या माध्यमातून मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रमही राबविण्यात आला. तसेच समाज कल्याण विभागामार्फत महिला मेळावा व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या सहायक संचालक सरकारी अभियोक्ता ॲड. ममता पाटील यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी तुषार गवळ...

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिक मेळावा व रक्तदान शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.१५ (जिमाका ):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने १३ एप्रिल रोजी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर, नागरिकांचा मेळावा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे उपआयुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी दिली आहे. या कार्यक्रमांदरम्यान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने नागरिकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा जात पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रीमती रुईना तांबे, जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष रजत रेगे, जिल्हा सरचिटणीस सखाराम सपकाळ, माजी जिल्हाध्यक्ष बी. के. मराठे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालेकर, समाज कल्याण अधिकारी तुषार गवळी तसेच लेखा अधिकारी उदय यादव आदी मान्यवर ...

कर्तृत्वाचा महामेरू: नारायण राणे म्हणजे धडाडीचे नेतृत्व आणि मार्गदर्शक दीपस्तंभ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी जागवल्या ऋणानुबंधाच्या आठवणी; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत लोकनेत्याचा गौरव सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- "महाराष्ट्राच्या विधानसभेतील माझी कारकीर्द ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आणि ज्यांनी माझ्या पहिल्याच भाषणावर 'छान बोललास' अशी चिठ्ठी पाठवून मला शाबासकी दिली, ते नारायण राणे साहेब माझ्या राजकीय वाटचालीत सदैव मार्गदर्शक राहिले आहेत," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कणकवली येथे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या 'अमृत महोत्सवी' वर्ष पदार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी राणे साहेबांच्या संसदेतील आणि विधानसभेतील अभ्यासू वृत्तीचा गौरव करताना सांगितले की, अर्थसंकल्पावर भाषण करताना राणे साहेब एखाद्या अर्थतज्ज्ञाप्रमाणे आकड्यांची जी चिरफाड करायचे, त्याने संपूर्ण सभागृह स्तब्ध व्हायचे. माझ्या संसदीय यशाचे आणि मी लिहिलेल्या 'बजेट कसं वाचावं' या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेयही राणे साहेबांच्या पुढाकारालाच जाते, अशी कृतज्...

'कासव महोत्सव' केवळ पर्यटन उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ - आमदार दिपक केसरकर 'कासव महोत्सवा'मुळे स्थानिक पर्यटनाला चालना -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे हजारो कासवांची पिल्ले किनाऱ्यावरुन महासागराकडे...

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- निसर्गसंपन्न किनारपट्टी, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. कासव संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव पर्यावरणपूरक उपक्रमाचे उत्तम उदाहरण मानला जात आहे. दरवर्षी पर्यटक या ठिकाणी भेट देऊन समुद्रकिनारी कासवांच्या अंड्यांपासून पिल्ले बाहेर येण्याचा अद्भुत नजारा अनुभवतात. यामुळे निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि संशोधक यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येते. कासव महोत्सव हा केवळ एक पर्यटन उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची चळवळ आहे. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे.या महोत्सवामुळे परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचे आमदार दिपक केसरकर यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन विभाग दक्षिण कोकण वनपरीक्षेत्र ( कांदळवन ) मालवण यांच्या वतीने वेंगुर्ला वायंगणी बीच येथे 'कासव महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दिपक केसरकर बोलत होते. यावेळी व...

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी विकास बडबे, पोलीस निरीक्षक ज्योती चव्हाण, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता ममता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, विशेष अधिकारी तुषार गवळी, तसेच संबंधित शाखेचे संतोष परुळेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, तसेच समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे व अत्याचार पीडितांना नुकसान भरपाईचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणे, मागील बैठकीचे इतिवृत्त व अर्थसहाय्याबाबतचा ...