Posts

Showing posts from April, 2025

विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी दिनांक 24 (जिमाका) :- जिल्ह्यामधील महाविद्यालयात इ. ११ वी व १२ वी तसेच त्यानंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जाती व नबबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर जुन्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. या योजनेची व्याप्ती जिल्हा व तालुका स्तरापर्यत वाढविण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणित नुकसान होवू नये म्हणुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 30 एप्रिल 2025 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,सिंधुदुर्ग (02362 228882) या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. ०००००

पहेलगाम, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी 'जिल्हा आपत्ती व्यवस्थापन'च्या कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) :- पहेलगाम, जम्मू व काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ल्यामुळे विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 02362228847 किंवा मोबाईल क्रमांक 7498067835 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. पर्यटकांच्या मदतीसाठी जिल्हा मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, श्रीनगर येथे पर्यटकांसाठी (24X7) हेल्प डेस्क/ आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अ) संपर्क क्रमांक : 0194-2483651/ 0194-2457543, ब) WhatsApp Nos. : 7780805144/ 7780938397 ०००००

ग्रामीण भागात आधार कॅम्पचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) :- ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या आधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी सिंधुदुर्ग टपाल खात्याने ग्रामीण भागात आधार कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे. सिंधुदुर्ग टपाल विभागाने तालुका निहाय कॅम्पचे आयोजन पुढीलप्रमाणे, गावाचे नाव तालुका कॅम्पची तारीख मळगाव सावंतवाडी 23 एप्रिल 2025 कलमठ कणकवली 23 एप्रिल 2025 आंबेरी मालवण 25 एप्रिल 2025 इळये देवगड 25 एप्रिल 2025 आजगाव सावंतवाडी 29 एप्रिल 2025 घोणसरी कणकवली 29 एप्रिल 2025 केरवडे (भोयाचे ) कुडाळ 30 एप्रिल 2025 वैभववाडी वैभववाडी 30 एप्रिल 2025 ०००००

फळपिकविमा रब्बी हंगामसाठी ई पीक नोंदणी पुर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील सहभागी झालेले फळपिक विमाधारक बंधु-भगिनींनी शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजनेमध्ये रब्बी हंगाम 2025 साठी दिलेल्या दि. 25 एप्रिल 2025 रोजी अखेरपर्यंत ई पीक पहाणी नोंदणी पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. ई- पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन आपल्या 7/12 वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसुल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15ऑगस्ट 21 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. ००००

हृदय आणि फुफ्फुसाचे पुनरुज्जीवन (सीपीआर) एक आवश्यक जीवनरक्षक कौशल्य जिल्हा शल्यचिकित्सक -डॉ. श्रीपाद पाटील

सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) :- संपूर्ण देशामध्ये सीपीआर प्रशिक्षण हि काळाची गरज आहे व सीपीआर कसा ‌द्यायचा व कोणाला द्यायचा या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील डॉ. सुबोध इंगळे निवासी वै‌द्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. श्याम पाटील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमित आवळे वैद्‌यकीय अधिकारी रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, डॉ. तुषार चिपळूणकर वैद्‌यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सीपीआर प्रशिक्षण आयोजित केले जात आहे या कामी विभागीय स्तरावरुन प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर डॉ. योगेश साळे उपप्राचार्य डॉ. विनीत फाळके यांनी आरोग्यविषयक अधिकारी कर्मचारी यांना यावेळी मार्गदर्शन केले. यामध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण अंतर्गत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक व RBSK वैद्यकीय अधिकारी याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे तसेच पुढील टप्प्यात तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालय रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. सीपीआर काय आहे हृदय आणि फुफ्...

अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी पोर्टलवर करणे बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाचे कलम ४ अन्वये ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना तसेच इंटरप्रायझेस इ. यांना आवाहन करण्यात येते की, ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करुन खाली नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा वापर करून सदर समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. SHE BOX PORTAL वर अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्याची कार्यपद्धती- https://shebox.wcd.gov.in या वेबसाईट वर जा. private head office registration या tab वर click करा. आवश्यक त्या सर्व माहितीचा अचूक तपशील भरा. submit या tab वर click...

राज्यात रेशन कार्ड तपासणी मोहीम सुरु अपात्र लाभार्थ्यांची नोंदणी होणार रद्द

सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का.) :- राज्यात अपात्र रेशन कार्ड शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत योग्य ते पुरावे सादर न करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. दिनांक ३१ मे पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. या काळात रेशन कार्डधारकांच्या घरी भेट दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे. या विशेष मोहीमेत राज्यातील प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार आहे. रेशन कार्डधारकांना त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांकडून तपासणी नमुना फॉर्म विनामूल्य उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या फॉर्मसह कार्डधारकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. हमीपत्रासह फॉर्म दुकानदारांकडे सादर केल्यानंतर लाभार्थ्यांना त्याची पोच मिळणार आहे. तालुका निहाय शिधापत्रिका पुढील प्रमाणे : कुडाळ -45,591, कणकवली-40,186, सावंतवाडी- 39,170, मालवण 32,254, देवगड-32,146, वेंगुर्ला-23,364, वैभववाडी- 13,485 व दोडामार्ग-12,732 अशी आहे. पुरवठा विभागाकडून होणाऱ्या छाननीत वास्तव्याचा पुरावा आणि योजनेच्या निकषानुसार सर्व कागदपत्रे असलेल्या अर्जाचा गट...

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग सन 2025-‍26 या आर्थीक वर्षात हे महामंडळ राबवीत असलेल्या 50 टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजनेसाठी कर्ज प्रस्तावाबाबत. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग सन 2025-‍26 या आर्थीक वर्षात हे महामंडळ राबवीत असलेल्या 50 टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजना या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याकरीता या महामंडळाच्या योजना अनुसुचित जाती व नवबौद्ध लोकांच्या स्वयंरोजगारासाठी लाभ घेऊ इच्‍छिणाऱ्या अर्जदारांनी यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत अर्ज स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात दाखल करावे. त्रयस्थ तसेच मध्यस्तीमार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अ.क्र. योजनेचे नाव...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात पदभरती

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का.) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह व माजी सैनिक विश्रामगृह यांच्या व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधनवार माजी सैनिक प्रवर्गातुन/ नागरी संवर्गातून खालील अशासकीय पदे भारण्यात येणार असल्याचे सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. अ.क्र पदाचे नाव संवर्ग मानधन दरमहा एकुण पदे सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी 1 सहाय्यक वसतीगृह अधीक्षक (पुरुष) माजी/नागरी संवर्ग रुपये 24,875/- 1 2 पहारेकरी (पुरुष) (निवासी पद) माजी/नागरी संवर्ग रुपये 19,992/- 1 3 माळी (पुरुष) माजी/नागरी संवर्ग रुपये 12,493/- 1 4 स्वयंपाकी (महिला) माजी/नागरी संवर्ग रुपये 13,328/- 3 5 सफाई कामगार माजी/नागरी संवर्ग रुपये 12,493/- 1 माजी सैनिक विश्रामगृह, सावंतवाडी 1 पहारेकरी (पुरुष) (निवासी पद) माजी/नागरी संवर्ग रुपये 19,992/- 1 इच्छुक माजी सैनिक/ माजी सैनिक पत्नी यांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा ओळखपत्र आणि नाग...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) :- राज्यातील इयत्ता 1 ली. ते 12 वीमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतींची काही प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच्या उद्दिष्टीने तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) निलिमा नाईक यांनी दिली आहे. सन 2024-2025 मध्ये मृत्यु झालेल्या 7 विद्यार्थ्यांच्या मातांना प्रत्येकी रक्कम रुपये 1 लाख 50 हजार प्रमाणे रक्कम रूपये 10 लाख 50 हजार व अपघातामुळे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या 4 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष शस्त्रक्रियेच्या खर्चाप्रमाणे रक्कम रूपये 1 लाख 39 हजार 636 अशी एकूण रक्कम रूपये 11 लाख 89 हजार 636 एवढी रक्कम राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 00000

अनधिकृत संस्थाबाबत माहिती द्यावी

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्ष कारावास तसेच रुपये 1.00 लक्ष पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतुद नमुद करण्यात आलेली आहे. आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 या वर संपर्क साधुन बालकांवरील शारिरीक तसेच लैगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी केलेले आहे. ००००००

हरकत आणि सूचना लेखी स्वरुपात कळविण्याबाबत

सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) :- सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग यांच्याकडील पत्रान्वये मौजे वाघेरी नांदगाव रेल्वे स्टेशन नजिक ता. कणकवली येथील मुख्य बाजार आवारास मंजूरी, अधिसूचित करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा दि. 25 जानेवारी 2025 रोजी पार पडली. या बैठकीमधील ठराव क्रमांक 14 अन्वये सर्वानुमते वरील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायत वाघेरी ता. कणकवली यांनी ना-हरकत दाखला दिलेला असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपन शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे कलम 5(2)व कृषी व सहकार विभागाकडील अधिसूचनेनुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्ग यांच्या कार्यक्षेत्रात नियमन करण्यात आलेल्या शेतमालाची खरेदी-विक्रीकरीता बाजार क्षेत्रातील उपरोक्त निर्दिष्ट केलेली क्षेत्र शेतमालाची खरेदी-विक्रीकरीता मुख्य बाजार आवार म्हणून स्थापन करण्याचा इरादा जाहिर करण्या...

"जलव्यवस्थापन कृती पंधरवडा" दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार

सिंधुदुर्गनगरी, दि.16 (जि.मा.का.) :- जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून "जलव्यवस्थापन कृती पंधरवडा" राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लघु पाटबंधारे विभाग, सिंधुदुर्गनगरी येथे " जलव्यवस्थापन कृती पंधरवडा" या उपक्रमाचा शुभारंभ एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आला. यावेळी दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ उपअधीक्षक अभियंता प्रज्ञा पाटील, कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव, कार्यकारी अभियंता श्रीमंगले व मंडळ कार्यालय तसेच विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने जल प्रतिज्ञा घेतली. कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. कार्यकारी अभियंता वि. बा. जाधव यांनी या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी श्री. माणगावकर यांनी आभार प्रदर्शना...

उन्हाळी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यांच्या मार्फत जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटना व शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे, तरी सर्व विद्यार्थी खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. खेळाचा प्रचार व प्रसार होवून फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी 10 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळांचे शिबीरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शरीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. ठिकाण दिनांक खेळ वेळ संपर्क क्रमांक एस.एल देसाई विद्यालय पाट. तालुका –कुडाळ 30 एप्रिल ते 9 मे 2025 कुस्ती सकाळी 8 ते 10 वा. सायं. 4 ते 6 वा. माधरी घराळ मोबा.9867699281 शासकीय जलतरण सिंधुदुर्ग 15 मे ते 15 जून 2025 जलतरण दुपारी 3 ते 4 वा. प्रविण स...

"समता पंधरवडा" निमित्त जेष्ठ नागरिक मेळावा, रक्तदान शिबीरचे कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जात आहे. या निमित्त जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व जेष्ठ नागरिक मेळावा, स्वच्छता अभियान तसेच रक्तदान शिबीराचे कार्यक्रम संपन्न झाले, असल्याची माहिती समाज काल्याण चे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी रक्तदान केले, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे म्हणले. या रक्तदान शिबीरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी एस.एस.पी.एम ब्लड बॅकेंचे वैद्यकीय अधिकारी, नर्स इतर स्टाफ उपस्थित होते. तसेच ओरोस सिध्दार्थ नगर वस्तीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. डॉ. बाबासा...

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 12 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत शनिवार दि. 10 मे 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक यांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र सवरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेणेबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी दि. 10 मे 2025 चे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावययाचे आहे,असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिल यांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्या...

समाज कल्याण कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जात आहे. या निमित्त समाज कल्याण विभागामध्ये क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली, यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कले. प्रमुख वक्ते नागेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नागरिक, विद्यार्थीनी, सर्व कार्यालयातील, समादूत, महामंडळाचे, जात पडताळणी विभगाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

सामाजिक न्याय विभागाच्या समतादुतामार्फत विविध योजनांचा प्रबोधन

सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जात आहे. या निमित्त जिल्ह्यातील सार्वजनिक लोक वस्तीच्या ठिकाणी, ग्रामीण व शहरी भागात समतादूतामार्फत भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे वाचन, पथनाट्य व लघुनाटिकाव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबतचे प्रबोधन, समाज कल्याण विभगातील योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. ०००००

जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य -पालकमंत्री नितेश राणे

• आर्थिक शिस्ती लावणार •अखर्चित निधी राहता कामा नये • गुणवत्तापूर्ण कामांवर भर सिंधुदुर्गनगरी दि ११ (जिमाका):- जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये. जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च व्हावा याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या वि...

जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य -पालकमंत्री नितेश राणे

• आर्थिक शिस्ती लावणार •अखर्चित निधी राहता कामा नये • गुणवत्तापूर्ण कामांवर भर सिंधुदुर्गनगरी दि ११ (जिमाका):- जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये. जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च व्हावा याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या वि...

"जयभीम पदयात्रा" चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि. 14 एप्रिल 2025 रोजी "जयभीम पदयात्रा" चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 एप्रिल 2025 रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावरुन सकाळी 7.30 वाजता "जयभीम पदयात्रे"ला सुरुवात होईल व या पदयात्रेचा शेवट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ होणार आहे. या पदयात्रेत NCC, NSS, scout Guide तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत सर्वांनी मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

आंबा व काजू उत्पादकांची बैठक भौगोलिक मानांकन प्राप्त शेतमालाच्या ब्रॅंडिंगबाबत विशेष प्रयत्न करणार - पणन मंत्री जयकुमार रावल

सिंधुदुर्गनगरी दि ११ (जिमाका) प्रामुख्याने राज्यात उत्पादित भौगोलिक मानांकन प्राप्त काजु व आंब्याकरिता ब्रॅंडिंग व मार्केटिंग करणेकरिता कृषि पणन मंडळामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल. तसेच भेसळ रोखण्याकरिता अन्न व औषध विभागाची मदत देखील घेण्यात येणार आहे. तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त शेतकऱ्यांची संख्या वाढविण्याकरिता कृषि पणन मंडळ व भौगोलिक मानांकन मालकी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांच्या अडीअडचणीच्या अनुषंगाने पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य काजु मंडळाचे संचालक डॉ. परशराम पाटील व रुपेश बेलोसे तसेच माजी आमदार ॲड. अजित गोगटे, डॉ. विवेक भिडे, विलास सावंत, वासुदेव झांट्ये यांचेसह काजु व आंबा उत्पाद...

सामाजिक "समता सप्ताह" निमित्त जेष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जाणार आहे. या समता पंधरवडा निमित्त रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग येथे, जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर व जेष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकाणी या मेळावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ०००००

शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गासाठी सन 2024-25 करीता शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी शासनाकडून 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रीया https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरीष्ठ व व्यावसायिक संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येत की जे विजाभज, विमाप्र, इमाव प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचीत असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण दि. 31 मे 2025 अखेर करावे,विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेणेची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात न...

वाघेरी येथील बाजार समिती इमारतीचे पणन मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन बाजार समितीमुळे होणार शेतकऱ्यांची उन्नती -पणन मंत्री जयकुमार रावल

• आंब्याला युआयडी सील देण्यासाठी प्रयत्न • 'आंबा महोत्सव' कोकणात भरवणार • पात्र लाभार्थ्यांना काजु अनुदान देणार सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका):- राज्याचे शासन हे शेतकऱ्यांना केंद्रबिंदु मानून काम करणारे शासन आहे. शेतकरी मेहनत करतो, कष्ट करुन पिक घेतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक बाजार समिती किंवा उपबाजार समिती उभी करावी असा शासनाचा संकल्प आहे. बाजार समितीच्या माध्यमातून मालाला योग्य भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये बाजार समितीची भूमिका महत्वपूर्ण राहिल असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन पणन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदीं मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिला अनावरण करून पार पडले, यावेळी ते बोलत होते. श्री रावल म्हणाले, प्रत्येक तालुक्यात बाजार समिती किंवा उप बाज...

शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन मुलांच्या आयुष्यामध्ये परीवर्तन घडवणारी इमारत -पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दि 10 (जिमाका):- निरीक्षणगृह व बालगृहामध्ये मुला मुलींना घरासारखे वातावरण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या संस्था मुलांना मायेचा आधार देतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असल्याने ही इमारत अशा मुलांच्या आयष्यामध्ये परीवर्तन घडवून आणणारी एक वास्तू ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस सिंधुदुर्गगरी येथील शासकीय संस्थेची नूतन इमारत जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास आली आहे. या शासकीय नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला व बाल विकास सहआयुक्त राहुल मोरे, महिला व बाल विकास विभागीय उप आयुक्त सुवर्णा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जि...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सप्ताहानिमित्त स्वाधार योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना धनादेश व माहिती पुस्तीकेचे वाटप

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांना धनादेश व माहिती पुस्तीकेचे वाटप समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या हस्ते करण्यात आले. समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृहे, जिल्ह्यातील महाविद्यालये, शाळा येथे भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविकांचे वाचन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शासकीय वसतिगृहे, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी/ विद्यार्थींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होतो. ००००

जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून "समता पंधरवडा" साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत दि. 1 ते 14 एप्रिल या कालावधीत जात प्रमाणपत्र जडताळणीबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेध्ये इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन साळे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे / उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. दरवर्षी विद्यार्थ्यांनी 12 वी मध्ये शिकत असताना 30 नोव्हेंबर पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज सादर करणे आवश्यक असते. समता पंधरवडया निमित्त दि.01 एप्रि...

फळपिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेच्या निकषानुसार ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. परंतू फळपिकांची ई-पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपव्दारे केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. शासन निर्णयामधील तरतुदी नुसार 7/12 उताऱ्यावर ई –पिक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यामार्फत मृग बहार सन 2024 मध्ये संत्रा , मोसंबी, डाळिंब,द्राक्ष (क),चिकू, पेरु, सिताफळ व लिंबू या 8 फळपिकांसाठी 26 जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार स...

सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवध योजनांचा सन 2024-25 मधील 100 टक्के खर्च

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा माहे मार्च 2025 अखेर 100 टक्के खर्च झाला असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शिक्षण शाखेच्या योजनांमधील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेकरीता सन 2024-25 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या 1 हजार 131 पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटीमार्फत रक्कम रू. 259.82 लक्ष इतका निधी, मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क फ्रिशीप योजनेकरीता 270 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 243.14 लक्ष इतका निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेमार्फत 63 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 1.89 लक्ष इतका निधी, व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता योजनेकरीता 99 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 7.54 लक्ष इतका निधी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेमार्फत 14 पात्र लाभार्थ्यांना रक्कम रू. 1.60 लक्ष इतका निधी, सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ...

इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सन 2024-25 मधील 100 टक्के खर्च

सिंधुदुर्गनगरी दिनांक 10 (जिमाका) :- इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा माहे मार्च 2025 अखेर 100 टक्के खर्च करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी दिली आहे. सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43 कामांना प्रशासकीय मान्यता देवून रक्कम रू. 236.00 लक्ष इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे. शिक्षण शाखेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकत असलेल्या विजाभज व विमाप्र मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 826 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू. 16.74 लक्ष इतका निधी तर इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 1 हजार 737 पात्र विद्यार्थ्यांना रक्कम रू.42.25 लक्ष इतका निधी आणि इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकत असणाऱ्या विजाभज / विमाप्र प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्...

"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह कार्यक्रम दि.08 एप्रिल पासून राबविला जात आहे. यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत दि. 08 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक समता सप्ताहचे उद्घाटन करणे, या कालावधीत भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे नियमित वाचन करणे व जनजागृती करणे, दि.09 एप्रिल रोजी जिल्ह्यातील महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांबर आधारीत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन, दि. 10 एप्रिल रोजी समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे विविध योजनाबाबत जनतेचे प्रबोधन करणे, मार्जिन ...

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींच्या सक्षमीकरणाच्या आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) :- मिशन लक्ष्यवेध अंतर्गत राज्यातील खाजगी अकादमींचे सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरीता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी / विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने "मिशन लक्ष्यवेध" या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक...

कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी समीर देशपांडे यांची निवड

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) :- प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य शासनाने विभागीय अधिस्वीकृती समित्या 11 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये गठित केल्या आहेत.कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य श्री. समीर सुधाकर देशपांडे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करुन राज्य अधिस्वीकृती समितीकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.त्यास राज्य समितीने मान्यता दिली असून कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्री. समीर सुधाकर देशपांडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक (मा.) सुनिल सोनटक्के यांनी दिली. कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष श्री. सुखदेव गिरी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे समिती अध्यक्षपदी श्री. समीर देशपांडे यांची समितीचे सदस्य श्री. सुखदेव गिरी, गजानन नाईक, निखील पंडीतराव व प्रताप नाईक यांनी श्री. देशपांडे यांची समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करुन राज्य अधिस्वीकृती समितीकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले होते. श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीस राज...

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत; अँड्रॉइड ॲप विकसीत

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या तथा सूचनांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे लोकाभिमुख उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. सोबत अँड्रॉइड ॲप विकसीत करण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री नितेश राणे व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत केलेले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने "थेट जिल्हा परिषद" "पारदर्शक प्रशासन विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे!" हे Android App Developed केलेली आहे. ॲपव्दारे सामान्य नागरिक आपल्या समस्या, सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला थेट घर बसल्या विचारू शकतात तसेच त्यांचा पाठपुरावा (Trackig) सुध्दा त्याच App मध्ये होणार असल्याने नागरिकांना त्यासाठी जिल्हा परिषदेला भेट द्यायची आवश्यकता भासणार नाही. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अंतर्गत प्रसिध्द करावयाच्या 1 ते...

फोर्टिफाईड तांदळाबाबत जिल्हाभरात जनजागृती

सिंधुदुर्गनगरी, दि.2 (जि.मा.का.) :- जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोर्टिफाईड अर्थात गुणसंवर्धित तांदळाबाबत जनजागृती करण्याचे प्रशिक्षण संपन्न झाले, असल्याची माहिती प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांनी दिली आहे. या सत्रामध्ये पॉवर पॉईंट सादरीकरण व माहितीपटांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदळाची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणावेळी फोर्टिफाईड तांदळाचे फायदे, त्याचे पोषणमूल्य व कुपोषण, ॲनिमिया निवारणासाठी त्याचे महत्त्व यावर माहिती देण्यात आली. फोर्टिफाईड तांदळाबाबत जनतेमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करून जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याच्या हेतूने जनजागृती करण्यात आली. भारत सरकारने फोर्टिफाईड तांदूळ (गुणसंवर्धित तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जनतेला उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या तांदळामध्ये लोह, फोलिक ॲसिड व व्हिटामिन ए, व्हिटामिन बी 12 व इतर जीवनसत्वे असल्याने तो अत्यंत फायदेशीर आहे. मुलांमध्ये पोषक तत्वांची कमतरता आणि महिलांमध्ये अशक्तपणा लक्षात घेऊन शासकीय योजनांच्या माध्यमातून गर...

देवगड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात सुरक्षागृहाची व्यवस्था

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ऑनर किलिंगपासून संरक्षण पुरवून ऑनर किलिंगच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मा. सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंधात्मक, दंडात्मक उपायांच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेशित केलेले आहे. शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार या कार्यालयाच्या अधिनस्त 100 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, देवगड येथील एक खोली सुरक्षागृह म्हणून (Safe House Roome) 'तात्पुरत्या' स्वरूपात देण्यात आलेली आहे. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना ऑनर किलिंगपासून संरक्षण घेण्याची आवश्यकता भासल्यास पोलीस अधिक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग, अथवा महिला व बालविकास कार्यालय सिंधुदुर्ग. या कार्यालयांशी संपर्क साधून, सुरक्षागृहात सुरक्षिततेकरिता राहण्याचा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ०००००

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31 मेपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व इतर शिष्यवृत्ती योजनेसाठी अनु. जाती प्रवर्गासाठी सन 2024-25 करिता शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्याकरिता 31 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे सुरु आहे. सिधुदुर्ग जिल्हयातील सर्व कनिष्ठ / वरिष्ठ व व्यावसायिक संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी आवाहन करण्यात येते की , जे अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्याथ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करुन घ्यावे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची आहे. या योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे.तसेच महावि...

अशासकीय सदस्य पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित अधिनियम 2021 मधील प्रकरण 3 मधील कलम 4 (1) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2018 मधील प्रकरण 2 मधील नियम 3 व 4 च्या अधिनराहून महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय मंडळ सिंधुदुर्ग 2 अशासकीय सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ मधील प्रकरण ३ मधील कलम ४ (१) तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील प्रकरण २ मधील नियम ३ व ४ अन्वये बाल न्याय मंडळ गठीत करण्याची तसेच मंडळाची रचना याबाबतची तरतूद आहे. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ च्या नियम ९१ ला अधीन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय मंडळ, गडचिरोली व नागपूर येथील प्रत्येकी १-१ अशासकीय सदस्य व बाल न्याय मंडळ, पुणे (अतिरिक्त) येथील २ अशासकीय सदस्य असे एकूण ४ पदे वगळून उर्वरित सर्व बाल न्याय मंडळाची जिल्हातील दोन अशास...

बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य पदाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2018 च्या नियम 91 ला अधिन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती अशासकीय 1 अध्यक्ष व 4 सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारानी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 मधील प्रकरण 5 मधील कलम 27 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियम 15 (1) मध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 चा नियम 90 च्या अन्वये गठीत केलेल्या निवड समितीच्या शिफारशीनुसार बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, 2018 च्या नियम 91 ला अधीन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-1 येथील 1 अध्यक्ष व 4 सदस्य पदे तसेच कोल्हापूर येथील 2 सदस्य, धुळे, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यातील प्रत्येकी 1 सदस्य पदे अशी एकून 10 पदे वगळून उर्वरित सर्व जिल्हातील बाल कल्याण समिती अध्यक्ष, ...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुण व्यावी

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी दि. 10 मार्च 2025 पूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अशा प्रशिक्षणार्थी उर्वरित पाच महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक तसेच योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांनी आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे प्र. सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी दिली आहे. योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्याकडे सादर करणे अनिवार्य आहे. ज्या आस्थापना या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण...

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी दिनांक 4 (जिमाका) :- उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 5 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठक. (स्थळ:- शांतादुर्गा मंगल कार्यालय (वाटवे हॉल) मुंबई –गोवा हायवे पावशी कुडाळ जि.सिंधुदुर्ग). दुपारी 4 वाजता कुडाळ येथून मोटारीने राधानगरी जि. कोल्हापूरकडे प्रयाण. ०००००

नेत्रदान करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :- राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत सन 2024-2025 मध्ये 5 व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान केलेले आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तींचा आदर्श घेऊन जनतेने नेत्रदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. नेत्रदान हे दृष्टिहीनांच्या जीवनात दिवा लावण्यासारखे आहे. तुमचे डोळे दान केल्याने इतर कोणाला तुमच्या डोळ्यांव्दारे जग पाहण्याची परवानगी मिळते, जगाचे सौदर्य आणि आश्चर्य वाटून घेता येते. आपले डोळे दान केल्याने अंध व्यक्तीला उज्वल भविष्याची आशा मिळते, ज्यांची दृष्टी केली आहे, त्यांना नेत्रदान ही दुसरी संधी देते. ०००००

जिल्हा रुग्णालयात जागतिक ऑटीझम डे संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील डिईआयसी विभागामार्फत जागतिक ऑटीझम डे संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, यांनी डिईआयसी कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवाबाबत तर श्रीम. मनिषा कर्चे यांनी ऑटीझम डे च्या अनुषंगाने विस्तृत माहिती दिली. यावेळी अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डिईआयसी स्टाफ विक्रम कांबळे, डॉ. अनुराधा बांदिवडेकर, श्रीम. ॲजेला रॉड्रीक्स, केतन कदम, श्रीम. लोचन चिंदरकर, श्रीम. मनिषा कर्चे, श्रीम. शलाका राणे, संतोष देसाई, रोहन वारंग, ओमकार ठाकूर, तसेच पालक व बालके उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रास्ताविक केतन कदम यांनी केले. बालकांच्या हस्ते केक कापून ऑटीझम डे साजरा करण्यात आला. लहान मुलांसाठी चित्र रंगवणे तसेच इतर खेळ घेण्यात आले. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. ०००००

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाष्ट्रातील नवयुवक नवयुवतीसाठी दिनांक 5 ते 14 मे 2025 या कालावधीत SSB कोर्स क्र. 61 आयोजित करण्यात येत येत आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे 29 एप्रिल 2025 रोजी मुलाखतीस हजर रहाण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. या मुलाखत्तीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pane (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील SSB-61 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे. एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणती...

िल्हा पदोन्नती समितीची सभा संपन्न

ज सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पदोन्नती समितीची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नती व सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे. ग्रामपंचायत विभाग 5, बांधकाम विभाग 2, आरोग्य विभाग 6 असे एकूण 13 पदोन्नतीचे प्रस्ताव सादर केले होते. तसेच सामान्य प्रशासन विभाग 82, ग्रामपंचायत विभाग 93, शिक्षण प्राथमिक विभाग 153, बांधकाम विभाग 6 असे एकूण 334 विभागनिहाय सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव सादर केले. या सभेत प्राप्त प्रस्तावाचे वाचन करण्यात आले आणि प्रत्येक प्रस्तावाची छाननी करुन योग्य प्रस्तवाना मान्यता देण्यात आली, असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) किशोर काळे यांनी दिली आहे. ०००००

सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातुन 02-03 माजी सैनिकांची जिल्हा सैनिक कल्याण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक जे जिल्हा, तालुक्यातील आजी, माजी सैनिकांच्या परिवारांची भेट घेवून त्यांना देय असलेल्या शासकीय तथा अन्य योजनांची माहिती देतात व त्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करतात तसेच त्यांच्या अडी-अडीअचणी प्रसंगी आवश्यकतेनुसार गाव, तालुका, जिल्हास्तरीय प्रशासनाशी समन्वय साधून या अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असतात अशा माजी सैनिकांनी त्यांचे सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र, आधार कार्ड यांची छायांकीत प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 15 एप्रिल 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व आजी ,माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पन्ती, वीरनारी, वीरमाता, वीरपिता, यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारांसंबंधित व इतर प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह...

सोमवारी लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.) : माहे एप्रिल महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्या पहिला सोमवार दि.7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत, जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येणार असल्याची, माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. 000000

राज्य सामाईक प्रेवश परीक्षा 9 एप्रिलपासून

सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का): शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र बी, प्लानिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणाऱ्या MHT-CET २०२५ ही परीक्षा (पीसीबी ग्रुप) दि. ०९ ते १७ एप्रिल २०२५ ( दि.१० व १४ एप्रिल २०२५ वगळून) व (पीसीएम ग्रुप) दिनांक १९ ते २७ एप्रिल २०२५ (दिनांक २४ एप्रिल २०२५ दिवस वगळून) सकाळी ७.३० ते सायं ६.४५ या वेळेत १) एस.एस.पी.एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली, हरकुळ बु. ता. कणकवली व जेबीएफस मेट्रोपोलीटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट (एमआयटीएम) सुकळवाड ता. मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. ०००००

ई आर 1 विवरणपत्र 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्यबळाचे माहे मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 30 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय/ निमशासकीय/ खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकार आहे. मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे. ज्या उद्योजक/आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02362 228835 वर संपर्क साधावा. 000000

जिल्हा परिषदेने दिला 821 लाडक्या लेकींना पाच हजारांचा लाभ

सिंधुदुर्ग दि 29 (जिमाका) जिल्हयातील 821 लाडक्या लेकींना लेक लाडकी योजनेअंतर्गंत पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी पाच हजारांचा लाभ या वर्षात देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात दिनांक 01 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनामार्फत लेक लाडकी योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गंत एकूण 01 लाख 01 हजार रुपये वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत मुलींच्या खात्यावर जमा केले जातात. जन्मानंतर पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा दिला जातो. मुलगी पहिली इयत्तेत गेल्यावर 06 हजार रुपये, इयत्ता सहावीमध्ये गेल्यावर 07 हजार रुपये, इयत्ता अकरावीत गेल्यावर 08 हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर उर्वरित 75 हजारांचा शेवटचा हप्ता असे एकूण 01 लाख 01 हजार रुपये जमा केले जातात. सन 2024-2025 या आर्थिक वर्षात जिल्हयातून एकूण 821 पात्र लाभार्थी मुलींना लेक लाडकी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात रुपये पाच हजार प्रमाणे एकूण 41,05,000/- इतक्या रकमेचा लाभ जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत अदा...

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींच्या सक्षमीकरणाच्या आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) :- मिशन लक्ष्यवेध अंतर्गत राज्यातील खाजगी अकादमींचे सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरीता नियोजनबध्द प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी / विदेशी प्रशिक्षक व संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने "मिशन लक्ष्यवेध" या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक...

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत; अँड्रॉइड ॲप विकसीत

सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) :- जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या तथा सूचनांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे लोकाभिमुख उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. सोबत अँड्रॉइड ॲप विकसीत करण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. शासनाच्या महत्वाकांक्षी 100 दिवस कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री नितेश राणे व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ अद्यावत केलेले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने "थेट जिल्हा परिषद" "पारदर्शक प्रशासन विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे!" हे Android App Developed केलेली आहे. ॲपव्दारे सामान्य नागरिक आपल्या समस्या, सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला थेट घर बसल्या विचारू शकतात तसेच त्यांचा पाठपुरावा (Trackig) सुध्दा त्याच App मध्ये होणार असल्याने नागरिकांना त्यासाठी जिल्हा परिषदेला भेट द्यायची आवश्यकता भासणार नाही. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अंतर्गत प्रसिध्द करावयाच्या 1 त...