पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन - पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी दि.20 (जि.मा.का):- जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धकाधकीच्या जिवनातून आपल्या आरोग्याकडे वेळच्या वेळी लक्ष देणे शक्य होत नसते. त्यातुनच त्यांना मधुमेह, रक्तदाब, यासारखे आजार बळकावत असतात. पोलीस अधिकारी व अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी पोलीस विभागाकडून वेळच्या वेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आज 20 जून 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 01 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील येथील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. रामचंद्र नागरगोजे, डॉ. प्रतिक कुमार, डॉ. किरण केशेवार डॉ. तुष्वर सोलंकी, डॉ. काजल वाघ, डॉ. संकेत ठाकरे, व वैद्यकीय महाविद्यालयातील स्टाफ यांनी 172 पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांची मधुमेह, रक्तदाब तसेच अन्य आजारांची तपासणी केली. पोलीस अधिकारी व अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी यांचे वजन व उंचीचे आधारे तसेच त्यांना असलेल्या आजारावर त्यांनी घ्यावयाची काळजी, तसेच बॉडी इंडक्स कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शिबिरामध्ये उपस्थित राहुन आरोग्य तपासणी चांगला प्रतिसाद दिला तसेच सदर आरोग्य शिबीरामध्ये पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, तसेच पोलीस उपअधीक्षक कविता गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, यांनी आरोग्य तपासणी करून घेऊन शिबिरामध्ये सहभाग नोंदविला. यापुढेही पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांचसाठी आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोबत :- फोटो 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'