Posts
Showing posts from July, 2021
आजअखेर 44 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 544 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जलजीवन मिशनअंतर्गत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) -जल जीवन मिशन अंतर्गत 22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार सन 2024 पर्यत प्रती व्यक्ती 55 लिटर शाश्वत शुध्द पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये संर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना सागरी, नागरी व डोंगरी स्वरुपाची आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत विविध कामे हाती घेवून नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करुन, नवीन स्त्रोत निर्माण करुन नागरिकांनी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावयाचे आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नुकतीच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता जिल्हा कक्षाचे सल्लागार व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना गाव कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये माहिती संकलन राबविण्याच्या प्रक्रिया कोबोटूलव्दारे माहिती अपलोड करणे आदि प्रशिक्षण देण्यांत आले....
जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 731 जणांनी घेतला पहिला डोस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 66 हजार 731 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 806 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 291 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 897 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 685 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 90 हजार 932 व्यक्तींनी पहिला डोस तर 34 हजार 214 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 91 हजार 66 नागरिकांनी पहिला डोस तर 21 हजार 146 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 65 हजार 30 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 827 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 41 हजार 894 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 46 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 88 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 59 हजार 267 कोविशिल्ड आणि 82 हजार 627 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 41 हजार 894 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालयाचा नविन पत्ता
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय सिंधुदूर्ग कुडाळ, या कार्यालयाचा पत्ता बदलला असून पुढील पत्यावर कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, व्दारा श्री. रविंद्रनाथ तुकाराम कुडाळकर, इमारत क्र. 3185(2) पहिला मजला, भैरववाडी, कुडाळ पंचायत समीती कार्यालयाजवळ कुडाळ, मु.पो. तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग दुरध्वनी क्रमांक 02362 222220 या पत्यावर पत्रव्याहार करावा .असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हे कळवितात.
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.8870 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.46 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 60.7740, अरुणा - 78.3033, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.3661, ओटाव – 3.3076, देंदोनवाडी – 0.2488, तरंदळे – 2.2190, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.1450, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 1.5100, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या ...
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2696.56 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 13(2619), सावंतवाडी - 11(2894.10), वेंगुर्ला - 01 (2219.4), कुडाळ - 09(2552), मालवण - 08(2918), कणकवली - 11(2945), देवगड - 03(2386), वैभववाडी - 11(3039), असा पाऊस झाला आहे. 00000
आजअखेर 44 हजार 292 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 537 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
शासकीय तंत्रनिकेतन मालवण मार्फत डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेश व करियर संधीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – शासकीय तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक मालवण हि अत्यल्प खार्चात गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण देणारी शासकीय संस्था असून या संस्थेमधुन दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी एम.पी.एस.सी निवड केलेल्या प्राध्यापकांच्या मार्फत पदविका अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, संस्थेमार्फत नोकरीच्या संधी प्राप्त् करुन बाहेर पडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी नंतर अत्यल्प खार्चात तंत्रशिक्षण व नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने हि संस्था सतत झटत असेते. कोरोनामुळे उध्दवलेल्या आपत्ती परिस्थितीत विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीअरिंग अभ्यासक्रम व करियर संधी याबाबत माहिती देण्याकरिता तसेच विद्यार्थ्यी व पालकांचे शंकानिरसन करण्याकरिता या संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक खर्च, शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे यांविषयी माहिती प्राप्त करुन घेण्याकरिता संस्थेतील प्राध्यापक डॉ.योगेश महाडिक 9423682846, दत्तप्रसाद गोलतकर 9764513133, संदेश जोशी 9422641384 यांचेशी संपर...
गोपीनाथ मुंडे शेतकरीअपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव तात्काळ सादर करावेत
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून, पुराच्या पाण्यात वाहून किंवा अन्य अपघाताने शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा दुर्दैवी मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुटुंबियांच्या वारसदारांना आर्थिक मदत होण्यासाठी राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रुपये एक ते दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अपघातग्रस्तांच्या वारसदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन विमा प्रस्ताव सादर करावा. विमा प्रस्तावासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागांनी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून बाधित कुटुंबास विमा संरक्षणाचा लाभ शीघ्रतेने देता येईल. विमा प्रस्ताव तयार करणेकामी ऑक्झीलियम इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींची मदत घ्यावी. या विमा सल्लागार कंपनीचा टोल फ्री क्रमांक 1800 220 812 असा आहे. अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या वारसदारांनी युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शु...
जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 693 जणांनी घेतला पहिला डोस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 66 हजार 693 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 806 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 290 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 897 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 680 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 90 हजार 926 व्यक्तींनी पहिला डोस तर 34 हजार 202 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 91 हजार 64 नागरिकांनी पहिला डोस तर 21 हजार 135 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 65 हजार जणांनी पहिला डोस तर 6 हजार 802 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 41 हजार 802 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 46 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 88 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 59 हजार 175 कोविशिल्ड आणि 82 हजार 627 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 41 हजार 802 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण के...
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.300 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 204 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.8870 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.46 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 60.7740, अरुणा - 78.3033, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.3661, ओटाव – 3.3076, देंदोनवाडी – 0.2488, तरंदळे – 2.2190, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.1450, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.7910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 1.5100, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या ...
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 8.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2696.56 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 13(2619), सावंतवाडी - 11(2894.10), वेंगुर्ला - 01 (2219.4), कुडाळ - 09(2552), मालवण - 08(2918), कणकवली - 11(2945), देवगड - 03(2386), वैभववाडी - 11(3039), असा पाऊस झाला आहे. 00000
आजअखेर 44 हजार 88 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 558 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
आरोग्य विभागाने बालकांच्या आरोग्य तपासणीबरोबरच समुपदेशन करावे कौशल्य विकास विभागाने विधवा महिला, 18 वर्षापुढील मुलांना प्राधान्य द्यावे - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) –कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांची आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी करण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करावे. कौशल्य विकास विभाग आणि आरसेटीने प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची यादी अंतिम करताना विधवा महिला तसेच पालक गमावलेल्या 18 वर्षापुढील बालकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरीय कृती दलाची बैठक आज घेण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी संजित महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. दीपक म्हालटकर, पोलीस उपअधिक्षक संध्या गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांचे निर्देश - * बालकांना धान्य वितरण करा. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्राधान्य द्या. * संजय गांधी, ...
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.500 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 7 हजार 8 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 373.3580 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.46 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 35.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 61.0140, अरुणा - 78.5825, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.4900, ओटाव – 3.2549, देंदोनवाडी – 0.2714, तरंदळे – 1.8560, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.1300, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 1.9410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7760, शिरगाव – 1.5100, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या...
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 25 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.3 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2688.18 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 25(2606), सावंतवाडी - 16(2883.10), वेंगुर्ला - 13.4(2218.4), कुडाळ - 09(2543), मालवण - 10(2910), कणकवली - 15(2934), देवगड - 05 (2383), वैभववाडी - 13(3028), असा पाऊस झाला आहे. 00000
जिल्ह्यात 2 लाख 66 हजार 641 जणांनी घेतला पहिला डोस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 66 हजार 641 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 806 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 288 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 897 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 678 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 90 हजार 921 व्यक्तींनी पहिला डोस तर 34 हजार 195 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 91 हजार 59 नागरिकांनी पहिला डोस तर 21 हजार 117 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 64 हजार 958 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 771 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 41 हजार 690 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 34 हजार 700 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 46 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 88 हजार 220 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 59 हजार 63 कोविशिल्ड आणि 82 हजार 627 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 41 हजार 690 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण...
पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि.28 (जि.मा.का): इयत्ता 5वी ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी ची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी ही 23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यातमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत 30 मार्च 2021 च्या प्रसिध्दीप्रत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यातमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन परीक्षा तुर्त पुढे ढकलण्यात आली होती. दिनांक 10 मे 2021 च्या प्रसिध्दीपत्रकामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी ही दिनांक 8 ऑगस्ट रोजी मान्यता देण्यात आली आहे. परंतु दिनांक 8 ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात य...
पूरग्रस्त प्रती कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार झालेल्या प्रती कुटुंबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ आणि 5 लिटर केरोसीन मोफत देण्याची सूचना तहसिलदारांना दिली आहे. बाधित कुटुंबांकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य देण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे एनडीआरएफचे एक पथक कोसळलेल्या दरडीत बेपत्ता गितेश गावडे याचे शोधकार्य अद्यापही करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णतः पडझड झालेली 5, अंशतः पडझड झालेली पक्की घरे 260, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 24, 4 नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या आहे. तर 115 बाधीत गोठ्यांची संख्या आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये 39 गावातील 290 कुटुंबातील 1 हजार 271 व्यक्तींना आज अखेर सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 26 मोठी दुधाळ जनावरे, दोन लहान दुधाळ जनावरे आणि एक ओढकाम करणारे जनावर मृत झाले आहे. जिल्ह्यात शाळा, शासकीय इमारत अशा 17 स...
नाटळ - कनेडी पुलाला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून 6 कोटीची मंजुरी मिळणार पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी थेट साधला संपर्क
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नाटळ - कनेडी पुलाच्या कामासाठी सहा कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरु केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पर्यायी पुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची काल केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठका घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. सामंत आणि खासदार श्री. राऊत यांनी आज चिपळूण येथे पूरग्रस्त भागातील प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये विशेषतः खारेपाटण येथील पर्यायी मार्गासाठी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. खारेपाटण येथील खाडीला पत्तन विभागाच्या माध्यमातून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या भिंतीची उंची वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटबंधारे विभागाचे...
जिल्ह्यात 2 लाख 60 हजार 614 जणांनी घेतला पहिला डोस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 60 हजार 614 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 801 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 252 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 893 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 536 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 90 हजार 364 व्यक्तींनी पहिला डोस तर 33 हजार 440 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 90 हजार 116 नागरिकांनी पहिला डोस तर 19 हजार 967 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 60 हजार 440 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 566 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 33 हजार 375 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 20 हजार 980 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 39 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 81 हजार 500 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 55 हजार 348 कोविशिल्ड आणि 78 हजार 027 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 33 हजार 375 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण...
हातमाग व वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) - हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) 13 व वेंकटगिरी -2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर , सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज 20 आगॅस्ट 2021 पर्यंत मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 20 आगॅस्ट 2021 पर्यत संबंधीत प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचेकडे सादर करावा. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे वस्त्रोद्योग आयुक्त महाराष्ट्र राज्य शीतल तेली - उगले हे कळवितात. 0000
आजअखेर 43 हजार 778 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 650 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 10.87 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2674.88 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 13(2581), सावंतवाडी - 15(2867.10), वेंगुर्ला - 15(2205), कुडाळ - 15(2534), मालवण - 07(2900), कणकवली - 09(2919), देवगड - 00(2378), वैभववाडी - 13(3015), असा पाऊस झाला आहे. 00000
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 9 हजार 268 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 378.8940 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.69 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 20.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर - 61.9720, अरुणा - 79.4570, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.6189, ओटाव – 3.2020, देंदोनवाडी – 0.3844, तरंदळे – 2.2190, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.1300, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.0910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7910, शिरगाव – 1.4980, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960...
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.800 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
पुरामुळे आजअखेर 39 गावातील 290 कुटुंबातील 1271 नागरिकांचे आजअखेर स्थलांतर
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – पुरामुळे जिल्ह्यातील 39 गावांमधील 290 कुटुंबातील 1 हजार 271 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलेल्या गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. दोडामार्ग तालुक्यातील 7, सावंतवाडी तालुक्यातील 10, वेंगुर्ला तालुक्यातील 1, कुडाळ तालुक्यातील 8, मालवण तालुक्यातील 4, देवगड तालुक्यताील 5 आणि कणकवली शहरातील नागरिकांचे पुरामुळे स्थलांतर करण्यात आले आहे. तालुकानिहाय अनुक्रमे स्थलांतरीत कुटुंबाची संख्या आणि व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे - दोडामार्ग एकूण 107 कुटुंबांतील 425 व्यक्ती, सावंतवाडी 84 कुटुंबातील 451, वेंगुर्ला 2 कुटुंबातील 11 व्यक्ती, कुडाळ 72 कुटुंबातील 273 व्यक्ती, मालवण 7 कुटुबांतील 26 व्यक्ती, कणकवली 3 कुटुंबातील 22 व्यक्ती, देवगड 15 कुटुंबातील 63 व्यक्ती, अशा एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. तालुका निहाय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक मुसळधार पावसामुळए उद्...
मल्हार पुलासाठी पर्यायी मार्ग उभारा अतिवृष्टीने नुकसान झालेले साकव, पुल आणि रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री उदय सामंत
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – मल्हारपूल कोसळल्यामुळे 5 हून जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाचे स्टक्चरल ऑडिट करावे, पर्यायी साकव उभारावा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. कणकवली तालुक्यातील कनेडी येथील मल्हार पुलाची पालकमंत्री श्री.सामंत यांनी आज पहाणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. मल्हार पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यासह खारेपाटण, नाटळ या पूरग्रस्त भांगाचीही त्यांनी यावेळी पहाणी केली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन.म्हेत्रे, तहसिलदार आर.के.पवार, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता के.के. प्रभू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्वच साकव, पूल आणि रस्ते यांची यादी तयार करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी पुलांचे नुकसान झाले आहे, त्या त्या ठिकाणी स्टक्चरल ऑडिट करण्यात यावे. ज्या ठिकाणी पर्यायी मार्ग नाही, त्या ठिकाणी प्राथमिकतेने साकवांची दुरुस्ती करण्यात या...
आजअखेर 43 हजार 284 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 18 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
जिल्ह्यात 2 लाख 60 हजार 553 जणांनी घेतला पहिला डोस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.) - जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 60 हजार 553 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 801 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 252 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 893 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 5 हजार 533 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 90 हजार 350 व्यक्तींनी पहिला डोस तर 33 हजार 413 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 90 हजार 106 नागरिकांनी पहिला डोस तर 19 हजार 942 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 60 हजार 403 जणांनी पहिला डोस तर 6 हजार 549 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 3 लाख 33 हजार 242 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 3 लाख 16 हजार 980 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 2 लाख 35 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 81 हजार 500 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 2 लाख 55 हजार 215 कोविशिल्ड आणि 78 हजार 027 कोवॅक्सिन असे मिळून 3 लाख 33 हजार 242 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण के...
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपाताळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.000 मी. आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.800 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 2.800 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.9720, अरुणा – 78.8736, कोर्ले- सातंडी - 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.7907, ओटाव – 3.0964, देंदोनवाडी – 0.6009, तरंदळे – 2.3250, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.4060, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.1300, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.2160, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.8060, शिरगाव – 1.4860, तिथवली – 1.7230, लोरे – 2.6960 या प्रमा...
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 25(2568), सावंतवाडी - 21(2852.1), वेंगुर्ला - 07(2190), कुडाळ - 26(2519), मालवण - 20(2893), कणकवली - 31(2910), देवगड - 10(2378), वैभववाडी - 98(3002), असा पाऊस झाला आहे. 00000
आजअखेर 43 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
आजअखेर 43 हजार 93 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 926 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 26.00 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2602.138 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 15.00(2515.00), सावंतवाडी - 32.00(2782.10), वेंगुर्ला - 6.00(2160.00), कुडाळ - 50.00(2462.00), मालवण - 30.00(2849.00), कणकवली - 47.00(2852.00), देवगड - 18.00(2357.00), वैभववाडी - 10.00(2840.00), असा पाऊस झाला आहे. 00000
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 23 हजार 830. क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 403.6710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 90.23 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 84.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 63.4090, अरुणा – 76.4882, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.9658, ओटाव – 2.8468, देंदोनवाडी – 1.3947, तरंदळे – 2.8830, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3440, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 2.0850, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4160, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 1.3390, ओझरम – 1.8190, पोईप – 0.8370, शिरगाव...
जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 41.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.800 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 4.500 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
आजअखेर 43 हजार 5 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 859 - जिल्हा शल्य चिकित्सक
- Get link
- X
- Other Apps
'सुरक्षित महाराष्ट्र' स्तर 3 च्या निर्बंध आदेशास 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) - जिल्यार् त सरासरी पॉझिटीव्हीटी रेट 6.92 टक्के इतका असल्याने सद्यःस्थितीत जिल्हा स्तर 3 मध्ये समाविष्ट होत असल्याने 16 जुलै रोजी लागू करण्यात आलेल्या आदेशास दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 7 वाजले पासून 2 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिला. राज्यात कोविड 19 विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने सुरक्षित महाराष्ट्र निर्बंध स्तर आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे जिल्ह्याचा साप्ताहित पॉझिटीव्हीटी रेट हा आरटीपीसीआर टेस्ट व त्यामध्ये आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येनुसार ठरवण्याबाबत व या पॉझिटीव्ह रेट नुसार जिल्ह्याच्या निर्बंधाचा स्तर निश्चित करण्याच्या सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील 2 सप्ताहातील प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन तसेच आरटीपीसीआर चाचण्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर विचारात घेऊन स्तर निश्चित करण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये 9 जुलै ते 15 जुलै या सप्ताहातील कोविड बाधित रुग्णांचा सरासरी पॉझिटीव्हीटी रेट (आरटीपीस...
( सायंकाळी 4 वा. पर्यंतची माहिती) रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू : दोन जखमी जिल्ह्यातील 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कणकवली तालुक्यातील रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संगिता प्रकाश जाधव (वय 40) या महिलेचा मृत्यू झाला असून प्रकाश शांताराम जाधव (वय 47) बळीराम कृष्णा जाधव (वय 80) या दोघांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. तालुकानिहाय अनुक्रमे स्थलांतरीत कुटुंबाची संख्या आणि व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे - दोडामार्ग एकूण 107 कुटुंबांतील 425 व्यक्ती, सावंतवाडी 84 कुटुंबातील 451, वेंगुर्ला 2 कुटुंबातील 11 व्यक्ती, कुडाळ 72 कुटुंबातील 273 व्यक्ती, मालवण 7 कुटुबांतील 26 व्यक्ती, कणकवली 3 कुटुंबातील 22 व्यक्ती, देवगड 15 कुटुंबातील 63 व्यक्ती, अशा एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफची दोन पथके होणार दाखल जिल्ह्यामध्ये सावंतवाड...
तिलारी, वाघोटन, कर्ली नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे - अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – भारतीय हवामान खात्यामार्फंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने तिलारी, वाघोटन व कर्ली नदी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयकुमार थोरात यांनी केले आहे. तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने आज सकाळी 11.00 वाजता तिलारी नदीची तिलारीवाडी येथील पाणी पातळी धोका पातळी 43.30 मीटर पर्यंत पोहोचली आहे. तिलारी धरणातून सद्य:स्थितीत 1140 घ.मी./सेकंद एवढस विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, धरणाच्या खालील बाजूस तिलारी नदी व पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने धरण साठ्या होणारी वाढ व विसर्ग पाहता आज धोका पातळी(43.60 मीटरच्या पुढे) ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील प्रामुख्याने तिलारीवाडी, कोनाळकट्टा, परमे, देवमळा, धनगरवाडी, वानोसीवाडी, मणेरी, तळेवाडी, दोडामार्ग, घोटगेवाडी, घोटगे, आवाडे, साटेली, भेडशी, खानयाळे, वायंगणतड, बोडदे, भटवाडी, कुडा...
तिलारी नदी धोका पातळीवर, कर्ली, वाघोटनने ओलांडली इशारा पातळी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे. 00000
तिलारी धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) - तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 40 हजार 83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून 229.515 क्युसेक्स, विद्युत गृहातून 211.86 क्युसेक्स आणि सांडव्यातून 39 हजार 641.83 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 424.1050 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 94.80 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल 478.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात 68.1990 द.ल.घ.मी. पाणी साठा असून हा प्रकल्प 69.58 टक्के भरला आहे. सध्या या प्रकल्पातून 158.688 घ.मी. सेकंद विसर्ग सुरू आहे. अरुणा प्रकल्पात 72.9977 द.ल.घ.मी पाणीसाठा असून या धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात 257.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोर्ले- सातंडी प्रकल्प 100 टक्के भरला असून 25.4740 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. या धरणातून 245.102 घ.मी. सेकंद विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधाके प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 4.0971, ओटाव – 2.8468, देंदोनवाडी – 1.3208, तरंदळे – 2.9660, आडेली – 1.2...
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 219 मि.मी. पाऊस
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – किनारपट्टीचे तालुके वगळता सर्व तालुक्यांमध्ये गेल्या चोवीस तासात पावसाने शंभरी पार केली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 219 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 137.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2576.138 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 184(2500), सावंतवाडी - 210(2750.10), वेंगुर्ला - 86.60(2154), कुडाळ - 126(2412), मालवण - 27(2819), कणकवली - 185(2805), देवगड - 65(2339), वैभववाडी - 219(2830), असा पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 2 हजार 830 मि.मी. झाला आहे. त्यानंतर मालवण, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, देवगड तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 2 हजार 154 मि.मी. झाला आहे. 00000
तिलारी नदीकाठच्या गावांनी पुढील 5 दिवस सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे - उप कार्यकारी अभियंता सु.दु.आंबी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – तिलारी नदीपात्रातील पाण्याची पातळी सद्यस्थितीत 43.60 मीटर ( धोका पातळी) इतकी आहे. पुढील चोवीस तासात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे सांडव्यावरून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तिलारी नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी पुढील 5 दिवस सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग चराठे - सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता सु.दु. आंबी यांनी केले आहे. तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तिलारी नदीवर मुख्य धरण हे कोनाळ गावाजवळ आहे. तिलारी नदी धरणापासून 21 कि.मी. लांबीचा प्रवास करून गोवा राज्यात प्रवेश करते. आज 23 जुलै रोजी धरण तलांक 111.70 मीटर (94.80 टक्के ) भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे येणारा विसर्ग थेट नदी प्रवाहात वर्ग होत आहे. सद्यःस्थितीत सांडव्यावरून 1123 घ.मी. / सेकंद या प्रमाणे विसर्ग सुरू असून संकल्पीत पूर विसर्ग 3233 घ.मी./स...
अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि.22(जि.मा.का): केंद्र शासनाच्या सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी विविध खेळ प्रकार आयोजित केले जातात.केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्याक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्या त्या त्या राज्यात आयोजित केल्या जातात. स्पर्धाकरिता शासनाच्या विविध विभागात कार्यरत असलेले खेळाडूंनी खालील खेळ प्रकारात टेबलटेनिस,बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम,बुध्दीबळ, ॲथलेटिक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफटींग, पॉवरलिफटींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी सहभाग नोंदवण्याकरिताचे आवेदनपत्र कार्यालय प्रमुख यांच्या स्वाक्षरीने व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शिफारशीने व्यवस्थपक, सचिवालय जिमखाना मुं.400032 यांचेकडे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत टपालाने ,व्यक्तीश: पाठावावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे. 0000
पूर्व उच्च्ा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्ट रोजी
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि.22 (जि.मा.का): सन 2020-2021 च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8वी सन 2021 च्या दिनांक 23 मे रोजी होणार होती. मात्र कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणास्तव परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली होती. कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून परीक्षा दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. असे कळविण्यात आले आहे, या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी केले आहे. 0000
कणकवली - कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला
- Get link
- X
- Other Apps
सिंधुदुर्गनगरी दि. 22 (जि.मा.का.) - जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली - कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कनेडी परिसरातील गावांचा कणकवली शहराशी संपर्क तुटला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. वागदे येथे राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाघोटन नदीने इशारापातळी ओलांडल्यामुळे खारेपाटण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गड नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे कणकवली येथील गोपुरी आश्रमाजवळील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक येथे रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वैभववाडी तालुक्यातील जांभवडे येथील जामदा पूल पूर्णपणे बुडाला असून गुरववाडीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तसेच नदीकाठची भात शेती वाहून गेली आहे. दोडामार्ग तालुक्यात भेडशी कॉजवेवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच घोडगेवाडी - केर, परमे - भेडशी, उसप - खोक्रल, खोक्रल - मांगेली या मार्गा...