Posts

Showing posts from 2025

'सिंधुदुर्गनगरी' महसूली गावाची निर्मिती • जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना •आता एकूण महसुली गावांची संख्या ७५९

सिंधुदुर्गनगरी दिनांक ३१ (जिमाका) मौजे ओरोस बुद्रुक (134-12-80 हे.आर.), मौजे अणाव (95-47-70 हे.आर) आणि मौजे रानबांबुळी (104-59-70 हे.आर) असे एकूण 334-20-20 हे.आर. क्षेत्र संपादीत करुन ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ ची निर्मिती दिनांक 2 एप्रिल 1998 रोजी झालेली आहे. उपरोक्त क्षेत्रापैकी सर्व क्षेत्राचा ताबा ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ यांचेकडे आहे. त्याच क्षेत्राचा समावेश असणारे ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसूली गाव निर्माण करत असलेबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून झालेली आहे. त्यामुळे ‘सिंधुदुर्गनगरी’ हे नवीन महसूली गाव दिनांक 1 जानेवारी 2026 पासून अस्तित्वात आलेले आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण महसूली गावांची संख्या 759 इतकी झालेली आहे. याबाबतची अंतीम अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे. नवीन महसूली गाव निर्माण करताना प्राधिकरणाच्या प्रत्यक्ष ताब्यात असणाऱ्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही नवीन क्षेत्राचा समावेश सदरच्या महसूली गावाच्या क्षेत्रात ...

जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर 1 जानेवारीला स्वच्छता मोहिम

सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी श्रमदानाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावासियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. आपला जिल्हा हा पर्यटन व स्वच्छ जिल्हा म्हणून देशात प्रसिध्द आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. जिल्ह्यात येणारा पर्यटक मोठ्याप्रमाणात समुद्रकिनारी पर्यटन करित असतात. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे पाहता यावे, या हेतुने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरीता दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पंचायत समिती देवगड, मालवण, वेंगुर्ला यांना या कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात ...

पिक विमा योजनेच्या लाभासाठी ई-पिक पाहणी बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन 2025-26 या योजनांमध्ये नुकसान भरपाई मिळण्यसाठी ई-पिक पाहण्याची अट विहित करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ई-पिक पाहणी पूर्ण करण्याची सुधारित अंतिम कालमर्यादा दिनांक 15 जानेवारी 2026 अशी आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यापासुन पात्र शेतकरी वंचित राहू नये याकरिता पुनर्रचित हवामानावार आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी सर्व शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी. याविषयी कालमर्यादा कमी असल्याने फळपिक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या सर्व आंबा व काजू बागायतदारांची ई-पिक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करावी. त्याचप्रामणे सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत उन्हाही भात व उन्हाळी भुईमूग पिक या पिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 अशी असल्याने सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ...

सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिस नवीन इमारतीतमध्ये स्थलांतरीत होणार

सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिस सध्या सावंतवाडी जिमखाना मैदानाशेजारील हरिहरेश्वर कॉम्प्लेक्समध्ये भाडे तत्त्वावरील इमारतीत कार्यरत आहे.आता सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिसच्या स्वमालकीच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, १ जानेवारी २०२६ पासून हे हेड पोस्ट ऑफिस भोसले उद्यानच्या मागे, चराठा, सावंतवाडी येथे स्वमालकीच्या नवीन इमारतीत स्थलांतरित होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी दिनांक १ जानेवारी २०२६ पासून सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिसशी संबंधित सर्व कामे भोसले उद्यानच्या मागे, चराठा येथील सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिस येथे करावीत, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक नंदकुमार कुरळपकर यांनी केले आहे. ००००

जीवनावश्यक वस्तूंवरील GST दरात कपात 22 सप्टेंबर 2025 पासून नवे दर लागू

सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- वस्तू व सेवा परिषदेच्या 56 व्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून अनेक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवांवरील GST दरात कपात करण्यात आली आहे. हे दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (प्रशासन) यांनी दिले आहे. त्यानुसार दैनंदिन जीवनावश्यक वस्तू जसे की, केशतेल, साबण, शाम्पू, टूथब्रश, टुथपेस्ट, दुचाकी, स्वयंपाक घरातील साहित्य यावरील जीएसटी दर 18 टक्के किंवा 12 टक्के वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. तसेच UHT दूध इंडियन ब्रेड्स (चपाती,रोटी,पराठा, परोट्टा), पॅकबंद व लेबल केलेले पनीर यावरील जीएसटी दर 5 टक्के वरुन शून्य करण्यात आला आहे. तसेच पॅकबंद नमकीन, भुजिया, सॉसेस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स चॉकलेट, कॉफी, कॉर्नफ्लेक्स, लोणी, तूप इत्यादी वरील जीएसटी दर 18 टक्के किंवा 12 टक्के वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. वातानुकूलन यंत्रे, टीव्ही, डिश वॉशर, छोट्या कार 350 CC पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी ई. वरील जीएसटी दर 28 टक्के वरुन 18 टक्के करण्यात आला आहे. उपरोक्त प्रमाणे वस्तू व सेवांवरील करा...

उद्योजकता मेळावा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- प्रत्यक्ष उद्योजकासोबत संवाद साधत त्यांच्या उद्योगातील अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, दे आसरा फाउंडेशन व संत राऊळ महाराज महाविद्यालय, एस. एन. देसाई चौक, कुडाळ, यांच्या संयुक्त विद्यमाने 24 डिसेंबर 2025 रोजी उद्योजक, लघु उद्योजक, पारंपारिक कारागीर व महिला उद्योजक यांच्यासाठी उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या उद्योजकता मेळाव्याचे उद्घाटन कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, यांनी केले. दे आसरा फाउंडेशन प्रोग्रॅम मॅनेजर डॉ. आनंद गोडसे, अपग्रोथ फाउंडेशन, प्रोग्रॅम मॅनेजर तेजस धारकर, कौशल्य विकास अधिकारी अ.इ.तडवी, परि. कौशल्य विकास अधिकारी सु.वा. देवाजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत कौशल्य विकास अधिकारी श्री. तडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. दे आसरा फाऊंडेशनचे प्रोग्रॅम मॅनेजर डॉ. आनंद गोडसे यांनी "व्यवसाय वाढीसाठी उत्तम नेटवर्किंग कसे करावे, या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच अपग्रोथचे प्रोग्रॅम मॅनेजर त...

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक २९ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक व कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत वाघोठण नदी आणि विजयदुर्ग खाडीमधील प्रलंबित वाळू लिलाव प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कायदेशीर बाबींची पूर्तता आणि पर्यावरणीय शाश्वतता लक्षात घेऊन या प्रस्तावांची तांत्रिक तपासणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल विभागाला दिले. पारंपारिक 'डुबी' आणि 'हातपाटी' पद्धतीने वाळू काढण्याचे परवाने देण्याच्या सद्यस्थितीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला. या परवान्यांमध्ये येणारे कायदेशीर अडथळे आणि प्रशासकीय विलंब दूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ज्या न्यायालयीन आदेशांमुळे परवाना प्रक्रिया थांबली आहे, त्याबाबत जिल्हाधिका...

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद

सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (जिमाका) शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचे समाधान करण्यात आले. पालकमंत्री यावेळी म्हणाले की, शिरोडा-वेळागर येथे प्रस्तावित ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटनाला चालना मिळेल तसेच परिसराचा आर्थिक विकास साधला जाईल. जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवला जाईल. भविष्यातही अशाच प्रकारे स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सूचनांचा विचार करून विकासात्मक निर्णय घेतले जातील असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. या बैठकीस आमदार आमदार दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार राजन तेली, जयप्रकाश चमनकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. ००० ०००००० ०००

जिल्हा परिषद आढावा बैठक संपन्न जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा -पालकमंत्री नितेश राणे

* निधी 100 टक्के खर्च करा * कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार * विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करा सिंधुदुर्गनगरी दि. 29 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परिषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच...

राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का):- ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बिल घेणे, उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती मिळवणे, अटी व शर्ती वाचणे आणि फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहणे गरजेचे आहे. तक्रार असल्यास ग्राहकांनी न घाबरता अधिकृत यंत्रणांकडे तक्रार दाखल करावी. ग्राहकांनी आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवून सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, श्रीमती वराळे, अशासकीय सदस्य श्री पार्सेकर आणि श्री पाटील...

सिंधुदुर्गात 26 डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयांची होणार तपासणी

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण 59 खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे रुग्णशुल्क व इतर रुग्णालयीन सेवा शुल्क दरपत्रक प्रत्येक खाजगी रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये ठळक लावणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यातील सर्व तरतुदींचे खाजगी हॉस्पिटल मधून पालन होते की नाही याची खातर जमा करण्याकरीता 26 डिसेंबर 2025 पासून धडक मोहिमेद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रसिद्धी प्रत्रकाव्दारे कळविले आहे. रुग्ण हक्क संहिता (रुग्णांना असलेले अधिकार) दर्शनी भागामध्ये ठळक अक्षरांमध्ये दर्शविणे बंधनकारक आहे. सर्व हॉस्पिटलचे इलेक्ट्रिसिटी आणि फायर ऑडिट झालेले असणे बंधनकारक आहे. ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये नमूद कायद्यातील तरतुदींचे अनुपालन होत नाही, असे निदर्शनास आल्यावर या कायदे अंतर्गत उच...

*नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनाऱ्यांवर* *प्रशासनाकडून पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना*

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का):- नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. सुरक्षितेतेविषयक सूचना :- ज्या किनाऱ्यांवर लाईफगार्ड नियुक्त केलेले आहेत त्यांच्या परवानगीशिवाय समुद्रात उतरू नये. स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे. एकट्याने समुद्रात उतरणे टाळावे, लहान मुलांवार विशेष लक्ष ठेवावे. उच्च लाटा, खोल पाणी व Rip Current बाबतच्या सूचनांची माहिती घेऊनच समुद्रात उतरावे. हवामान खात्याचा इशारा असल्यास समुद्रात उतरणे टाळावे. प्रतिबंधात्मक सूचना :- मद्यप्राशन करुन समुद्रात उतरु नये. समुद्रात प्लास्टिक, काच किंवा अन्य धोकादायक साहित्य नेऊ नये. रात्री उशिरा समुद्रात उतरणे टाळावे. परवागीशिवाय बोटींग,जेट स्की, पॅरासेलिंग इ. जलक्रिडा करु नयेत. भरती- ओहोटीच्या वेळांची माहिती घेऊनच समुद्र...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न जनतेची कामे जलद, पारदर्शक व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी दि. 23 (जिमाका) : नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा देणारा घटक या भूमिकेतून काम करताना जनतेची कामे तातडीने आणि पारदर्शकपणे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. लोकाभिमुख प्रशासन, जलद सेवा वितरण आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुशासन सप्ताह अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती वराळे, आरती देसाई, वक्ते श्री वळंजू तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, आपण नागरिकांना कोणत्या सेवा देतो, त्या किती जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचत आहेत, तसेच त्या अधिक प्...

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का):- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2024-25 व 2025-26 या कालावधीतील योजनानिहाय व कामनिहाय स्थिती तपासण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश तसेच प्रत्यक्ष कामांची सद्यस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. तसेच ज्या कामांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, ती तात्काळ पूर्ण करून कार्यारंभ आद...

सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी! वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार

• पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न •स्थानिकांना निर्माण होणार रोजगार • जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (5 स्टार) हॉटेल उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठळक ओळख निर्माण होणार आहे.सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. शिरोडा–वेळाघर येथील जमिनीबाबत मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि. (ताज समुह) यांनी सादर केलेल्या पुरक करार पत्रावर चर्चा करण्यासाठी आज पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ताज समुहाच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या...

स्वच्छता मोहिमेत 32 हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का):- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील 32 हजार 118जनांनी श्रमदान करुन 3 हजार 620 किलो कचरा गोळा केला आहे. या कार्यक्रमांत 795 शाळा, 245 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र तर 396 ग्रामपंचायत कार्यालयानी सहभाग घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ जिल्हा म्हणुन देशात प्रसिध्द आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याकरीता 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय स्वच्छता कार्यक्रमांत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वर्ग खोल्याची साफसफाई, शाळा परिसर स्वच्छता आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. तर ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छता कार्यक्रमांत ...

अण्णासाहेब पाटील महामंडळाविषयी अफवांवर विश्वास ठेवू नये

सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जिमा.का):- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाविषयी प्रसारित होत असलेल्या कोणत्याही अफवा अथवा चुकीच्या माहितीवर मराठा बांधवांनी अगर सर्वसामान्य नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबईचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये काही समाजमाध्यमांद्वारे तसेच काही व्यक्तीद्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या कार्यवाही विषयी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे .या बाबीमुळे महामंडळाची बदनामी होत असून प्रामुख्याने मराठा समाजामध्ये व जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनामार्फत विविध शासकीय विभाग महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रम इत्यादींसाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाद्वारे तरतूद निश्चित करण्यात येते व ती विधिमंडळात सादर केली जाते. या अंदाजपत्रकास विधीमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी शांततेत व पारदर्शकतेने संपन्न सीसीटीव्ही, व्हिडिओ निगराणीमुळे एकाही ठिकाणी फेर मतमोजणीची गरज भासली नाही

सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रविवार, दि. 21 डिसेंबर रोजी अत्यंत शांत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडली. सर्व मतमोजणी केंद्रांवर तसेच विशेषत: प्रत्येक टेबलवर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले होते. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे व प्रभावी सुरक्षाव्यवस्थेमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे आणि कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील कोणत्याही मतमोजणी केंद्रावर फेर मतमोजणीची आवश्यकता भासली नाही. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अंतर्गत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी योग्य ती निगराणी व पर्यवेक्षण ठेवण्यात आले होते. या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्वतः उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवले. त्यांनी मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व निर्गमन न...

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सविस्तर आढावा

· आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी · सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात सिंधुदुर्गनगरी दि.20 (जिमाका) :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रीया 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवर सुरक्षितता, पारदर्शकता व शिस्तबद्धता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी कक्ष, प्रवेशद्वार, स्ट्राँगरूम परिसर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. नगरपालिका/नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 अनुषंगाने मतमोजणी पुर्वतयारीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी संवाद साधून सविस्तर आढाव...

स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यत अर्ज करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का):- जिल्ह्यातील इयत्ता 11वी व 12वी तसेच इयत्ता 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. सन 2025-26या शैक्षणिक वर्षासाठी विद्यर्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती याप्रमाणे आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, सदर महाविद्यालयातील इ.11वी, 12 वी तसेच इ. 11 वी व इ. 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील. सन 2024-25 वर्षामध्ये स्वाधारसाठी नोंदणी केलेले तसेच चालू वर्षात 2025-26 मध्ये प्रवे...

अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्गनगरी, दि. 18 (जि.मा.का):- अल्पसंख्याक समाजाच्या समावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध असून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण, समानता व सामाजिक सलोखा याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 18 डिसेंबर हा 'अल्पसंख्याक हक्क दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री खेबुडकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वैशाली मळेकर, ॲङ अशफाक शेख, शहानवाज शहा, निसार शेख, ॲङ बापूशा अशिर अहमद पटेल, शेरपुद्दीन महंमद बोबडे, नितीन जठार, नामदेव मठकर, मुराद अली शेख, बुलंद पटेल, सलमान शेख, प्रकाश मोहिरे, रावजी यादव, फादर मॅन्युअल डिसिल्वा आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री बु...

दिव्यांग तक्रार निवारण समितीची सभा 22 डिसेंबरला

सिंधुदुर्गनगरी दि.17 (जिमाका) : ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करुन दर महिन्याला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता ही सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स (व्ही.सी.) द्वारे आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी या सभेसाठी आपल्या नजिकच्या पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहून ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जयप्रकाश परब यांनी केले आहे. ००००००

हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना यंत्रसामग्री अनुदानावर उपलब्ध होणार

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का):- जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली व दोडामार्ग या 3 तालुक्यतील हळद उत्पादक शेतकरी, महिला गटांना हळद भरणी व काढणी यंत्र अनुदानावर पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे. या योजनेतून जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, महिला गटांना प्रति तालुका 1 यापमाणे हळद प्रक्रिया युनिट देखील देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय खरेदी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित घटकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळद लागवड व प्रक्रिया योजना सन 2025-26 मध्ये राबविली जाणार आहे. या योजनेतून जिल्ह्यातील इच्छूक हळद उत्पादक शेतकरी, महिला गट यांची हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जिल्हा सांगली येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जिल्ह्यतील शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यातील हळद लागवड करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर हळद लागवड व प्रक्रियाबाबत अनु...

ई- पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांना आवाहन

• ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे १७ ते २४ डिसेंबर पर्यंत पिकांची नोंद करावी • ग्रामस्तरीय समिती संयुक्तपणे करणार स्थळ पाहणी सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका वृत्तसेवा) राज्यात खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणेबाबत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे. तसेच खरीप हंगाम, २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पहाणी करणेबाबत मंडळ अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ पर्यंत पिकांची नोंद करणेकरिता अर्ज सादर करावेत. तसेच संबंधित शेतकरी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे दाखल केलेल्या अर्जाची पोहोच घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे य...

जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक १२ (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सप्टेंबर 2025 अखेरच्या तिमाहीची जिल्हा समन्वय व कर्ज पुनरावलोकन समिती (DCC/DLRC) बैठक दिनांक ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी क्षेत्रनिहाय उद्दिष्ट पूर्तता, जिल्ह्याचा CD Ratio, पिक कर्ज वितरण, मत्स्य व पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रगती, तसेच CMEGP, PMEGP, PMFME, AIF यांसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या वेळी RBI LDO अरुण बाबू यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावेळी CMEGP, SHG, PMFME यांसारख्या योजनांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या बँकांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच Unclaimed Deposit मोहिमेचेही पुनरावलोकन करण्यात आले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,RBI LDO अरुण बाबू, अग्रणी जिल्हा प्रबंधक ऋषिकेश गावडे, APD-DRDA श्री. बेहरे, CEO SDCC Bank श्री. गावडे, DDA श्री. बडे, FDO श्री. महाडवाला, उद्योग विभाग, KVIB विभाग आणि विविध बँकांचे समन्वय अधिक...

ई पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी समिती गठीत

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का):- राज्यात खरीप हंगाम २०२५ हा दि.०१ ऑगस्ट, २०२५ पासून सुरु झाला होता. त्यांतर्गत दि.०१ ऑगस्ट, २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच दि.०१ ऑक्टोबर, २०२५ पासून सहाय्यक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी करण्यात आली होती. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इ. लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये याकरीता सहायक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला (DCS) दि.३० नोव्हेंबर, २०२५ अखरेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सन २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात या विषयाबाबत विधानसभा लक्षवेधी सूचना उपस्थित झाली होती. या लक्षवेधी सूचनेबाबत विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेवेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विहित मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विहित मुदतीत ईपीक पाहणे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची ऑफलाइन पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली असल्याचा शासन निर्णय निर्गमित क...

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आदिशक्ती अभियानाचा आढावा

सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्यांनी केलेल्या कामाचे भौतिक निरीक्षण करण्यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक १५ डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर समित्यांनी आदिशक्ती पुरस्कारासाठी केलेल्या स्वगुणांकनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महिला स्नेही वातावरण निर्मिती प्रशिक्षण, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन आदी निकषांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार मिळवून देण्यासाठी विशेष म...

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक संपन्न पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करा -विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

· समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण करा · AI कार्यालयाला दिली भेट · आरोग्य यंत्रणा बळकट करा सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा असून येथे होणाऱ्या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे पर्यटन यंत्रणा सक्षम करणे, किनारपट्टी स्वच्छ व आकर्षक ठेवणे तसेच पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व विभागांची आढावा बैठक पार पडली. विविध विकासकामे, पर्यटन सुविधा, पर्यावरण संवर्धन तसेच पायाभूत सुविधांबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राची क्षमता ओळखून त्याचा शाश्वत विकास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिं...

थकबाकीदारांना व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (ओबीसी महामंडळाच्या) संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेच्या 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा ( OTS) योजना 31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीती आर पटेल यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित उप कंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग (ओबीसी महामंडळ) यांच्यामार्फत व्यवसाय करिता पात्र लाभार्थींना मुदती कर्ज, बीज भांडवली कर्ज, स्वर्णिमा कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना,इ.योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील कर्जवाटप करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सा...

राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जि.मा.का):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग यांच्यावतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षा आतील मुले व मुली) स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग (बॅडमिंटन हॉल) येथे संपन्न झाल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्धाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या हस्ते पार पडल्या. या उद्धाटन कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, महिला व बालविकास अधिकारी बापू शिनगारे व जिल्हा क्रीडा अधिकारी, नीलिमा अडसूळ उपस्थितीत होत्या. राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आबा काळे, सिंधुदुर्ग जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सचिव दाजी रेडकर यांच्या हस्ते संपन्न झाले.या राज्यस्तीय कुस्ती स्पर्धेचे जिल्हा क्रीडाकार्यालयामार्फत यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.

सैनिक कल्याण विभागातील लिपिक–टंकलेखक पदांसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का):- महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरिता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिक व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार युद्धकाळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यावेळी नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंतीक्रमांने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांपैकी 3 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाचा प्रकारानुसार कर्तव्य व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टीसीएस -आयओएन यांच्यामार्फत होणारे आहे. परीक्षासा...

मंदिर स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद, 8,970 ग्रामस्थांचा सहभाग

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का):- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन आयोजित करण्यात आलेला मंदिर व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील 443 मंदिरात कायक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 8 हजार 970 ग्रामस्थांनी श्रमदान केले आहे. या कार्यक्रमांतर्गत 625 किलो प्लास्टिक कचरा तर 1 हजार 487 अन्य असा 2 हजार 112 किलो कचरा गोळा करण्यात आला आहे. या कचऱ्याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन योग्य विल्हेवाट लागण्याबाबत ग्रामपंचायतीना सुचना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांची ये-जा होत असते. उत्सव, जत्रा, पालख्या, धार्मिक सोहळे अशा प्रसंगी येणारी गर्दी वाढत आहे. यामुळे या परिसरात प्लास्टिक, कागद, कोरडे गवत, पानफुलांचे अवशेष आदी कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र राहणे हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर समाज आरोग्य, पर्यटन विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टिकोना...

नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई – केवायसी करुन घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का):- जिल्ह्यात सन 2025-26 वर्षामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिके, शेतजमीन, बियाणे व तद्अनुषंगिक बाबी ईसाठी झालेल्या नुकसानाकरीता शासनाकडून नुकसान भरपाईचा निधी पुढीलप्रमाणे प्राप्त झाला आहे. शासन निर्णय दिनांक नुकसानीचा महिना मंजूर निधी (रक्कम रुपये) 12.09.2025 जून 2025 नुकसान 12,63,000/- 4.11.2025 जून ते सप्टेंबर 2025नुकसान (बियाणे व इतर) 15,94,000/- 17.10.2025 ऑगस्ट 2025 नुकसान 4,79,000/- 22.07.2025 फेब्रुवारी ते मे 2025 नुकसान 54,41,000/- 18.10.2025 सप्टेंबर 2025 नुकसान 8,29,000/- 17.10.2025 जून 2025 नुकसान (शेतजमीन) 88,000/- 13.10.2025 जुलै 2025 नुकसान 97,000/- 08.12.2025 ऑक्टोंबर 2025 नुकसान 4,08,69,000/- एकूण 5,06,60,000/- या नुकसान भरपाईची रक्कम ही ई- केवायसीव्दारे लाभार्थ्यांना वाटप होत असून यासाठी शेतकरी, लाभार्थींनी आपल्या तहसिल, तलाठी कार्यालयातून VK क्रमांक (विशिष्ट क्रमांक) प्राप्त करुन घेऊन जवळच्या महा –ई सेवा केंद्रावर जाऊन स्वत:ची ई- केवायसी करुन घ्यावी. यानंतरच लाभार्थ्यांच्...

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 09 (जि.मा.का):- गोव्यातील हडफडे येथील क्लबमध्ये दि.६ डिसेंबर २०२५ रोजी आगीची घटना घडली होती. प्रथमदर्शनी ही आग सिलेंडरच्या स्फोट होऊन भडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत घडलेली मनुष्यहानी विचारात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल/ रिसॉर्ट/ होम स्टे यांचे चालक व मालक यांच्यासाठी वास्तव्यास येणारे पर्यटक तसेच तिथे काम करणारे कामगार यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे यांचे चालक व मालकानी पुढीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. गॅस सिलेंडर व त्याच्या कनेक्शनची सुरक्षा- हॉटेल, रिसॉर्ट, होम-स्टे येथे वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडर, रेग्युलेटर, पाईप इत्यादींची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. गॅस पाईपची वैधता, कालमर्यादा तपासून आवश्यक असल्यास तातडीने बदल करावा. कुकिंग एरिया हवेशीर ठेवावा. आगीच्या वेळी सुरक्षित सुटकेचे मार्ग (Emergency Exit)- आपत्कालीन परिस्थितीत सुटकेचे मार्ग (Emergency Exits) स्पष्टपणे दर्शविणारे बोर्ड व दिशादर्शक बाण (glow sign boards) लावावेत. संबंध...

नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल परिचलण प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी,दि.09 (जि.मा.का):- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षणाचे 87 वे सत्र 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026 पर्यंत कालावधी सुरु होत आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग मालवण येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र.ग. मालवणकर यांनी केले आहे. प्रशिक्षण कालावधी- दिनांक 1 जानेवारी 2026 ते 30 जून 2026, आवश्यक पात्रता- उमेदवारांचे वय 18 ते 35 असावे, (आधार कार्ड व रेशन कार्डची छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक (शाळा सोडल्याचा दाखल्याची छायाप्रत जोडणे), क्रियाशील मच्छिमार असावा.( विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) उमेदवारास पोहता येणे आवश्यक. प्रशिक्षण शुल्क – सहा महिन्याचे रु. 2700/- मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. 600 /- मात्र, (दारिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक) रोजगार, स्वयंरोजगाराच्या स...

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 15 डिसेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी,दि.09 (जि.मा.का):- डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी केले आहे. राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी समान हक्क असा मुलभूत अधिकार दिलेला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे,त्यांचे हक्कांचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळाव या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोड...

सावंतवाडी येथे उद्योग मित्र समितीची सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 09 (जि.मा.का):- जिल्ह्यात उद्योग मित्र समितीची सभा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय सावंतवाडी येथे संपन्न झाली, असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. या सभेत जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, सावंतवाडी उद्यमनगर सहकारी औद्योगिक वसाहत यांच्याकडील प्रलंबित समस्यांतात्काळ सोडवावेत. जमिनीची मोजणी ऑनलाईन पद्धतीने होत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने करावी. जमिन शासकीय असल्यामुळे विनाशुल्क मोजणी करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी सबंधित महसूल अधिकारी यांना सावंतवाडी उद्यमनगरला लागून असलेला सर्व्हे नं. ९५/४ च्या नोंदी अद्ययावत करून घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच हस्तांतरण होत असताना जुन्या नोंदी वगळण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ डिसेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 09 (जि.मा.का):- मुंबईचे उच्च न्यायालय न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे. सन २०२५ या वर्षातील ही चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १३ डिसेंबर, २०२५ चे राष्ट्रीय लोक अ...

सशस्त्रसेना ध्वजदिन संकलन -2025 निधी शुभारंभ आणि ध्वजदिन प्रशस्तीपत्र वितरण सोहळा वीर सैनिकांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

· सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम सिंधुदुर्गनगरी दि 08 (जिमाका):- संपूर्ण समाज हा आपल्या वीर जवानांचा सदैव ऋणी आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. वीर जवानांचे कुटुंब हे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे ही केवळ जबाबदारी नसून आपली नैतिक कर्तव्य आहे. या धारिष्ट्यपूर्ण सेवेसाठी कृतज्ञता म्हणून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या. सशस्त्रसेना ध्वजदिन संकलन -2025 निधी शुभारंभ आणि ध्वजदिन प्रशस्तीपत्र वितरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी शहिद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करुन शहिद जवानांना श्रदांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात ध्वजदिन -2025 चा निधी संकलन शुभारंभ दे...

'घर घर संविधान' कार्यक्रमातून संविधानाची महती लोकांपर्यंत पोहोचणार -जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी दिनांक ०८ (जिमाका) :- भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदा आहे. देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक रचना कशी असावी, नागरिकांना कोणते हक्क असावेत याचे दिशादर्शन संविधान करते. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च आणि मूलभूत कायदे सांगणारे दस्तऐवज आहे. देशाची राजकीय रचना, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये, तसेच शासनप्रणाली कशी चालवायची याचे स्पष्ट मार्गदर्शन संविधान करते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत झालेल्या आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेल्या या संविधानात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, न्याय, स्वातंत्र्य आणि समानता यांचा आधारभूत विचार आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले हक्क, स्वातंत्र्य आणि न्यायाचे महत्त्व जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. 'घर घर संविधान' उपक्रमामुळे संविधानाची महती घराघरात पोहोचेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 'संविधान अमृत महोत्सव' अंतर्गत समाज कल्याण विभागाने 'घर घर संविधान' हा महत्त्वाक...

मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेंत सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 05 (जिमाका) :- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या कालावधीत श्रमदानाच्या माध्यमातुन मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत जिल्हावसियांनी सहभाग घेऊन श्रमदान करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि ग्रामस्थांची ये-जा होत असते. उत्सव, जत्रा, पालख्या, धार्मिक सोहळे अशा प्रसंगी येणारी गर्दी वाढत आहे. यामुळे या परिसरात प्लास्टिक, कागद, कोरडे गवत, पानफुलांचे अवशेष आदी कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र राहणे हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर समाज आरोग्य, पर्यटन विकास आणि ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे आहे. या हेतुने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सकाळी 8 ते 11 या कालावधीत मंदिरे व मंदिर परिसर स्वच्छता ...

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत शनिवार, दि.१३ डिसेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सन २०२५ या वर्षातील ही चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येते. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दि. १३ डिसेंबर, २०२५ चे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांनी कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही, वैराने वैर वाढतच राहते असे होऊ नये, यासाठी सामंजस्य घडवावे हाच ...

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागात प्रथम क्रमांकावर

• राज्यपालांच्या हस्ते होणार जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव •४३ लाखांच्यावर निधी संकलन सिंधुदुर्गनगरी, दि. 03 (जिमाका) :- सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच तब्बल 105.81 टक्के निधी संकलित करत जिल्ह्याने राज्यातही आपली छाप उमटवली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून जिल्ह्याने हे यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना 10 डिसेंबर रोजी मुंबईतील राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यास 41.45 लाखांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, विविध शाळा–महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून जिल्ह्याने तब्बल 43 लाख 65 हजार इतका निधी गोळा करत उत्कृष्टता सिद्ध केली. या यशात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्...

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 03 (जिमाका) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सन 2025-26 या वर्षातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षाआतील मुले व मुली) क्रीडा स्पर्धा दिनांक 8 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग (बॅडमिंटन हॉल) येथे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ यांनी दिली आहे. राज्यस्तरीय शालेय कुस्ती (14 वर्षाआतील मुले व मुली) क्रीडा स्पर्धेमध्ये विविध वजनगटात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागरपूर, नाशिक, पुणे असे महाराष्ट्रातील 8 विभागातून सुमारे 160 खेळाडू व संघव्यवस्थापक, स्पर्धेकरिता पंच असे एकूण 200 व्यक्ती उपस्थिती राहणार आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्याव्दारे खेळाडू व संघव्यवस्थापक यांची निवास, भोजन इ. बाबींची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यस्तीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन दिनां...

कामाच्या ठिकाणी तक्रार समिती स्थापन करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 03 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई, व निवारण अधिनियम 2013 तसेच 09 डिसेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झालेल्या नियमांनुसार महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणाचा हक्क मिळण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत. या अधिनियमातील कलम 4 (1) अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समितीबरोबरच कलम 6 (1) अंतर्गत जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतुद असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा POSH ACT नोडल अधिकारी बापू शिणगारे यांनी प्रसिध्दी प्रकाव्दारे कळविले आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने Miscellaneous Application Diary No.(s) 22553/2023 in Civil Appeal No. 2482 Of 2014 Aureliano Fernandes Vs The State of Goa & Ors या न्यायालयीन प्रकरणी 3 डिसेंबर 2014 रोजी पारित आदेशान्वये विहित कालमर्यादेत उपरोक्त नुसार अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करण्याबाबत निर्देश दिले असल्याने सिधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आस्थापना प्रमुखांनी तसेच खाजगी आस्थापना मालकांनी (दुकान मालक मॉलमालक...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव: चारही नगर क्षेत्रांत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग दि. २ (जिमाका) जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तीन नगरपरिषदांमध्ये आणि कणकवली नगरपंचायतीमध्ये आज सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्याने पुन्हा एकदा लोकशाहीप्रती असलेली निष्ठा आणि सहभाग दाखवून दिला. संपूर्ण जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, सुयोग्य नियोजनात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या. सर्व वयोगटातील मतदारांसह तरुणाईनेही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. नववधूंचा खास सहभाग या निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर हृदयस्पर्शी दृश्ये पाहायला मिळाली. लग्नाच्या वेशात नववधूंनीही थेट विवाह स्थळावरून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीप्रती आस्था आणि कर्तव्याची जाणीव दाखवणारे हे चित्र सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. प्रशासनाचा सजग आणि शिस्तबद्ध कारभार जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेसाठी काटेकोर तयारी केली होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः मालवण शहरातील मतदान केंद्रांना भेट देत संपूर्ण प्रक्रियेच...

‘सखी मतदान केंद्र’- महिलांच्या सामर्थ्याचा उत्सव! मतदानात उत्साहवर्धक महिलांची उपस्थिती; सेल्फी पॉइंट आणि महिला कर्मचाऱ्यांची पूर्ण तयारी

सिंधुदुर्गनगरी दि 2 (जिमाका) : लोकशाहीच्या या महत्त्वाच्या उत्सवात आज जिल्ह्यातील ‘सखी मतदान केंद्रां’ना विशेष आकर्षण लाभलं. गुलाबी रंगाच्या सजावटीत नटलेले केंद्र, प्रवेशद्वारावर फुलांची रांगोळी, स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिला कर्मचारी- संपूर्ण वातावरणात स्फूर्ती आणि आत्मविश्वास दाटून वाहत होता. सकाळी मतदानाला सुरुवात होताच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. नवमतदार मुलींपासून ते ज्येष्ठ मातोश्रींपर्यंत सर्वांनी अभिमानाने मतदानाचा हक्क बजावला. केंद्रावर उभारण्यात आलेल्या ‘सेल्फी पॉइंट’ने युवतींचे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 ठिकाणी सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली होती. सखी केंद्रातील सर्व कामकाज- मतदान प्रक्रिया, पडताळणी, तांत्रिक सहाय्य- पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडूनच पार पाडले जात असून, हीच संकल्पना महिला सक्षमीकरणाचे सुंदर चित्र उभं करते, असे नागरिकांनी सांगितले.जिल्हा प्रशासनाने महिला मतदारांना सुरक्षित, सुलभ आणि प्रेरणादायी वातावरण देण्यासाठी केलेली ही विशेष संकल्पना यशस्वी ठरत असून, मतदानाचा टक्का वाढविण्यातही या केंद्रांचा मोठा वाटा राहणार आह...

माजी सैनिक वसतिगृह आणि विश्रामगृहासाठी कंत्राटी पदभरती

सिंधुदुर्गनगरी दिनांक 02 (जिमाका) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गच्या अधिपत्याखाली असलेल्या, सैनिकी मुलांचे वसतीगृह व माजी सैनिक विश्रामगृह सावंतवाडी येथे माजी सैनिक प्रवर्गातुन दोन कंत्राटी अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. सैनिकी मुलांचे वसतिगृहात, अशासकीय वसतीगृह अधीक्षक हे एका पदासाठी सैन्यातुन सुबेदार या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा तसेच संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माजी सैनिक विश्रामगृह, सावंतवाडी येथे अशासकीय पहारेकरी या एका पदासाठी सैन्यातुन हवलदार पदापर्यंत सेवानिवृत्त झालेला असावा. तरी पात्र माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, 02 फोटो, आधार कार्ड या कागदपत्रांसह दिनांक 10 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी (मानधन व कामाचे स्वरूप) दुरध्वनी क्र- 02362-228820/ 9322051284 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ०००००

“मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा” चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 02 (जिमाका) :- उद्योगमंत्री तसेच विकास आयुक्‍त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक 3 ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत “मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा” जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. या पंधरा दिवसांमध्‍ये जिल्‍हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहिम हाती घेण्‍यात येणार आहे. मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जास्‍तीत जास्‍त प्रस्‍ताव या माध्‍यमातून गोळा करणे. ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पोर्टलवर भरणे, माहिती देणे, प्रचार करणे ई. करण्‍यात येणार आहे. या मोहिमेत मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज हे निःशुल्‍क भरुन दिले जातील. जिल्ह्याच्या प्रत्‍येक तालुक्‍यात बॅनर व ऑडियोच्‍या माध्‍यमातून मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रचार व प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे. या योजनेतून जास्‍तीत जास्‍त लाभार्थ्‍यांचे अर्ज प्रस्‍ताव त्‍यांच्‍या कागदपत्रांसहित स्‍वीकारुन त्‍यांची तात्‍काळ छाननी ...

श्रीलंकेत "दितवाह" चक्रीवादळात अडकलेल्या नागरिकांची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 01 (जिमाका) :- श्रीलंकेमध्ये "दितवाह" चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय पर्यटक, प्रवासी यांच्यासाठी भारत सरकार मार्फत मदत कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. श्रीलंका येथे पर्यटनासाठी किंवा इतर कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक गेले असतील व त्या ठिकाणी अडकले असतील तर अशा नागरिकांनी केंद्र शासनामार्फत देण्यात आलेल्या https://t.co/FnfQcBi0rm या लिंकरवर आपली माहिती भरणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष मंत्रालय, मंबई यांच्याकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग यांना प्राप्त झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती त्यांचे नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक 02362-228847 किंवा मोबा. 7498067835 या क्रमांकावर द्यावी. जेणेकरुन संबंधितांना योग्य ती मदत करणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. ०...

मतदानासाठी 2 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी

सिंधुदुर्गनगरी दि.01 (जिमाका) :- राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स,रिटेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजा...

नगर परिषद आणि नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे आणि पोलिस अधीक्षक डॉ दहिकर यांची चारही मतदान क्षेत्राला भेटी सावंतवाडी–वेंगुर्ला–मालवण–कणकवलीत निवडणूक तयारीचा सखोल आढावा राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग नगरी दिनांक २९ (जिमाका) नगर परिषद तसेच नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि कणकवली येथे भेट देत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर कामकाज करण्याचे निर्देश दिले. तर पोलिस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देत सूचना केल्या. सावंतवाडी : प्रशिक्षण व Strong Room ची पाहणी दौऱ्याची सुरूवात सावंतवाडी येथून झाली. येथे निवडणुकीच...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : डिसेंबर महिन्यातील लोकशाही दिन महिन्याच्या पहिला सोमवार दि.1 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी दिली आहे. 000000

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का):- संविधान दिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योगकता मार्गदर्शन कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. या शिबिराचा उद्देश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, युवक यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे व त्याव्दारे रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणणे हा होता. तसेच याव्दारे विद्यार्थ्यांना आपल्या संविधानात अंतर्भूत असलेल्या जबाबदारी, समानता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करण्यास प्रोत्साहन प्राप्त करून देणे हा होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी, तृप्ती धोडमिसे, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्या हस...