Posts
Showing posts from April, 2021
- Get link
- X
- Other Apps
कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय* *अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी* ------------------ *सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद* *खासगी कार्यालयांना घरूनच काम,* *केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु* ------------------ *रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी* ------------------- *मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले* मुंबई दि 4: कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणज...