सिंधुदुर्ग, दि. २ (जिमाका) : पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते ७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘BRICS शाश्वत जीवनशैली सप्ताह २०२६’ साजरा करण्यात येत आहे. ‘One Week, Seven Actions, One Planet’ अर्थात ‘एक आठवडा, सात कृती, एक पृथ्वी’ ही या अभियानाची संकल्पना असून, मिशन LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, युवक मंडळे आणि नागरिकांच्या सहभागातून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी केले आहे. या सप्ताहांतर्गत आरोग्यदायी जीवनशैली, ऊर्जा बचत, पाणी बचत, शाश्वत अन्नप्रणाली, एकल वापर प्लास्टिकला नकार, ई-कचरा कमी करणे आणि कचरा व्यवस्थापन अशा सात विषयांवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी, दि. १ नोव्हेंबर रोजी आरोग्यदायी जीवन...