Posts

Showing posts from 2023

संत काशिबा गुरव युवा व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ कार्यरत

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या. अंतर्गत राज्य शासनाने राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या आर्थिक विकासासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनीची स्थापना केली आहे. या दोन उपकंपनींची जिल्हास्तरीय कामकाज शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली आहे. या महामंडळामार्फत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजातील गरजू पात्र व्यक्तींना महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास साध्य करण्याकरीता या महामंडळामधून स्वय:रोजगार करीता आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. महामंडळाचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे असून अधिक माहितीसाठी 02362 228119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील गुरव व लिंगायत बांधवांनी या महामंडळाच्या योजना...

निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.): जिल्हा कोषागार कार्यालय येथे डिसेंबर अखेर पर्यंत हयातीचे दाखले स्विकारले जात होते, तरीही अद्याप 583 निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने त्यांचे निवृत्तीवेतन रोखण्यात आले असून अश्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकानी त्वरीत जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालय येथे जाऊन हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. राज्यशासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी ज्या बँकेतमधून निवृत्तीवेतन स्विकारत आहेत त्या बँकेत अथवा जवळच्या कोषागार, उपकोषागार कार्यालयात दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जाऊन हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मोहिम राबविण्यात आली होती. हि सुविधा 'जीवनप्रमाण' या वेबसाईटवर सुध्दा ऑनलाईन पध्दतीनेही उपलब्ध आहे. ज्या निवत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयास न कळविता परस्पर बँक शाखा बदलली आहे अशा निवृत्ती वेतन धारकांनी जिल्ह्यातील नजीकच्या उपकोषागार, कोषागार कार्यालय येथे संपर्क ...

विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करा -पालकमंत्री रविंद्र चव्हाण · निधी अखर्चित राहता कामा नये · विद्यार्थी बस फेऱ्यांना प्राधान्य द्या · नमो क्रिडा संकुलासाठी मुबलक निधी

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी पुरेसा निधी प्राप्त झालेला आहे. प्राप्त निधीतून विकासकामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करुन निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी नोंद घ्यावी ,मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते तातडीने पूर्ण करण्यासाठी मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान पवार तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी सादरीकरणाव्दारे खर्चाची माहिती दिली. पालकमंत्री म्हणाले, आर्थिक वर्षे संपायला कमी कालावधी राहिला असल्याने विकासकामांचे सूक्ष्म नियेाजन करुन ती कामे...

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का):- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची नेमणूक करावी, जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कोविड तपासणी किट, ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, आरटीपीसीआर लॅब, या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करावी, नियमित माहितीचा dashboard बनवावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. ...

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 22 ते 23 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व ओरोस जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ: समिती कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस. दुपारी 3 वाजता केसरी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी. 4.30 वाजता केसरी जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजता केसरी जि. सिंधुदुर्ग येथून गोवाकडे प्रयाण. ००००००

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ शुक्रवार दि.22 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील नेरुर देऊळवाडा आणि वालावल, सावंतवाडी तालुक्यातील तळवडे आणि निरवडे, कणकवली तालुक्यातील कासरल आणि सातरल तर देवगड तालुक्यातील कुणकेश्वर आणि मिठमुंबरी, दोडामार्ग तालुक्यातील विर्डी आणि तळखोल या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. ००००००

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): जिल्ह्याच्या ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी व 12 वी तसेच 12 नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन 2023-24 या शैक्षणीक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्यी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. जिल्हा ठिकाणातील हद्दीपासून 0.5 कि.मी परिसरातील असलेल्या महाविद्यालयातील इ.11 वी, 12 वी तसेच इ.11 वी, 12 वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असावा. विद्यार्थ्यास मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील. जिल्हानिहाय अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्याना लाभ द्यावयाचा आहे ही संख्या ...

दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनांसाठी 4 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे, आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. योजनेचा उद्देश, दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/ कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे. योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल दिनांक 3.12.2023 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. 000000

गोवा येथे 10 जानेवारीला पोस्टल पेन्शन अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): टपाल पेन्शनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, गोवा येथे दि. 10 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता पोस्टल पेन्शन अदालत पोस्टमास्टर जनरल गोवा प्रदेश, पणजी येथे आयोजित केली आहे. गोवा पोस्टल क्षेत्रांध्ये महाराष्ट्र राज्यातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांच्या सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. 3 महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही आशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निति प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी प्रपत्रामध्ये आपले अर्ज महेश एन, लेखा अधिकारी सचिव, पेन्शन अदालत, क्षेत्रीय कार्यालय पणजी गोवा 403001 या पत्यावर दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकतात. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही. ०००००००

सिंधुदुर्गनगरी येथे 26 डिसेंबरला डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): पोष्टाच्या कार्यपध्दीतीविषी व कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचे निवारण 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयामध्ये डाक अदालत घेतली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधिक्षक मयुरेश कोले यांनी दिली आहे. यावेळी टपाल, स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असवा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा ईत्यादी. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार मयुरेश कोले, अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी 416812 यांच्या नावे दि. 22 डिसेंबर 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. 0000

जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): जल जीवन मिशन अंतर्गत प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धाकरीता रक्कम रुपये 2 लक्ष 25 हजारची बक्षिस जाहिर करण्यात आली आहेत. या स्पर्धामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हा स्तरीत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी प्राथमिक स्तरावर इयत्ता 1 ते 7 वी माध्यमिक स्तरावर इयत्ता 8 ते 10 वी या वर्गातील विद्यार्थीयांना सहभागी होता येणार असुन, दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा 1500 इतकी असेल व निबंध लेखन स्पर्धेकरीता वेळ 40 मिनिटांची असणार आहे. निबंध स्पर्धेकरीता दोन्ही गटा करीता, पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, ...

ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य जनजागृती मोहिमेच्या मोबाइल व्हॅनचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनव्दारे ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते या मोबाईल व्हॅनच्या उद्घाटनाने झाली. या जनजागृती मोहिमेत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत मतदारांना संपूर्ण माहिती देण्यात येणार असून ही माहिती देण्यासाठी कर्मचारी वर्ग देखील नियुक्त करण्यात आलेला आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्ययाबाबत जनजागृती मोहिम .29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी / मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात EVM प्रात्यक्षिक केंद्र (EDC) स्थापन करण्याबाबत देखील भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी तथा उ...

मेरा युवा भारत पोर्टल वर नावनोंदणी करा

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): युवा कार्यक्रम व क्रीडा विभाग, भारत सरकार नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग या व्दारा संपूर्ण राज्यभर युवक युवतींचे मेरा युवा भारत पोर्टलवर ऑनलाईन (nyks) या पर्यायाला निवड करुन जिल्ह्यामधील 15 ते 29 वयोगटातील युवक, युवतींची नोंद करुन घ्यावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी केले आहे. देशातील तरुणांना मंत्रालये, सरकारी आणि खाजगी संस्था आणि शैक्षणिक संस्थांशी जोडते ज्यांचा उद्देश तरुणांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभगी होण्यासाठी, प्रायोगीक शैक्षणाव्दारे व्यावसायिक अनुभव प्राप्त करण्यासाठी आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रम, जॉब वर्क इतर उपक्रम विषयी नवीन कौशल्य आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. युवा म्हणून नोंदणी करा आणि स्व विकासाच्या आणि राष्ट्र वाढीमध्ये सहभाग नोंदवा. तसेच महाविद्यालयात शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकत असणारे युवा- युवतींना माय भारत पोर्टलला www.mybharat.gov.in या वेबसाईट वरुन ऑनलाईन नोंदणी रजिस्ट्रेशन करीता प्रव्वृत करावे. जिल...

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकाच्या योजनांसाठी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयास संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग (समाज कल्याण विभागाकडून) इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र झाल्याने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेसंदर्भातील पत्रव्यवहार सहाय्यक संचालक, इतर मागस बहुजन कल्याण सिंधुदुर्ग कार्यालयाच्या नावे करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्गाचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासननिर्णयानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (समाज कल्याण विभागाकडून) विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गांशी संबंधित पुढील विषय इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. मराठा आरक्षण,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण,राज्य मागासवर्ग आयोग,इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे सूचीमध्ये एखादी जात समाविष्ट करणे.सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,इतर मागास वर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाच्या...

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना 2023 ही योजना दोन टप्यात लागु केलेली आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्तऐवजांकरीता शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी प्राची घोलप यांनी केले आहे. दिनांक 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या दरम्यान निष्पादीत केलेले संलेख असल्यास योजनेच्या पहिल्या टप्यात 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कमेस माफी देण्यात आलेली आहे. मुद्रांक शुल्क 1 लाख रूपयांपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात 50 टक्के व दंडाच्या रक्कमेस संपूर्ण सुट देण्यात आली आहे. या कालावधीतील निष्पादीत दस्तऐवजांना योजनेच्या दुसऱ्या टप्यात 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये 80...

बेस्ट टुरिझम विल्हेज व बेस्ट रुरल होमस्टे स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी, दि.19 (जि.मा.का): भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ग्रामीण पर्यटन स्पर्धांची दुसरी आवृत्ती जाहीर केली आहे: सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा 2024. पर्यटन उद्योगाचा शाश्वत विकास हे ध्येय ठेवून देशातील सर्वोत्तम ग्रामीण पद्धतींना चालना देणे आणि प्रोत्साहन देणे हे या स्पर्धांचे उद्दिष्ट आहे. दोन्ही स्पर्धांसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण किनारपट्टीवरील आश्रयस्थान, त्याच्या मूळ समुद्रकिनारे, हिरवेगार निसर्गचित्रे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासारख्या ऐतिहासिक चमत्कारांनी मोहित करतो. प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य, उबदार स्थानिक आदरातिथ्य आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा, हे एक अद्वितीय गंतव्यस्थान बनवते. पर्यटन मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण होमस्टे स्पर्धा सुरू केल्यामुळे जिल्हाधिकारी दोन्ही स्पर्धांसाठी जास्तीत जास्त नामांकने आमंत्रित करत आहेत. या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे थोडक्यात निकष पुढीललप्रमाणे आहेत. सर्वोत्तम ग्रामीण होमस्टेसाठी प...

मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवडा

सिंधुदुर्गनगरी, : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती योजना गतिमानता पंधरवडा दि.18 ते 30 डिसेंबर पर्यत घोषित केला आहे. त्यानिमित्ताने जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जास्तीत जास्त प्रस्ताव या माध्यामातून गोळा करणे आणि ते ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे पोर्टलवर भरणे, माहिती देणे, प्रचार करणे इ. करण्यात येणार आहे. या मोहिमेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज हे निःशुल्क भरून दिले जातील. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात बॅनर व आणि ऑडियोच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या योजनेमधून जास्तीत जास्त लाभाथ्यांचे अर्ज प्रस्ताव त्यांच्या कागदपत्रासहित स्वीकारून त्यांची तात्काळ छाननी होणार असून बँकेकडे अशी प्रकरणे लवकरात लवकर आणि प्राधान्याने मंजूर करून घेण्याचा प्रयत्न जिल्हा उद्योग केंद्र, करणार आहे. यामध्ये बँकेकडून उपयोगिता प्रमाणपत्रे जमा करणे, बैंकेत रखडलेली मुख्यमंत...

जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थींचे लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांअंतर्गत 30 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात आलेले होते. या कालावधीतील कामगिरी प्रभावी होती. परंतु अभियान...

नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल, परिचालण प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.): मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षण दि. 1 जानेवारी 2024 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मालवण येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील मच्छीमार युवकांकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन मत्सयव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के.सुर्वे यांनी केले आहे. प्रशिक्षण तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी, दि 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024. आवश्यक पात्रता, उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे ) किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ) क्रियाशील मच्छिमार असावा. (विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षण शुल्क:- सहा महिन्याचे रु.2700 मात्र एवढे असेल, दारिद...

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहार पुरविण्यासाठी ऑनलाईन निविदा 26 डिसेंबरपर्यंत भरावी

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का):सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प-सावंतवाडी येथील 3 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार (HCM) अंगणवाडी निहाय पुरविण्यासाठी अनुभवी दर्जाधारक उत्पादक, अधिकृत पुरवठाधारकाडून ऑनलाईन पध्दतीने निविदा मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) ममता देसाई यांनी दिली आहे. सविस्तर निविदा विषय माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पहावयास उपलब्ध आहे. निविदा भरण्याची कार्यवाही ऑनलाईन असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 26 डिसेंबर 2023 रोजी 16 वाजेपर्यंत सादर करावेत. ०००००

महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत 16 नवसंशोधकांनी संकल्पनाचे सादरीकरण

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): नवसंशोधकांना आपल्या नविन्यपूर्ण संकल्पनाना मूर्तिमंत स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामार्फत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत 16 नवसंशोधकांनी आपल्या संकल्पनाचे सादरीकरण केले आहे. नवसंशोधकांना आपल्या नाविन्य पूर्ण संकल्पनांना मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत दि. 13 डिसेंबर रोजी 11 वाजता मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत नवले, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मयुरी ...

आंबा फळमाशी नियंत्रणासाठी सिंधुरत्न योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): जिल्ह्यात आंबा पिकावरील फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन आंबा फळमाशीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी सिंधुरत्न समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमधुन फळमाशीचे एकाचवेळी सामुहिक नियंत्रण करण्याकरीता आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत रक्षक सापळे 4 नग प्रति हेक्टर व 4 ल्युर्स प्रति हेक्टर याप्रमाणे 75 टक्के अनुदान तत्वावर पुरवठा करण्यात येणार आहे. तरी योजनेचा सामुहिक स्वरुपात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. फळमाशीचे एकाच वेळी सामुहिकरित्या नियंत्रण करुन प्रादुर्भाव कमी करता येईल व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. या योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया तालुका कृषि अधिकारी यांच्यास्तरावर होणार असून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज करावेत व अर्जासोबत आंबा पिकाची नोंद असलेला 7/12 जोडावा. सिंधुदुर्ग जिल्हा हापुस आंब्यासाठी जगप्रसिध्द असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकाखाली ए...

आंबा फळमाशी नियंत्रणासाठी सिंधुरत्न योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, जिल्ह्यात आंबा पिकावरील फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन आंबा फळमाशीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी सिंधुरत्न समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमधुन फळमाशीचे एकाचवेळी सामुहिक नियंत्रण करण्याकरीता आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत रक्षक सापळे 4 नग प्रति हेक्टर व 4 ल्युर्स प्रति हेक्टर याप्रमाणे 75 टक्के अनुदान तत्वावर पुरवठा करण्यात येणार आहे. तरी योजनेचा सामुहिक स्वरुपात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. फळमाशीचे एकाच वेळी सामुहिकरित्या नियंत्रण करुन प्रादुर्भाव कमी करता येईल व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. या योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया तालुका कृषि अधिकारी यांच्यास्तरावर होणार असून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज करावेत व अर्जासोबत आंबा पिकाची नोंद असलेला 7/12 जोडावा. सिंधुदुर्ग जिल्हा हापुस आंब्यासाठी जगप्रसिध्द असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकाखाली एकुण 34250 हेक्टर ...

महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत 16 नवसंशोधकांनी संकल्पनाचे सादरीकरण

सिंधुदुर्गनगरी: नवसंशोधकांना आपल्या नविन्यपूर्ण संकल्पनाना मूर्तिमंत स्वरुप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांच्यामार्फत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेंज स्पर्धेत 16 नवसंशोधकांनी आपल्या संकल्पनाचे सादरीकरण केले आहे. नवसंशोधकांना आपल्या नाविन्य पूर्ण संकल्पनांना मूर्तिमंत स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांच्यामार्फत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इनोवेशन चॅलेज स्पर्धेचे जिल्हास्तरीय सादरीकरण जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत दि. 13 डिसेंबर रोजी 11 वाजता मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅड मॅनेजमेंट कॉलेज, सुकळवाड येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत नवले, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मयुरी परब, यंग प्रोफेशनल ...

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहार पुरविण्यासाठी ऑनलाईन निविदा 26 डिसेंबरपर्यंत भरावी

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का):सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प-सावंतवाडी येथील 3 ते 6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार (HCM) अंगणवाडी निहाय पुरविण्यासाठी अनुभवी दर्जाधारक उत्पादक, अधिकृत पुरवठाधारकाडून ऑनलाईन पध्दतीने निविदा मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (वर्ग-2) ममता देसाई यांनी दिली आहे. सविस्तर निविदा विषय माहिती https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर पहावयास उपलब्ध आहे. निविदा भरण्याची कार्यवाही ऑनलाईन असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. 26 डिसेंबर 2023 रोजी 16 वाजेपर्यंत सादर करावेत. ०००००

जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थींचे लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यासाठी दि. 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांअंतर्गत 30 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात आलेले होते. या कालावधीतील कामगिरी प्रभावी होती. परंतु अभिया...

नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल, परिचालण प्रशिक्षणासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी, : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलण प्रशिक्षण दि. 1 जानेवारी 2024 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मालवण येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील मच्छीमार युवकांकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन मत्सयव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी प्र.के.सुर्वे यांनी केले आहे. प्रशिक्षण तपशिल पुढीलप्रमाणे- प्रशिक्षण कालावधी, दि 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024. आवश्यक पात्रता, उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे ) किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. ( शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे ) क्रियाशील मच्छिमार असावा. (विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षण शुल्क:- सहा महिन्याचे रु.2700 मात्र एवढे असेल, दारिद्रय रेषेखालील अस...

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ शनिवार दि.19 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबार्डे आणि बिबवणे, सावंतवाडी तालुक्यातील नाणोस आणि तिरोडा, कणकवली तालुक्यातील शिरवल आणि हळवल तर देवगड तालुक्यातील पोयरे आणि मणगे, दोडामार्ग तालुक्यातील सासोली आणि मणेरी या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. ००००००

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ शनिवार दि.19 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबार्डे आणि बिबवणे, सावंतवाडी तालुक्यातील नाणोस आणि तिरोडा, कणकवली तालुक्यातील शिरवल आणि हळवल तर देवगड तालुक्यातील पोयरे आणि मणगे, दोडामार्ग तालुक्यातील सासोली आणि मणेरी या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. ००००००

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.15(जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ शनिवार दि.16 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव आणि नानेली, सावंतवाडी तालुक्यातील सातोसे आणि कवठणी, कणकवली तालुक्यातील नाटळ आणि दिगवळे तर देवगड तालुक्यातील किंजवडे आणि आरे, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल आणि कूडासे या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. ००००००

जिल्ह्यात 28 डिंसेबरपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का): जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन आक्रमक होत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी राज्यात सण/ उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात वैयक्तीक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते अशावेळी आंदोलकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा -केंद्रीय सह सचिव संकेत भोंडवे

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष योजना लाभार्थी पर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व आयटी विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे, जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी तसेच तहसिलदार, गट विकास अधिकारी, व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर दूरदृश्यप्रणालीव्दारे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्याचा विकसित भारत संकल्प यात्रा मध्य...

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.13(जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ गुरुवार दि.14 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील वसोली आणि शिवापूर, सावंतवाडी तालुक्यातील दांडेली आणि आरोस, कणकवली तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर तर देवगड तालुक्यातील सांडवे आणि कुवळे, दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी आणि झोळंबे या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. ००००००

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 18 डिसेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का): डिसेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि.18 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दु. 1 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्कांचे व्यासपीठ मिळावे, त्यांचे तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी / तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत दालन क्र. 106,ए-ब्लॉक, मळमजला सिंधुदुर्गनगरी ओरोस येथून उपलब्ध करुन घ्यावेत. अर्ज विहीत नमुन्यात असावा. त...

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ बुधवार दि.13 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. कुडाळ तालुक्यातील पुळास आणि नेरुर कर्यात नारुर, सावंतवाडी तालुक्यातील कास आणि पाडलोस, कणकवली तालुक्यातील हरकुळ ब्रुदूक आणि नागवे तर देवगड तालुक्यातील साळशी आणि चाफेड या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. ००००००

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.): जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेंदवारांसाठी जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in या लिंकवर जाऊन दि. 20 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी 46 व्या जागतिक स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून देशातील 10000 उमेदवार समाविष्ट झाले होते आणि या स्पर्धा 15 देशांत 12 आठवडयासाठी आयोजित करण्यांत आली होती. यावर्षीची जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे. जागतिक कौशल्य विकास स्पर्धा 2024 आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill...

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ब्रँडिगसाठी 'सिंधुदुर्ग 23' स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.): सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन स्थळांनी नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळावी या उद्देशाने पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन 2.0 उपक्रमांतर्गत 'महाराष्ट्र राज्य पर्यटन प्रतिमा सिंधुदुर्ग 23’ या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेमध्ये टॅगलाईन स्पर्धा आणि लोगो स्पर्धेचा समावेश असून ही स्पर्धा 12 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 या कालावधी दरम्यान होणार आहे. विजेत्यांना प्रशस्तीपत्राव्दारे सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी visitsindhudurgnow@gmail.com या ईमेल वर प्रवेशिका पाठवाव्यात तसेच अधिक माहितीसाठी 02362- 228847 या क्रमांकावर संपर्क करावा. थोडक्यात स्पर्धांचे वर्णन- o टेकड्यांपासून समुद्रकिनाऱ्यांपर्यंतच्या जॉय ऑफ जर्नीच्या या अनुभवांना व्यापून, सिंधुदुर्गचे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारा योग्य लोगो आणि टॅगलाइन विकसित करण्याचा या स्पर्धेचा हेतू आहे. o सिंधुदुर्गातील कोकणी लोक तसेच येणारे पर्यटक यांचेसाठी त्याचप्रमाणे पर्यटनामध्ये स्वारस्य असलेले लोक यांना सिंधुदुर्ग सर्वात ल...

कुणबी नोंदीच्या तपासणीसाठी गठीत न्यायमूर्ती शिंदे समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.): मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी नियुक्त समितीची बैठक समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्र आढावा घेण्यात आला. सिंधुदुर्गातील पत्रकार भवनात पार पडलेल्या या आढावा बैठकीत सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार, सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरी पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, समितीचे उपसचिव विजय पवार, यांचेसह दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष,अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आदि उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संपूर्ण विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये जिल्ह्यात तपासण्यात आलेली कागदपत्रे...

'विकसित भारत संकल्प यात्रा' योजनांची माहिती देणारा चित्ररथ असणार येथे

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.): विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. हा चित्ररथ मंगळवार दि.12 डिसेंबर 2023 रोजी पुढील गावांत योजनांची माहिती देण्यासाठी फिरणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील निगुडे आणि मडुरा, देवगड तालुक्यातील शिरगांव आणि हडपीड, कणकवली तालुक्यातील साकेडी आणि करंजे तर कुडाळ तालुक्यातील गोठोस आणि नारुर या गावांत योजनांची प्रसिध्दी करणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

मालवण तालुक्यातील मालवण राजकोट, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला क्षेत्रात तात्पुरते रेड झोन जाहीर

सिंधुदुर्गनगरी दि.3 (जि.मा.का.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष सुरक्षा व्यवस्था असून यांच्या भेटी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करीता सिंधुदुर्ग जिल्हयात मौजे राजकोट, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला ता. मालवण या ठिकाणी भेट देणार असल्याने या तिन्ही कार्यक्रमाचे ठिकाणी Drone Rules 2021 मधील Rule 22 अन्वये पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना प्राप्त अधिकारानुसार वरील नमुद ठिकाणी (Temporary Red Zone) No Fly Zone जाहीर केलेली आहेत अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाचे वेळी फोटोग्राफीसाठी कार्याक्रमाचे आयोजक व सहभागी यांच्याकडून ड्रोन उडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या कार्यक्रमाचे ठिकाण किंवा इतर कोणतेही संवेदनशील ठिकाण हे Drone Rules 2021 मधील Rule 22 अन्वये 48 तासाकरीता तात्पुरते रेड झोन ( Temporary Red Zone) No Fly Zone म्हणून घोषित करता येवू शकते असे नमुद करण्यात आलेले आहे. खालीलप्रमाणे नमुद ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या दौरा कालावधीमध्ये दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 ते दि. 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 व...

नौसेनेचा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

सिंधुदुर्गनगरी दि.2 (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मंत्री महोदय, अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे. दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमाचे प्रात्याक्षिके 4 वाजलेपासून सुरु होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत प्रवेश सुरु राहणार आहे. नागरिकांना कार्यक्रम बघण्याची व्यवस्था तारकर्ली व्यासपिठाच्या दक्षिणकडे तारकर्ली बीच देवबागकडे आणि उत्तरेकडे दांडी बीचकडे केली आहे. नागरिकांना वाहन पाकींगकरीता दांडी बीच ते मोरयाचा धोंडा, काळेथर मैदान व ग्रामपंचायत तारकर्लीच्या बाजूला सोय करण्यात आलेली आहे. कार्यक्रम सर्वाना पाहता यावा यासाठी कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यासाठी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते, नौदल दिन कार्यक्रम व नौसेना विभागाची प्रात्याक्षिके पाहण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच...

नौसेना दिनानिमित्त वाहतुक व्यवस्थेत बदल

सिंधुदुर्गनगरी दि.3 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व तारकर्ली येथे भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मंत्री महोदय, अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मालवण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे. वाहतूक व्यवस्थेत बदल मालवण दांडी परीसरात राहणा-या लोकांकरीता व वाहनांकरिता तारकर्ली नाका ते देऊळवाडा या मार्गाने न येता शिवाजी पुतळा, तानाजी नाका ते शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा. वायरी व वायरी भूतनाथ येथे राहणा-या लोकांकरीता व वाहनांकरीता वायरी नाका, तारकर्ली नाका, देऊळवाडा असे न येता रेकोबा हायस्कुल ते शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा. तारकर्ली गावातील लोकांकरिता व वाहनांकरिता तारकर्ली, तानाजी नाका, देऊळवाडा या मार्गाचा वापर न करता काळेथर, देवली ते कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा. देवबाग परिसरातील लोकांकरिता व वाहनांक...

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि 30 (जिमाका) - मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल तसेच नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि राजकोट किल्ल्याच्या कामाची पाहणी केली. तसेच टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड येथील हेलिपॅडची देखील पाहणी करून काही मौलिक सूचना केल्यात. ०००००

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शुक्रवार दि. 1 व 2 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा), गोवा येथे आगमन व केसरी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, येथे आगमन व भारतीय नौसेना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात आढावा. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गगरी. सायं. 5.30 वाजता सिंधुदुर्ग येथून केसरी ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 6.30 वाजता केसरी येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता केसरी ता. सावंतवाडी येथून मनोहर विमानतळ, मोपा (गोवा) कडे प्रयाण. 000000

आरोग्य सुविधा अधिक बळकट करा -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी दि 29 (जिमाका) : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणे अवश्यक आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरा, तसेच अद्यावत पॅथालॉजी लॅब तयार करुन गरजूंना अवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालय येथे आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अधिष्ठाता डॉ. सुनीता रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ श्याम पाटील, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. औषधसाठा पुरेसा ठेवावा, सुविधांबाबत नियमित आढावा घेण्यात यावा, पदभरती कंत्राटी पध्दतीने करा, एनएचआरएम मधून औषध खरेदी करा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नाव पत्त्यासह यादी तयार करा ते कुठे जेवतात त्यांना येणारा खर्च याबाबत माहिती घ्या अशाही सुचना त...
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने 4 डिसेंबर रोजी राजकोट, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या निमित्ताने या सोहळ्याची माहिती देणारी माहिती पुस्तिका सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात करण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेचे आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी खासदार निलेश राणे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी यासंदर्भातील समन्वय पुस्तिका, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्वांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. या माहिती पुस्तिकेत किल्ले राजकोट आराखडा, नौदल दिन सोहळा, कार्यक्रम प्रसिध्दी, नियंत्रण कक्ष व्यवस्थापन, तारकर्ली येथील कार्यक्रम स्थळाचा नकाशा, सोहळ्याचे संपूर्ण सनियंत्रण, हेलीपॅड व अनुषंगिक व्...

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत दि. 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष नोंदणी अभियान (पंजीकरण अभियान) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. माता व बालकांच्या आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, मातामृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु केले आहे. योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राअंतर्गत 30 नोव्हेबर ते...

कट्टा, चौके, मालवण नगरपरिषद येथील आठवडा बाजार बंद

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान यांच्या संभाव्य दौऱ्याचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने व वाहतुकीचे योग्य विनियमन करण्यासाठी मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, मालवण नगरपरिषद याठिकाणाचे आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. मालवण येथील राजकोट व तारकर्ली येथे दि. 4 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदल विभागामार्फत नौदल दिन 2023 या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व नौदल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यमास पंतप्रधान महोदयांसह इतर अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने VVIP यांचे वाहन ताफे मौजे देऊळवाडा- बोडींग ग्राउंड- राजकोट – तारकर्ली MTDC मालवण शहरातून जाणार आहेत. तसेच VIP यांचे वाहन ताफे कसाल मालवण असे मालवण शहरातून जाणार आहेत. यावेळी आवठवडा बाजार भरला तर मोठ्या प्रमाणावर वाहनाची गर्दी होऊन VVIP यांचे वाहन ताफ्याला अडथळा निमार्ण होऊ शकतो. त्यादृष्टीने पोलीस अधीक्षक यांनी पंतप्रधान भारत सरकार यांच्या संभाव्य दौऱ्याच...

सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिन आढावा बैठक

सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे ही माझ्यासह तमाम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. हा सोहळा काही दिवसांवर आला असल्याने सर्व यंत्रणांनी उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा व नौसेना दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नौदलाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम आणखी गतीने करावे, तसेच तारकर्ली येथील एमटीडीसी परिसरातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत, कार्यक्रमाच्या ठि...

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका) : मालवण किनारपट्टीवरील मोरयाचा धोंडा येथील किल्ले सिंधुदुर्गच्या पायभरणी सोहळ्याचा वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. पालकमंत्री यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा करण्यात आली. याचबरोबर किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरातील दररोज होणाऱ्या पुजेसाठी शासकीय यंत्रणांकडून आवश्यक ते सहकार्यही उभे केले जातील असे पालकमंत्री यांनी जाहीर केले. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला भुमिपूजन वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते. श्री चव्हाण पुढे म्हणाले, 350 वर्षा पासून महाराजांचा इतिहास जपण्याचे काम गावातील सर्व मंडळींनी केले आहे. त्याच धर्तीवर राम राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेऊन देश महासत्तेच्या दिशेने नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रामराज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आप...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वंचित घटकाने लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्गनगरी, दि.24(जिमाका) : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार आहे. या संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वंचित घटकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करते प्रसंगी केले. विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमातंर्गत तळागळातील जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत ओरोस येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपूरे, किशोर काळे, आरोस ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती आशा मुरमुरे, उपसरपंच श्री घाडीगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते. संकल्प यात्रेच्या चित्ररथात मोठया स्क्रीनवर लोकांशी निगडीत योजनांची माहिती द...

परीक्षेच्या अनुषंगाने 24 रोजी मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): जिल्ह्यातील SSPM Collegs Of Engineering, Harkul Budruk Nardave Road Tal Kanakavali Dist Sindhudurg या परीक्षा केंद्रावर दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षेचे आयोजन करणेत आलेले असून परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी SSPM Collegs Of Engineering, Harkul Budruk Nardave Road Tal Knakavali Dist Sindhudurg परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात सकाळी ०७.०० वाजेपासून सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केला आहे. परीक्षा केंद्रावर परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा येईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एस.टी.डी.बुथ, झेरॉक्स, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाध...

धान विक्री 31 जानेवारी पर्यंत करावी

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): हंगाम 2023-24 मधील शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान विक्री दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात यावी. अशी माहिती डी. आर. पाटील जिल्हा मार्केटींग अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील 44 धान खरेदी केंद्रावरती धान खरेदी सुरु आहे. त्याचा तालुका निहाय तपशिल पुढीलप्रमाणे 1) सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कोलगाव, सावंतवाडी, मळगाव, मळेवाड, डेंगवे, तळवडे, भेडशी, इन्सुली, मडुरा 2) कुडाळ तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. कुडाळ, माणगाव, कडावल, घोडगे, कसाल, निवजे, निरुखे, आंब्रड, पिंगुळी, गोठोस, वेताळ बांबार्डे, पणदुर, पाठ, हिर्लोक, केरवडे, तुळस, 3) शेतकरी सह तालुका खरेदी-विक्री संघ लि. कणकवली - कणकवली, सांगवे, घोणसरी, लोरे नं.1, फोंडा 4) वेंगुर्ला तालुका सह. खरेदी विक्री संघ लि.- वेंगुर्ला, होडावडा 5) देवगड तालुका सह खरेदी- विक्री संघ लि. देवगड, पाटगाव, पडेल 6) मालवण तालुका सह खरेदी विक्री संघ लि. पेंडुर, गोठणे 7) वैभववाडी तालुका सह खरेदी विक्री सं...

पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ प्राप्त होण्यासाठी राज्यातील नामांकित उद्योजक/इंडस्ट्रिज समवेत नागपूर येथे दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी राज्यस्तरीय पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन ग.पां.चिंमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सिंधुदुर्ग यांनी केले आहे. राज्यातील उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यामध्ये आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जिल्हयातील नोकरी साधक (Job Seeker) उमेदवारांनी वरील पोर्टलवर अधिसूचित रिक्त पदांसाठी आपल्या स्वतःच्या लॉगीन आयडीने शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी ऑनलाईन अर्ज करावे, किंवा दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५ ईमेल आयडी :- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क सा...

सखी निवास कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): सिंधुदुर्ग जिल्ह्यात सखी निवास योजना राबविण्यास इच्छुक संस्था/एजन्सी यांनी विहित वेळेत प्रस्ताव सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष अथवा कार्यालयाच्या ०२३६२-२२८८६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीच्या पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता मिशन शक्ती अंतर्गत सखी निवास या योजनेचा समावेश आहे. राज्यात सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नवीन ५० सखी निवास आहेत. भाडे तत्वावरील इमारती मध्ये प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन याकरिता अनुदानासह कार्यान्वित करावयाची आहेत. महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून ०३.०६.२०२३ रोजी सर्व जिल्ह्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रांत प्रसिध्द जाहिरातीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १ सखी निवास कार्यान्वित करायचे आहे. जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना न...

एन.एम.एम.एस व दिव्यांग शिष्यवृत्तीसाठी नोडल अधिकाऱ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून देण्यात येणारी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृती करीता बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल वर दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असून राज्यात दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ अखेर एन. एम. एम. एस साठी मागील परीक्षेत शिष्यवृत्तीधारक घोषित झालेल्या १९.६८२ पैकी ६.३३५ नवीन अर्ज तर नूतनीकरणाचे ३५,०४१ पैकी १६,०५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. तर दिव्यांग मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे २४२ नवीन व नूतनीकरणाचे २३६ पैकी ६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे विद्यार्थी, ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत त्या शाळेचे शाळा प्रमुख (एच.ओ.आय), नोडल अधिकारी (आय.एन.ओ), जिल्हा शिक्षणाधिकारी (डी.एन.ओ) आणि राज्य नोडल अधिकारी (एस.एन.ओ) यांचे या शिष्यवृत्ती योजनांकरीता चालू वर्षी पहिल्यांदाच बायोमॅ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी जमीन हस्तांतरीत

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का): मालवण येथे 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या अनुषंगाने मालवण येथील स.न. 199/2 क्षेत्र 0.33.60 हे. आर ही शासकीय जमीन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांना हस्तांतरीत करण्यात येत आहे. भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने व कब्जाहक्काने पुढील अटीं व शर्तींच्या अधीन राहून हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. 1.जमीन कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली जि.सिंधुदुर्ग हे भोगवटादार वर्ग २- म्हणून धारण करतील. 2. सदर जमिनींचा ताबा आहे त्या स्थितीत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली जि.सिंधुदुर्ग यांना देण्यात यावा. 3. मंजूर करावयाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमणे असल्यास ती निष्कासित करण्याची अथवा त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली जि. सिंधुदुर्ग यांची राहील. तसेच, मंजूर केलेल्या जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ...