अपंग प्रशिक्षण केंद्रात 5 जुलै पर्यंत अर्ज पाठवावा
सिंधुदुर्गनगरी दि.12 (जि.मा.का):- दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे.
सदरील प्रशिक्षण केंद्रात शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकॉऊटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे. तरी इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दिनांक 5 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड येथे पञव्यवहार करावे किंवा समक्ष भेटावे. अथवा मो. नं - 9960900369,9403207100, 7378641136, 9420846887 वर संपर्क साधावा.
०००००
--
Comments
Post a Comment