अंगणवाडी मदतनीस पदासाठी 11 जुलै पर्यंत अर्ज सादर करा -बाल विकास प्रकल्प अधिकारी तारका साटम

सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : दोडामार्ग तालुका अंतर्गत तळेखोल, तळकट, कोनाळ अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवाराकडून दि. 11 जुलै 2023 रोजी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी तारका बाळाजी साटम यांनी दिली. सदर दिनांक 27 जून ते 11 जुलै 2023 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत (सार्वजनिक सूट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय दोडामार्ग दूरध्वनी क्र.02363-256506,9421029556 येथे संपर्क करावा. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'