Posts

Showing posts from June, 2024

जागतिक अंमली पदार्थ दिन जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम व "खोड" लघुपटाचे प्रदर्शन

सिंधुदुर्गनगरी : जागतिक अंमली पदार्थ दिनाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून दि 14 ते 30 जून 2024 या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थामध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन करत आहेत. शहरातील बाजारपेठा, मुख्य चौक या ठिकाणी रॅली काढून लोकांना अंमली पदार्थाच्या दुष्परीणामांबाबत माहिती देण्यात येत आहे. निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहेत. या अभियानात विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, तालुका स्तरावरील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक व विविध उद्योजक यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून "खोड" या लघुपटाची (short film) निर्मिती साईनाथ जळवी, साई जळवी फिल्म्स, कुडाळ यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. या लघुपटाचे प्रदर्शन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नियोजनाखाली 25 जून रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन, सिंधुदुर्ग येथे करण्यात आली. या समारंभास जिल्हाधिकारी किशोर तावडे, शासकीय...

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय फसवणूक करणाऱ्या विकासकास नुकसान भरपाईचे आदेश

सिंधुदुर्गनगरी एस. डेव्‍हलपर्स अॅंड बिल्‍डर्सचे सागर संपत ढोपे यांनी सन 2017 मध्‍ये मिशन हयूमन पार्क या नावाने कोकणातील मालवण तालुक्‍यात एक गृहनिर्माण प्रकल्‍प सुरु करणार असलेबाबतची जाहिरात दिली. जाहिरातीमधून त्‍यांनी बिनशेती आणि नगररचना कार्यालयाकडून मंजूर केलेले ओपन प्‍लॉट खरेदी करुन त्‍यावर स्‍वतःच्‍या आवडीचा बंगला बांधुण त्यामध्ये अनेक आकर्षक सोयीसुविधा सुध्‍दा उपलब्‍ध करुन दिल्‍या जाणार आहेत व ते ही अगदी कमी पैशात अशी जाहिरात होती. या जाहिरातीवर विश्‍वास ठेऊन सौ. सुप्रिया सुधिर कदम, सौ. अपुर्वा अनंत लोटणकर व अनंत लोटणकर, भानुदास कुबल व तानाजी पडवळ यांनी एस.डेव्‍हलपर्स अॅंड बिल्‍डर्स यांच्याकडून मौजे - कुंभारमाठ, ता. मालवण येथील रेखांकनामधील 490 चौ.मी. चा भूखंड खरेदी केला. त्‍यानंतर या भूखंडावर स्‍वतंत्रपणे बंगले बांधून देतो असे विकासक सागर ढोपे यांनी सांगितले. त्‍यांचे शब्‍दावर विश्‍वास ठेऊन सौ. सुप्रिया सुधिर कदम यांनी घर बांधण्यासाठी रु.8 लाख 50 हजार सागर ढोपे यांना अदा केले. त्‍याचप्रमाणे अनंत लोटणकर व त्‍यांच्‍या पत्‍नी सौ. अपुर्वा लोटणकर यांनी सागर ढोपे य...

जिल्ह्यात 25 जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): जिल्ह्यात २१ ते २५ जून २०२४ या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तसेच २२ जून २०२४ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ५० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असून या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी (१) विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. (२) दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. (३) विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. (४) विजेच्या खांबांपासून लांब रहावे. (५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थ...

डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी 25 जून पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 21 (जिमाका) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 18 जून 2024 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे डी.एल.एड अर्ज भरण्यासाठी दि. 25 जून 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे. याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे www.maa.ac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी. ०००००

आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविद्येचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 21 जून 2024 रोजी सकाळी 7.15 ते 8.15 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथील बॅडमिंटन हॉल येथे योग दिन साजरा होणार आहे. सर्व नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, खेळाडू ,जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी योग कार्यक्रमात अनुकुल पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ००००००

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहे जुलै ते डिसेंबर 2024 शिबीरे

सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली. शिबिराचे वेळापत्रक माहे देवगड दिनांक कणकवली दिनांक मालवण दिनांक वेंगुर्ला दिनांक सावंतवाडी दिनांक दोडामार्ग दिनांक जुलै -2024 03 04 10 11 18 19 ऑगस्ट -2024 06 07 13 14 21 22 सप्टेंबर-2024 03 04 10 11 18 19 ऑक्टोंबर-2024 08 09 16 17 23 24 नोव्हेंबर-2024 06 07 13 14 20 21 डिसेंबर -2024 04 05 11 12 18 19 या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील. 00000

सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा 2 व 3 जुलै रोजी

सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 2 ते 3 जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा वा.स. विद्यालय माणगाव मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून 2024-25 सत्रातील आंतरशालेय प्रवेश स्पर्धाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे. सुब्रतो मुखर्जी स्पोट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्लीतर्फ 2024-25 या वर्षातील सबज्युनिअर व ज्युनियर गटातील 63 व्या आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखजों चषक फुटबॉल स्पर्धेचा कार्यक्रम संचालनालयाला प्राप्त झाला. 17 वर्षाखालील मुला-मुलीच्या गटाची राष्ट्रीय स्पर्धा 30 जुलै ते 11 सप्टेंबर दरम्यान दिल्ली येथे होणार आहे. यावर्षी सबज्युनिअर म्हणजे 14 वर्षाखालील मुलांची स्पर्धा यावर्षी 15 वर्षांखालील मुलांच्या गटात होणार असून राष्ट्रीय स्पर्धा बंगळूरू येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जिल्हास्तरीय व विभागीय सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा 10 जुलैपूर्वी घेण्यात येणार आहेत. जे संघ सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत ...

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा निरोगी जीवन जगण्यासाठी योग महत्वाचा -मकरंद देशमुख

सिंधुदुर्ग दि २१ (जिमाका) आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारच्या व्याधीने त्रस्त आहेत. आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. 'योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. योगामुळे मानवाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जीवन आनंदी, उत्साही व निरोगी ठेवण्यासाठी योगाची खूप आवश्यकता असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख म्हणाले. जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग, जिल्हा आयुष विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सिंधुदुर्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे ठिकाणी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी प्रशालेचे विदयार्थी व शिक्षक, तसेच नागरीकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या Common Yoga Protocol नुसार आयुष विभागाच...

असाक्षरांची नोंदणी 15 जुलैपर्यंत पूर्ण करावी -जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी दि. 19 (जिमाका) : केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शाळांना दिलेल्या उदिष्टानूसार आपल्या कार्यक्षेत्रातील वय 15 वर्षांवरील सर्व असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर 15 जुलै 2024 पर्यंत पूर्ण करुन अध्ययन अध्यापन वर्ग सुरु करण्यात यावे. तसेच शाळांनी त्यांना दिलेल्या उदिष्टाइतके असाक्षर शाळेच्या कार्यक्षेत्रात नसल्यास तसे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांना सादर करावे. कोणत्याही परिस्थितीत दि.15 जुलै 2024 नंतर असाक्षर व असाक्षरांच्या संख्येनुसार आवश्यक स्वंयसेवक यांची नोंदणी प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहेत. केंद्रपुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2024-25 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय नियामक परिषदेची बैठक जिल्हास्तरीय नियामक परिषद, नव भारत साक्षरता कार्यक्रम अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. गतवर्षी सन 2023-24 मधील दि.17 मार्च 2024 रोजीच्या 2...

शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे, जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 19 (जिमाका) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अनु.जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गासाठी सन 2023-24 करीता शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी दि. 30 जून 2024 पर्यंत मुदवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु असून जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्रायार्च, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज अखेर करावे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. ही योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजूरीस्तव या कार्यालयाकडे वेळेवर वर्ग क...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 19 (जिमाका) : जिल्हा व तालुका ठिकाणातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती -(क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण चे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने" करीता पुढीलप्रमाणे वेळापत्रकानुसार या कार्यालयाकडून अर्ज वाटप व स्विकृती ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी दि.20 जून 2024 ते दि. 15 जुलै 2024 पर्यत अर्ज करता येणार आहे. तर उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षासाठी दि. 5 ऑगस्ट 2024 पासून ते 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज वाटप व स्विकृती सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग येथे सादर करावेत. ००००००

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा

सिंधुदुर्गनगरी दि. 18 (जिमाका) : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० पर्यंत मतदान होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पदवीधर निवडणूकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तीक रजा जाहीर केलेली आहे. ही रजा त्याच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. ००००००

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

धुदुर्गनगरी दि. 13 (जिमाका) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती - (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी “ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ” राबविण्यास इतर मागास बहूजन कल्याण विभागाकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक तथा सदस्य सचिव संतोष चिकणे यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती या प्रमाणे आहेत. सदरचा विदयार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. व्यवसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60 टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रडेशन/CGPA चे गुण असणे आवश्यक राहील. व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विदयार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील.यासाठी इयत्ता 12 वी च्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पुर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. योजनेंतर्गत लाभ मिळ...

शाळाप्रवेशोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1 हजार 360 शाळांमध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळाप्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, प्रतिष्ठीत मान्यवर आणि इतर शिक्षण प्रेमी नागरीक उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे. शाळा प्रवेशनिमित्त प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, पालक, सन्मा. निमंत्रीत व व्यक्ती, नवागत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी एकत्रित येऊन मिरवणूक काढणे, इयत्ता 1 ली व इतर वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे पुष्प देवुन स्वागत केले जाणार आहे. मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण- इयत्ता 1 ली ते 8 वी च्या 51546 विद्यार्थ्यांना 58724 पाठ्यपुस्तक संचाचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी दि. 15 जून 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रम- शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करणे. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांत जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख...

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 13 (जिमाका) : अनुसूचित जातीच्या मुला- मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in (जलद दुवे ताज्या घडामोडी) येथे नमुद संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय ३ चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, योजनेची सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज क...

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी 24 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करा

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जिमाका): सेवा सोसायट्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव दि.24 जून 2024 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत कार्यालयात स्वहस्ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे. बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यांच्या उद्देशाने रु. 3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक इएसई-२००३/प्र.क्र.१९१/रोस्वरो-१, दि. 01 फेब्रुवारी 2006 जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत. आवश्यक अटी व शर्तीच पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नो...

जिल्ह्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रिक्रिया सुरू

सिंधुदुर्गनगरी दि.12(जिमाका): सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 118 पोलीस शिपाई (5 बॅण्डस्मन पदासह) व 24 चालक पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी बुधवार दि.19 जून 2024 रोजी पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर अर्ज भरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होणार असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. पोलीस शिपाई पदासाठी 5 हजार 920 बॅण्डस्मन पदासाठी 783 व चालक पोलीस शिपाई पदासाठी 1 हजार 339 असे एकूण 8 हजार 42 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. दि.19 जून 2024 रोजी पासून पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर घेण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले असून उमेदवारांना टप्याटप्याने बोलविण्यासाठी 'महाआयटी विभागाकडून प्रवेशपत्र उमेदवारांच्या ई-मेल/एसएमएस या माध्यमाद्वारे पाठविले जाणार आहेत. हि भरती प्रक्रीया ही तटस्थपणे, निःपक्षपातीपणे व पारदर्शक पार पाडली जाणार असून भरतीप्रक्रीये दरम्यान गैरप्रकार व भ्रष्टाचार होणार नाही, याकरीता योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. पोलीस भरती प्रक्रीये दरम्यान उमेदवारांना व त्यांचे नातेवाईकांना भ्रष्टाचारी प...

जिल्ह्यात कलम 144 लागू

सिंधुदुर्गनगरी दि.12 (जिमाका): जिल्ह्यातील महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदासंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे अधिकाराचा वापर करून दिनांक 11 जून 2024 रोजी 20 वाजलेपासून ते 5 जुलै 2024 रोजी 24 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये संपूर्ण भूभागात मनाई आदेश जारी केला आहे. ०००००

'सचेत' प्रणाली- आपत्ती काळातील 'संदेशदुत '

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का): आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती व्यवस्थापन करताना कोणत्याही आपत्तीची पूर्व सूचना मिळणे खूप महत्वाचे असते ज्यामुळे होणारी हानी कमी करता येऊ शकते. यासाठी National Disaster Management Authority म्हणजेच NDMA ने एक एप्लिकेशन म्हणजेच ॲप कार्यान्वित केले आहे. ज्याचे नाव आहे सचेत. या सचेत विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हे ॲप वापरण्यास अगदी सोप्पे आहे.Google App Store किंवा iOS प्रणालीवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. डाऊनलोड केल्यानंतर इतर ॲप प्रमाणे आपला मोबाईल क्रमांक भरून नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP क्रमांक येतो तो टाकला की आपण हे ॲप वापरू शकतो. नोंदणी केल्यावर आपण आपले लोकेशन टाकले की आपल्या परिसरातील हवामान तसेच इतर आपत्ती विषयक माहिती तात्काळ उपलब्ध होते. विशेष म्हणजे ह्या app मधील Subscribe Location मध्ये ...

शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकास घरबांधणीसाठी आर्थिक मदत

सिंधुदुर्गनगरी दि. 5 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक संतोष लक्ष्मण गावडे रा. आंबोली ता.सावंतवाडी यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने घरबांधणीकरीता 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते अदा करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर व लिपिक अनिल नाटलेकर हे उपस्थित होते. तरी जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी/विरमाता/ वीरपिता/ माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये/ अवलं‍बित यांनी अश्याप्रकारच्या कल्याणकारी योजनांचा (उदा.शैक्षणिक/स्वयंरोजगार/ पुनर्वसन) लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. ००००० सोबत : फोटो

जिल्ह्यात 13 जूनपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार 13 जून 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी-सिंधुदुर्गची मतमोजणी दिनांक 4 जून 2024 रोजी होणार आहे. निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांकडून मिरवणूकीचे आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांवर टिका टिप्पणी करणे, सोशल मिडीयावर एकमेकांविरूध्द माहिती प्रसारीत करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे / आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून, तणाव निर्माण होवुन त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारख...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस दल सज्ज

सिंधुदुर्गनगरी दि.3 (जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. त्यादिवशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ तसेच देशातील इतर मतदार संघाचा निकाल जाहिर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हयात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये व शांतता रहावी याकरीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज आहे. व याकरीता जिल्हयातील विविध ठिकाणी, फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पोलीस वाहन पेट्रोलिंग असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. तसेच संवेदनशील गावांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. मतमोजणी निकालाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातून 1 अपर पोलीस अधीक्षक, 3 पोलीस उपअधीक्षक, 41 इतर पोलीस अधिकारी व 319 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. तसेच 4 स्ट्रायकिंग, 2 दंगल नियंत्रण पथके सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 469 इसमांवर विविध कलमांन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली असून 433 इसमांना क्रि.प्रो.को.कलम 149 प्रमाणे नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीयावर लक्ष ठेव...