महाराष्ट्र स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वच विभागांनी नितांत प्रयत्न करावा - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
Ø जिल्ह्यामध्ये लवकरच नवीन 196 इलेक्ट्रीक शिवाई वातानुकुलित बसेस Ø स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना ई-ग्रंथालयांसाठी 2 कोटी Ø रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील 270 उमेदवारांना नोकरी Ø अन्न प्रक्रिया उद्योगांना 10 कोटी 99 लाख कर्ज सिंधुदुर्गनगरी दि.1 (जि.मा.का):- आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यांच्यात वैविध्य असले तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया, अशा शब्दांत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महाराष्ट्राच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच,आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी नितांत प्रयत्न करण्याचे आवाहनही केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलिस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ...