सिंधुदुर्गनगरी दि. 30 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये शहिद जवान,त्यांच्या विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक कुटुंबिय सेवारत सैनिक यांच्या प्रलंबित कामांचा निपटारा जलद होण्यासाठी संपूर्ण राज्यात माहे मे २०२२ ते १५ जून २०२२ या कालावधीत "अमृत जवान अभियान-२०२२" राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. विविध विभागांमध्ये माजी सैनिक, शहिद जवान व सेवारत सैनिकांची अनेक कामे असतात. महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी,विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड संबंधित कामे, पोलीस विभागाकडे विविध तक्रारी/ समस्या, समाजकंटकांकडून होत असलेल्या त्रासाबाबतच्या समस्या, कृषी विभागाकडील लाभ घेण्याबाबतचे प्रस्ताव, फौजदारी स्वरुपाचे वाद, शहिद जवा व सेवारत सैनिकांचे प्रश्न, परिवहन विभागगकडील परवाने, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे इत्यादी, तसेच अनेक कामे प्राधान्यने मार्गी लावणेकामी या अभियानामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ला...