Posts

Showing posts from January, 2025

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला प्राधान्य सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य मासेमारी नौकेवरील नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसणे बंधनकारक

सिंधुदुर्ग दिनांक ३१ (जिमाका वृत्त): राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला नेहमी प्राधान्य राहिले आहे. राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरुन रंगविणे बंधनकारक आहे. तसेच मासेमारी नौकेवरील प्रत्येक खलाशांने स्मार्ट कार्ड / QR Coded आधार कार्ड जवळ बाळगणे बंधनकारक असल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी निर्गमित केले आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन मर्चंट शिपिंग ॲक्टच्या १९५८ मधील ४३५ (एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन धिनियम १९८१ व (सुध...

आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्या -जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी सोपविलेली कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्‍यातील आंगणेवाडी येथील श्री. भराडी देवी वार्षिक जत्रौत्‍सव आणि देवगड तालुक्‍यातील कुणकेश्वर श्री. देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्‍सव नियोजनाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, कुडाळ उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे, देवगड तहसिलदार श्री ठाकुर, आंगणेवाडी आणि कुणकेश्वर विश्वस्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सुविधा मिळणे...

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता नाधवडे ता. वैभववाडी येथे आगमन व कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 37 वा वार्षिक व्यापारी एकता मेळाव्यास उपस्थिती. स्थळ:- अर्जून रावराणे विद्यालय वैभववाडी. दुपारी 12.30 वाजता मोटारीने हेत ता. वैभववाडीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता श्रीगणेश जयंती उत्सवास उपस्थिती. स्थळ:- श्री गणपती मंदिर (खडकवाडी) हेत, ता. वैभववाडी . दुपारी 1.30 वाजता मोटारीने कणकवलीकडे प्रयाण. दुपारी 2.वाजता ओमगणेश निवास्थान, कणकवली येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ:- ओरोस जि.सिंधुदुर्ग . दुपारी 4.30 वाजता मोटारीने वराड ता. मालवणकडे प्रयाण. सायं. 5 वाजता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना...

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी जिल्हा माहिती कार्यालयाची मोबाईल व्हॅन पुढील आठ दिवसांत देणार १२८ गावांना भेटी

सिंधुदुर्गनगरी, दि.३० (जि.मा.का): शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून 'सामाजिक न्याय विभागा'च्या योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. २६ जानेवारी पासून हा चित्ररथ विविध गावांना भेटी देऊन योजनांची प्रसिध्दी करत असून २१ फेब्रुवारी पर्यंत हे प्रसिध्दी अभियान राबविण्यात येणार आहे. १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, देवगड आणि कुडाळ तालुक्यातील १२८ गावांना भेटी देणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी कळविले आहे. 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची' जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी झाले. या चित्ररथाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. सामाजिक न्याय व...

जिल्हा नियोजन समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

सिंधुदुर्गनगरी, दि.३० (जि.मा.का.) : शासनाच्या नियोजन विभागाकडील दि.२८ जानेवारी २०२५ रोजीच्या शासनिर्णयान्वये जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम, २०००" मधील कलम ३ (३) (दोन) (ब) व (क) आणि कलम ३ (चार) (फ) मधील तरतूदीनुसार राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर "नामनिर्देशित सदस्य" व "विशेष निमंत्रित सदस्य" म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (सभा घेणे) (सुधारणा) नियम, २०१८ च्या अधिसुचनेतील परिच्छेद ७ (मूळ अधिनियमाचा नियम ६-अ) मधील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर "नामनिर्देशीत सदस्य" तसेच "विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या त्वरीत प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच वरील सदस्यांव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांकरीता काही व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत यापूर्वी पत्रांव्दारे देण्यात आलेल्या सूचनादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर २ नामनिर्देशित सदस्य व ९ वि...

जिल्हा ग्रंथालयातील ग्रंथ मोबाईल ॲपव्दारे शोधा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने ई-ग्रंथालय आज्ञावली स्वीकारली आहे.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने सभासदांकरीता मोबाईल ॲप सुरु केले असून सभासद मोबाईलमध्ये e-Granthalay ॲप डाऊनलोड करुन घेवून ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ पाहू शकतात. या सुविधेमुळे सभासदाला ग्रंथ शोधणे सुलभ झाले आहे. तरी जास्तीत जास्त वाचकांनी ग्रंथालयाचे सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केली आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग हे मुख्य प्रशासकीय इमारत, 'ए ब्लॉक, तिसरा माळा, मॅझेनीन प्लॉथर, सिंधुदुर्गनगरी, सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे. या ग्रंथालयात आजरोजी ४३९४५ एवढी ग्रंथसंपदा असून १८ दैनिके व ३० मासिके नियमित येतात. आजच्या आधुनिक जगाप्रमाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, देखील आधुनिक झाले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने पुर्वी ग्रंथ शोधणे, ग्रंथ देवघेव पारंपारिक पध्दतीने होत असे संभासदांचे सभासद कार्ड असे या कार्डवर सभासदांनी आणलेले ग्रंथ जमा केले जात व नवीन घेतलेल्या ग्रंथांची नोंद होत असे. ई- ग्रंथालय आज्ञावली स्वीक...

कर्ली खाडीवरील पुलाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सरंबळ टेंबवाडी सोनवडेपार वराड रस्त्यावरील कर्ली खाडीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामाचा दि. 31 जानेवारी 2025 रोजी सायं. 5 वाजता सोनवडे गाव कर्ली नदीकाठी येथे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष उपस्थितीत लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार नारायण राणे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य दीपक केसरकर, रविंद्र चव्हाण, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सोनवडेचे सरपंच श्रीम. पूर्वीप्रमोद धुरी सावंत, वराडचे सरपंच श्रीम.शलाका समीर रावले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ००००

लोकशाही दिनाच्या वेळेत बदल

सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका वृत्त) : सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी जाणून घेवून त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सकाळी ११ वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली 'जिल्हा नियोजन समिती' ची बैठक असल्याकारणाने 'लोकशाही दिन' दुपारी १:०० ऐवजी दुपारी ३:०० वाजता होणार आहे. तरी कृपया सर्व तक्रार अर्जदार, नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ००० ०००

लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट –ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली आणि कणकवली कॉलेज कणकवली या दोन उपकेंद्रवार घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी एकूण 789 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत परीक्षीच बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे बैठक क्रमांक KD001001 ते KD 001408 आणि कणकवली कॉलेज कणकवली येथे बैठ क्रमांक KD 002001 ते KD002381 उपकेंद्रवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे , आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपायोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांव...

राष्ट्रीय नमुना पाहणी आरोग्य विषयक सर्वेक्षण

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि ‘मागील 365 दिवसां...

जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर त्याबाबतचा फॉर्म प्रत्यक्ष येऊन जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करुन त्याबाबतची खात्री करावी. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्हा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना देण्यात येणाऱ्या विविध आर्थिक मदती व इतर कामकाज हे दिनांक 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन पध्दीने सुरु करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362 228820,9322051284 वर संपर्क करावा. ००००००००

दिव्यांगांनी हरित उर्जेवर चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग या महामंडळाकडून राबविण्यात येणारी सन 2024-25 वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होणाच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल (शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबबातच्या योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींनी 6 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही लोहकरे यांनी केले आहे. योजनेचा उद्देश – दिव्यांग व्यक्तींना पुरेसा सोयी –सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे. योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दि. 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://register.m...

"पोस्टल पेन्शन अदालत"चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनसंबंधी प्रामाणिकपणे निवारण करण्यासाठी डाक विभाग, क्षेत्रीय कार्यालय गोवा (ज्यामध्ये गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांचा समावेश आहे) तर्फे " पोस्टल पेन्शन अदालत" चे आयोजन केले आहे. पोस्ट मास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी (गोवा) येथे मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी ठीक 3 वाजता "पेन्शन अदालत" आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी दिली आहे. डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन पेन्शन संबंधी ज्या तक्रारींचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारींची या डाक पेन्शन अदालत मध्ये दखल घेतील जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंन्शन अदालत मध्ये विचारात घेतील जाणार नाहीत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यांस मूळ तक्रार पाठविली असेल त्यांचे नाव,हुद्दा संबंधित...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

•प्राध्यापकांची सहा महिन्यात भरती •नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत •रुग्ण गोवा येथे पाठविणे बंद करावेत सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेशही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा बैठक घेण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांचेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालकमंत्री श्री. राणे यांच्या पाठपुराव्यानुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमद...

तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालवा फुटीबाबत वस्तुस्थिती दर्शक माहिती

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : दि.21 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता गाव मौजे घोटगे ता. दोडामार्ग येथील तिलारी उजवा तीर कालवा किमी 9 मधील सा .क्र. ८/९३० मी . येथील केर जलसेतूचा पहिला Span (GRP Pipe Aquaduct ) कोसळल्याचे निदर्शनास आले. सदर जलसेतूचे दगडी बांधकाम हे सुमारे 30 ते 35 वर्षापुर्वी झालेले आहे. यापुर्वी दि. 10 जानेवारी 2024 रोजी जलसेतुच्या एका span मधुन गळती निदर्शनास आल्यामुळे तात्काळ त्याची दुरुस्ती करुन पाणीपुरवठा सुरळित केला होता. दि. 04.05.2024 या दिवशी सदर जलसेतूच्या दुस-या Span मधुन गळती निदर्शनास आली होती. दोन्ही घटनांवेळी शेतक-यांकडुन होणारी पाण्याची मागणी लक्षात घेता तातडीने या जलसेतुची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्ती कामामध्ये प्रामुख्याने गंजलेले Steel Trusses पुर्णपणे बदलण्यात आले होते. आता जलसेतुच्या उर्ध्व बाजुच्या abutment च्या वरील दगडी भागाचे Morter कमकुवत झाल्याने ते क्षतीग्रस्त होऊन जलसेतुच्या लोखंडी आधारावर कोसल्यामुळे पहिल्या गाळ्यातील 15 मी. लांबीतील जलसेतु ढासळला आहे. त्यामुळे यापुर्वी गतवर्षी आपत्कालीन परिस्थीतीमध्ये केलेले स्टिल...

नसबंदी शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : जिल्ह्याकरीता सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत एकूण 1900 चे भौतिक उद्दीष्ट प्राप्त झालेले आहे. माहे डिसेंबर अखेर एकूण 860 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या असून 45.26 टक्के उद्दीष्ट साध्य झालेले आहे. यामध्ये एकूण 855 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया व 5 पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 16 स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे. दि. 24 व 25 जानेवारी 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये कणकवली, वैभववाडी, देवगड व मालवण तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते. यावेळी 01 टाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया व 30 बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबीराकरीता डॉ. राजेश्वर उबाळे, स्त्रीरोग तज्ञ व खाजगी वैद्यकिय व्यावसाईक यांनी सर्जन म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. हेमा तायशेटे व डॉ. मनिषा होगले यांनी भूलतज्ञ म्हणून...

'घर घर संविधान' उपक्रमअंतर्गत मान्यवरांना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे वाटप

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : समाजिक न्याय व विशेष विभागामार्फत 'घर घर संविधान' उपक्रमअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडून 26 जानेवारी रोजी पोलीस परेड मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्याकडून मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदी मान्यवरांना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. तसेच अनु. जाती उपायोजना अंतर्गत निधीतून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत समाज कल्याण विभगातील विविध योजनेची प्रसिध्दी करण्यासाठीच्या मोबाईल व्हॅन चे मत्स्य व्यवसाय, बंदरे तथा पालकमंत्री तिनेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यालय प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ००००००

आरोग्य विभागाला लस वाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील लस साठवण केंद्राकरीता राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन लस वाहन प्राप्त झालेले आहे. सदरील वाहन हे पूर्णपणे उष्णतारोधक असून राज्यस्तरावरील तसेच उपसंचालक स्तरावरील लस साठवण केंद्राकडून प्राप्त होणारा लस साठा सुरक्षितपणे जिल्हास्तरावरील लस साठवण केंद्रामध्ये आणणे यापुढे सोयीचे होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांना लसीचे योग्यवेळी सुरक्षितपणे वाटप करणे सोयीचे होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी दिली आहे. भारतामध्ये विस्तारीत लस टोचणी कार्यक्रम हा सन 1978 मध्ये सुरु करण्यात आला. सन 1997 मध्ये हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आला. सन 2005 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रम सुरु झाल्यानंतर या कार्यक्रमाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा एक महत्वाचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम असून त्यामध्ये दरवर्षी देशातील सुमारे 2.67 कोटी नवजात बालके व सुमारे 2.9 कोटी गर...

क्षयरुग्ण शोध मोहीम

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : समाजातील सर्वाचे एकत्रित प्रयन्त व सहयोगाने भारतातुन क्षयरोग दुरीकरण ध्येय पुर्ती करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याव्दारे 100 दिवस सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम (100 Day TB Campaign) 7 डिसेंबर 2024 पासून सुरु करण्यात आलेला आहे. ही मोहिमेचा मुख्य उद्देश क्षयरोगाचे जास्तीत जास्त रुग्ण शोधुन क्षयरोग मृत्यु दरात घट करणे हा आहे. ही मोहिम 24 मार्च 2025 'जागतिक क्षयरोग दिन' रोजी संपणार आहे. या मोहिमेचा उ‌द्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुण्याचा मृत्युदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजातील क्षयरोग विषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करणे, जिल्ह्यातील क्षय रुग्णांना "पंतप्रधान क्षयमुक्त भारत" अभियानांतर्गत निक्षयमित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे. 100 दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील 347 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्...

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाला नागरिकांचा प्रतिसाद चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार योजनांची माहिती - उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे

सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का): शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून 'सामाजिक न्याय विभागा' च्या योजनांची माहिती नागरिकांना मिळत असल्यामुळे पात्र लाभार्थी योजनांचा लाभ घेऊ शकणार असल्याचे कुडाळ-मालवणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे म्हणाल्या. 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची' जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने मोबाईल व्हॅन आणि चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाला आज श्रीमती काळुशे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तहसिलदार विरसिंग वसावे, नायब तहसिलदार श्री आढाव, श्री पवार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी श्री चिलवंत यांनी या चित्ररथाविषयी माहिती दिली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती श्री चिलवंत यांनी...

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का): जिल्हा वार्षिक योजना- अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2024-25 साठी 'सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची' जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅन आणि चित्ररथाचे आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या फित कापून उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सौ ऋतुजा नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. यावेळी मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयीची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री नि...

विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान

सिंधुदुर्ग, दि. 26 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय सेवेबद्दल अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक, अन्वेषण' प्राप्त झाले. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सन 2023 मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचा देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस मुख्याल येथील राखीव पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील पोलीस निरक्षक संदिप अशोक भोसले, चिपी विमातळ येथील पोलीस उप निरीक्षक प्रताप विठोबा नाईक, जिल्हा विशेष शाखा मनोज मारुती मांजरेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार विश्वजीत झीलू परब, निवती पोलीस ठाणे येथील श्रीमती अर्चना ग...

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द -पालकमंत्री नितेश राणे

•लोककल्याणकारी योजना राबविण्यावर भर • कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य •'नशामुक्त जिल्हा' म्हणून ओळख निर्माण करणार सिंधुदुर्ग दि २६ (जिमाका) सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले असून त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. अशा विविध महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जनतेला देण्यास मी पालकमंत्री म्हणून प्राधान्य देणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी १७१ कोटी रुपयांचा नियतव्यव आणि २२९ कोटींची अतिरिक्त मागणी असा एकूण ४०० कोटींचा आराखडा शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पायाभूत सोयी सुविधांचे बळकटीकरण होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहिल. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. दरडाई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना प्राधान्य देणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास हाच माझा ध्यास असून सिंधुदुर्ग जिल...

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 25 (जिमाका) :- मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वाजता भारताचा 76 वा प्रजासत्नाक दिनाच्या समारंभानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणास उपस्थिती. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. सकाळी 10 वाजता मोटारीने ओमगणेश निवासस्थानकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता ओमगणेश निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता ओमगणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने मोपा, गोवा विमानतळाकडे प्रयाण. ०००००

जिल्हा प्रशासन, जिल्हा परीषद आणि पोलिस प्रशासनाचा घेतला आढावा सर्वसामान्यांची कामे प्रशासनाने त्वरित मार्गी लावावीत -पालकमंत्री नितेश राणे

• कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य द्यावे •जिल्हा परीषदेचा निधी अखर्चित राहता कामा नये •नागरिकांच्या कामाला प्राधान्य द्या सिंधुदुर्ग दि २५ (जिमाका) शासन जतनेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांची कामे कमीत कमी वेळेत करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल प्रशासन, जिल्हा परीषद प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री नितेश राणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , अपर अधिक्षक कृषिकेश रावले तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार सर्व महसूल खातेप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, सरकारची प्रतिमा ही महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवरून ठरते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नेमून...

फळपिक विमा भरपाई १५ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Image
• पालकमंत्र्यांनी तात्काळ घेतली बैठक • ४ हजार ५८० शेतकऱ्यांना लाभ • १० कोटी ६२ लाख रुपयांची मिळणार भरपाई सिंधुदुर्ग दि २५ (जिमाका) पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ मधील विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातील ६ मंडळातील ४ हजार ५८० बागायदार शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी फळपिक विमा भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विमा कंपनीला दिले. संबंधित कंपनीनेही पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये १५ फेब्रुवारीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत फळपिक विमा भरपाई रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे मान्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी पिक विमा योजनेसंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री खुरकुटे, रिलायन्स इंनशुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सिध्देश येडवे आद...

नार्को कोऑर्डीनेशन सेंटरची जिल्हास्तरीय बैठक संपन्न अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग दिनांक २४ (जिमाका वृत्त) : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषत: तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात सुरू असणाऱ्या तसेच बंद पडलेल्या कंपन्यांना नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ विरोधी कार्यवाहीची मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. नार्को कोऑर्डीनेशन सेंटरची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, स्थानिक गुन्हे शाखचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीव्दारे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी तसेच सागरी सुरक्षा दलाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, तरुण पिढी ही देशाचे भविष्य आहे. अंमली पदार्थापासून तरूण पिढीचे र...

नद्या गाळमुक्त करण्यासाठी 1 फेब्रुवारीपासून विशेष मोहिम -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग दि २० (जिमाका) पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर परिणामकारक उपाय म्हणजे नद्यांमधील गाळ काढून नद्या गाळमुक्त करणे. पहिल्या टप्प्यात ४ ठिकाण निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी १ फेब्रुवारीपासून गाळ काढण्याची विशेष मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी,ओढे,नाले मधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पूराच्या तीव्रतेचा व...

जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयमध्ये मोतिबिंदु नेत्रशस्त्रक्रिया सेवा सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) : जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे मोतिबिंदु नेत्रशस्त्रक्रिया सेवा सुरु झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील नेत्र रुग्णलयाच्या शस्त्रक्रीया गृहामधील नवीन यंत्रसामुग्रीचे ओ.टी स्वाब नमुने मायक्रोबायोलॉजी तपासणीकरीता प्रयोगशाळेकडे 3 वेळा पाठविण्यात आलेले होते. सदरचे ओ.टी स्वाब नमुने तपासणीअंती निगेटीव्ही आले. दिनांक 22 जानेवारी 2025 पासून मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झालेली आहे. 3 दिवसात एकूण 17 मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झालेल्या आहेत. या पुढे पुर्वीप्रमाणेच आठवड्यातून 4 दिवस पात्र रुग्णांच्या मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. ०००००

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत 'न्याय आपल्या दारी'

सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) : राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि.3 फेबुवारी 2025 ते 1 मार्च 2025 या कालावधीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत 'न्याय आपले दारी' या संकल्पनेतून मोबाइल लोक अदालत व फिरते विधी सेवा केंद्र या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनव्दारे कायदेविषयक शिबीरे व मोबाईल लोक अदालत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे. या मोबाईल व्हॅनमधुन घ्यावयाच्या कार्यक्रमांचे उद्घाटन दि. 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकर अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. मोबाइल लोक अदालत ग्रामपंचायत वाडीहुमरमळा, माणगांव, कोलगांव, साटेली-भेडशी, आरवली, आनंदव्हाळ, शिरगांव, खारेपाटण व ग्रामन्यायालय वैभववाडी येथे घेण्यात येणार आहेत. या मोबाईल व्हॅन लोक अदालतमध्ये सहभागी होऊन आपले दाखलपूर्व व प्रलंबित वाद सामोपचाराने कायमचे मिटवावे. तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत ...

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता भक्ति मंगल कार्यालय कट्टा गुरामवाडी ता. मालवण येथे आगमन व माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांच्या नागरी सत्कार आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता नदीपत्रातील गाळ काढणेबाबत आढावा बैठक. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस) दुपारी 4 वाजता रस्त्याचे भूमीपूजन,(टेंबवली स्टॉप ते गावठण, ता. देवगड) कार्यक्रमानंतर देवगड येथून रत्नागिरीकडे प्रयाण. रात्री 10 वाजता कणकवली येथे आगमन व राखीव ००००००

सीएससी सेंटरसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा पत्नी यांना निवृत्ती वेतनाबाबत स्पर्श प्रणालीत (SPARSH PORTAL) येणाऱ्या अडचणींचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सी. एस.सी (Common Service Centres) चालविण्याठी ईच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी डीजीआर वेब साईट https://dgrindia.gov.in या संकेस्थाळावर 29 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. ईच्छुक माजी सैनिकांनी आपली माहिती संकेस्थळावर नोंदणी करुन लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कार्यालयास सादर करावी. या करीता इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना डीजीआरव्दारे मोफत विशेष प्रशिषण देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362-228820/9322051284 वर संपर्क साधावा. ००००

अशासकीय कल्याण संघटक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने एकंदरीत मानधनावर माजी सैनिक प्रवर्गातून माजी सैकिनाचे 01 (एक) अशासकीय कल्याण संघटक (बुहुउद्देशीय MTS स्वरुपाचे) पद भरावयाचे आहे. तरी पात्र माजी सैनिकांनी दि. 27 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय सिंधुदुर्ग येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. उमेदवार हा सैन्य दलातून नायब सुबेदार/ सुबेदार या पदावरुन निवृत्त झालेला असावा व संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्र माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र, 2 फोटो,आधार कार्ड या कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. आधिक माहितीसाठी (मानधन व कामाचे स्वरुप) दूरध्वनी क्र. 02362 228820/9322051284 वर संपर्क करावा. 000000

सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत काजू बोंडूपासून रस काढण्याकरिता यंत्र खरेदी योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का.) : जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत काजु बोंडुपासून रस काढण्याकरीता ७५ टक्के अनुदान तत्वावर यंत्र खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून या योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्यशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी ५ फेब्रुवारी २०२५ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण काजू पिकाखालील क्षेत्र साधारणतः ७२,१२५ हे. आहे. जिल्ह्यात काजू पिकांमध्ये काजू बी चा वापर पुढील प्रक्रियेसाठी केला जातो व उर्वरित काजू बोंडू वाया जातो. या वाया जाणाऱ्या बोंडूपासून रस काढून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीतुन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते. याकरिता सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४-२५ अंतर्गत काजू बोंडूपासून रस काढण्यासाठी यंत्र खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हे....

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. हा शासकीय समारंभ कार्यक्रम रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर 9.30 ते 9.40 दरम्यान पोलीस व राखीव पोलीस दल यांचे संचलन होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ००००

शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण )अधिनियम 2013 अन्वयेनूसार कलम 4 मध्ये नमूद तरतुदीनुसार 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असणाऱ्या शासकीय/निमशासकीय/ खाजगी इ. कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे कायद्याने बंधनकारक आहे.तसेच कलम 19 (ब) नुसार नियोक्ता यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचे परिणाम काय होतात याची माहिती कार्यालयात लावणे व अंतर्गत तक्रार समिती स्थापन केल्याचा आदेश कार्यालयात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांनी आपले कार्यालयात जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीचा फलक लावणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई, व निवारण अधिनियम नुसार महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणाचा हक्क मिळण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत या अधिनियमातील कलम 4 (1) अन्वये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समितीबरोबरच कलम 6(1)...

उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेंसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना सन 1985 पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत सन 2024 च्या पुरस्कारांसाठी पात्र सूक्ष्म व लघु उद्योजकांनी 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत प्रथम पुरस्‍कार रोख रु.15 हजार आणि व्दितीय पुरस्‍कार रोख रु. 10 हजार सन्‍मानचिन्‍ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्‍यात येणार आहेत. विहीत नमून्‍यातील अर्ज जिल्‍हा उद्योग केंद्र, सिंधुदूर्ग येथे उपलब्ध आहेत. पुरस्‍कार करण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. १) अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि. ०१/०१/२०२१ रोजी किंवा त्‍यापुर्विचा स्‍थायी लघु उद्योग नोंदणीकृत / पार्ट-२ ज्ञापन स्‍वीकृतीधारक घटक असावा. २) अर्जदार घटक मागील दोन वर्षे सलग उत्‍पादनात असावा. ३) अर्जदार घटकास कोणत्‍याही बॅंकेचा अथवा वित्‍तीय संस्‍थेच...

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द - पालकमंत्री नितेश राणे

· कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य · दरडोई उत्पन्न वाढविणार · निधीची कमतरता पडू देणार नाही सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. ‍जनतेची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. भ्रष्टाचार आणि बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्वांनी जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडावी. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. जिल्ह्याची नाहक बदनामी होईल असे काम कोणीही करु नये. जिल्ह्याच्या प्रतिमेला गालबोट लागता कामा नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. आपला जिल्हा दरडाई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी विकासात्मक कामांना नेहमीच प्राधान्य देणार असून सिंधु...

पूर रोखण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्याला प्राधान्य -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- मुसळधार पावसामुळे डोंगरमाथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो. वर्षानुवर्ष हा गाळ काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जात असल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पूराच्या तीव्रतेचा विचार करुन गाळ काढण्याच्या कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करावे. प्राधान्यक्रम निश्चित झाल्यावर पहिल्या टप्प्यात गाळ काढण्यासाठी 5 ठिकाणांची यादी आणि करावयाच्या कार्यपध्दतीचा सविस्तर प्रस्ताव २४ जानेवारी पर्यंत तयार करुन सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात 'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी,ओढे,नाले मधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, कुडाळ तालुक्यातील भंगसाळ, पीठढवळ, बेल नदी तर कणकव...

प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता सुजाता गोसावी यांना विशेष निमंत्रण

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- बचतगटाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील श्रीमती सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता विशेष निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक, स्वभामि (ग्रा), प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांनी दिली. श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी, म्हापण, ता. वेंगुर्ला यानी आपल्या बचत गटाच्या माध्यमातुन जल जीवन मिशन अंतर्गत गावातील नळपाणी योजना चालविण्यास घेतली आहे. या योजनेचे पाणी सोडणे, पाईप लाईन दुरुस्ती, नळ जोडनी, पाणीपट्टी वसुली आदी कामे त्या बचत गटाच्या माध्यमातुन करतात. यामुळे बचतगटाला आर्थिक फायदा झाला आहे. याची दखल घेत वेंगुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी व त्याचे पती बाळकृष्ण सिताराम गोसावी यांना दिनांक 23 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिना सोहळ्याकरीता विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. ०००००

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा -जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग दि १५ (जिमाका) नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा देण्यसाठी ह्या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, आरती देसाई तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ कायद्याची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करावी, नागरिकांना या बाबत माहिती द्यावी, अधिनियमातील तरतुदीनुसार माहिती फलक लावावा, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या अनुषंगाने कार्यरत आपले सरकार सेवा केंद्राच्या ...

जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापना

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार सन 2025-26 मध्ये घेण्यात येणाऱ्या आठवी आर्थिक गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कामाच्या सनियंत्रण व समन्वयासाठी या आदेशान्वये जिल्ह्याकरीता खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रभारी अधिकारी, आर्थिक गणना अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सह अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य, जिल्हा सह आयुक्त/ सहायक आयुक्त नगरपालिका प्रशासन सदस्य, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्रिय कार्य विभाग) सदस्य, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र सदस्य, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य, राष्ट्रीय विज्ञान व सूचना अधिकारी (NIC) सदस्य, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सदस्य, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक जि.प./ महानगरपालिका सदस्य, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग सदस्य, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सदस्य, सहायक आयुक्त (कामगार) सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण सदस्य, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नोड...

क्रीडा सप्ताहनिर्मित वेगवेगळ्या शाळेत विविध क्रींडा उपक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : राज्यातील नवोदित खेळाडूंमध्ये खेळाविषयाची गोडी निर्माण व्हावी तसेच खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी राज्यस्तरावर क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात होते. त्याअनुषंगाने दि 12 ते 18 डिसेंबर 2024 रोजी क्रीडा सप्ताहा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळेत विविध क्रीडा उपक्रम यशस्वी पणे संपन्न झाले. कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे याठिकाणी क्रीडा जनजागृती रॅली, व्हॉलीबॉल स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा, लगोरी स्पर्धा, लंगडी स्पर्धा, कॅरम स्पर्धा, आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाल्या. तसेच एस. व्ही.एम अॅन्ड ज्यूनिअर कॉलेज-सायन्स कुडासे याठिकाणी कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा, लांब उडी, गोळा फेक, क्रिकेट, व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी याठीकाणी लंगडी स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा सप्ताह निमित्त वाडा हायस्कूल देवगड याठिकाणी खो-खो क्रीडा स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, धावणे स्पर्धा तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. सिंधुदुर्ग सैनिक पब्लिक स्कुल, आंबोली या...

आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षाची आरटीई 25 टक्के प्रवेश प्रकिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील 48 शाळा मधून 268 जागांसाठी दिनांक 14 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये पालकांना बालकांच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज Rte portal Maharashtra च्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाईटवर भरावेत, असे आवहान जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई 25 टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यतच्या अंतरावर स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळा (स्वंय अर्थसहाय्यित शाळा) अशा सर्व शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25 टक्के प्रवेशाअंतर्गत प्रव...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्र व दिव्यांग खेळाडू यांनी दि. 26 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडामार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासन निर्णय दि. २९ डिसेंबर, २०२३ अन्वये व शासन निर्णय दि. २५ जानेवारी, २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, २०२३ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी ...

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्रायल येथे रोजगाराची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. या विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर Latest jobs या विकल्पाव्दारे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इस्रायल देशामध्ये Home Based Caregiver या पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे. या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/ पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे ...

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी 15 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्यांचारासंबंधीत व इतर प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची बैठक पोलीस अधिक्षक कार्याल सिंधुदुर्ग येथे दि.15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येणार आली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय,अत्यांचार व त्यासंबंधित भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि त्यांच्या निराकरण करण्यासाठी सिंधुदर्ग जिल्हा पोलीस प्रशासन व संबंधित माजी सैनिक यांच्यात सविस्तर विचार विनीमय करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे अशा माजी सैनिक, माजी सौनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी त्यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्यांचारविषयी पोलीस यंत्रणेसंदर्भातील काही समस्या व इतर काही प्रलंबित ...

उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालय, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवली यांच्या वतीने आयोजित उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व कणकवली तालुकास्तर उल्लास मेळावा २०२४-२५ पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेळाव्यात राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर, नव भारत साक्षरता कार्यक्रम तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ प्रदीपकुमार कुडाळकर, कार्यक्रम व्यवस्थापक, राज्य शाळा मानक प्राधिकरण, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अरुण चव्हाण, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कणकवली या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. पोदार एज्युकेशन ट्रस्ट कोल्हापूर हबचे जनरल मॅनेजर कर्नल शिरीष कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्याच्या सुरूवातीला सिंधुदुर्ग जिल...

राज्य क्रीडा दिनामित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणुन साजरा केला जातो. सन 2023 पासुन याची अमंलबजावणी सुरु झाली आहे.याच क्रीडा दिनाचे औचित्य साधुन जिल्हा क्रीडा विभागाने विविध कार्यक्रमांचे जिल्ह्यात आयोजन केलेले आहे. यामध्ये ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान यावरील व्याख्यान न्यु इंग्लिश स्कुल, ओरस येथे आयोजित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी कुस्ती या खेळासंदर्भातील नियमावली याबाबत मार्गदर्शन शिबिर शिवाजी इंग्लिश स्कुल, पणदुर येथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि दि.16 जानेवारी रोजी तालुका क्रीडा संकुल, वेंगुर्ला येथे विशेष एकदिवसीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. तसेच क्रीडा दिनाचे औचित्य साधुन 2024-25 या वर्षातील जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय व राज्य खेळाडुंचा गौरव जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांना शाळास्तरावर राज्य क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्...

राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी योजनेव्दारा संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांची जन्म दिवस दि. 12 जानेवारी युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो व त्या निमित्ताने दि. 12 ते 19 जानेवारी हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी दिली. युवकांचा सर्वांगिण विकास करणे, राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी युवकांना उत्साहित करणे त्या करिता युवकांच्या सर्वागिण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे. युवकांमध्ये व्यक्तीमत्व व नेतृत्व गुण विकसीत करणे, राष्ट्र उभारणी मध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने सामाजिक उपक्रम आयोजन, नियोजनामध्ये युवकांचा सहभाग वाढविणे, युवकांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव करणे, शारीरिक क्षमता व व्यायामाची आवड निर्माण करणे. तसेच खेळाकडे आकर्षित करण्यासाठी स्पर्धाचे आयोजन करणे, चर्चासत्र, परिसंवाद, युवा मेळावा, राष्ट्रीय एकात्मता उपक्रम माध्यामातून युवकांना प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. देशाची सर्वात मोठी शक्ती ही युवा शक्ती अस...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका) :- जिल्हा व तालुका ठिकाणातील परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व इ.12 वी तसेच इयत्ता 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने दि. 15 जानेवारी 2025 अखेर नोंदणी करण्याचे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा,विद्यार्थी हा जिल्हा व तालुका ठिकाणातील परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच 11 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इत...