संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मार्यादित यांच्यामार्फत अनुसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी, नवी दिल्ली) विविध योजना राबविल्या जातात. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची ई.) इच्छुक अर्जदारांकडून कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी केले आहे. ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडलव योजना, मुदती कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, लघुऋण वित्त योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण योजना, उत्कर्ष ऋण योजना, या योजनांचा लाभ घेण्यासठी अर्जदार हा चर्मकार (चांभार, ढोर, होलार व मोची ई.) समाजातील असावा. तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योयजेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्ण पुर्तता करुन वरील शासकीय योजनेंचे तीन प्रतीत अ...